१२ जून , २०१० .. काळ्या मेघांचा गळका, फाटका रेनकोट घालत दिवस उजाडला. ठरल्याप्रमाणेच मी ही सकाळी उठलो अन एक गोड आवाज ऐकण्यासाठी मोबाईलमधला नं रि-डायल केला, अन ऐकमेकांच अभिनंदन केलं. अभिनंदन ! कशाचं?? अहो आमच्या नातेसंबधाला तब्बल ५ वर्षे पुर्ण झाली. कसे गेले हे दिवस, कितीसे मंतरलेले , कितीसे सुखाचे अन कितीसे अंतरातल्या विरहात चिंब भिजलेले याची भराभर पाने डोळ्यासमोरून उलटून गेली अन प्रत्येक पानावरं लिहिल्याप्रमाणे क्रमश: हा शब्द मनाला आनंद देवून गेला. सकाळची तयारी करून घर सोडलं अन ६.५५ च्या लोकल मधे बसलो. संपुर्ण पिंपरी लोकल प्रवास, ५ वर्षातल्या गुलाबी आठवणी गोंजारण्यातच गेला. लोकलमधून स्टेशनवर पाय टाकणार तोच तीचा फोने आला. "व्यवस्थीत पोहचलास ना रे ? पाऊस जास्त नाहिये ना ? मी अजून कर्जत स्टेशनवरच आहे.. तू लवकर खोपोलीला ये.. की मी येऊ लोणावळ्यापर्यंत मग आपण तिथूनच अलिबाग ला जाऊयात का ? मी फक्त तीचा आवाज ऐकत होतो अगदी भान हरपून.. तेवढ्यात तीने विचारलं काय झालं रे, मूड नाहिये का तुझा, नको जाऊया का आपण कुठेच? तेवढ्यात मी जागा झालो, आसवांच्या धुक्याला पुसून मी येतोय २० मि. खोपोलीमधे तू पण पोहचं एवढं बोललो अन फोन ठेवला.
मी खोपोलीला पोहचलो, एस टी स्टँड वर ! पाऊस हलकाशा शिरकाव करत होता अन घरी परतणार्या पिल्लांची अन माय बापांची लगबग चालु होती स्टँडवर. चौकशीअंती मला कळालं की अलिबागला जायला २:३० तास लागतात. ९:३० ची एसटी आहे. फोनाफोनीवरून तीला कळवलं अन १५ मि. एकटाच वाट पाहत बसलो. आधी ती यावी अन मग एस टी.. या अपेक्षेत ! पण तिच्या आधी कधी नव्हे ते वेळेवर एस टीच आली. ९ वाजताच एस टी ?
तेवढ्यात रिक्षातून ती उतरली अन ओरडून म्हणाली एसटीत जाऊन जागा धर मी आलेच. मी जागा धरली पण माझ्या शेजारची जागा occupied होती अन तीच्या शेजारचीसुद्धा. पुन्हा जवळ बसता येत नाही म्हणून हूरहूर. ऐकमेकांकडे फुटभर अंतरात पाहणे सुद्धा कसे से होत होते. कारण ते अंतरही नकोसं झालं होतं पण काय करणार ! थोड्या वेळाने पेण जवळ दोघांना बसता येईल असं सीट मिळालं लगेच तिथे जाऊन बसलो. प्रवास चालूच होता एसटिचा अन आमच्या प्रेमाचा सुद्धा. एसटी एक एक झाड, नद्या नाले यांना हाय बाय करून चालत होती तर मी अन ती डोळ्यातल्या नजरेला आपल्याला हवे असे अर्थ लावून ओठांवर स्मिताचे कारंजे उसळत होतो. या सगळ्यात प्रवास कसा संपला ते कळलंच नाही. अन एसटी ने अलिबागमधे जो ब्रेक लावला तोच आमच्या २ तासांच्या date on whleels ला लगाम लागला. अलिबागमधे उतरल्यावर तीच्या चेहर्यावर कमालीची सुखे चमकत होती. अगदी भर दिवसा चांदण तिच्या चेहर्यावर पडल्यासारखं भासत होतं. ती उतरली तेव्हा हळूच म्हणाली , मला थोडीशी भूक लागलीये. मी ही म्हणालो मलाही लागली होती पण आता पोट भरल्यासारखं वाटतयं, बघ ना ढेरीवर तीचा हात ठेवून. ती हसली अन म्हणाली नाटकं करू नकोस, चल काहीतरी खाऊन घेवूया. अन मग नाश्त्यासाठी व्हेज हॉटेल शोधण्याचा आमचा प्रवास सुरू झाला. सगळी कडे मासांहाराचे बोर्ड वाचून तीला कसतरी होत होतं, तीची भूक मरणार तोच आम्हाला एक व्हेज हॉटेल मिळाल. नेहमी प्रमाणेच मिसळ पाव ! अन एखादी वेगळी अशी डिश म्हणून आम्ही ढोकळा पकोडा डिश वर ताव मारला, आंबा पन्ह ढोसलं अन किनार्याच्या रस्त्याकडे निघालो.


एखादं जहाज कसं लाटेचा हात धरून खवळलेल्या सागरात किनारा शोधतं तसं आम्ही सागर किनारा शोधत होतो. फरक फक्त एवढाच कि त्याचा प्रवास पाण्यातला असतो अन आमचा मात्र जमिनीवरचा होता. किनार्यावर पोहचतात, अलिबाग समुद्र किनार्यावर एक गर्दी दिसत होती. सगळे लोक कट्यावर उभे होते. सागर किनारा कुठेच दिसत नव्ह्ता. मला तर एका क्षणी आपण चुकीच्या ठिकाणी तर आलो नाहीये ना असचं वाटलं. पण समोरचा किल्ला पाहून आपणचं बरोबर आहे, कदाचित समुद्रचं चुकतोय अस वाटलं. तिथे फुटपाथवर उभे राहीलो तेव्हा ऐकमेकांकडे पाहिलं अन वाटलं ह्या सागरासारखंच आपण एकत्र जगायचं. कधी शांत राहून तर कधी आलेल्या वादळाला प्रयत्नांनी शमवून. नंतर तिथे आम्हाला बसायला एक बाकडं मिळालं. त्या बाकडयावर बसून उधाण आलेल्या सागराला न्याहळत होतो. ३ फुट उंचीच्या लाटा उसळत होत्या. अन कधी त्या लाटा ऐकमेकांना बिलगून पुन्हा क्षणात विलग व्हायच्या कोणीतरी पाहतयं या लाजेनचं असावं बहूतेक त्यांच ते वागणं. आम्ही मात्र त्यांच बिलगण अगदी घट्ट हातात हात घालून पाहत होतो. अता , अलिबाग सारख्या गर्दिच्या किनार्यावर बसून एवढचं करणार ना आम्ही
नाहीतर मग मोबाईलवर हा सागरी किनारा, ओला सुंगध वार, ओल्या मिठित येतो अंगावरी शहारा असं काहीसं झालं असतं. तिला थोडीशी पाण्याची भीती वाटत होती म्हणून ती उसळणार्या लाटांजवळ यायला घाबरत होती, पण मी आहे ना या माझ्या एका वाक्यानेच ती माझ्याबरोबर त्या पायर्यांवर बसायला तयार झाली जिथे एवढ्या मोठ्या लाटा सुद्धा खुज्या ठरून गेल्या. लाटांच्या उसळत्या कारंजांमधे आम्ही भिजलो. काही फोटोही काढले अगदी योगेश२४ ने काढलेले हा सागरी किनारा थिम सारखे आम्हीही फोटो काढले. बालवयातले दोघे बहीण भावंडे अन उतारवयातले आजी अजोबा पण तरूण वयातलं कोणी सापडेच ना तेव्हा आम्ही दोघांनीच तिथे उभा राहून फोटो काढून घेतला.:फिदी:

मागे वळून पाहीलं तर तीचं लगेच सुरू झालं, मला पानीपुरी खायची, नारळ पाणी अन त्याची मलाई खायची. कणीस खायचं. तेव्हा मी मनातल्या मनात म्हणालो ५ वर्षात मी असले खाण्याबाबतीचे हिचे हट्ट कधीच अनुभवले नव्ह्ते. तेव्हा त्या गाड्याकडे चालत असताना तीला माझ्या दोन मैत्रिणींची आठवण झाली ज्यांच्याबद्दल एक वर्षापुर्वीच तीला कळालं होतं. जेव्हा तीला कळालं मी लपवलेलं काही तेव्हा फक्त तिच्या सुखासाठी माझ्या आयुष्यातल्या दोन पानांना मी अक्षरशः फाडून माझ्या डायरीच्या कव्हर मधे लपवलेलं होतं. वर्षभर प्रेमाच्यातर सोडाचं पण औपचारिकतेचं सुद्धा साधं भाष्य केलं नव्ह्त त्यांच्या सोबतं. आपल्याच काळजाच्या तुकड्यांशी इतकं कठोर वागतं का हो कोणी, पण माझ्या आयुष्यात माझ्या अन तिच्या अखंड सौख्यसाठी मी हे दु:ख पत्करलं अन वर्षभर ते पाळलं सुद्धा. ती सरळ सरळ फोन हातात देवून फोन लाव म्हणाली, मला तर काही कळेचना मी फोन लावला ऐका मैत्रीणीला तेव्हा ती सुद्धा कुठेतरी फिरायला गेली होती, रोमिंग मधे असूनही मी बोलतोय तो ही तब्बल एक वर्षानंतर हे ऐकून बोल म्हणाली अन माझ्याशी अबोला, भांडन ह्या सगळ्यांना वाव देण्याआधी माझं नव्याने वसलेल्या गावाविषयी तिने कुतूहलाने विचारलं.
मला बरं वाटलं , तिची खुशाली ऐकून. अन तिला बरं वाटलं आमच्या दोघाची खुशाली ऐकून. मला मात्र जरासं वेगळचं वाटत होतं. मग आम्ही पाणीपुरी खाल्ली, नारळपाणी अन मलाई सुद्धा खाल्ली, काही मलाई तिच्या नकाला लागलेली पाहून हसलो सुद्धा ! पुन्हा परतीचा प्रवास , स्टॅंडकडे चालत जाऊ लागलो अन पुन्हा एक धक्का फोन घे अन तुझ्या दुसर्या अन सगळ्यात जवळच्या मैत्रीणीला फोन लावं. मी थरथरत फोन हातात घेतला अन पटकन तिचा फोन नं पुटपुटत डायल केला तेव्हा म्हणाली , माझे नं सुद्धा असेल ना रे तुझ्या लक्षात की रिडायल करूनच लावतो नेहमी. अन उगाच हसली. मी त्या मैत्रीणीला फोन लावला तेव्हा ती व्यस्त, फोनची रेंज व्यस्त. निटसं बोलण झालं नाही किंवा माझ्यावरच्या रागाने तीने ते होऊच दिलं नसावं बहूतेक. पण ती सुखात आहे हे कळल्यावरही माझं समाधान झालं नाही तिने फोन कट केला. थोडं गप्प बसून आम्ही पुन्हा चालू लागलो , अन मीच तिच्या हातून फोन घेतला अन पुन्हा मैत्रिणीला फोन लावला तर तिचा फोन बंद आहे अस समजलं. तेव्हा मला जाणवलं की तिला सुद्धा आमच्या सुखातलं पुन्हा एकदा सतावणारं अंतर पहायचं नव्हतं म्हणूनच बंद केला असेल फोन तिने कदाचित ! चालत चालत थोडासा रस्ता हरवत आम्ही एस टी स्टँडवर पोहचलो. तिथे अलिबाग सातार एस्टी लागलेली. आम्ही त्या बस मधे चढलो तर पुन्हा घोळ १८ ते २० अशी तीन सीट्स पोयनाड पासून रिझर्व केली आहेत तेव्हा तुम्ही बसा पण तिथून पुढे तुम्हाला उभ राहून प्रवास करावा लागेल अस वाहकाने नम्रतेनं सांगितलं तरिही आम्ही तिथेच बसलो नशिबाचं कौल आजमवयाचा असं ठरवून.
आम्ही पहिल्यांदा पेण पर्यंतची तिकीटे काढली, अन जायचं होतं खोपोलीला:फिदी: कारण प्लॅन बी वापरला. रिझर्वेशन वाले आले तर पेणला उतरून दुसर्या एसटीत बसायचं नाहीतर पेण पर्यंत कोणी नाही आलं तर पुढच्या प्रवासाचं तिकीट काढायचं. प्रवास सरु झाला, कुठेही एस टी थांबली कि वाटायच आले रिझरवेशनवाले ! नशिब आमच्या सोबत होतं म्हणून पेण पर्यंत कोणीच आलं नाही. पेण मधे तिला एक फ्रूटी घेवून दिली तेव्हा ती फ्रूटीचे फुरके घेत म्हणाली कसं होतं माझं गिफ्ट मी गप्प बसून तिच्या डोळ्यात एकसंथ पाहून फक्त डोळे पाणवले अन खोपोली ऐवजी मी खंडाळ्याचं तिकीट काढलं. अन खंडाळ्यापर्यंत फक्त तिच्याकडे बघत बसलो होतो. खंडाला आला तेव्हा शुटींग पाँईटवर काळ्या नभाच्या गर्दित दाट धुक्याच्या सानिध्यात एक भेट घडली अन मी कधी न व्यक्त झालो होता असा व्यक्त झालो. न शेवटी डोळे पुसत म्हणालो , मला अशीच प्रेयसी हवी होती.. जी बायको झाल्यावरही शेवटपर्यंत प्रेयसी म्हणूनच राहील. तीने डोळे पुसले अन आम्ही खंडाळा स्टेशनवर जाऊन दोन विरुदध दिशेला जाणार्या गाड्यांची वाटं पाहू लागलो. मला ह्या विरुद्ध दिशेची भयंकर चिड येते ती अश्याच वेळी. एवढं मिठीतून एकत्र आलेली दोन शरीरे ह्या यंत्राच्या गाड्या विरुद्ध् दिशेला घेवून जातात. मला बाय करून ती डेक्कन एक्सप्रेस मधे बसली अन मी सुद्धा फ्लाईंग किस देवून सिंहगड एक्स्प्रेस ज्या फलाटावर येते तिथे आजच्या दिवसाची उजळणी करत बसलो..
आत तुम्हीच सांगा, कसं होतं तिच गिफ्ट अन माझं गिफ्ट. पण एवढचं सांगेल आयुष्यभर लक्षात राहील असंच गिफ्ट तिने मला दिलं. अन त्या गिफ्ट बद्दल मला उघडपणे सांगताना मला जराही संकोच वाटला नाही. वपुर्झांनी लिहिल्याप्रमाणेच बायकोने प्रेयसी म्हणून जगाव आपल्या संसारात ! याचा मला लग्नाआधीच साक्षात्कार झाला.
किरणा.................... काय
किरणा.................... काय लिहु रे प्रतिसादात????? शब्दच सुचत नाही. सध्यातरी तुमच्या भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छाच देवू शकतो.
तरीच म्हटंल काल (१२जुन) याचा फोन out of coverage area का सांगतोय सारखा.
;-).
मला ह्या विरुद्ध दिशेची भयंकर चिड येते ती अश्याच वेळी>>>>>
तरीच हां तरीच! एवढ्या सुंदर
तरीच हां तरीच! एवढ्या सुंदर प्रेमकविता तुझ्या लेखणीतून झरताहेत!!
असाच रहा!!तुमच्या भावी आयुष्यासाठी माझ्याकडून खुप खुप शुभेछ्चा!!
तिच नाव सांग ना "उखाण्यातच हां!
नशीबवान आहात दोघही खूप खूप
खूप खूप शुभेच्छा भावी आयुश्यासाठी...
सुक्या.. अभिनंदन रे... आणि
सुक्या.. अभिनंदन रे... आणि खुप खुप शुभेच्छा !
(No subject)
आता आम्ही काय लिहायच?? सगळच
आता आम्ही काय लिहायच?? सगळच तर तू लिहिल आहेस.
इथे मला कोणाचं तरी ( बहुतेक
इथे मला कोणाचं तरी ( बहुतेक वपुंच ) एक वाक्य आठवतय ... more you become personal , more you become universal !!
छान लिहिल आहेस रे !!!
माझ्या पण खूप खूप शुभेच्छा रे
माझ्या पण खूप खूप शुभेच्छा रे सुक्या तुम्हाला
छान लिहिलंयस आता वविला
छान लिहिलंयस
आता वविला येणारे ना ती?
धन्यवाद सगळ्यांना , अजूनही मी
धन्यवाद सगळ्यांना , अजूनही मी शनिवार मधेच रमलेलो आहे असं वाटतयं.
तेरी तलाश, उसकी दिलकशी रहे
तेरी तलाश, उसकी दिलकशी रहे बाकी, खुदा करे के ये दिवानगी रहे बाकी
मला ह्या विरुद्ध दिशेची भयंकर चिड येते ती अश्याच वेळी. एवढं मिठीतून एकत्र आलेली दोन शरीरे ह्या यंत्राच्या गाड्या विरुद्ध् दिशेला घेवून जातात.>>> इस दौर-ए-जहांसे हम भी गुजरे थे कभी! काय मुश्किल दिवसांची आठवण करुन दिलीस यारा!
मला अशीच प्रेयसी हवी होती.. जी बायको झाल्यावरही शेवटपर्यंत प्रेयसी म्हणूनच राहील>>> हे होण्यासाठी शुभेच्छा! कारण ते फार अवघड असते!
सुर्यकिरण जी अभिनंदन !!! ...
सुर्यकिरण जी अभिनंदन !!! ... आणि खुप खुप शुभेच्छा !
आणी धन्स अलिबागचे फोटो टाकल्याबद्दल
खतरा! सही हे दोस्ता.......
खतरा!
सही हे दोस्ता.......
अत्यंत व्यक्तिगत आणि केवळ
अत्यंत व्यक्तिगत आणि केवळ दोघांपुरत्या मर्यादित ठेवण्यासारख्या आठवणी अश्या ओपन फोरमवर का लिहील्यात कळत नाही.
सुकी, तू लिहिलं आहेस खूप छान
सुकी, तू लिहिलं आहेस खूप छान पण मला पण मंजू म्हणते तसंच थोडं वाटलं होतं. म्हणूनच मी तुला विचारलं की ती वविला येणार आहे ना? हे सगळं पब्लिक झालेलं तिला आवडेल का ते तिला विचारुन बघ. कदाचित तिला तुम्हा दोघांच्यातले हळूवार क्षण सगळ्यांना माहित झाले हे कळल्यावर कानकोंडं होईल. गैरसमज करुन घेऊ नकोस
मंजूडी आणि अश्विनी सारखीच
मंजूडी आणि अश्विनी सारखीच माझी ही प्रतिक्रिया झाली वाचता वाचता......
पण प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा पुरुष आणि स्त्री दोघांचाही अँगल वेगेवेगळा असतो. स्त्रीला जी गोष्ट लपवून ठेवावी वाटते/खाजगी वाटते त्या बद्दल मे बी पुरुषांचा "त्यात काय आहे न सांगण्यासारखं" असा दृष्टिकोन असतो.
सुकि, तुला आणि तिला खुप खुप शुभेच्छा!!
जन्मभर नातं असंच टिकवा.
( मुळ लेखाला सोडुन प्रतिसाद
( मुळ लेखाला सोडुन प्रतिसाद देत आहे , सुर्यकिरण .... माफी )
अत्यंत व्यक्तिगत आणि केवळ दोघांपुरत्या मर्यादित ठेवण्यासारख्या आठवणी अश्या ओपन फोरमवर का लिहील्यात कळत नाही. >>>
मायबोलीवर काय लिहायचं अन काय लिहायचं नाही याची एकदा आपण लिस्टच का देत नाही ??

जरा काही ऑफबीट लेखन दिसलं कि त्यावर काहीतरी कारण काढुन तुटुन पडायची सवयच आहे आपल्याला असे दिसते !!
मायबोलीवर काय लिहायचं अन काय
मायबोलीवर काय लिहायचं अन काय लिहायचं नाही याची एकदा आपण लिस्टच का देत नाही ??
लिस्ट मी कशाला द्यायला हवी? आपल्या खाजगी जीवनापैकी काय उघड करायचं आणि कुठे उघड करायचं हे प्रत्येकाला कळायला हवं. शेवटी मायबोली.कॉम कितीही आपलीशी वाटली तरी एक पब्लिक फोरम आहे. इथे लिहिल्या जाणार्या माहितीचा कोणी गैरफायदा तर घेणार नाही ना अशी भिती प्रत्येकाला थोडीतरी वाटायला हवी.
जरा काही ऑफबीट लेखन दिसलं कि त्यावर काहीतरी कारण काढुन तुटुन पडायची सवयच आहे आपल्याला असे दिसते !!
कुठलीतरी जुनी जखम ठुसठुसतेय असं दिसतंय...
मस्त !!
मस्त !!
जरा काही ऑफबीट लेखन दिसलं कि
जरा काही ऑफबीट लेखन दिसलं कि त्यावर काहीतरी कारण काढुन तुटुन पडायची सवयच आहे आपल्याला असे दिसते !! >>>
प्रसाद, चिडु नकोस ना! इथे सुकि ने इतकं छान प्रेमगद्य लिहिलंय. आणि तू वादाला तोंड का फोडतोयस?
मंजूडी आणि अश्विनीने फक्त एक concern बोलून दाखवला. आणि ते पण सुकि च्या 'ती' च्या संभाव्य प्रतिक्रियेचा विचार करून!!! इथे लिहिल्या जाणार्या माहितीचा कोणी गैरफायदा तर घेणार नाही ना या भितीपोटी रे!
सुकि, छान लिहीलयस!
सुकि, छान लिहीलयस!
कुठलीतरी जुनी जखम ठुसठुसतेय
कुठलीतरी जुनी जखम ठुसठुसतेय असं दिसतंय...
>>>
हा हा हा , अगदी बरोबर !!! तुम्ही इथे इतरांना जखमा करायला येता, आणि जमेल तितक्या करता हे तुम्हाला मान्य आहे तर !!
>>>
निम्बे , कोणाच्याही कोणत्याही स्वातंन्त्र्यावर घाला घालायचा यांना काय अधिकार ?? असल्या मॉरल पोलीसिन्ग ला मी रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांची उपमा देतो , रस्ता आपल्या बापाची प्रॉपर्टी असल्याच्या अविर्भावात काय करायचं अन काय करायचं नाही सांगत असतात
(((शिवाय बर्याचदा धर्म , संस्क्रुती चा आधार सांगत असतात अन उगाचच ते बदनाम करत असतात ते वेगळेच ...)))
>>> ज्याला खरी काळजी असेल तो विपु ने कळवेल ....उगाच असं सगळ्ञां समोर ज्ञान पाजळणार नाही .
असो बाकी . या पुढे मला काही बोलायचं नाहीये .
:शांत:
निम्बे , कोणाच्याही कोणत्याही
निम्बे , कोणाच्याही कोणत्याही स्वातंन्त्र्यावर घाला घालायचा यांना काय अधिकार ?? असल्या मॉरल पोलीसिन्ग ला मी रस्त्यावरच्या कुत्र्यांची तुलना देतो , रस्ता आपल्या बापाची प्रॉपर्टी असल्याच्या अविर्भावात काय करायचं अन काय करायचं नाही सांगत असतात
शब्द सांभाळून वापरा....
आपण कुठे, काय, कसं लिहितो ह्याचं तारतम्य प्रत्येकानेच बाळगलं तर बरं होईल. म्हणजे काय की लोकं जखमा करायला येणार नाहीत. बाकी तुम्ही वर जे अपशब्द वापरले आहेत त्यावरूनच तुमची प्रवृत्ती दिसून येते. तुम्ही स्वतःचंच हसं करून घेताय ह्यात...
निम्बे , कोणाच्याही कोणत्याही
निम्बे , कोणाच्याही कोणत्याही स्वातंन्त्र्यावर घाला घालायचा यांना काय अधिकार ?? असल्या मॉरल पोलीसिन्ग ला मी रस्त्यावरच्या कुत्र्यांची तुलना देतो , रस्ता आपल्या बापाची प्रॉपर्टी असल्याच्या अविर्भावात काय करायचं अन काय करायचं नाही सांगत असतात
शब्द सांभाळून वापरा बरं का...
>>>
उपमा मॉरल पोलीसिन्ग ला दिली आहे ....आपल्याला नाही . हां अर्थात आपण त्यात असाल तर....
""शब्द सांभाळून वापरा बरं का..."" हे जर आपल्याला कळालं असतं तर इतकं लिहायची वेळ आली नसती.
असो.
मी थांबत , उगाच इथे वाद घालचा नाहीये म्हणुन .
इथे ज्ञान पाजळण्याचे कारण नाही . कळावे .
अरे कशाला भांडताय, मंजूडी
अरे कशाला भांडताय, मंजूडी माझ्यासाठी ते अतुलनीय होतं म्हणून मी ते इतरांसोबत शेअर केलं. निर्माल्य कितीही नदित बुडवण्याचा प्रयत्न केला की ते पाण्यावरचं तरंगत अन ते जर अस लपवून ठेवलं की अर्थात ते कुजतचं ! तुम्हा सगळ्यांचे विचार पटले मला मनापासून , कोणत्याही प्रतिसादावर माझा राग नाही. मंजूडी. धन्यवाद अन प्रसाद कष्ट नको तुझ मत तू मांडलस आभारी आहे. मेधा, निंबुडे, अश्विनी, प्रसाद अन मंजुडी तुम्हाला ठाऊक नसेल पण मी आज कट्ट्यावर जास्त वेळ ऑनलाईन नव्ह्तो याचं कारणं ती माझ्याशी तब्बल ३ तास १७ मि. फोनवर बोलली. कारण मी जे काही लिहिलंय ते तीने वाचलं अन तिला रहावेनाच. जेवढं मी रडून घेतलं त्या दिवशी त्यापेक्षाही जास्त ती ह्या आनंदाने रडली आहे. तेव्हा ह्यावर वाद न झालेलेचं बरे.
छान आहे रे सुक्या, तू लक्ष
छान आहे रे सुक्या, तू लक्ष देऊ नकोस, मस्त लिहिलंयस तू. भा.पो.

पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
अरेरे मंदार_जोशी, पुन्हा एकदा
अरेरे मंदार_जोशी, पुन्हा एकदा पश्चातापदग्ध होऊन प्रतिक्रिया बदललीत. मला सहानुभूती आहे तुमच्याबद्दल...
मंजूडी, पश्चातापदग्ध वगैरे
मंजूडी, पश्चातापदग्ध वगैरे होऊन नव्हे, तर इतक्या सुंदर अनुभवकथनाचा बी.बी. भलतीकडेच भरकटू नये म्हणून.
सहानुभूती
सहानुभूती
अप्रतिम.... सुरेख....मन खरच
अप्रतिम.... सुरेख....मन खरच भरुन आल
मन भरुन आल की भावना त्या ओसंडून वाहणारच
"पण आपल दुध आपल्याच घरात ऊतू जात दुसर्याच्या नाही..."
सुकीने हे सर्व आपल्यासमोर मांडल कारण तो "आपला" आहे... त्याला इथे आपल्या भावनांना वाट करुन देणे सोपे वाटते
त्यामुळे सुकीने जे काही लिहील आहे त्याला माझा पुर्ण पाठिंबा पण
मंजु आणी मंड्ळीने दिलेल्या सुचना अगदी योग्या आहेत त्यावर प्रत्येकाने विचार करायला हवा
कोणाच्याही भावनांचा किंवा माहीतीचा गैरवापर अथवा अपमान होता कामा नये
Pages