Submitted by संयोजक on 25 January, 2010 - 15:45

वरील मजकूर आहे छोट्या मायबोलीकर "क्रिती" च्या सुंदर हस्ताक्षरात आणि हे बडबडगीत आहे "इरा"च्या आवाजात.
ही स्पर्धा एकाच वयोगटात घेण्यात येणार आहे: वय वर्षे २ ते ५
स्पर्धेसाठी प्रवेशिका marathibhasha at maayboli.com वर पाठवावी. प्रवेशिका पाठवताना ई-पत्राच्या विषयामधे Marathi Bhasha : Bolgani असे नमूद करावे.
स्पर्धेसाठी माध्यम: व्हिडीओ, ऑडिओ
साहित्य पाठवण्याची अंतीम तारीख: २० फेब्रुवारी २०१०
अधिक माहितीसाठी संयोजक समितीशी marathibhasha at maayboli.com इथे संपर्क साधावा अथवा ह्याच पानावर आपला प्रश्न विचारावा.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच स्पर्धा आहे. ज्या
मस्तच स्पर्धा आहे. ज्या मायबोलीकरांची पोरं या गटात येत नाहीत त्यांनी नात्यातल्या, मैत्र-मैत्रिणींच्या मुलांच्या आवाजातल्या प्रवेशपत्रिका पाठवल्या तर चालतील का?
जाहिरात सुंदरच! क्रितीचं अक्षर वळणदार आहे!
इराच्या आवाजातलं बडबडगीत फास्टफॉरवर्ड केल्यासारखं ऐकू येतंय.
(की माझ्याच कंप्युटरची भानगड आहे?)
फायरफॉक्स्मधून ऐकलं. कसलं गोड म्हंटलंय 'टकबक टकबक घोडोबा'..!
फारच मस्त कल्पना आहे !
फारच मस्त कल्पना आहे ! लाडोबाने काय गोड म्हटलंय बडबडगीत. जाहिरात अगदी वळणदार अक्षरांत वाचायला मिळाली त्याची गंमत वाटली.
आमच्याकडून प्रवेशिका नक्की पाठवणार.
आम्ही पण पाठवणार प्रवेशिका
आम्ही पण पाठवणार प्रवेशिका
फक्त ती ऑडियो फाईल कशी पाठवायची त्याबद्दल कोणीतरी मला मार्गदर्शन करा. मी मोबाईल रेकॉर्ड करेन. मग ती फाईल मेलमधून अॅटाच करून पाठवता येईल का? हा बी प्रश्न असू शकेल पण माझा नाईलाज आहे.
भ्या फक्त २-४ वयोगट आहे असो
भ्या
फक्त २-४ वयोगट आहे
असो आम्हाला ऐकायला मिळतील का सगळी बोलगाणी?
शुभेच्छा सगळ्या बालगोपाळांना
प्रवेशिका एकापेक्षा जास्त
प्रवेशिका एकापेक्षा जास्त पाठवत्ता येतील का??
कविता, मोठ्या मुलांसाठी निबंध
कविता, मोठ्या मुलांसाठी निबंध स्पर्धा आहेत. अधिक माहितीसाठी इथे पहा.
मंजु, ऑडिओ फाइल ई-पत्रासोबत जोडुन marathibhasha at maayboli.com वर पाठवावी. प्रवेशिका पाठवताना ई-पत्राच्या विषयामधे Marathi Bhasha : Bolgani असे नमूद करावे.
साहित्य पाठवण्याची अंतीम तारीख: २० फेब्रुवारी २०१०
अरे वा !!! छान आहे
अरे वा !!! छान आहे पोस्टर.
पोरीला तयार केला पाहिजे गाण्यासाठी.
एरवी अखंड तोंड चालू असतं. पण कॅमेरा समोर असला की तोंडाला कुलुप.
वयोगट २ ते ४ ?
वयोगट २ ते ४ ? च्क्च्क्च्क्च्क आधी सांगायला पाहिजे होत राव...
राहुल, अरे रेकॉर्ड करव मग गाण
राहुल, अरे रेकॉर्ड करव मग गाण तिच्याकडुन.
असुदे, आधीच तर सांगितलय
वर संयोजकांनी लिहीलय ते वाचा आणि मोठी मुल असतील तर इवलेसे रोप ला भेट द्या
माझा मुलगा साडेचार वर्षांचा
माझा मुलगा साडेचार वर्षांचा आहे, त्याला कशात भाग घेता येईल?
४ ते ६ वयोगटासाठी काहीच नाही
इथे प्रवेशिका पाठवण्यासाठी
इथे प्रवेशिका पाठवण्यासाठी कोणत्या ग्रुपचे सदस्यत्व घ्यावे लागेल? ते कसे घ्यायचे?
रैना, मस्तच,गोडु वाटतोय इराचा
रैना, मस्तच,गोडु वाटतोय इराचा आवाज. आणि बॅकग्राऊंडला तुझाही.
स्वरा, प्रवेशिका पाठवण्यासाठी
स्वरा, प्रवेशिका पाठवण्यासाठी कुठल्याही गृपचे सदस्यत्व घेण्याची गरज नाही.
स्पर्धेसाठी प्रवेशिका marathibhasha@maayboli.com वर पाठवावी. प्रवेशिका पाठवताना ई-पत्राच्या विषयामधे Marathi Bhasha : Bolgani असे नमूद करावे.
गोड ... आधी केले असेल तर
गोड
... आधी केले असेल तर चालेल का? म्हणजे मुलगी ४ च्या आत होती तेव्हा केलेले?
धन्यवाद अमृता......
धन्यवाद अमृता......
आपल्या पाल्याचे वय पाच
आपल्या पाल्याचे वय पाच वर्षांपेक्षा कमी असल्यास तो/ती ह्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी पात्र आहे.
प्रीति, वरील नियमाप्रमाणे राम बोलगाणी स्पर्धेत भाग घेऊ शकतो.
सुनिधी, माफ करा, मुलीचे सध्याचे वय पाच किंवा अधिक असल्यास प्रवेशिका स्वीकारता येणार नाही.
धन्यवाद संयोजक!!
धन्यवाद संयोजक!!
धन्यवाद संयोजक!! ... खुप
धन्यवाद संयोजक!! ... खुप उत्सुक आहे बोबडे बोल ऐकायला.. जास्तीतजास्त लोकांनी ह्यात भाग घ्यावा अशी मीच विनंती करते.
वरच्या क्लिप मधे आहे तसे
वरच्या क्लिप मधे आहे तसे लहानमुलां बरोबर मधे मोठ्यांचा आवाज आला तर चालणार आहेत का (म्हणजे पुढच्या शब्दाचा क्लू देण्यासाठी... )
हह, हो चालेल.
हह, हो चालेल.
त्वरित उत्तराबद्दल धन्यवाद
त्वरित उत्तराबद्दल धन्यवाद संयोजक.
संयोजक, जर वयोमर्यादा पाच
संयोजक, जर वयोमर्यादा पाच वर्षापर्यंत केली असेल, तर वर स्पर्धेच्या घोषणेतही (हेडरमध्ये) तसा बदल करावा ही विनंती.
धन्यवाद. बदल केला आहे.
धन्यवाद. बदल केला आहे.
खूपचं सुंदर उपक्रम करताहात
खूपचं सुंदर उपक्रम करताहात तुम्ही सर्व! अगदी मनापासून खूप खूप आनंद झाला हे सर्व वाचून आणि ऐकून. लहान मुलांमधे केवढी पॉझिटीव्ह ऐनर्जी असते हे लग्गेच कळले. मला जमतील तेवढ्या बालकविता-गाणी मी गोळा करुन तुम्हाला पाठवेन.
मला काही प्रश्न आहेत:
१) माझी भाची कल्याणी, ४ वर्षाची होत आली आहे. तिला या स्पर्धेत सहभागी होता येईल का?
२) वयोमर्यादा थोडी वाढवून मिळेल का? म्हणजे बाकीच्या भाच्यांना पण यात सहभागी करता येईल.
३) गाणी म्हणवून घेताना आई किंवा बाबा यांनी मधे जर थोडे शब्द सांगितलेत मुलांना तर चालतील का? कधी कधी मुलं अडखळतात.. पुढे जात नाहीत म्हणून त्यावर हा उपाय.
४) गाणे जर मराठी किंवा ईंग्रजी किंवा हिन्दी किंवा इतर कुठल्याही भाषेतील चालेल का?
धन्यवाद आणि शुभेच्छा!
बी, १. वयोमर्यादा २ ते ५
बी,
१. वयोमर्यादा २ ते ५ करण्यात आली आहे त्यामुळे तुमची भाची नक्कीच भाग घेउ शकते.
२.५ वर्षांवरील मुलांसाठी 'इवलेसे रोप' स्पर्धा आहे. मोठी मुले तिथे भाग घेउ शकतात.
http://www.maayboli.com/node/13619
३.हो, चालेल.
४.मराठी भाषा स्पर्धे साठी गाणे मराठीतच असलेले उत्तम.
हे आज बघितलं मी. काय मस्त
हे आज बघितलं मी.
क्रितीचं अक्षर पण छानय. आवडली जाहिरात.

काय मस्त म्हटलय इरानी.
आयामला नाही घेता येणार यावेळी भाग. पुढच्या वर्षी नक्की.
भाग घेणार्या सगळ्या पिल्लांना शुभेच्छा.
इरा ला माझ्याकडुन एक गोग्गोड
इरा ला माझ्याकडुन एक गोग्गोड किच्चा! 'घोडोबा मस्त म्हंटलय.
क्रिती सुरेख लिहीलय.
एरवी अखंड तोंड चालू असतं. पण कॅमेरा समोर असला की तोंडाला कुलुप.>>>> आमच्याकडेपण असंच आहे.
जरा नेट लावुन तयार करायला हवं. मुड असला तर बरं म्हणेल तो असं वाटतय.
गाणं एक नंबर आहे..
गाणं एक नंबर आहे..
क्या बात है! किती गोड आहे
क्या बात है! किती गोड आहे इराचं गाणं.. थकवा एकदम पळून गेला.
सयोजक समिती, मी कालच माझ्या
सयोजक समिती,
मी कालच माझ्या मुलीच्या,सनिकाच्या अवाजातील एक बडबडगीत पाठवलय्.ते मिळाले का?
त्यात मी तिच वय नमूद करायला विसरलेय. ती साडे तीन वर्षाची (३.६ वर्षे) आहे.परत ई-पत्र पाठवायला हवय का?
तसदी बद्दल क्षमस्व....
तोषवी.
Pages