( क्योटो-नारा-ओसाका ) :- भाग २: क्यो~तोमधली संध्याकाळ

Submitted by ऋयाम on 8 May, 2010 - 02:59

................ "कियोमिझुदेरा" तर बघुन झालं, आता हातातल्या नकाशामधे पुढचं ठिकाण दिसत होतं: -
"गीन-काकु-जी"!!!

त्या रंगीत झाडापासुन पुढे चौकात आलो..
बस स्टॉप शोधत, नकाशा पहात असताना अचानक हॉर्नचे आवाज ऐकु आले!!!
"आपल्या मागुन येणार्‍या वाहनाने जर हॉर्न दिला तर आपण काहीतरी चुक केली आहे" हा सर्वसाधारण संकेत असलेल्या तो~क्योमधे राहिल्यानंतर असे पोत्यानं होर्न वाजताना ऐकुन धक्का बसला नसता तर नवल होतं..

सतत असे हॉर्नचे आवाज, नंतर संध्याकाळी घराकडं जाताना "लाल सिग्नल असुनही गाडी दामटत चाललेला ड्रायव्हर", "सिग्नल लाल होताना पाहुन" हातातलं सगळं सामान सांभाळत पळणारी "विद्यार्थी लोकं" पाहुन थेट पुण्याची आठवण आली....
ते पाहिलं आणि एक सेकंद तिथेच थांबलो.
छातीभरुन श्वास घेतला! वाह!
मनात जुन्या आठवणी जाग्या झालेल्या असताना असा श्वास घेतला की थेट त्या आठवणीच्या जागी आपण जाऊन पोहोचतो!!!

....................................................................................

सिग्नलचा लाल दिवा हिरवा झाला आणि आम्ही गीनकाकुजी च्या शोधात पुढे निघालो...
बसने १५ मिनीटं प्रवास होता...

बसमधे मुख्यतः परप्रांतियांचाच भरणा होता.
जन्माला येतानाच नाकाला चिकटवुन आणल्यासारखं "गॉगल काढायचा नाही" या तत्वाला सारे चिकटले होते.. काही उन वगैरे नव्हतं खरं तर...
* असो..... ज्याचा त्याचा प्रश्न आहे...

(नियमाप्रमाणे ) गीन-काकु-जी बद्दलही थोडीशी(च) इतिहासगिरी तसंच जपानीगिरी करणं भाग होतं: -
चित्रलिपीप्रमाणे 銀閣寺
銀 गीन : चांदी
閣 काकु : मंडप
寺 जी : मंदिर
अर्थात "चांदीचा मंडप असलेले मंदिर"!

मंदिर बांधलं गेलं ते १४९० साली, अर्थात "मुरोमाची" कालखंडामधे (१३३३ ते १५७३) .
पंधराव्या शतकामधे "आशिकागा योशिमासा" या शोगुन(कमांडर) आणि "मुसो~ सोसेकी" या बौद्ध भिक्षुनी हे मंदिर बांधलं अशी माहिती मिळते.
*पण "मुसो~ सोसेकी"चा मृत्यु आणि मंदिर बांधलं गेलं तो काळ यात थोडी तफावत जाणवली.
* अधिक अभ्यास केला नाही Wink

ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे यात असलेलं "झेन उद्यान"!

अशी उद्यानं बौद्ध भिक्षुंची शांतिसाधनेची मुळ जागा होती...

0__0.jpg1__.jpg4__.jpg5__.jpg6__.jpg
गीनकाकुजी वरुन दिसणारा क्यो~तो चं दृश्य..

7__.jpg8__.jpg
गीनकाकुजी.

दुपारी तांदळापासुन बनवलेली ओसाके अर्थात आमाझाके जरी प्यायली असली, तरी भुकेचं अकाऊंट अजुन भरलेलं नव्हतं. त्यामुळे गीन-काकु-जी ला जातानाच एका इटालियन रेस्टॉरंटवर नजर पडली होती.
तिथं थोडीशी पोटपुजा वगैरे करुन आजच्या शेवटच्या देवळाकडे जायला निघालो...

गीनकाकुजी पासुन पुढे ४० मिनीटं बसचा प्रवास करुन कीनकाकुजीला जायचं होतं.
अर्थाच सोन्याच्या मंदिरात...
कीन 金 सोन्याचा
काकु 閣 मंडप (असलेले)
जी 寺 मंदिर.
* गीनः - चांदी आणि कीनः - सोनं.

अर्थातच चांदीपेक्षा सोन्याचं मंदिर कसं प्रत्यक्ष कसं दिसेल याचा विचार करत "कीनकाकुजी" चाललो होतो..

चित्रात कितीवेळाजरी पाहिलं तरी "चित्रात आणि प्रत्यक्ष पाहण्यात फरक असतो" हे इथं परत एकदा पटलं...

कीनकाकुजी मंदिर..

9__.jpg10__.jpg11_.jpg

१३९७ला बांधलं गेलेलं हे मंदिरही गीनकाकूजीचा बौद्ध संस्थापक "मुसो~ सोसेकी" आणि शोगुन "आशिकागा योशिमात्सु" यांनी बांधलं.
मात्र या सोन्यावरही डाग लागलाच. १९५० मधे "हायाशी योकेन" या भिक्षुनेच मंदिराला आग लावुन देऊन स्वतः आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला. तो वाचला. ७ वर्षांची शिक्षा होऊनही त्यादरम्यान मनावर परिणाम झाल्याने तिथुन सुटका झाली... पण सुटका होताच आजारपणात अंत झाला...
आग लागल्यानंतर झालेलं मंदिराचं नुकसान, १९५५ मधे जिर्णोद्धार करुन भरुन काढण्यात आले.
उन्हात चमकत असलेलं कीनकाकुजी, शिखरावर असलेल्या सोन्याच्या "फिनिक्स पक्षाचं असणं" या गोष्टीमुळं सार्थ आहे हे दाखवत होतं...

इतर मंदिरांमधे गेलं तरी साधारण सारखीच रचना असेल अशा विचारानं, "मुख्य मंदिरं झाली आहेत." त्यामुळे इतर मंदिरात जाणं टाळुन, संध्याकाळ निवांत "क्यो~तो" फिरण्यात घालवावी असा विचार करत तिथुन बाहेर पडलो...

"क्यो~तो" हे जपानच्या पश्चिम भागात येतं, जिथलं "ओकोनोमी याकी" हे व्यंजन प्रचंड प्रसिद्ध आहे.
आयुष्यात पहिल्यांदा खाल्लेला पहिला जपानी पदार्थ हा "ओकोनोमी याकी" हा असल्याने खुद्द क्यो~तो मधे
आल्यावर तो न खाणं अशक्य होतं..

ओकोनोमी याकी: - (お好み焼き)

12_.jpg
ओकोनोमी याकी चा तवा. उजवीकडे सगळे मसाले.

13_.jpg14_.jpg

ओकोनोमी: - आवडीचं
याकी: - ग्रील करणे.
* विविध जपानी सॉस, कांदा, भाज्या, आणि भाजलेले नुडल्स(याकी सोबा) हे सारं शिजवुन, त्यावर ऑम्लेटसारखा पातळ पदार्थ घालुन हे सारं ग्रील करतात.
* तो~क्यो मधे सहसा "तयार" ओकोनोमी याकी मिळते. पण क्यो~तो ची खसियत म्हणजे, त्यावरचा सॉस आपण आपल्याला हवा तसा घालु शकतो. गप्पा मारत निवांत खाउ शकतो. दरम्यान पदार्थ गार झाल्यास गरम करण्यासाठी तवा.
* सॉस तिखट, गोड असे दोन प्रकारचे. बरोबर "वाळवलेले शेवाळे" (पौष्टिक म्हणुन...)
* हा पदार्थ शाकाहारी देखिल मिळतो. पण ज्यांना "सगळं चालतं" त्यांच्यासाठी ह्यात ऑक्टोपस आणि अंडं असतं... आम्हाला "सगळं चालतं..." Wink

आवडीचं खाणं तर झालं होतं.
दिवस चांगला गेला होता..
आता उद्या सकाळी उठुन "आराशीयामा", अर्थात "आराशी" नावाच्या डोंगरावर जायचं होतं...
चला, पहिला दिवस असा संपला होता...

................पण ती गोष्ट सांगितल्याशिवाय हा दिवस संपणार नाही... Happy

* * * हॉटेलच्या बुकींगची गोष्ट. * * *

पहिल्या भागात लिहील्याप्रमाणं, शेवटपर्यंत नक्की होत नव्हतं जाणं.
ते नक्की झालं आणि राहण्याचं बुकींग करायला घेतलं.
"हॉस्टेलवर्ल्ड" वेबसाईटवरुन बुकींग केलं. २५०० येन प्रत्येकी. एक रात्र राहणं.

हॉस्टेलवर चेक इन करायला गेलो पण सापडेना.
मग तिथेच दुकानदाराला विचारलं.
त्यानं तत्परतेनं बरोब्बर चुकीचा पत्ता सांगितला.
टॅक्सी करु म्हटलं.
"पण इथुन फारच जवळ आहे" म्हणत टॅक्सीवाल्यानं स्वत:च्या फोननं मालकाला फोन केला.
मालकीण स्वतः आम्हाला घ्यायला आली.
आम्ही हॉस्टेलला पोचल्यावर मालक आला.
आम्हाला न्याहाळत म्हणाला, "अरे! तुम्ही?.... बुकींग तर लेडीज रुममधे झालं आहे तुमचं..."

.............................

आम्ही डोक्याला हात लावुन एकमेकांकडं बघत राहिलो..
मालक आमच्याकडं पाहत जागेवर खिळुन राहिला.....
आमची सारथी, मालकाची बायको हसत आमच्याकडं बघत काहीतरी बोलत होती, पण आम्ही मात्र
"काही जमलं नाही इथं तर आजची रात्र कुठे काढायची?" ह्या विचारात पडलो होतो...
"खरंच, सरळ काही होत नाही आयुष्यात..... लक्षात राहते अशानं ट्रीप... "

मालकानं बरीच काही सेटींग्स लावली...
हॉस्टेलमधे "लेडिज", "जेन्ट्स" आणि "मिक्स्ड" असे तीन विभाग होते...
"मिक्स्ड" रुममधे असलेल्या एका पोरीला "लेडीज" मधे जाण्याची विनंती.
आणि आमच्यातला एक तिच्या जागी मिक्स्ड रुममधे.
दुसरा, जेन्ट्स रुममधे उपलब्ध असलेल्या एकमेव खाटेवर...
"माफ करा, तुम्हाला वेगवेगळ्या खोल्या देतो आहे" म्हणत मालक खोखो हसु लागला.
त्याची बडबडी बायकोही हसली.
एवढी मदत केलेली त्यानं, पर्याय नव्हता... आम्हीही हसलो...

चालुन चालुन इतकं दमल्यावर बिछान्याला पाठ लागताच गाढ झोप लागली...

मनात आराशीयामा!
उद्या आराशीयामाला जायचं होतं... Happy

(क्रमशः)

* इतिहास वगैरे परत विकीपीडीयावरुन साभार...

गुलमोहर: 

हे पण जमले आहे रे ऋयाम..किनकाकुजी चा २ रा फोटो जरा क्रॉप करता आला तर बघ ना. आणि किनकाकुजीचाच ३ रा फोटो दिसत नाहिये...
बाकी ओकोनोमीयाकी सहीच दिसते आहे. एकदम तोंपासु!!
बादवे असे ओतोकों चे ओन्ना कसे रे झालात असे? Wink

मस्त रे ऋयामभाऊ. क्योतो मलाही खूप आवडलं होतं. किनकाकुजी, तिथलं रॉक गार्डन व सान-जु-सान-गेनदो सगळंच आवडीचं. सुट्टी सार्थकी लावलीत.

आराशीयामाला राफ्टिंग केलंत कां? आम्ही केलं होतं, सही धम्माल आली होती.

धन्यवाद एम्बी Happy
कीनकाकुजी चे २ आणि ३ बदलले आहेत.

<ओतोको चे ओन्ना> :
अति घाई संकटात जाई... डिटेल्स न बघता "मोकळं दिसतंय तर बुक करा" असं झालं.
पण मला खरंच तिथं असा काही ऑप्शन दिसला नव्हता.... Sad

धन्यवाद आडो. Happy
सार्थकी लावली खरी Happy !

@ आभार्स!

जपानी काशीयात्रा चांगली आहे. टेक्स्ट पूर्ण पॅरिग्राफ मध्ये का नाही लिहीत. म्हणजे एकसंध दिसेल. तो खाऊ पण छान आहे.

> काशीयात्रा
अगदी योग्य शब्द!

ऋयाम, गीनकाकुजी पासुन सुरु होणारी 'फिलॉसॉफर्स पाथ' घेतलीत (धरलीत) की नाही? छान आहे. नानझेनजी पर्यंत जाते आणि रस्त्यात अनेक छोटी मंदिरे आहेत.

गिंकाकुजी मला अजिबात लक्षात येत नाहीये. आम्ही सगळी देवळं अगदी 'मस्ट' असल्याप्रमाणे पाहिली होती त्यामुळे डोक्यात गोंधळ. त्यातल्यात्यात किंकाकुजी आणि सान्जुसानगेन्दोच लक्षात आहे.

सुट्टी मस्त एन्जोय करताय्.मज्जा आहे....:)
क्योतो प्रमाणे गीनकाकुजी,कीनकाकुजी.. पण फारच सुन्दर आहे.
खर म्हणायचे झाले तर जपानच फार मस्त आहे.
हॉटेलचि गोष्ट एकदम भारीच आहे. सो नेक्स्ट टाईम पासुन डिटेल्स न बघता बुकींग नका करु......:-G