कल्लोळ

Submitted by मिल्या on 28 January, 2010 - 02:35

संपता संपेचना कल्लोळ ह्या देहातला
ऐकला नाहीच मी आवाज कारण आतला

एकदा केली मनावर मात मेंदूने जरा
तेवढ्यानेही किती आयुष्यभर तो मातला

आज साक्षात्कार झाला; जग असे का वागते?
आज जवळुन पाहिला, मीही पशू माझ्यातला

बोलली काहीच नाही! शल्य ना त्याचे मला
बोचला परकेपणा नजरेतल्या मौनातला

काल आयुष्यात पहिल्यांदा पराभव चाखला
चक्क छातीवर जगाने घाव की हो घातला!

एकदा मागे जरासा गोड त्यांना लागलो
त्याक्षणापासून झालो ऊस मी चरकातला

शेवटी कंटाळुनी तो खालती आला पुन्हा
थाट सारा बेगडी होता म्हणे स्वर्गातला

लावले त्यांनी दिवे आपापल्या गावांमधे
दूर ना झाला तरी अंधार ह्या देशातला

काय माझी कैद ह्या जन्मी तरी संपेल का?
ह्या विचारानेच कैदी त्रस्त गाभार्‍यातला

गुलमोहर: 

मस्तच.

बोलली काहीच नाही! शल्य ना त्याचे मला
बोचला परकेपणा नजरेतल्या मौनातला

एकदा मागे जरासा गोड त्यांना लागलो
त्याक्षणापासून झालो ऊस मी चरकातला

काय माझी कैद ह्या जन्मी तरी संपेल का?
ह्या विचारानेच कैदी त्रस्त गाभार्‍यातला >> आ हा च!

आज साक्षात्कार झाला; जग असे का वागते?
आज जवळुन पाहिला, मीही पशू माझ्यातला

शेवटी कंटाळुनी तो खालती आला पुन्हा
थाट सारा बेगडी होता म्हणे स्वर्गातला>>
मस्तच!

व्वाह! गझलनवाझ जियो !

बोलली काहीच नाही! शल्य ना त्याचे मला
बोचला परकेपणा नजरेतल्या मौनातला

काय माझी कैद ह्या जन्मी तरी संपेल का?
ह्या विचारानेच कैदी त्रस्त गाभार्‍यातला

दोन्ही शेर ख ल्ला स !

काय माझी कैद ह्या जन्मी तरी संपेल का?
ह्या विचारानेच कैदी त्रस्त गाभार्‍यातला

>>>>>मस्तच लिहिलेस रे.

climax........

धन्य गझल आहे. मीटर कुठे कुठे हुकल्यासारखे वाटले. बारकाईने पाहिले पाहिजे.

पण एकेक शेर अफाट आहे. प्रत्येक शेरात वेगवेगळा झटका आहे.

शेवटचा शेर चोरावासा वाटतोय. देणार का?

प्रतिसादाबद्दल परत एकदा धन्यवाद

मीटर कुठे कुठे हुकल्यासारखे वाटले.>>> सारंग कुठे हुकल्यासारखे वाटते मीटर तुम्हाला? मला नाही वाटत मीटर कुठे चुकलेय... हा एक सुट तेवढी घेतली आहे... 'जवळुन'

क्या बात है शायरसाहब..मजा आ गया !

बोलली काहीच नाही! शल्य ना त्याचे मला
बोचला परकेपणा नजरेतल्या मौनातला...........सही !!

एकदा मागे जरासा गोड त्यांना लागलो
त्याक्षणापासून झालो ऊस मी चरकातला >>>वा!

शेवटी कंटाळुनी तो खालती आला पुन्हा
थाट सारा बेगडी होता म्हणे स्वर्गातला >> अगदी अगदी

काय माझी कैद ह्या जन्मी तरी संपेल का?
ह्या विचारानेच कैदी त्रस्त गाभार्‍यातला >> मस्तच..

बोलली काहीच नाही! शल्य ना त्याचे मला
बोचला परकेपणा नजरेतल्या मौनातला>>> खल्लास Happy

एकदा मागे जरासा गोड त्यांना लागलो
त्याक्षणापासून झालो ऊस मी चरकातला>>> क्या बात है!!!

काय माझी कैद ह्या जन्मी तरी संपेल का?
ह्या विचारानेच कैदी त्रस्त गाभार्‍यातला>>>क्लासच !!

बाकीचे शेर उत्तम आहेत Happy अप्रतीम गझल Happy

उशिरा प्रतिसाद देतोय त्याबद्दल क्षमस्व...
प्रतिसाद दिल्याबद्दल खूप सारे आभार

बोलली काहीच नाही! शल्य ना त्याचे मला
बोचला परकेपणा नजरेतल्या मौनातला >>> विशेष भावला.

मिल्या, सही है!

सुंदरच. मात, ऊस, दिवे या शेरात शब्द मस्त खेळवले आहेत.

संपता संपेचना कल्लोळ ह्या देहातला
ऐकला नाहीच मी आवाज कारण आतला
येथे आवाज आणि कारण ह्या शब्दांच्या बैठकीची जागा अदलाबदल केली तर
आपल्याला अभिप्रेत असलेला कल्लोळ अजूनच उठून दिसेल असे वाटते का?
-सविनय व ज्ञानार्जनार्थी.