Submitted by ट्यागो on 3 June, 2010 - 08:54
'बरिस्ता',
आपलं भेटण्याचं ठिकाण,
टमरेल भरून कॉफी पिण्याचं...
माफक हसणं, माफक बोलणं...
तेही इंग्राळलेलं.
मग तुझ्या माफक डोळ्यांवर असलेल्या
महागड्या गॉगलवर बाष्प...
कॉफीचं, पैश्याचं.
अन् माझ्या मनावर ताण...
ह्या अतिशिष्ट जगण्याचा.
तुला ड्रॉप केलं की,
नाक्यावरच्या टपरीतून घेतो
एक कटिंग, सोबत मोठा फोर स्क्वेअर...
मग कुठे भेटतो मी मला.
तुझ्या बरिस्तापेक्षा टपरीच बरी म्हणत,
क्षितीजाकडे बघणंही टाळतो!!!
मयूरेश चव्हाण, मुंबई.
२६.०५.१०, ०९.३६.
गुलमोहर:
शेअर करा
<ह्या अतिशिष्ट
<ह्या अतिशिष्ट जगण्याचा.>
<नाक्यावरच्या टपरीतून घेतो एक कटिंग,>
लय भारी मयर्या..
( पण अशा पोरी हव्यात कशाला?;) साध्याच बर्या... )
-मीही एक मयर्या.
भारी रे.... खर आहे टपरीच बरी
भारी रे....
खर आहे टपरीच बरी
खुपच
खुपच छान.........................
सही रे! आपला तर बाबा दम घुटतो
सही रे!
आपला तर बाबा दम घुटतो असल्या ठिकाणी...
(No subject)
टमरेल म्हंटलं की कॉफी वगैरे
टमरेल म्हंटलं की कॉफी वगैरे नाही रे येत डोळ्यापुढे.
वैद्य बुआ, अहो आपण म्हणताय ते
वैद्य बुआ,
अहो आपण म्हणताय ते बरोबरच.
पण इतकहि मनावर घेऊ नक हं.
धन्यवाद सर्वांचे,
मनापासुन!!
मयुरेश, अप्रतिम.. बरिस्ता
मयुरेश, अप्रतिम.. बरिस्ता माझं अतिशय आवडतं असूनही कविताही खूप खूप आवडली !!! मस्तच..
छान कविता आहे.... मला तर
छान कविता आहे.... मला तर टपरीही आवडते अन् बरिस्ताही.... जाता-येता, पावसात भिजले असताना, रस्त्यावर ''साईटसिईंग'' करायला टपरी बरी पडते! आणि चकाट्या पिटायला, भर दुपारी उन्हात टीपी करायला, पब्लिक न्याहाळायला बरिस्ताही छान असते!
<<टमरेल म्हंटलं की कॉफी वगैरे
<<टमरेल म्हंटलं की कॉफी वगैरे नाही रे येत डोळ्यापुढे.>>
मग तुझ्या माफक डोळ्यांवर
मग तुझ्या माफक डोळ्यांवर असलेल्या
महागड्या गॉगलवर बाष्प...
कॉफीचं, पैश्याचं.
मस्त रे..........!!!!!!! ते "टमरेल" मलाही नाही आवडलं. त्याजागी दुसरा शब्द योजावा.........
धन्यवाद!! ते "टमरेल" काढावे
धन्यवाद!!
ते "टमरेल" काढावे असे वाटत नाहीये, म्हणजे त्याऐवजी दुसरा शब्द सुचत नाहीये.
any one help?
मयुरेश , येक नंबर भावा !!
मयुरेश , येक नंबर भावा !! जिंकलंस !!
मला ही अगदी असंच वाटंतं बरीस्ता / सीसीडी त गेल्यावर !
आपली टपरीच बरी ....पण फोर स्क्वेअर...छ्या ... मला आपली मार्लबोरो
बाकी मस्त लिहीत आहेस रे ...
मयुरेश , मस्त लिहिलं आहेस
मयुरेश , मस्त लिहिलं आहेस रे.. शेवटच्या ओळीतून sacrifice जाणवला.
प्रसाद धन्यवाद, आपला मोठा फोर
प्रसाद धन्यवाद, आपला मोठा फोर स्क्वेअर बराय त्या मार्लबोरोपेक्षा(आवड ज्याची त्याची):स्मितः
आणि सुकि, खरेच आभारी आहे, कवीतेची दूखरी बाजू जाणल्याबद्दल.
(No subject)
मयुरेश : तिच्याबरोबर( की
मयुरेश : तिच्याबरोबर( की तिच्यासाठी ??) बरीस्ता अन मग म्हणायच टपरीच बरी ... हे डायनॅमिक्स नाय कळल राव...
अवांतर .....
कित्येक नजरांना मिळवणार्या कॉलेजच्या पायर्या आता
जिर्ण-भग्न-खचलेल्या बुरुजासारख्या अचेतन दिसतात
...
आजकाल म्हणे "एनिथिंग कॅन हॅपन"ला"बरीस्ता"च लागतो....!!!!
चालायचंच, कित्येकदा हे
चालायचंच,
कित्येकदा हे झेपायचं नाही म्हणतो आपण,
पण तरिही प्रयत्न करतोच...
तिच्याबरोबर/तिच्यासाठी ह प्रश्नच नाही.
ति तिथेच, फक्त मि इथेहि अन् तिथेही!!
मग गोंधळ वाढला कि असे प्रश्न येतात, तेव्हा वाटतं, आपुला गाव बरा!!!
गिरीश.. अंगावरचे लव दिसायला
गिरीश.. अंगावरचे लव दिसायला लागले की लव्ह कळायला सुरूवात होते आजकाल. तेव्हा वेशीबाहेरचा तो वड गेला आणि कॉलेजातलल्या पायर्या आल्या.. आता त्याही निखळून पडल्या तेव्हा बरीस्ता सारख्या काचेच्या टपर्या आल्या. चालायचंच. याला लगाम नाही पण लव्ह च्या या गाडीच्या चाकांना लागणांर वंगण मात्र कधीच संपणार नाही. तेव्हा हे असचं होणार.. आजच्या बरिस्तातलं उद्या कुठेतरी virtual flower garden मधे नक्कीच दिसेल यात वादच नाही.
टमरेल भरून कॉफी ??? कसंतरी
टमरेल भरून कॉफी ??? कसंतरी वाट्टंय.
पण कविता मस्त. अर्थही मस्त.
माफक ओळींमध्ये अर्थ मस्त व्यक्त झालाय.
प्रगो, तुझी मार्लबोरो ऑफिसच्या डायरीत पण आलीये ना
आणि हो, टमरेल वरून आठवलं. ते टप्परवेअर चं पाणी पिण्याचं ग्लासासारखं मिळतं ना त्याला बरेच जण "टमरल" असं संबोधतात. ते "टमरल" म्हणायचंय का इथे मयुरेश ना?
बादवे, त्या टप्परवेअर च्या वस्तुला "टमरल" शा शब्दप्रयोग बरोबरै का? अर्थ काय त्याचा? (ज्यांना हा शब्द माहीत नाही ते लोक टमरेल च म्हणताना ऐकलंय मी.
म्हणे "मी आज टमरेल मधून ताक आणलंय" :ईईईईई:)
आणि हो, टमरेल वरून आठवलं. ते
आणि हो, टमरेल वरून आठवलं. ते टप्परवेअर चं पाणी पिण्याचं ग्लासासारखं मिळतं ना त्याला बरेच जण "टमरल" असं संबोधतात. ते "टमरल" म्हणायचंय का इथे मयुरेश ना? >>>
नाही हो, ह शब्द योजला त्यामागे हि कारण आहे.
एका गरीब घरात ऐकलेला शब्द.
"आरं, केव्हढी ही 'चा' टमरेलभर!"
मयुरेश ...सेम थिंकींग हिअर..
मयुरेश ...सेम थिंकींग हिअर..
माझा एक मैत्रिण आहे. कुण्यातरी एका सरकारी क्लासवन ऑफिसर तीचा बाप, आयुष्यात छत्रीशिवाय कधी रस्त्यावरुन चालली नाही. पब्लिकची गर्दीच आवडत नाही तर गर्दिवाली पब्लिक ट्रान्सपोर्ट सुविधा कधी वापरणार. एकदा आम्ही नाशकात एका मित्राच्या शेतावर रहायला गेलो. तेव्हा तिचा बॉयफ्रेंड .. अगदी सुदामा सारखा. त्याला तिने भुक लागलीये म्हणून काहीतरी आणायला सांगितलं तेव्हा तो लगेच गेला अन प्रिंजलस का काय ते वेफर्स असतं ना ते घेवून तासभराने परत आला. एवढा वेळ का लागला म्हणून ती भांडली त्याच्याशी.. तेव्हा आम्ही त्याला विचारलं वेफर्सच आणायचे होते तर वरल्या वाडीतून आणायचे होते ना त्यासाठी इतक्या लांब कशाला गेलास.. तेव्हा तो म्हणाला.. त्या साठी प्रेमात पडावं लागतं रे... तेव्हा मला लाज वाटली असल्या प्रेमाची..
तेव्हाच वाटलेलं मिलनं होणे शक्य नाही त्यांच अन तेच झालं. 
येस सुकि, अगदी बरोबर
येस सुकि, अगदी बरोबर बोललात!!
उदाहरण तर झक्कासच... सुदामा
कविता मस्त. अर्थही मस्त.
कविता मस्त. अर्थही मस्त. माफक ओळींमध्ये अर्थ मस्त व्यक्त झालाय.>>>
अनुमोदन!
छान
छान
धन्यवाद सर्वांचे!!!
धन्यवाद सर्वांचे!!!
बरिस्तापेक्षा टपरीच बरी
बरिस्तापेक्षा टपरीच बरी म्हणत,
क्षितीजाकडे बघणंही टाळतो!!
अशी स्वप्ने पहावी कि न पहावी? अस्वस्थ भावना छान व्यक्त केलिये.
खरंतर टमरेल...हा शब्द "टंबलर"
खरंतर टमरेल...हा शब्द "टंबलर" असा लिहीला जाउ शकतो....
निंबूडा ते टप्पर वेअर चं पाणी
निंबूडा ते टप्पर वेअर चं पाणी पिण्यासारख्ं भांडं टंबलर आहे..
कविता आवडली..
कविता आवडली..
Pages