डास बोध

Submitted by मंदार-जोशी on 23 February, 2010 - 22:28

हे विडंबन आणि विनोदी कविता यांचे मिश्रण आहे. म्हणून विडंबन ह्या शीर्षकाखाली टाकतोय.
ही कविता मी चक्क मला डास चावत असताना केली आहे, त्यामुळे ह्याला (मेथड अ‍ॅक्टिंग च्या चालीवर) 'मेथड कविता' असेही म्हणता येईल. Proud

daas.gif

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

डासांचा सुकाळू
मलेरियाचा आधारू
बहुत करावा भ्रष्टाचारू, पालिकेने || १ ||

असे कामगार येती
औषध मारुनिया जाती
तरी डास आम्हां चावती, दिवसाराती || २ ||

असा हा पालिकेचा फवारा
डासांनी पचविला सारा
आम्ही म्हणतो मारा मारा, डासांना या || ३ ||

कासव, गुडनाईट, जेट लावता
घरातले या डास मारता
खर्च होतो पहा, डोंगराएवढा || ४ ||

कानांशी करती पिरपिर
रक्त शोषूनी आमुचे फार
डास होती फुगीर, आवळ्याएवढे || ५ ||

रक्त शोषूनी ड्रॅक्युला थकला
पण मलेरिया त्याने नाही पसरविला
ते काम सोडले आहे, डासांसाठी || ६ ||

अशी ही आमुची डास कथा
आणि आम्ही सोसलेली व्यथा
एकूण तुम्ही झाला नसाल 'बोर'
तर समजू आम्ही आमुचे भाग्य थोर || ७ ||

|| समाप्त ||

गुलमोहर: 

मस्त Happy

झोपेची पार लागलीय वाट
मच्छरदानीचाही केला होता थाट
तरी आत आले, घुसखोर || १०० ||

गेले मग मी बाजारी थेट
आणली मॉसक्युटो रॅकेट
हात हो लागला, दुखायाला || १०१ ||

mosquito_racket.jpg

बसता रॅकेटचा शॉक
जबरी एकेकास
एक ही दिसेना
आता आस-पास
इति डास बोध
तात्पुरते संपुर्णम्

लय भारी ... मंदारराव .... लगे रहो

छान जमलय विडंबन.

भारतातले डास चंट, चपळ असतात. थोडी शरिराची हालचाल केल्यावर त्याला प्रतिसाद म्हणुन काही काळ दुर पळतात. आमच्या या बाजुला (उन्हाळ्यात) डासांचा खुप सुळसुळाट असतो. हात हलवा, पाय हलवा, मंदाड डास उडायचे नाव घेत नसतात. प्रत्येक वेळी हातानेच मारावे लागते... निसर्गाने केवळ दोनच हात Sad दिले आहेत.

मंद्या, खतरनाक.. Lol

>>>>मंदाड डास ??
केद्या, अरे 'मंदार डास' चं विडंबन आहे ते डिप्याने केलेलं. Proud

मस्त रे मंदार ,
पण मी म्हणतो डास मारायचेच कशाला , पिऊन पिऊन किती पिणार आहेत ते , पिऊ दे ना बिचार्‍यांना , तु पण जग त्यांना पण जगु दे . ह्यालाच भुतदया म्हणतात रे Lol
तुम्हारा खुन जिसकी रगोंमे दौड रहा हो, उसे इस दुनियासे उठाने के बारे मे तुम सोच भी कैसे सकते हो ? Proud

Pages