पहिले चुंबन

Submitted by UlhasBhide on 15 September, 2010 - 12:16

पहिले चुंबन

अधीरतेने आज गायिले, थरथरणार्‍या अधरद्वयाने
शृंगाराच्या मैफिलीतले, पहिले वहिले गीत मुक्याने

सर्वांगी मोहरला काटा, गात्री गात्री गोड शहारे
घुसमटलेल्या श्वासांमधुनी, सतार मनि झिनि झिनि झंकारे

अमृत गोडी अनुभवण्याचे, भाग्य प्रथम अधरांस लाभता
असुयेने हिरमुसून रसना, करी शब्द ना धरी मौनता

या ओठांना त्या ओठांचे, शब्दाविण संवाद उमगले
अर्धोन्मीलित नेत्रांमधुनी, परस्परांनी भाव वाचले

....... उल्हास भिडे (१५-९-२०१०)

गुलमोहर: 

अप्रतिम कविता.....!!!
अगदी तरल आणि सुंदर.

.............................................
एक निरागस शंका- सध्या माबोवर "मांसाहारी कवितांचा"
अमृतमहोत्सवी सप्ताह सूरू आहे का?

धन्यवाद गंगाधरजी.
.........................................
"मांसाहारी कविता" ?????
बाकी कवितांच मला माहित नाही, पण
माझ्या प्रांजळ मतानुसार,
माझ्या कवितेने सोज्वळपणाच्या मर्यादा
ओलांडल्या आहेत अस मला तरी जाणवत नाही.
........................................

आता शृंगार हा सोज्वळ असतो का ?
हा काही जणांसाठी वादाचा विषय होऊ शकेल.
मी इतकच जाणतो की,
'शृंगार' हा साहित्यातला एक रस आहे.
......................................

आता शृंगार हा सोज्वळ असतो का ?
हा काही जणांसाठी वादाचा विषय होऊ शकेल.
मी इतकच जाणतो की,
'शृंगार' हा साहित्यातला एक रस आहे..........................
....................................................................................
सहि बोललात भाऊ !!!!!
अप्रतिम कविता !!!!!

स्वर्गीय माधुरी अनुभवण्याचे, भाग्य प्रथम अधरांस लाभता
असुयेने हिरमुसून रसना, करी शब्द ना धरी मौनता

>>>> अप्रतिम !!!!

<<निरागसता म्हणजे अज्ञान हे नव्याने उमगले. >>

मांसाहारी कविता न आवडणारे म्हणजे अज्ञानी असतात, हे पण नव्याने उमगले.
धन्यवाद अनुजाकाकू. Happy

.

छान!!!

छान, मधुर शब्दांची रचना!

स्वर्गीय माधुरी ऐवजी 'स्वर्गसुरेला' असे केल्यास बहुधा लयीत यावे असा अंदाज आहे.

प्रणयभावनांचे वर्णन मोहक आहे. शुभेच्छा!

प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद.
----------------------------------------------------
बेफ़िकीर जी,
लयी बद्दल सतर्क केलत, धन्यवाद !
माझ्या कल्पनेनुसार बदल केला आहे.
----------------------------------------------------
प्रसाद गोडबोले,
अवांतर चर्चा सुयोग्य स्थानी नेल्याबद्दल धन्यवाद.
----------------------------------------------------
प्रतिसादाबद्दल सर्वांना पुनश्च धन्यवाद.

इतकी सहज उतरलेली छंदबद्ध रचना, कुठेही शब्दांची ओढाताण नाही, उगाच वृत्त जुळवायला अनाठायी शब्द भरलेले, घडवलेले नाहीत! भाषेचा डौल किती सुंदर ! आणि हे सगळे असून अर्थ-भाव-रसपूर्ण काव्य!!!!!

भरत,
इतक कौतुक ऐकायची सवय नाही हो.
डोळ्यांच्या कडा ओलावल्या.

----------------------------------------------------------------

सर्वांना धन्यवाद.

या ओठांना त्या ओठांचे, शब्दाविण संवाद उमगले
अर्धोन्मीलित नेत्रांमधुनी, परस्परांनी भाव वाचले

भन्नाट!

आजच्या युगात 'शृंगार' रसावरील कविता शैलीला खुप वाचक वर्ग आहे. प्लिज कोणिही टिका करु नये. छान कविता.

----------
जे रसिकांना आवडेल, ते बुध्दिच्या शेतात पिकवावे.
आवडले तर प्रतिसाद नोंदवावे
किंवा फुकाट पुढे जावे.
----------

<<या ओठांना त्या ओठांचे, शब्दाविण संवाद उमगले
अर्धोन्मीलित नेत्रांमधुनी, परस्परांनी भाव वाचले >> अतिशय सुंदर... Happy

Pages