जिसा'चा'राडा चहा स्मारक

Submitted by मीन्वा on 19 July, 2010 - 02:59

जिसा'चा'राडा (पिनाकोलाडा च्या चालीवर) हे चहाचे स्मारक सुप्रसिद्ध चहा प्रेमी श्री श्री रा. (डा. च्च च्च ) रा. चहातज्ञ डॉ. साजिरा यांनी बांधले. हे स्मारक महाराष्ट्र राज्यात पश्चिमेस, रायगड जिल्यात, तालूका खालापूर येथील सुप्रसिद्ध 'यु के'झ रिसॉर्ट (युके! ये वहां है...) येथील भल्यामोठ्या सभागृहात आहे. हे स्मारक १८ जुलै २०१० रोजी मायबोलीच्या वविमधे बांधण्यात आले.

स्मारकाच्या वरील बाजूस कुणाही चहाप्रेमीस हळहळायला लावतील असे काळीज पिळवटून काढणारे उच्चार कोरलेले दिसतात "हा कुणी सांडला चहा ??" सांडलेला चहा, मध्यावर एकात एक घातलेले तीन चहाचे ग्लास, बाजूस एक तरंगणारा कागदाचा छोटुकला बोळा (हा बोळा साजिरा यांच्या पूनम वहीनींची आठवण आहे असे अधिक माहीती काढली असता कळाले) असे अत्यंत नाविन्यपूर्ण असे हे स्मारक आहे. यावर एक खुर्ची आहे जी प्रत्येक चहाप्रेमीस प्रेमाने बोलावते. स्मारक पहायला गेल्यास तुम्हाला या खुर्चीत बसून चहा पिताना फोटो काढता येतो.

बाजूलाच एका दगडावर एक सुरेख चहा काव्य कोरलेले आहे. जे चहा स्मारकाची लज्जत अजूनच वाढवते. कवितेचे नाव आहे 'चहाचा पाढा' (कुणाला पाठ असेल तर लिहा प्लिझ.. (ओवर टू आशू_डी)) हे स्मारक एखाद्या मॉडर्न आर्टप्रमाणेच आहे हे आता तुमच्या लक्षात आलेच असेल.

'चहा' ज्याला भुलोकीचे 'अमृत' असे म्हणतात त्याचे स्मारक बांधण्याची ही अभिनव कल्पना साजिरा यांना सुचली याबद्दल आपण त्यांचे अभिनंदन करु यात. आमच्या प्रतिनिधीने याबद्दल त्यांचे अभिनंदन केले असता "ही एकप्रकारे मी चहाला, भुलोकीच्या अमृताला (अ.आ. आलात? या या.. ) दिलेली मानवंदनाच आहे" असा नम्र अभिप्राय त्यांनी दिला. त्यांचा हा नम्रपणा पाहून आमच्या प्रतिनिधीच्या डोळ्यात खळ्ळकन पाणी आले. "'पाणी वाचवा, पाणी वाचवा' हे पुणे आहे खोपोली नव्हे" अशा आरोळ्या काही लोकांनी दिल्या पण शेवटी ते वाहीलंच! (पाणीच ते..!)

जगात महान लोकांनी बांधलेली अनेक स्मारके आहेत उदा. ताजमहाल. अशी स्मारके कवि आणि कवयित्रींच्या प्रतिभेला नेहेमीच आव्हान देत आली आहेत. 'जिसाचाराडा' हे चहा स्मारकही त्यास अपवाद नव्हेच. अनेक उत्कृष्ट काव्य या चहास्मारकाला पाहून लिहीली गेली.. वानगीदाखल ही खाली दिलेली काही सुप्रसिद्ध काव्ये आठवा

चहा सांडला.. - कवी - देवा
लपविलास तू चहा सांडता.. ओघळ त्याचा लपेल का? - कवयित्री मीनू
चहा सांडून सांडून सांडू नको...कप मांडू नको.. - कवयित्री मीनू

सुप्रसिद्ध गझलकार मिल्या यांनाही या चहाच्या स्मारकाला पाहून एक उत्तम गझल सुचली - तू चहाचा नाद साज्या सोड आता..

या पोस्टखाली वर उल्लेखलेली सर्व काव्ये तुम्हाला लवकरच वाचावयास मिळतील.

वैधानिक सूचना: प्रत्येक चहा आधी '\' वाचावा. न वाचल्यास निर्माण होणार्‍या अर्थातून काही अनर्थ घडल्यास लेखिका जबाबदार नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटल काल संपल असेल चहा पुराण आणि साजीराची खेचा -खेची. साजीराने ( बिचार्‍याने ) २-४ गजल म्हणल्या बसमधे आजीच्या समोर पण छे.

मीन्वा, मस्त विडंबन Lol
देवा सध्या मायबोलीवरुन अंतर्धान पावल्याने त्याने सुचवलेले 'कप मांडला' हे विडंबन काव्य माझ्या किंचित कल्पनाशक्तीला ताण देऊन स्मारकावर अर्पण करते.
(खेळ मांडला : नटरंग)

चहा सांडला

तुझ्या हातामंदी एक कप राहत नाही
वाफ ऊन चहाची ती हातावर येई
तरी साज्या सरंना यो भोग कशापायी
हरवली बशी कुठे कळंना रं काही..

वाफाळून ओततो रे चहा तुझ्या कपा
वणवा यो उरी पेटला..
कप मांडला.मांडला मांडला .
कप मांडला ... साज्याsss, कप मांडला!

भांडली मीनू कशी रे घेतला धसका तुझा
तूच पिऊन दाखव रे कप मांडला जुना
चावी साज्या मार पुन्हा मीनूपुढे र्‍हा हुबा
यो तुझ्याच खुर्चीखाली चहा सांडला पुन्हा

फिसकलं गणगोत सारं आधार कुणाचा न्हाई
ओघळल्या चहा परी जिणं डिफेन्स सुचत न्हाई
बळ दे झाकायाला खुर्चीची ढाल दे
विनवीती पंचप्राण साजिर्‍यास त्राण दे
हरपलं भान त्याचं छळलं चिकार
तरी न्हाई साज्या चिडलाsss
कप मांडला.मांडला मांडला .
कप मांडला ... साज्याsss, कप मांडला!
चहा सांडला सांडला सांडला
कसा चहा सांडला चहा सांडला!

साज्या खरंच रे आता हे एवढ सर्व वाचुन चहापेक्षा मला तुझीच जास्त काळजी, वाटायला लागली की रे गड्या, फार धसका घेउ नको रे.. वर स्वर्गात चहा मिळत नाही म्हणतात............

विडंबन सगळी भारेच्ज त्या कपाला, सांडलेल्या चहाला आगदी भरुन आल्म असेल, अगदी मोक्ष प्रापतीचा आनंद की......

मीन्वा.. आशू.. Lol __/\__
हायला मला वाटले, काल मी लवकर पळून गेल्यावर एव्हाना चहा थंडावला असेल. पण इथे तर नवनवीन उकळ्या फुटताहेत. Lol त्या शहीद झालेल्या चहाचं आणि कपाचं काय बाबा नशीब. Proud

आण्णा, सोळा आणे बोलला होतात बघा तुम्ही. तमाकु आणि चहा तिथे मिळत नाही म्हणून. इथेच भरपूर चहा पिऊन घेईन म्हणतो.

ववि संपले, सारे निघाले, युके विनवी पकडून बाही..
इथेच चहा सांडून घ्या रे, असा चहा पुन्हा नशिबी नाही!
Happy

Pages