आपलं आणि उत्सवांचं नातं अगदी जवळचं. मग ती दिवाळीतली रोषणाई, सुंदर सजवलेल्या गौरी, एखादे सुंदर सजवलेले ख्रिसमस ट्री किंवा दाराची शोभा द्विगुणीत करणारी गुढी. ही आहेत आपल्या उत्सवांची प्रतिके. या अशा उत्सवांच्या प्रकाशचित्रांचा हा झब्बू.
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
आजचा विषय - उत्सव
तुम्ही पाहिलेल्या/अनुभवलेल्या कोणत्याही सणाचे/उत्सवाचे छायाचित्र इथे टाका आणि त्यातला उत्साह, मजा, जिवंतपणा यासारख्या गोष्टी सगळ्यांपर्यंत पोचवा.
दोन वर्षांपूर्वीची दिवाळी
दोन वर्षांपूर्वीची दिवाळी
संक्रांतीच हळदीकुंकू
संक्रांतीच हळदीकुंकू
आमच्याकडे लेझीमासारखाच
आमच्याकडे लेझीमासारखाच दांडपट्टा हा खेळही खूप लोकप्रिय आहे. लग्नात ही दांडपट्टा पथकं आवर्जून आणतात. दांडपट्ट्याचा खेळ म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातल्या दांडपट्ट्याच्या काळजाचा ठोका चुकवणार्या अनेक करामती. अक्षरशः अंगावर शहारे आणतात बघणार्याच्या. त्या खेळातला हा म्होरक्या.
मोत्यांच्या तयार रांगोळ्यांचे
मोत्यांच्या तयार रांगोळ्यांचे आकार बनवुन काढलेली रांगोळी
आमची मांजरं सतत रांगोळी
आमची मांजरं सतत रांगोळी फिसकटुन टाकतात. म्हणून ही अशी रांगोळी काढलीये.
मस्त विषय. २००९ मधला ख्रिसमस.
मस्त विषय.
२००९ मधला ख्रिसमस.
बेदम खाण्यापिण्याचे पदार्थ
बेदम खाण्यापिण्याचे पदार्थ केले नाहीत तर आपल्याकडचे उत्सव पूर्णच होत नाहीत. हे घ्या फराळ
मोत्यांच्या रांगोळ्या
मोत्यांच्या रांगोळ्या सुंदर!
संक्रांत आणि फराळ पण झकास.
हॅलोविनचे भोपळे
हॅलोविनचे भोपळे
लग्नानंतरचं पहिलं
लग्नानंतरचं पहिलं ल़क्ष्मीपूजन.
मिनी, टोपलीभरून सोन्याचे
मिनी,
टोपलीभरून सोन्याचे दागिणे, सही आहे. रच्याकने इथे तुला लाह्या आणि बत्तासे कुठे मिळाले, इंडीयन स्टोअर मध्ये का?
हो लाह्या बत्तसे इंडीयन
हो लाह्या बत्तसे इंडीयन स्टोअर मध्ये मिळाले. फोटो उडवते.
(No subject)
ह्या वर्षीच्या
ह्या वर्षीच्या गणेशचतुर्थीच्या दिवशीचं दाराचं तोरण.
संक्रांतीचे दागिने
संक्रांतीचे दागिने
दागिने घातलेला पिल्लूचा फोटो
दागिने घातलेला पिल्लूचा फोटो टाकायचा मोह होतोय.
संक्रांतीचा देवाचा नैवेद्य.
संक्रांतीचा देवाचा नैवेद्य. वाटीत तिळगूळ आहे.
हॅलोवीन.
हॅलोवीन.
(No subject)
नाताळची रोषणाई.
नाताळची रोषणाई.
दत्तजयंतीला दत्ताची पालखी.
दत्तजयंतीला दत्ताची पालखी.
गोव्यातील हिंदु घरासमोर तुळशी
गोव्यातील हिंदु घरासमोर तुळशी वृंदावन हवेच. तुळशीचे लग्न तिथे अगदी थाटामाटात साजरे होते. त्यापुर्वी वृंदावन असे सजवले जाते. या चार बाजूंना, गणपति, विष्णु, मारुती आणि गरुड यांच्या मुर्ति असतात. माझे काका दरवर्षी या मुर्तींना असे रंगवत असतात.
देवळाच्या कलशपुजेसाठी मढवलेला
देवळाच्या कलशपुजेसाठी मढवलेला हत्ती.
गोव्यातीलच एका कार शोरुम मधली
गोव्यातीलच एका कार शोरुम मधली क्रिसमसची सजावट
दिवाळी..
दिवाळी..
सही फोटो आहेत.
सही फोटो आहेत.
व्वॉव दिनेशदा.... ख्रिसमस बेल
व्वॉव दिनेशदा.... ख्रिसमस बेल सही आहेत
ही आमच्याकडची दिवाळी:
गोव्यातील साखळी (सांकलेम) या
गोव्यातील साखळी (सांकलेम) या गावी विठ्ठलाचे आणि दत्ताचे सुंदर देऊळ आहे. या २ देवळांच्या मधून एक नदी वाहते. त्या नदीत, त्रिपुरारी पोर्णिमेला मोठा उत्सव असतो. तिथे बोटींच्या मॉडेल्सच्या स्पर्धा असतात. ही मॉडेल्स वर्केबल असावी लागतात, म्हणजे त्या मॉडेल्सना पाण्यातून एक फेरी मारावी लागते. या स्पर्धेशिवाय तिथे नाच, गाणी तसेच सरंगे सोडणे हा एक अनोखा प्रकार असतो. हा संपुर्ण परिसर त्या रात्री, पणत्यांनी सजलेला असतो.
तिथली एक स्पर्धक बोट.
पुण्यात पाषाण ला बालाजी मंदिर
पुण्यात पाषाण ला बालाजी मंदिर आहे. तिथे झालेल्या "कल्याण उत्सव" चा हा फोटो. कल्याण उत्सव म्हणजे बालाजी चे लग्न मधे असलेला बालाजी. हा सोहळा खूप छान असतो बघायला.
हो, हा सोहळा मस्तच असतो
हो, हा सोहळा मस्तच असतो पहायला. मी पाहिलाय वाशीला बालाजी मंदीरात. किती तयारी करतात. आताच झाला वाटते(वाशीची मावसाअजी इती).
Pages