माझी १/२ मॅरेथॉन यात्रा!!
कालचा रविवार मी पाठींबा देत असलेल्या संघांना जरी वाईट गेला (कोल्ट्स सुपरबोल हरले आणि भारताच्या क्रिकेट संघाने अर्ध्या कसोटीतच 'हे राम' म्हटलं) तरी वैयक्तिकदृष्ट्या माझे लक्ष्य मी पूर्ण करू शकलो.
गेल्या १० महिन्यतली ही तिसरी अर्ध मॅरेथॉन रेस पूर्ण केली. खरं तर मी यात भाग घेतोय ह्याचं मलाच आश्चर्य वाटतंय. कारण शाळेत असताना क्रिकेट सोडून इतर कशात कधी भाग घेतला नाही. वार्षीक क्रीडादिनाला एक लांब उडी किंवा गोळाफेक या स्पर्धांच्या पहिल्या फेरीत बाद झालो की मग दिवसभर आईसफ्रूट खात इकडे तिकडे भटकत बसणे, इतर मित्रांबरोबर गल्लीत क्रिकेट खेळणे आणि शेवटच्या दिवशी 'मार्च पास्ट' मध्ये आमच्या 'ब्ल्यू हाउस'चा झेंडा घेउन सर्वात पुढे संचलन करणे एवढाच काय तो सहभाग.
तसंच मॅरेथॉन म्ह्टलं की पळावंच लागतं हा जो बर्याच जणांचा गैरसमज असतो तसा माझाही होता. पण गेल्या वर्षी माझ्या एक मित्राने (देवाशीश भाटे) तो दूर केला. त्याने आतापर्यंत २० half आणि full मॅरेथॉन चालत पूर्ण केल्या आहेत. बरेच जण यांत चालत देखील भाग घेतात हे जेव्हा कळलं तेव्हा या स्पर्धेत भाग घ्यायला हरकत नाही असं वाटलं. आधी महिनाभर चालण्याचा सराव केला. जेव्हा एकदा सरावाच्या वेळी ८ मैल चाललो तेव्हा वाटलं हे जमु शकेल. आणि ३ मे २००९ ला "ऑरेंज काऊंटी" १/२ मॅरेथॉन ३ तास ५५ मिनिटात पूर्ण केली. त्यानंतर ११ ऑक्टोबरला सुप्रिया आणि मी दोघांनी मिळून "लाँग बीच" १/२ मॅरेथॉन पूर्ण केली आणि काल हंटीन्गटन बीच (सर्फ सिटी) १/२ मॅरेथॉन ३ तास ४५ मिनिटात पूर्ण केली.
१/२ मॅरेथॉन म्हणजे १३.१ मैल (२१ किलोमिटर).
त्यातली ही काही प्रकाशचित्रं.
१. सुरूवात - अमेरिकेच्या ५० राज्यांतून आणि १६ इतर देशांतून मिळून २०००० (विस हजार) स्पर्धक होते. त्यातल्या ६४% स्त्रिया होत्या.
२. संबंध मार्ग पॅसीफिक कोस्ट हायवे वरून होता.
३. हे फक्त दक्षीण कॅलीफोर्नीयातच (So. Cal.) शक्य आहे. एका बाजूला बर्फाच्छादीत डोंगर
४. आणि एका बाजूला पॅसीफीक समुद्राच्या लाटा.
५. रेस एकदाची संपली. हुश्श!!
६. सर्फ बोर्डच्या आकाराचं सुरेख मेडल मिळालं.
या स्पर्धांमध्ये भाग घेताना जाणवतं की आपण बर्याचवेळा उगाच बाऊ करत असतो. इथे ५ वर्षांपासून ते ८५ वर्षांच्या आजीबाईंपर्यंत सर्वजण उत्साहात भाग घेत असतात. विविध आकारमानाचे स्पर्धक आपल्या परीने रेस पूर्ण करायचा प्रयत्न करत असतात. आपण टीव्हीवर जे जिंकणारे स्पर्धक पहात असतो ती elite category वेगळी, पण इतरांचं लक्ष्य असतं आपल्या आधिच्या रेसचं टायमींग सुधारणं.
आशा आहे की हे वाचून (जर मीदेखील ह्या रेस पूर्ण करू शकत असेन तर) तुम्हालाअ देखील स्फूर्ती मिळेल आणि तुमच्या शहरातल्या पुढल्या स्पर्धेत भाग घ्याल.
आता माझं पुढचं लक्ष्य आहे सॅन फ्रान्सिस्कोची १/२ मॅरेथॉन पूर्ण करून "कॅलीफोर्नीया ड्रिमींग" मालिका पूर्ण करणे.
अरे वा अभिनंदन !!! माझी एक
अरे वा अभिनंदन !!!
माझी एक मैत्रिण गेली दोन वर्षे हाफ मॅरेथॉन पळते आहे. तिने ह्यावर्षी सिअॅअटलमधे झालेली २ तास २० मिन. पूर्ण केली. पण तुम्ही लोकं हाफ मॅरेथॉन पळुन (माझ्यासारख्या आळशींना) पुरेसं इन्स्पिरेशन देत नाहीत. आता पुढल्या वेळी पूर्ण मॅरेथॉन पळा
भले शाब्बास !
भले शाब्बास !
मस्तच. अभिनंदन. 'आपण उगीचच
मस्तच. अभिनंदन.
'आपण उगीचच बाऊ करत असतो'>>> ह्याला अनेक मोदक.
तेवढे तुमचे नी सुप्रियाचे पळतानाचे फोटो आले असते तर जास्त प्रोत्साहन मिळालं असतं.
हे शाब्बास. सही. छान वाटले
हे शाब्बास. सही. छान वाटले वाचून.
समीर बर झाले तू हे इथे टाकलस. मागच्या वर्षाच्या सुरूवातीला मी नुसतच ठरवले की आपण चालायचा सराव करायचा आणि उन्हाळ्यात एका तरी हाफ मॅराथॉन मध्ये भाग घ्यायचा, पूर्ण करू की नाही हा नंतरचा भाग पण स्पर्धेत भाग तरी घ्यायचा. असे ठरवूनही उन्हाळा आला आणि गेला पण त्यातले काहीच केले नाही आणि ते मी विसरूनही गेले :(.
त्यामुळे यावर्षी तरी माझा मागच्यावर्षीचा संकल्प मी पूर्ण करायला हरकत नाही.
झक्कास समीर ! अल्ल थे बेस्ट
झक्कास समीर !
अल्ल थे बेस्ट टो अल्ल ओफ यू !
जबरीच!!! अभिनंदन. मला पडलेला
जबरीच!!! अभिनंदन.
मला पडलेला एक प्रश्ण आहे. दोन फोटोंमध्ये एकिकडे धावणारे काही लोक वर दुसरीकडे धावणारे काही लोक आहेत. तर यात एका बाजुतून दुसरीकडे जाणे सहज शक्य आहे. तर लोक असे करणार नाहीत हे कसे ट्रॅक करतात. RFID टॅग्स वगैरे दिलेले असतात का स्पर्धकांना?
मस्त! लगे रहो!! सॅन
मस्त! लगे रहो!! सॅन फ्रान्सिस्कोमध्ये कधि आहे?
अरे वा जबरी.. !! ह्या
अरे वा जबरी.. !!
ह्या उन्हाळ्यात शक्य झालं तर नक्की भाग घ्यायचाय अर्धमॅराथॉन मधे...
मेडल मस्त आहे..
आशा तर्फे पण मॅराथॉन असते.
आशा तर्फे पण मॅराथॉन असते. त्यात ही खूप मजा असते,शिकायला मिळते, ते ट्रेनर सुद्धा ठेवतात. पैसे भरावे लागतात ते चॅरीटीत जातात. त्याला ही खूप कवरेज असते व रिस्पॉन्स असतो. १/२ व फुल असते.
समीर ,तुमचे अभिनंदन!
अरे वा, मस्त. समीर तुझे आणि
अरे वा, मस्त.
समीर तुझे आणि सुप्रियाचे अभिनंदन!
सॅन फ्रॅन मधे कधी आहे मॅरथॉन?
अभिनंदन, समीर आणि
अभिनंदन, समीर आणि सुप्रिया!
मलाही वाटायचे की मॅरेथॉन म्हणजे पळावेच लागते सॅन फॅन्सिस्को ची केव्हा आहे?
मस्त रे समीर... अभिनंदन
मस्त रे समीर... अभिनंदन तुझं..
मलाही वाटायचे की मॅरेथॉन
मलाही वाटायचे की मॅरेथॉन म्हणजे पळावेच लागते.
मस्तच. अभिनंदन
अभिनंदन समीर आणि सुप्रिया !
अभिनंदन समीर आणि सुप्रिया !
सही आहे.. पूर्ण मॅरॅथॉन पळा
सही आहे..
पूर्ण मॅरॅथॉन पळा आता कधीतरी.
मलापण मेडल आवडले. मस्त आहे.
लै भारी!!! दोघांचे अभिनंदन
लै भारी!!! दोघांचे अभिनंदन !!!
मस्तच. फुल मॅरेथॉनसाठी
मस्तच. फुल मॅरेथॉनसाठी शुभेच्छा.
आम्ही दरवर्षी रडतखडत ६ कि.मी वगैरेचा वॉक हाश्श हुश्श करत करतो. एकदा हाफ मॅरॅथॉन करुन पहायची आहे. कधी धाडस होईल कोण जाणे.
वॉक/रन- मॅरॅथॉन हा एक मानसिक प्रवास असतो नाही ? तो झाला की शारिरीक आपोआप होतो. सुरवातीला कश्शाला सुखातला जीव दु:खात टाकायचा असं वाटतं.
नात्या- काय फरक पडतो? ज्यांना हेच करायचे ते पळायला कशाला येतील ?
अरे वा! प्रेरणा मिळाली हे
अरे वा! प्रेरणा मिळाली हे चित्र.. हा लेख वाचून. मी या वर्षी मे महिन्यात Adidas Sundown Marathon मधे धावणार आहे. पहिलाच अनुभव आहे. काही खास अशी तयारी करावी लागते का समीर? जसे की जोडे, कपडे, पाणी -- यांच्या बाबतीत लिहि ना. कॅमेरा सोबत नेला तर फोटो काढायला अवकाश मिळतो का धावता-धावता?
सर्वांना धन्यवाद. सॅन
सर्वांना धन्यवाद.
सॅन फ्रान्सिस्कोची फुल/हाफ मॅरेथॉन २५ जुलैला आहे. तिथे हाफसाठी २ पर्याय आहेत.
१. पहिला मार्ग बे ब्रिजच्या खाली एंबरकेडेरोला चालू होउन गोल्डन गेट पार्कमध्ये संपतो. यांत गोल्डन गेट ब्रिजवर एक चक्कर असेल.
२. दुसरा मार्ग गोल्डन गेट पार्कमधल्या स्प्रेकल्स लेकजवळ सुरू होऊन बे ब्रिजच्या खाली एंबरकेडेरोला संपतो.
@नात्या
प्रत्येक स्पर्धकाला एक टिशर्टला लावायला नंबर टॅग (BIB) देतात तसेच शूजना लावायला एक DTAG देतात ज्यात चीप असते. सुरूवात्/शेवट तसेच मध्ये १ कींवा जास्त वेळा तो DTAG स्कॅन होतो. त्यानुसार त्या अंतरापर्यंत तुमचा वेग (pace) काय होता हे कळतं. पहिल्या ३ स्पर्धकांशिवाय ईतरांना फक्त मेडल मिळत असतं. पहिल्या ३ स्पर्धकंबरोबर मात्र पोलीसांची गाडी/बाईक असते.
रैनाने सांगितल्याप्रमाणे यांत भाग घेणारे पळण्या/चालण्यासाठीच आलेले असल्याने तसं शक्यतो कोणी करत नाही.
@रैना
वॉक/रन- मॅरॅथॉन हा एक मानसिक प्रवास >> अगदी अगदी. सरावाच्या वेळी जर ७ ते ८ मैल चालू/पळू शकलात तर मानसीक तयारी होते. फक्त सुरुवातीऐवजी ९-१० मैल झाले की वाटतं कशाला पैस भरून स्वतःला त्रास करून घेतोय त्याला रेसच्या भाषेत hitting the wall म्हणतात. हापमध्ये ९-१० मैल आणि फुलमध्ये २०-२१ मैल गाठल्यावर हे वाटू शकतं.
@बी
जरुर भाग घे. चालताना / पळताना तू हवी तेवढी विश्रांती घेऊ शकतोस फक्त एकूण वेळ जास्त लागेल . त्यामुळे फोटोच काय व्हिडीओ शूटींगपण करत तू जाऊ शकतोस.
काही काळज्या ज्या जरूर घेतल्या पाहिजेत.
१. शूज - हे अत्यंत महत्वाचे असतात. चालण्याचे आणि पळण्याचे शूज वेगळे असतात. तुम्ही स्वता: दोन्ही प्रकार करून बघा. एका प्रकारात टाचेवर जोर येतो तर दुसर्या प्रकारात पुढल्या पावलावर. तर त्याप्रमाणे शूज घ्या.
२. शूज २ - आपल्या तळपायांच्या आकाराप्रमाणे शूज घ्या. याची चाचणी करण्यासाठी पाय ओला करून त्याच ठसा उमटवून तपासा. भरीव किंवा मध्ये पातळ ठसा असेल तर तसे वेगळे शूज मिळतात.
३. सॉक्स - फक्त DryFit मोजे (सॉक्स) वापरा. कॉटनचे बिल्कूल वापरू नयेत. कॉटनने पायाला blisters येतात.
जे भाग घेतायत त्यांना हार्दिक शुभेच्छा!!!
मस्तच !अभिनंदन आणि पुढील
मस्तच !अभिनंदन आणि पुढील मॅरेथॉनसाठी शुभेच्छा!
समीर, माहितीही उपयुक्त.
समीर, माहितीही उपयुक्त.
तिनदा अभिनंदन!! माझा मित्र
तिनदा अभिनंदन!!
माझा मित्र पळलाय एकदा...मला पण करावं वाटतं, बघु कधी जमतय!!
सहीच! माहितीपण उपयुक्त
सहीच! माहितीपण उपयुक्त सांगितलीयेस.
प्रीति, हार्टफर्ड मधे कधी असेल तर आपण ट्राय मारु एकत्र
सहीच. अभिनंदन... मेड्ल मस्त
सहीच. अभिनंदन... मेड्ल मस्त आहे.
मी पण हाफ मॅरॅथॉन एक वर्षापुर्वी पळाले. अगदी पैसे भरून का आपण त्रास करुन घेतो आहोत वगैरे वगैरे सगळ वाटल. पण आता व्यसन लागल आहे पळायच. मी पण नापा मधे पळणार आहे ह्या वर्षी fall मधे. हाफच अजूनतरी.. पण बघू कधीतरी फुल पण पळेन.
अजून एक गोष्ट म्हणजे पळायला सुरुवात केल्यावर बरेच त्रास होउ शकतात. जसं I was very frustrated because of shin pain. बंद केलं मी पळण त्यामुळे अगदी. पण माझ्या मेंटॉरने मला पळवायचच असं मनावर घेतल होतं .. पळून झाल की २० एक मिनिटे बर्फाने पायांना मसाज करुन, शु सपोर्ट वगैरे वापरुन कमी झाला त्रास.
अरे मी मेडल पाहिलचं नव्हतं.
अरे मी मेडल पाहिलचं नव्हतं. कसलं सुंदर आहे ना.. इथे आम्हाला आदिदासचे टी-शर्ट देणार आहेत बहुतेक
समीर, बुट-मोज्यांबद्दल छान माहिती दिलीस. धन्यवाद!
अभिनंदन, सुप्रिया आणि
अभिनंदन, सुप्रिया आणि समीर,
>>तसंच मॅरेथॉन म्ह्टलं की पळावंच लागतं हा जो बर्याच जणांचा गैरसमज असतो तसा माझाही होता
माझाही हे वाचून दूर झाला...
अभिनंदन, सुप्रिया आणि समीर.
अभिनंदन, सुप्रिया आणि समीर. झक्कास मेडल.
मॅरेथॉन = रन / रेस असंच वाटलं होतं पण ते तसं नाहीये हे आत्ता कळलं.
अभिनंदन समीर .. मॅरेथॉन बद्दल
अभिनंदन समीर .. मॅरेथॉन बद्दल आणि तो अनुभव इथे लिहील्या बद्दलही
अभिनंदन समीर
अभिनंदन समीर
महाराज! आशिर्वाद द्या आता!
महाराज! आशिर्वाद द्या आता! आमची हाफ मॅरॅथॉन आहे परवा.
लेख लिहील्याबद्दल पुन्हा धन्यवाद! दररोज आपलं कामावर जाणे परत येणे ह्या दिनक्रमाचा फार कंटाळा आला होता. नुसतं व्यायाम करणं एक पण एखादं लक्ष्य साधण्याकरता केलेली तयारी वेगळी असते. आणखिन मजा येते. हा लेख वाचल्यावर डोक्यात किडा वळवळायला लागला आणि मग पराग च्या वेगे वेगे .... लेखाच्या बाफं वरच सायोनी मॅरॅथॉनची माहिती दिली. त्यानंतर एक आठवड्यात पळण्याचे निश्चित केले. बाकी आता एकदा भोपळा न मिळता मॅरॅथॉन पार पाडली की सविस्तर वृत्तांत लिहीनच.
इथली मॅरॅथॉन थोडी किचकट आहे नविन भाग घेणार्यांकरता. ३.५ तासांनंतर इथे रसत्यावरची ब्लॉकेड्स काढली जातात आणि रस्ता ट्रॅफिक ला खुला केला जातो त्यामुळे ३.५ तासात अंतर पुर्ण न केल्यास कदाचित पदक, मानाची टोपी मिळणार नाही.
आता मोहिम फत्ते झाली तरच जीवाचं नाव बुवा!!!
मुजरा!!!
Pages