Submitted by नितीनचंद्र on 24 January, 2010 - 11:00
तो म्हणाला मला
"ती' येणार कारे अॅलिमनीला ?
खुप वर्ष झाली पाहिल नाही तीला
जे बोलायच होत ते राहुनच गेल "त्या " वेळेला.
काय म्हणाव या खुळ्याला ?
मुलच काय नातवंड झाली असतील एव्हाना "तीला"
इतकी वर्ष लोटली या घटनेला
"हा" अजुन कुरवाळतो आहे त्या जखमेला
तो काळच असा होता
बहुधा "तीचापण" जीव "याच्यात" गुंतला होता
हा जातीचा ना पातीचा
त्यातुन आतल्या गाठीचा
शेवटी व्हायच तेच झालं
बापान तीच्या मुंबईला शिफ्ट केलं
तुटला नाही रडला नाही
गप्प असा झाकुन राहीला
पडल ते दान सोशीकपणे
मुक राहुन खेळीत राहीला
पंधरा वर्षानी एक दिवस
बांध याचा राहुन फुटला
तीसर्या पेग ला सारे गुपीत
माझ्याजवळ सांगुन बसला
अजुन त्याला एकच आशा
भेटेल ती एक दिवस
डोळे त्याचे शोधत रहातात
रुप तीचे आठवत आठवत
गुलमोहर:
शेअर करा
आता पुढची कविता 'अॅलिमोनी'
आता पुढची कविता 'अॅलिमोनी' का?
छान आहे..!!
छान आहे..!!
हम्म्म....things unsaid are
हम्म्म....things unsaid are always unheard ....
एकदम छान....
एकदम छान....
मस्त!
मस्त!
म्स्त ! खुप गहरी
म्स्त ! खुप गहरी
खुप छान!!
खुप छान!!
आठवणी... सुरेख लिहलंय.
आठवणी...
सुरेख लिहलंय.
आवडली.. !
आवडली.. !
मस्तच कविता नि३! जुन्या जखमा
मस्तच कविता नि३! जुन्या जखमा ताज्या होतात कि नै?

दुसर्याची व्यथा उत्तम
दुसर्याची व्यथा उत्तम मांड्ली
(No subject)
त्या एका हळव्या कोपर्यात...
त्या एका हळव्या कोपर्यात... बरेच अनुत्तरीत प्रश्न.... कधी कधी तसेच राहतात...... हजारो ख्वाहिशे ऐसी...
मस्त...
मस्त...