Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 11 March, 2010 - 01:33
दाव तोच जीवना लावतो पुन्हा पुन्हा
मृत्युला जगायला शिकवतो पुन्हा पुन्हा
चांदणी कधी कुण्या अंबरास भार ना
चंद्र मग उगाच का हरवतो पुन्हा पुन्हा
आसवे न ढाळली मी कधीच पांगळी
का तिच्यापुढेच मी भेकतो पुन्हा पुन्हा
माज ही जुनाच शिरजोर आज ती पुन्हा
आग तीच मी परी पोळतो पुन्हा पुन्हा
हां...कबूल दुश्मनी जन्मजात लाभली
बांध घालुनी दुवा सांधतो पुन्हा पुन्हा
हात जोडुनी उभे सौख्य मजपुढे सदा
व्यर्थ दशदिशात मी शोधतो पुन्हा पुन्हा
जयश्री
गुलमोहर:
शेअर करा
सुरेख
सुरेख
सलाम..... पुन्हा पुन्हा !!!!
सलाम..... पुन्हा पुन्हा !!!!
खूप छान!!! सर्वच शेर
खूप छान!!!
सर्वच शेर छान!
<<हात जोडुनी उभे सौख्य मजपुढे सदा
व्यर्थ दशदिशात मी शोधतो पुन्हा पुन्हा>> हा शेर खूप आवडला..
हां...कबूल दुश्मनी जन्मजात
हां...कबूल दुश्मनी जन्मजात लाभली
बांध घालुनी दुवा सांधतो पुन्हा पुन्हा
जास्त आवडला.
अगदी देखणी गझल ,फक्त ''माज ही
अगदी देखणी गझल ,फक्त ''माज ही जुनाच'' या ओळीत लय बिघडते .तरी हे गालबोट छान कारण
अर्थ तोच ठेवून दुसरा कुठला शब्द समर्पक वाटत नाही .मी जरा अर्थ बदलून ही ओळ अशी वाचली
का असे पुन्हा पुन्हा मी पतंग व्हायचे
आग तीच मी असा पोळतो पुन्हा पुन्हा
शेवटचा शेर उत्तम ,फार फार आवडला पण सर्व शेर एका आशयाचे व फक्त शेवटचा शेर पूर्णपणे विरुद्धार्थी वाटल्यामुळे जरी गझलच्या तंत्रात बसले तरी पटत नाही, म्हणून शेवटचे शेर एकूण आशय बघता असे असावेसे वाटतात .
पाठ फिरवताच ती ,धावतोच मागुनी
का तिच्याच पाइ मी ,घोळतो पुन्हा पुन्हा
इतर सौख्य मजपुढे हात जोडुनी उभे
का तिच्यात सौख्य मी शोधतो पुन्हा पुन्हा
मस्त! आवडली!!
मस्त! आवडली!!
जयुताई कातील गझल गं एकदम
जयुताई कातील गझल गं एकदम !!
आवडलेले शेर लिहायचे तर सगळी गझलच द्यावी लागेल. मला फ़ार भावले सगळे शेर.
टॊप टेन !
मस्त. नेहेमीप्रमाणे! याचं
मस्त. नेहेमीप्रमाणे!
याचं 'तुम्ही स्वतः वाचन' करुन त्याचं 'ध्वनीमुद्रण' इथे उपलब्ध करुन देण्याबद्दल काय मत आहे? 
अजुन जास्ती प्रभावी वाटेल.
चांदणी व आसवांचे शेर आवडले.
चांदणी व आसवांचे शेर आवडले.
जयश्री, रचनेतील भाव उत्तम
जयश्री,
रचनेतील भाव उत्तम आहेत, पण ह्यात एक सुधारणेला वाव आहे तांत्रिक दृष्ट्या.,
मतल्यात जमीन स्पष्ट होत नाहीय बहुदा...
मतल्यातील काफियात ' वतो' हा अक्षर-समूह दोन्ही मिसर्यात येतोय.. पण अलामत अ कि आ हे स्पष्ट होत नाही. बरे हे ठीक आहे. पण पुढील प्रत्येक काफियात 'वतो' हे यायलाच हवे, जसे लावतो, भावतो, गावतो, दावतो, पावतो, असो. जाणकारांचे सुद्धा मत घ्यावे.
(शिर-जोर मधे यतिभंग होतोय)
पु. ले. शु.
-मानस६
धन्यवाद प्रतिक्रियांबद्दल
धन्यवाद प्रतिक्रियांबद्दल !!
ऋयाम..... कल्पना चांगलीये...... बघते नक्की
मानस..... तू म्हणतोस ते बरोबर आहे. पण "वतो" जमीन तयार झाल्यावर जर दुसर्या शेरापासून ही सूट घेतली असती तर चालली असती का ?
यतिभंगाबद्दल पण जाणून घ्यायला आवडेल. कारण वृत्तभंग होत नाहीये कुठेच.
जाणकारांनी मार्गदर्शन करावं.
गा ल गा ल गा ल गा,,, गा ल गा
गा ल गा ल गा ल गा,,, गा ल गा ल गा ल गा..हे वृत्त आहे , बरोबर?
, अलिकडल्या भागात आणि जोर पलिकडल्या भागात आहे..
जिथे टीम्ब आहेत तिथे pause असावा, आहे..तिथे शब्द तुटायला नको, जसा शिरजोर तुटला आहे(शिरजोर झाला!):)
त्याचा शिर किंवा( त्याचे शिर
माज ही जुनाच शिर,.....जोर आज ती पुन्हा.... अशी वाचली मी ही द्विपदी!
अरे, जयश्री, हे लिहिताना गमतीशीर होतेय. .:) असो.. पु. ले. शु.
-मानस६
मानस अरे तिथे यतिभंग होतोय हे
मानस अरे तिथे यतिभंग होतोय हे खरं.........पण हे चालतं का असं.....की सौंदर्याच्या दृष्टीने म्हणतो आहेस ?
या ग़ज़लचे वृत्त कुठले
या ग़ज़लचे वृत्त कुठले आहे?
"सूर तेच छेडिता, गीत उमटले नवे" या गाण्यात आहे तेच.
लयबद्ध रीतीने वचले तर "छेडिता" या शब्दानंतर दीर्घ पॉज येतो; नाहीतर लयीत वाचताच येत नाही. हाच पॉज 'शिर' या अर्धशब्दानंतर येतो आणि पुढे 'जोर' हा वेगळा येतो. बरे, या दोन्ही शब्दांना एक्-मेकांशिवाय अस्तित्व नसते तर कदाचित चालवून घेता आले असते; पण तसे नाही. त्यामुळे यतिभंग नक्कीच होतोय.
तसेच रदीफ 'वतो' आणि काफिया अ किंवा आ हे स्वर घेता येतील (म्हणजे ही एक प्रकारची विशेष सूटच आहे); पण नक्कीच 'धतो', 'लतो' वगैरे येऊ शकणार नाही.
ही ग़ज़ल तांत्रिकदृष्ट्या दुरुस्त करायची झाली तर 'शिकवतो' या शब्दाच्या ऐवजी 'पाहतो', 'मागतो' असा एखादा योग्य शब्द निवडावा लागेल. तसेच "शिर - जोर" हा शब्द बदललाच पाहिजे.
शरद
छान गझल!!
छान गझल!!
आय हाय्य्य जयुताई... मार डाला
आय हाय्य्य जयुताई... मार डाला
शरददादांनी सांगितल्याप्रमाणे "सुर तेच....." चालीवर म्हणुन पाहीली आणि प्रत्येक शेरातली गंमत कळत गेली.
आय हाय्य्य..... जिंदा कर डाला
आय हाय्य्य..... जिंदा कर डाला
जयुताई! खुप छान रचना.
हात जोडुनी उभे सौख्य मजपुढे
हात जोडुनी उभे सौख्य मजपुढे सदा
व्यर्थ दशदिशात मी शोधतो पुन्हा पुन्हा >>> जयू मस्तच... आवडला
झकास!!!
झकास!!!
पुन्हा पुन्हा असच लिहा....
पुन्हा पुन्हा असच लिहा.... मस्त...
आसवे न ढाळली मी कधीच पांगळी
का तिच्यापुढेच मी भेकतो पुन्हा पुन्हा..
अप्रतिम...
छान, शुभेच्छा! मानस यांच्याशी
छान, शुभेच्छा! मानस यांच्याशी सहमत! मतला बदलायला हवा आहे.
व्यर्थ दशदिशा - शेर आवडला.
-'बेफिकीर'!