नामंजूर… (रेल्वे प्रवाशाच्या नजरेतून)

जपत जीवाला ट्रेन सोडणे नामंजूर.
स्लो लोकलची वाट पहाणे नामंजूर.
मी मिळवावी जागा विंडोशेजारची,
दुसरी, तिसरी, चौथी जागा नामंजूर..!

कुपन हवे अन कार्ड हवे मज पास नको.
सुट्ट्या पैशाचाही मजला त्रास नको.
घड्याळ माझे तेच ज्या क्षणी ये गाडी,
मनगटावरी वेळ पाहणे नामंजूर..!

विदाऊट तिकिट जातो पाहून लाईन मी.
टि.सी. धरता मजला भरतो फ़ाईन मी.
प्रवासामध्ये होती हाडे चक्काचूर,
मज गर्दीचे थिटे बहाणे नामंजूर..!

धक्के, बुक्के भांडण तंटे लाख कळा,
लेडीज चढता डब्यात होतो घोटाळा.
रोख चापटी तिथेच द्यावी अन घ्यावी,
स्टेशनशी नेणे गार्‍हाणे नामंजूर..!

"मी लेट लोकलला शाप मानले नाही.
अन दार अडवणे पाप मानले नाही.
प्रवासी जेथे एकही चढला नाही,
स्टेशन असले मी अद्याप पाहिले नाही."

विरार, पनवेल, खोपोली ती दूर बरी.
बोरिवली, वाशी, कल्याणची गोष्ट खरी.
सेंट्रल, हार्बर शिव्या घालणे मज समजे,
पण वेस्टर्नचा गर्व वाहणे नामंजूर..!

– अभिजीत दाते (मूळ कविता : 'संदिप खरे' )


आवड्या आवड्या.. सही लिहिलिस...
- अनिलभाई



झक्कास...
जबरीच रे



आवडल. मस्त.



मस्त जमलय विडंबन!

>>>>> मज गर्दीचे थिटे बहाणे नामंजूर..!
lol!!



मस्तच रे.. सही जमलय



मस्तच रे.. सही जमलय



जबर्‍याच !!!
>> पण वेस्टर्नचा गर्व वाहणे नामंजूर ..!

हे हे हे हे ... सुंदर.



हे बघितलच नव्हत, छान जमलय !



>>>धक्के, बुक्के भांडण तंटे लाख कळा,
लेडीज चढता डब्यात होतो घोटाळा.
रोख चापटी तिथेच द्यावी अन घ्यावी,
स्टेशनशी नेणे गार्‍हाणे नामंजूर..!

"मी लेट लोकलला शाप मानले नाही.
अन दार अडवणे पाप मानले नाही.
प्रवासी जेथे एकही चढला नाही,
स्टेशन असले मी अद्याप पाहिले नाही."

>>>
जियो अभिजीत!! मस्तच!! अजुन येउंद्यात!!
सगळी कडवी चपखल बसली आहेत. मी तर मनातल्या मनात गाउन पण पाहीलं. जबर्‍याच.



अभिजित मस्तच एकदम चपखल
lol , rofl

visit http://milindchhatre.blogspot.com



>> "मी लेट लोकलला शाप मानले नाही.
अन दार अडवणे पाप मानले नाही.
प्रवासी जेथे एकही चढला नाही,
स्टेशन असले मी अद्याप पाहिले नाही." >>

व्वा! व्वा!



व्वा व्वा!
कसली भट्टी जमलीये... बहोत खूब!
रोख चापटी तिथेच द्यावी अन घ्यावी
स्टेशनशी नेणे गार्‍हाणे नामंजूर..!स्मित

सेंट्रल, हार्बर शिव्या घालणे मज समजे,
पण वेस्टर्नचा गर्व वाहणे नामंजूर..! स्मित

प्रवासामध्ये होती हाडे चक्काचूर,
मज गर्दीचे थिटे बहाणे नामंजूर..! स्मित

किती किती सहजता आहे रे. जियो... अगदी वयाने मोठा असलास तरी (नाहीयेस बहुतेक... नक्की)



वाह वाह... क्या बोले भाई... बोले तो अख्खा मुंबई उतार डाला तुने, मान गयेले तेरेकू.

धक्के, बुक्के भांडण तंटे लाख कळा,
लेडीज चढता डब्यात होतो घोटाळा.

क्या फिट हुएला है भाई... वैसे तो पुराच विडंबन सेट हुएला है....

ए चल हट... गर्दी नई हां.. अभि भाई अभी को हवां आंदो क्या?.. वोह और लिखनेवाला है,

भाई तुम लिखो बाकी अपुन संभाल लेंगा...

घुस गया तू कलेजे में सीधा, अख्खा मुंबई तेरे पे फीदा...



आपल्या प्रतिक्रियांबद्दल अनेक धन्यवाद...!
विडंबनाचा असा पहिलाच प्रयत्न..!
मूळ कविताच इतकी जबरदस्त आणि माझ्या अतिशय आवडीची आहे की विडंबन आपोआप त्या पातळीवर जातंच..!



सही रे!



नेहमीसारखेच अप्रतिम!



मस्त... एक्दम फट्याक....
एकटा.....



एकदम खल्लास!!!



अल्टिमेट रे अभिजीत .... काय मस्त जमलीय कविता !!!

रोख चापटी तिथेच द्यावी अन घ्यावी
स्टेशनशी नेणे गार्‍हाणे नामंजूर..! स्मित
प्रवासामध्ये होती हाडे चक्काचूर,
मज गर्दीचे थिटे बहाणे नामंजूर..! स्मित
सेंट्रल, हार्बर शिव्या घालणे मज समजे,
पण वेस्टर्नचा गर्व वाहणे नामंजूर..! स्मित



अभिजीत,सही जमलय रे विडंबन.. शब्दांची मांडणी एकदम चपखल आहे..



अभिजीत, ही कविता संदीप खरेला दाखव.. तोही हसेल पोट धरून.
आणि विडंबन करण्यासाठी मुळ कविता दमदार असावी लागते, ती तू बरोबर निवड्लीस.
अजून करत राहा.. तसं पोटेंशियल दिसतंय..



लय भारीच राव्... बोले तो एकदम मंजूर..स्मित



साजिर्‍याला मी सहमत!!
रोख चापटी तिथेच द्यावी अन घ्यावी
स्टेशनशी नेणे गार्‍हाणे नामंजूर..!
>>>
घड्याळ माझे तेच ज्या क्षणी ये गाडी,
मनगटावरी वेळ पाहणे नामंजूर..!
>>.
खतरी!!
स्मित
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अत्तराची कुपी संपतानाच जास्त जपायची असते...



>>रोख चापटी तिथेच द्यावी अन घ्यावी,
>>स्टेशनशी नेणे गार्‍हाणे नामंजूर..!

अभिजित, एकदम कातिल लायनी!