कानदान

Submitted by स्वप्नाली on 7 March, 2010 - 15:23

सकाळचे अकरा वाजले असतील्..मी कामात गर्क..काही अर्जट फाइल्स सम्पवायच्या होत्या आणि अचानक तो समोर उभा...स्क्रीन वरुन डोळेही न हलवता मी नेहमीचे "हाय्--हेलो" केले..तो नेहमीच्या मूड्मधे वाटत नव्हता आज..
"५ मिनीट है?" - तो
"ह्म्म...everything is ok?" - मी
"lets go outside" - तो
नेहमीप्रमाणे माझ्या टेबलवर अचानक धडकून इकड्च्या-तिकड्च्या गप्पा मारणारा, उत्साहाने सळसळणारा तो आज एकदम सिरियस वाटत होता...बाहेर जाइपर्यन्त हजारो विचार माझ्या मनात क्लिक होउन गेले....तो सुरु झाला...
"अरे यार्...समझ मे नही आ रहा है..."
मी बूचकाळ्यात्.."क्या हुआ..?"
"मी तर चान्गले काम करतोय्...टायगर खूश वाटत नाहीये माझ्या कामावर..." (साहेबाना 'टायगर' हा कोड-वर्ड वापरायची त्याचीच सवय)
"टायगर काही बोलत नाहीये स्वतःहून पण मला जाणवते आहे की काहीतरी बिनसले आहे...something is going wrong somewhere for sure...कदाचित त्याला माझ्याकडून जास्त अपेक्षा असाव्यात.." - तो
"...." - मी
"मी तर मनापासून काम करतोय्..पण कुठेतरी कमी पडत असेन..टायगर तसा भला माणूस्..मला न सान्गता politics तर करणार नाही काही...पण माझ्यामूळे तो खूश नसावा हे मला सहन होत नाहीये..."
"...." - मी
"आता मीच त्याला विचारणार आहे...बघू त्याने काही सान्गीतले ..माझे काही चुकत असेल तर सुधारता येइल..lets go back to work..thanks yaar.."
"..." - मी
आम्ही दोघे पून्हा आपापल्या जागेवर येउन कामात गर्क.

घरी येताना सकाळच्या प्रसन्गाचा विचार करत होते..(thanks for heavy traffic !) काय हवे होते त्याला माझ्याकडून नक्की? माझा सल्ला? माझी सहानूभूती ? माझी मदत ? ...बहूतेक त्याच्या मनात चालू असलेल द्वन्द्व कुठेतरी बोलून दाखवण्यासाठी एक जागा..? माझे ५ मिनिट...? माझा कान !!!

सन्ध्याकाळची ५-५.३० ची वेळ्..छान सोनेरी ऊन पान्घरूण झाडे डोलत होती..सगळ्या चिमण्-पाखरान्ना अन नोकरदारान्ना घराची ओढ लागली होती...शान्ताबाई लगबगीने घराकडे निघाल्या होत्या..वाटेतल्या बाकड्यावर देशपान्डे आज्जीना बघून बसल्या शेजारी.."काय आज्जी, बर आहे ना? ८ घरच्या पोळ्या लाटून लाटून मनगट भरून आलीत बघा...काय करू..कराव लागत पोटासाठी..गणूच्या वडलान्ना एक नोकरी टिकवून ठेवता आली तर शप्पथ्..तशी काही वाइट-साइट सवय न्हाइ...पण जबाबदारी म्हणून न्हाइ...दर येळेला एक नोकरी सुटली की नव्या नोकरीसाठी साहेबलोकान्च्या हाता-पाया पडाया जीव नको-नको होतो...पण सान्गू कोणाला...घरी आधीच म्हातारीचा जीव तोळा-मासा..कशाला दुखवा ...म्हणून बोलत न्हाइ मी कायबी...चला उशीर झाला....निघते मी आता...सकाळी तुमच्यासाठी जोशीबुवा कडे फूले ठेवली होती..मिळाली का? ...आज्जी ?"
आज्जीनी पिशवीमधून कानाचे य्नत्र काढून नीट बसवीत विचारले..."काही म्हणत होतीस का शान्ता तू? ..?" ते पाहून शान्ताला खुद्कन हसूच आले, "अग्गोबाई..म्हन्जी मी येकटीच बोलत होते इतकायेळ्...काही न्हाइ...फूल मिळाली का विचारत होते..निघते आता..उशीर झाला.."
शान्ताचा चेहरा उजळला होता. कपाळावरच्या आठ्या नाहीश्या झाल्या होत्या..मनातल मळभ मोकळ करायला जागा मिळाली होती..जीवाची तगमग ऐकुन घेणारा एक कान मिळाला होता !!
खरच काय हवे असते एखाद्याला कधी कधी...एक सल्ला...एक आधार..एक मदत...एका प्रशाचे उत्तर...नाही....कोणाची तरी २ मिनिटे आणि ऐकून घेणारा एक कान...बस्स...
काय हरकत आहे असे कधी कधी कान-दान करायला ?
-स्वप्नाली
मार्च ०७'२०१०

गुलमोहर: 

स्वपनाली, छान लिहीलयस. Happy
खरच असं बरेच वेळा होत नाही? आपलं फक्त श्रवणकर्त्याच काम असतं. द्यायचा अस्तो फक्त दोन मिनीटांचा वेळ.

अगदी अगदी! काय हरकत आहे 'कानदान' करायला? मला तर फार बरे वाटते मी असे कोणाचे शांतपणे ऐकुन घेतले तर. भारतात असताना ज्या ठिकाणी मी नोकरी करायचे तिथे असे बरेच वेळा व्हायचे. शिपायापासुन वरिष्ठापर्यंत बर्‍याचदा मी फक्त ऐकायचे.

छान मांडलाय वेगळा विचार तुम्ही! पु ले शु

व.पु काले मला आता फार आवडत नाहीत. तरीही एकेकाळी मी त्यांचा फॅन होतो. त्यांची एक कथा आहे,एक निव्रुत्त माणूस बागेत का कॅन्टीन्मध्ये रोज लोकांची दु:खे लक्षपूर्वक ऐकून त्याना धीर देत असतो. शेवटी असे दाखवलेय की तो ठार बहिरा असतो... म्हणजे ऐकून घेणे महत्वाचे.

एक जण आयफेल तॉवर वर आत्महत्त्या करायला चढतो.त्याला एक फ्रेन्च पोलीस पाहतो. तो ओरडून त्याला खाली यायला सांगतो. तो मानून पोलीसाला सांगतो' मला मरायचे आहे, माझ्यावर कोणाचे प्रेम नाही. माझी कोणाला गरज नाही. मला कोणी विचारत नाही' वगैरे.
तो पोलीस म्हणतो 'ठीक आहे पण त्यापूर्वी ही सिगरेट तर ओढून जा....'
तो माणूस खाली येतो .पोलीस त्याला सिगरेट देतो. सिगरेत सम्पेपर्यन्त पोलीस त्याच्याशी आत्मियरेने जिव्हाळ्याने बोलतो. तोपर्यन्त त्या माणसाचे मतपरिवर्तन होते.आपल्याशी प्रेमाने बोलणारे कोणीतरी आहे अशी त्याची भावना होते आणि तो आत्म्हत्या करण्याचा विचार रहित करतो.
गोष्त छोटी आशय मोठ्ठा...........

बर्‍याच्दा सहानुभूती वगैरे पेक्षा दुसर्‍याशी बोलण्याने त्या गोष्टीवरचे आपल्या लक्शात न आलेले पैलू, अथवा तिच्याकडे बघण्याचा एखादा वेगळा दृष्टीकोन लक्षात येऊन मतपरिवर्तन होऊ शकते अथवा नवा एखादा उपाय सापडू शकतो हाही उद्देश असू शकतो. त्यामुळे बोललेही पाहिजे,ऐकलेही पाहिजे ...

खुपच छान लिहिल आहे. चांगला कान तर हवाच पण दु:खि माणसाचा नुसता हात हातात घेतला किंवा पाठिवरुन हात फिरवला तरि जि भावना येते ति फोन करुन किंवा मेल करुन येत नाहि.

स्वप्नाली, खूप आवडला हा लेख.
खरच, कधी कधी केवळ कान हवा असतो. बोलणारा बोलत रहातो... मोठ्ठ्याने विचार करावा तसा... त्याचं त्यालाच उमगत जातं, रस्ता सापडतो...

स्वप्नाली........ फारच सुरेख लिहिला आहेस लेख !! खरंच कानदानाचं पुण्यही इतर दानाइतकंच मोठं आहे Happy

स्वप्नाली.. तुझा लेख वाचून समजले कि मी जे आत्तापर्यंत करत आलेय आणी पुढेही करत राहीन ते कानदान आहे Happy
आणी या दानासाठी माझे कान सदैव उपलब्ध आहेत ही गोष्ट माझ्या सर्व मैत्रीणींनाही ठाऊक आहे Happy

आणी हो, मोस्ट इंपॉर्टंट ..या कानाचं दुसर्या कानाला कळू न देता, करता येणारं कानदानच सर्वश्रेष्ठ कानदान आहे

छान ...

फारच मस्त स्वप्नाली........ खरंच!
>>या कानाचं दुसर्या कानाला कळू न देता, करता येणारं कानदानच सर्वश्रेष्ठ कानदान आहे>>
वर्षु.. अगदी पटेश Happy