आयुष्य असं असतं...

Submitted by हर्षल_चव्हाण on 23 March, 2010 - 08:16

कसं जगायचं, कसं जगायचं,
हे कुणालाच माहीत नसतं...
न उमगणारं कोडं, उमगलेलं अगदी थोडं...
आयुष्य असं असतं...

जगतांना फक्त जगायचं असतं...
एकेक क्षण निसटतांना पहायचं असतं...
हसायचं, रडायचं, धडपडल्यावर पुन्हा उठून चालायचं असतं...
कळलेलं, न कळलेलं, पण त्या वेळेशी सूर जुळलेलं...
आयुष्य असं असतं...

देत असतं की नेत असतं, काही केल्या कळत नसतं...
दोन क्षणांचं गणित कधीच जुळत नसतं...
साठवायचं की आठवायचं, हे ही ज्याचं त्यानेच ठरवायचं असतं...
कधी मैफल रंगलेलं, कधी खूप मरगळलेलं...
आयुष्य असं असतं...

कसं जगायचं विचारतांना, जगणं विसरायचं नसतं...
प्रवास चुकला की काय, म्हणून वाटेतच उतरायचं नसतं...
गोंधळलेल्या क्षणी बावरलेलं, पण आपण होऊन सावरलेलं...
आयुष्य असं असतं...

आपणच घडवलेलं आयुष्य फक्त प्रश्न नसतं...
स्वतःत दडवलेलं, बाहेर शोधायला लावणारं उत्तर असतं...
प्रश्न एकच ठेवून , अनेक पर्याय देणारं,
आयुष्य असंच असतं...
आयुष्य असंच असतं...
-हर्षल(२३/०३/२०१०-सायं ५.४०)

गुलमोहर: 

>>>देत असतं की नेत असतं, काही केल्या कळत नसतं...
दोन क्षणांचं गणित कधीच जुळत नसतं......
स्वतःत दडवलेलं, बाहेर शोधायला लावणारं उत्तर असतं...<<< आवडलं. सुंदर कविता

छान.... आत्ताच या ओळी भाऊंच्या कवितेवर लिहील्यात... परत लिहीतोय..
"जिंदगी आखीर क्या है.... बस इक ख्वाब है दिवानेका !!! "

कसं जगायचं विचारतांना, जगणं विसरायचं नसतं...
प्रवास चुकला की काय, म्हणून वाटेतच उतरायचं नसतं... Happy

अतिशय सुन्दर कविता आहे.. खरच आयुष्य खूपच छान माडल आहे..