"आजही उशीरच झाला... " म्हणत, ती घराकडं चालु लागली.
उशीर झाल्यामुळं आज भराभर चालली होती.
मनातले विचारही खरं तर, आज भराभर येत आणि जात होते..
कधी- कधीच्या आठवणी त्या....
"शाळा झाली, महाविद्यालयीन शिक्षण झालं. ते संपता संपता नोकरी लागली.
प्रोबेशन मधुन पर्मनंट झाले..
आणि मागच्याच आठवड्यात 'पहिलं प्रमोशन'..."
सारं एकेक करुन आठवु लागलं होतं.
"'नोकरी लागणं' ही आयुष्यातली किती मोठी आणि महत्त्वपुर्ण घटना आहे नाही?"
... मित्रमैत्रिणींबरोबर तिचं बोलणं व्हायचं. किती 'स्वप्नं' होती.
त्यातलं एक खरंही झालंय नुकतच! पण मग 'आनंद' का नाही?
अचानक काहीतरी आठवलं आणि ती थांबली.
येताना दुकानातुन काही सामान घेऊन ये म्हटली होती आई.
"या विचारांच्या नादात....... " म्हणत ती परत फिरली.
सामान घेतलं आणि ती परत चालु लागली.
...पण 'विचारही' फिरुन परत आलेच.
........ "अशी लोकं का भेटतात मला?"....
........." 'खरे मित्र' का नाही होत 'ऑफिस लाईफ' मधे"....
........ "दुसर्याचं क्रेडीट असं स्वत: घेताना लाज कशी नाही वाटत?" ...
........ "प्रमोशन खरं तर मागच्या वर्षीच व्हायचं होतं..."
".............................................................."
........" आता सगळेच वाईट नाहीये पण तरीही..."
असे "किती प्रश्न? किती सांगु? जाउदे... ".......
"काय रे देवा? असं का होतंय सारखं" ती मनात म्हणाली...
आणि आकाशाकडे बघितलं...
आकाशात चंद्र आणि असंख्य चांदण्या.....
त्या लुकलुकत हीच्याकडे बघत होत्या....
"ह्या काय उत्तर देणार?" म्हणत तिनं परत चालायला सुरुवात केली...
चौकात उजवीकडे वळताच, तिनं एक मोठ्ठा श्वास घेतला, आणि नाकाला रुमाल लावुन ती पुढे चालु लागली.
पुढे असलेला कोंडाळा नुसता वाहत होता. सर्वत्र दुर्गंधी पसरली होती.
हे नेहेमीचंच झालं होतं.
"राहतो तिथंच बाहेर कचरा टाकायचा? "
"आणि हे.. हे तर सुशिक्षीत. यांनी तरी करु नये?" असे विचार आज परत आलेच मनात.
संपुर्ण रस्ता असाच दुर्गंधीनं बरबटलेला...
कसाबसा तो चौक ओलांडुन ती पुढे आली.
एकामागुन एक गोष्टी... वैताग वाढतच होता.
"लवकर घर येऊदे रे देवा... " मनात म्हणाली.
आता त्या छोट्या गल्लीमधुन गेलं की ५ मिनीटावर घर.
त्या गल्लीमधे ओळीनं सारी एकसारखीच घरं होती...
तिची पावलं झपाझप पडु लागली होती.
पण मधेच अचानक ती थांबली.....
..... " कसला हा सुगंध? "
त्या 'मोहक गंधानं' तिला थांबायला भाग पाडलं.
तिनं परत श्वास घेतला. परत... परत... परत...
परत एकदा मनात तो सुगंध दरवळला. मन प्रसन्न झालं. ....
तिनं पाहिलं की ओळीनं असलेल्या त्या घरांपैकी शेवटच्या घरात,
कोणीतरी छान फुलं लावली होती,
त्याचाच हा सुगंध होता. "जिओ!" ती बोलुन गेली.
अजुन एकदा तो सुगंध मनात साठवुन घेऊन ती घराकडे निघाली.
घर आलं.
तिच्या घराखाली तिनंच लावलेली काही फुलझाडंही होती.
आत्ता त्या फुलांचा सुगंधही दरवळत होता...
घरात जायच्या आधी दोन मिनीटं ती तिथं थांबली.
"सुंदर आहेत नाही? तुम्ही लावली आहेत का??" कोणाकडे आलेले पाहुणे जाता जाता तिला म्हणाले.
तीही हसुन "हो" म्हटली...
मग, मगाशी मनात असलेले विषय, विचार परत आठवले...
पण आत्ता काही वेगळा अर्थ लागु लागला होता.
'दुर्गंध' सगळीकडे आहेच. त्यामागे 'कोण', 'का आहे' काही सांगता येणार नाही..
पण त्याबरोबर कधी 'सुगंधही' असणार! अगदी नक्की!
आणि त्यामागेही 'कोण', 'का आहे' हे सांगता येणार नाहीच..
तिनं फुलांवरुन हात फिरवला.
आणि वर आकाशाकडं बघितलं.
तोच चंद्र आणि त्याच चांदण्या.
पण आत्ता जास्त लुकलुकत्या वाटल्या तिला.
"गंध आहे जीवनात. काहीतरी आहे जरुर.
चांगलाच कसा म्हणु? पण खरंच कुठेतरी कधीतरी आपल्या वाट्याचा सुगंधही आहे.
थोडा असेल, पण आहे जरुर.
'कमी' आहे, ती मधुनच थोडा विसावा घेण्याची. थोडं थांबण्याची.
...... आणि 'यावर विश्वास ठेवण्याची', त्याचा विचार करण्याची.....
काही गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची... "
" पण खरंच इतकं सोपं का आहे?
आणि अगदीच असह्य झालं तर?...
.... तर मग कधीकधी मार्गही बदलता येतोच नाही का?
.... कारण कितीही झालं तरी एकच तर आहे हे आयुष्य! त्याच्या पुढे काय माहित? 'किडा-मुंगी' चा जन्म?
.... म्हणुन तर याचं महत्त्व...
.... एकदाच मिळणारी १०० वर्ष....
.... पण तीही म्हणायला! खरी किती कोणास ठाऊक?
.... अवघड आहे खरं....
.... पण होईल काहीतरी....
.... जमेल तितकं मग, आपण आपलं काम करायचं.. करत रहायचं..
.... आणि आपलीही बाग फुलवायची अशी...
.... 'तो' ही आहेच! तो बघत असतो सारं... " तीनं आकाशाकडे बघीतलं...
.... आताच्या खेपेस मात्र चांदण्याही वेगळ्या भासल्या. लख्ख दिसल्या...
.... चांदण्यांचे गुच्छच होते जणु.
.... आणि प्रत्येक गुच्छात एकाच आकाराच्या-तेजाच्या चांदण्या..
.... जणु एकेक गुच्छातल्या चांदण्या-तारे, सारे एकमेकांचे मित्रमैत्रिणी असल्यासारख्या...
..... एकमेकांसारख्या... साधारण एकाच 'ढंगाच्या', एकाच 'गंधाच्या'...
..... आणि तो 'चंद्र' जणु काही हसतच त्यांच्याकडे पाहत होता....
..... तीही हसली. आज काही उत्तरं मिळाली होती...
पुन्हा एकवार मग त्या फुलांवरुन हात फिरवुन, "आजच्या दिवसाचा गंध" मनात साठवुन ती घराकडे निघाली...
-----------------------------------------------------------------------------------------------
"सुधन्वा" यांच्या "शिकलेली माणसे अशी का वागतात" शी काही प्रमाणात संबंधित आहे, कारण त्यातला "शिकलेली माणसे अशी का वागतात" हा मुळ प्रश्न मलाही नेहेमी पडतो. तुम्हालाही पडत असेलच!
त्याबद्दल वाटलेले विचार इथे देत आहे....
आई गं. अरे हा तुझा लेख वाचून
आई गं. अरे हा तुझा लेख वाचून मी अगदी हेच लिहीणार होते की त्या सुधन्वा यांचा लेख येण्यापूर्वी हा लेख यायला हवा होता. त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळाली असती. आता काय ते इथे फिरकणार नाहीत त्यामुळे तुझा हा लेख त्यांच्या नजरेस पडेल की नाही शंकाच आहे. असो,
छान आहे. उडदामाजी काळे गोरे असणारंच.....
चांगल लिहिलंय! आवडलं.
चांगल लिहिलंय! आवडलं.
धन्यवाद आ.डो. , वर्षा. आ.डो.
धन्यवाद आ.डो. , वर्षा.
आ.डो. )
मलाही वाटलं, आधी लिहायला हवं होतं. ..
कारण मुळ प्रश्न एकच आहे....
चालायचंच.
@आभार्स....
मयूर...खूप छान जमलाय
मयूर...खूप छान जमलाय लेख.........छान सुगंधीत वाटलं
चांगला आहे लेख...
चांगला आहे लेख...
(No subject)
छान. थोडक्यात बरंच मोठं
छान. थोडक्यात बरंच मोठं लिहिलयस
भले बुरे की ही रही, भले बुरे
भले बुरे की ही रही, भले बुरे से आस!
कांटे हैं तन भेदते, देते सुमन सुवास!!
- हरिऔध
आवडलं
मस्त लेख
मस्त लेख
मस्त लिहिलय
मस्त लिहिलय
सर्वांना) धन्यवाद! आभारी
सर्वांना)
आभारी आहे!
धन्यवाद!
मस्तच लिहिलय
मस्तच लिहिलय
आवडला.
आवडला.
>>मनात तो सुगंध दरवळला. मन
>>मनात तो सुगंध दरवळला. मन प्रसन्न झालं. ...>>अगदी असच वाटले वाचुन्...सुरेख जमलाय लेख.
लेख वाचला नाहीये अजून. पण
लेख वाचला नाहीये अजून. पण त्या घरकाम बीबीवर पण येऊ द्या असंच काहीतरी.
खुपच छान... जियो!
खुपच छान... जियो!
सुरेख लेख सायो अगदी अगदी
सुरेख लेख
सायो अगदी अगदी
मस्त लिहिलयं अगदी नेहमीच
मस्त लिहिलयं
अगदी नेहमीच पडणारे प्रश्न...
आज ऑफिस मध्ये सकाळ पासून अशिच
आज ऑफिस मध्ये सकाळ पासून अशिच विमनस्क अव्स्थेत बसलेली आहे.
तुमचा लेख वाचला आणि बरीच उत्तरे मिळालि.
धन्यवाद आणि पु ले शु
छान आहे लेख...
छान आहे लेख...
धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना.
Gulavanibai)
आवर्जुन लिहील्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद.
सायो, कविता नवरे)
येस्सर! प्रयत्न जरुर होणार आहे.
खूप खूप छान लिहिलय. आवडलं.
खूप खूप छान लिहिलय. आवडलं.
छान लिहिलय!
छान लिहिलय!
शरद, भाऊ) खुप धन्यवाद
शरद, भाऊ)
खुप धन्यवाद वाचल्याबद्दल
@आभार्स!
छान आहे
छान आहे
मस्त लेखा आहे
मस्त लेखा आहे
ह्म्म्म्म ..
ह्म्म्म्म ..
खुप छान वाटला वाचून गंधित
खुप छान वाटला वाचून गंधित झाले.. मजा म्हणजे हे माहिती असता पण सारखी अठावन करून द्यावी लगते.. नाही तर परत आहेच दुर्गंध सोबतीला
धन्यवाद <मजा म्हणजे हे
धन्यवाद
<मजा म्हणजे हे माहिती असता पण सारखी अठावन करून द्यावी लगते.>
त्याचीच गरज असते. माहिती असतं आपल्याला
@आभार्स!