वानु फोटोच्या रुपाने

vanya.jpg

vanya1.jpg

vanya2.jpg

हा आमचा वानु - तुम्हा सर्वांसाठी


खरच , खुप छान आहे तुमचा वानु............
त्याच्याबद्दल वाचल्यानंतर खुप उत्सुकता होती त्याला भेटायची ... फोटोमुळे काहि अंशी पूर्ण झाली....



किती छान आहे. अगदी शहाणं वाटतं आहे. स्मित आता जाऊन त्याची(म्हणजे वानूची) दृष्ट काढा. स्मित



आत्ता म्हणजे कसं गार गार वाटलं. वान्या कसा असेल, कसा असेल.... असं आपल्याच शेपटाभोवती फिरून फिरून माझं ल्हा ल्हा झालं होतं स्मित

टण्याभाव, हा वान्या तुमच्या अन मीनाताईंच्या घरचा आहे होय.... दोघेही जबरी लिहिणारे आहात.... काय सांगता येत नाही... वान्यालाही येत असेल (इतकं दोघेही छान लिहिता)!
खूप लिहा... आम्हाला खूप वाचायला मिळू दे. एक निखळ आनंदाचं गाव लागतं तुमचा लेख 'लागला' की... खरच.



अरे हा तर खूपच सुंदर आहे. जर्मन शेपेर्ड आहे का? चेहरा नीट दिसत नाहीय. आवडला. पण हा पॉपिलॉन नाही वाटत आहे?(जात नाही काढत आहे पण कुतुहलाने विचरतेय). स्मित
आय मीस माय सीन्डी.(माझी कुत्री).



मनुस्विनी, मलाही कुत्र्याच्या जातीतल फारस कळत नाही. पण पॅपिलॉन ही एक कादंबरी आहे. पॅपिलॉन हे तिच्या नायकाचे टोपण नाव- याचा अर्थ फुलपाखरु. या नायकाला काही गुन्हा नसताना केवळ सूड म्हणून तुरुंगवास होतो. तोही फार भयानक. ही एक आयुष्याशी टक्कर घेणार्‍या नायकाची सत्यकथा आहे. हा तीनदा पलायन करतो. तिसर्‍या वेळी यशस्वी होतो. आम्ही वान्याला पॅपिलॉन म्हणायचो, ते त्याच्या स्वातंत्र्यप्रेमामुळे. गच्चीत वानू दूरवर बघत बसला की हेलेना बेटावरचा नेपोलियनही म्हणायचो.



मनु, तुमचा लेख ही वाचला, अन वान्य चे फोटो हि छान आहे,

आमचा जिमी पण असाच होता सेम अगदी हुबेहुब ...तो ही धनगराकडुन आणला होता...पण धनगरी नव्हे ही मिश्र जात असेल...
मला एका श्वान प्रेमी ने सांगितले होते की मिश्र जातेचे श्वान नेहमीच उत्तम असते. शुद्ध परकीय जाती पेक्षा मिश्रीत प्राणी आपल्या इथे खास करुन गावा कडे चांगले सूट होतात. असो तुमचा वान्या आवडला... तुमच्या लेखा मुळे माझ्या लहानपणिच्या माझ्या एका मुक मित्रा ची त्याच्या आजार पणात त्याच्या साठी सलाइन धरुन बसुन काढ्लेल्या दिवसानन्ची आठ्वण झाली....खुप लळा लावतात हो हे मुक जिव...



आता कशी ओळख पूर्ण झाली.
आमच्याकडेही दोन कुत्रे होते, पण ते दोघेही पाण्याला खुप घाबरायचे. त्याना अंघोळ घालणे महाकठीण असे. त्याना बरोबर कळत असे आणि मग ते लपून बसत असत.
हा वान्या मात्र हौसेने पाण्यात जातोय.



खूप छान आहे तुमचा वानू. लेख ही खूप छान होते .



बेडेकर,

तुमची लेखन प्रतिभा खरच अतिशय छान आहे. तुमचे लेख वाचून जसा वानू कल्पीलेला तसाच आहे.



अप्रतिम्!तुमचे लेखन आणि वानुही.शब्द्च सुचत नाहीत.फुलापानासारखे एक् रुप झालेला तुम्ही.
पुस्तक् रुपात हे लेखन प्रसिध्द करा ना,मग मायबोली बाहेरील वाचकानाही हे सुन्दर लिखाण वाचायला मिळेल.



तन्याजी,
वानु फोटोत जेवढा छान दिसतो त्याहुनहि कितितरि पटीने मनाला भावतो तो तुमच्या लिखाणातुन...
काल ब-याच दिवसांनि मायबोलिवर कथा कादंबरिकडे वळले... आणि प्रथम भेटला तो वानु... मग वाचण थाबंण शक्य नव्हते... खरच फारच छान लिहिता.

बर्वे यांना मी अनुमोदन देते, पुस्तकरुपात तुम्हि हे लिखाण करा, म्हणजे वानु सर्वांच्या परिचयाचा होईल.



छान आहेत फोटो...
या सर्व गोष्टीतुन हे समजते कि प्राण्यांना पण माया समजते. नाही का?
(माणुस हा पण एक प्राणीच आहे. फक्त विचार करण्याची जास्त शक्ती असल्याने त्याला कधी कधी त्या मायेची जाणीव होऊनही किंमत कळत नाही हे दुर्भाग्य स्मित )



अप्रतिम!!!! ...... खुप छान , सुरेख लिहिता तुम्हि ...... तुमचा वानु खुप सुंदर आहे .... तुमच लिखाण वाचताना मन अगदि गुंतून जातं ....डोळ्यासमोर चित्र उभं रहातं.....मनाला स्पर्श करतो तुमचा लेख.



लेखमालिका उत्तम उतरली आहे. प्रसंगांचे तुकडे जिवंत झाले आहेत.

वानूचे, 'त्याचे' आणि तुमचेही कौतुक वाटले.



मीनाताई, गोड आहे हो तुमचा वानू.. तुम्ही त्याला दिलेले पॉपीलानचे नावही समर्पक वाटले. बर्वे ताईंना माझा दुजोरा आहे. तुम्ही जर मराठी साहित्याचा विचार केला तर अशा विषयांवर पुर्वी कुणी लिहीलेलं जर असेल तर ते खूपच कमी लेखकांनी आणि तुमची तर ही खूप मोठी लेखमाला आहे. जरूर एक पुस्तक काढा ह्यांच. सचित्र..