एक दिवस पोटदुखीचा

Submitted by वर्षा_म on 21 June, 2010 - 07:54

हलकासा आवाज
नाकाला रुमाल
कोण रे ते
सगळ्यांचा सवाल

पोटात गुडगुड
चेहर्‍यावर वेदना
लडखडती पाउले
चकरा संपेना

दिवसभर लंघन
थोडीशी खीर
चकरा मारुन
गळाला वीर

पडलेला चेहरा
टाकलेली मान
टमरेलची अपरिहार्यता
पोटदुखी महान

गुलमोहर: 

वर्षा ........ सर्दी बरी माझी......... पोटदुखी पेक्षा...असं वाटायला लागलं आता Rofl

Rofl

काय लोक काय काय एक एक अनुभव सांगायला लागलेत Rofl कोणी झुरळ, कोणी ढेकुण तरे कुणी हे................यावर एकच उपाय गोटॉल प्या.....थोड नाकाला लावा रुमाला ऐवजी Rofl
वर्षे विनोदाचा भाग सोडला तर रचना, रायमिंग एकदम परफेक्ट........डोळ्यासमोर चित्र उभं राहीलं Lol

जब्बरदस्त.
मंदार जोशी, निंबुडा : - काही औषध आहे का? गोटॉल सारखं? Rofl

आणि कोणी का.का.क. प्रसवली म्हणु नका. पोट साफ झालंय वीराचं Light 1 Happy

Rofl Rofl
_/\_

काहीही चालू आहे. काहीच्या काही कवितेच्या नावाखाली काय वाट्टेल ते पाडायला लागलेत लोकं... खरोखर आरोग्य विषयक बाफांवर असावेत असे प्रश्न कवितेच्या रूपात स्वतंत्र बाफ उघडून का लिहीताहात? बरं, काहीच्या काही कविता आहे, लिहीण्याची ऊर्मी आहे सगळं मान्य केलं तरी दर्जाचा प्रश्न येतोच की..

छ्या...
पोटदुखीवर पुर्वी काय एकेक कविता असत.
आजकालची मंडळी म्हणजे....
खरंच, दर्जा राहिला नाही.

हलके घ्या, भाऊ हलके घ्या, हलके घ्या हो हलके घ्या.
डाएट असेल तर भाजुन घ्या, डाएट नसेल तर तलके घ्या Light 1

:):)

Pages