स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना यांचा संग्रह

Submitted by अश्विनी के on 19 January, 2010 - 03:10

नमस्कार,

लहानपणी शुभंकरोती म्हणताना आपण काही काही स्तोत्रे, श्लोक म्हणत असू. आपल्या ऋषी-मुनींनी तपसाधना करुन अनेक स्तोत्रे, स्तवने सिद्ध केली आहेत. त्यातील काही आपल्या नित्य पठणात असतात तर काही तात्कालीक कारणासाठी उपासना म्हणून म्हटली जातात. ह्या स्तोत्रांमधे बीजमंत्र सामावलेले असतात व त्यांचे जमेल तसे पठण निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणते, आपल्या विचारात, प्रारब्धात. विचार सात्विक व्ह्यायला लागले की हातून चूका कमी कमी घडू लागतात, मन (जे आपले प्रारब्ध घडवते) आपल्या ताब्यात येऊ लागते. सगळ्यात ओढाळ मनासारखे काहीच नाही. आजच्या पिढीला व पुढच्या मोठे होऊ घातलेल्या पिढीला मनावर ताबा मिळवण्याची खूप गरज आहे. पुढची पिढी दहशतवादी विचारांची बनायला नको आहे.

प्रकाशाचे उपासक हे शुद्ध दैवतांचीच उपासना करतात ज्यामधे स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे, प्रदेशाचे भले व्हावे, रक्षण व्हावे हा हेतू असतो तर अंधाराचे उपासक हे क्षुद्र दैवतांची उग्र प्रकारे उपासना करतात ज्यामधे दुसर्‍याचे वाईट व्हावे हाच मुख्य हेतू असतो, तंत्रविद्येचा, जारण मारणाचा वापर असतो.

इथे शुद्ध दैवतांच्या उपासनांमधे समावेश होऊ शकणार्‍या स्तोत्रं, श्लोक, प्रार्थना शक्य असल्यास कारण व फलितासह लिहिणे अपेक्षित आहे (मायबोलीवर दुसर्‍या प्रकारचे सदस्य असूच शकत नाहीत म्हणा Happy ) जेणेकरुन मायबोलीवर एकेच ठिकाणी सगळे मिळू शकेल, गूगलवर शोधत बसायची आवश्यकता नाही. स्तोत्र, अध्याय, श्लोक मोठे असतील तर लिंकही देण्यास हरकत नाही (अ‍ॅडमिनची हरकत असल्यास तसे कृपया कळवावे व त्यांच्या आदेशानुसार लिंका देऊ नयेत.)

सर्वांना धन्यवाद Happy आतापर्यंत खालील स्तोत्रे इ. जमा झाली आहेत. जसजशी भर पडेल तसतशी यादी अपडेट करायचा प्रयास करेन.

http://sanskritdocuments.org/sanskrit/by-category/stotra.php इथे भरपूर स्तोत्रं पीडीएफ मध्ये आहेत.

****************************************************************************************************
(खालील स्तोत्रांच्या लिंक अनुक्रमणिका रुपाने देण्याचे काम शाम भागवत ह्यांनी केले आहे. त्यांना मनःपूर्वक धन्यवाद)

पान १
१) गायत्री मंत्र
२) दत्तबावनी
३) श्लोक
४) घोरकष्टोद्धरण स्तोत्र
५) तुळजा भवानी - लिंक
६) श्री भवानी अष्टक
७) श्री साईसच्चरित - लिंक
८) शिवपञ्चाक्षर स्तोत्र
९) करुणा त्रिपदी
१०) धन्य धन्य हो प्रदक्षिणा
११) श्री दत्तस्तव स्तोत्र
आणि श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) यांच्याबद्दलची लिंक केदार जोशी यांच्या पोस्टमधे.
पान २
१२) येई वो विठ्ठले
१३) श्री समर्थ रामदास - लिंक
१४) नव-नाग स्तोत्र
१५) गणपती अथर्वशीर्ष - लिंक
१६) नि:शंक हो निर्भय हो मना रे (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र)
१७) दत्तमाला मंत्र
पान ३
१८) श्री स्वामी समर्थाष्टक
१९ ) श्रीगणपती स्तोत्र
20) श्री मारुती स्तोत्र (भीमरुपी महारुद्रा)
२१) नवग्रह स्तोत्र
२२) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी
२३) हनुमंताचा धावा
२४) श्लोक
२५) तीर्थप्राशन, करदर्शन व भूमीवंदन श्लोक
२६) संपूर्ण नवनाग स्तोत्र
२७) शुभंकरोति कल्याणम
२८) कालभैरवाष्टक
२९) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र
३०) शनी मंत्र
३१) रुद्र
पान ४
३२) संपु���्ण आरती सन्ग्रह /मनाचे श्लोक/ भगवद गीता - लिंक (गौतम्७स्टार यांची पोस्ट)
३३) श्री आदि शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे - लिंक (चिनूक्स यांची पोस्ट)
३४) जयजयाजी गणपती (गणपती स्तोत्र)
३५) जगन्नाथपंडितांचं गंगालहरी - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३६) प्रार्थना
३७) श्रीसूक्त - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३८) विविध स्तोत्रं (ऑडियो) - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३९) गणेश / विष्णू / राम / हनुमान इत्यादींची स्तोत्रे - लिंक्स (मीनल यांचे पोस्ट)
४०) आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक
४१) सुंदरकाण्ड - लिंक (GauriC यांची पोस्ट)
४२) पुरुषसूक्त
४३) http://khapre.org/ (स्तोत्रे / पोथ्या व इतर वाड्मयाचा संग्रह (महेश यांची पोस्ट)
44) दत्तलीला मंत्र
४५) मंगलाष्टके - लिंक (महेश यांची पोस्ट)
४६) लक्ष्मी श्लोक / शारदा स्तवन / गणपती श्लोक
पान ५
४७) स्वामी समर्थ माला मंत्र
४८) सूर्याष्टक
४८) हनुमान चलिसा - लिंक (GauriC यांची पोस्ट)
४९) वदनी कवळ घेता - मातृभूमीसाठी
५०) भगवद्गीता / दासबोध - लिंक (saket यांची पोस्ट)
५१) अष्टलक्ष्मी स्तोत्र - लिंक (GauriC यांची पोस्ट)
५२) शांती मंत्र
५३) शिवताण्डव स्तोत्र
५४) श्रीरामाचा पाळणा (pdf फाईल)
५५) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी - संपूर्ण - जयवी यांची पोस्ट
५६) श्री समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र (राष्ट्राच्या सर्वांगिण रक्षणासाठी)
 ५७) मेधासूक्त - लिंक (कदंब यांची पोस्ट)
५८) विष्णूसहस्रनाम / भगवद्गीता - लिंक (महेश देशपांडे यांची पोस्ट)
५८) चर्पटपञ्जरिका स्तोत्रम.
५८) सुंदरकाण्ड ध्वनीरुपात
पान ६
५८) नुपेक्षी कदा राम दासाभिमानी
५९) सूर्यनमस्कार
६०) नवग्रहपीडाहरस्तोत्र
पान ७
६१) रुद्राष्टक - लिंक (माधव यांची पोस्ट)
६२) श्री दुर्गासप्तशती सार
६३) ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम्
६४) दत्तदशक स्तोत्र
६५) श्रीमहिषासूरमर्दिनी स्तोत्र
६६) कैलासराणा शिवचंद्रमौळी...
पान ८
६७) श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक
६८) आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती
६९) श्रीविष्णो: षोडशनामस्तोत्रम्
७०) रामरक्षा
७१) श्री हनुमंतांच्या उपासनेचे कारण व कार्य.
पान ९
७२) श्रीरामांची कर्पुरआरती
७३) मारुती स्तोत्र आणि त्याचे निरुपण (लिंक)
७४) संगितातल्या विविध रागांमधे गायल्या गेलेल्या दत्तबावनीची लिंक (अभि यांची पोस्ट)
७५) पवमान सूक्त - लिंक (अभि यांची पोस्ट)
७६) गणपती स्तोत्र (मराठी)
७७) गायत्री मुद्रा (व्हिडियो) - अभि यांची पोस्ट
पान १०
७८) दयाळू तू देवा खचित आहेसि - संत एकनाथांची रचना
७९) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम्
८०) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम्
८१) सनातनदेवीसूक्त
८२) शिवषडाक्षर स्त्रोत्र
८३) श्री महालक्ष्मी स्तोत्र
८४) देवीची आराधना
८५) स्वामी समर्थांना स्नान घालताना किंवा स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद
८६) श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक
८७) श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित "आरती नर्मदेची"
८८) श्रीदासगणूंनी रचलेले श्रीसाईबाबांवरील पद
पान ११
८९) धर्मराजाचे दुर्गास्तवन
९०) अन्नपूर्णास्तोत्रम्
९१) श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित "उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेय''
९१) सद्गुरु स्तोत्र
९२) विविध आरत्या महालक्ष्मीची आरती
श्री मंगेशाची आरती
श्री शांतादुर्गेची आरती
अंबेची आरती
विडा
९३) श्री रंग बावनी
९४) आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना
पान १२
९५ ) दत्तबावनी (मराठी)
९६) नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन
९७) अमोघशिवकवचम
९८) प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर
९९) अंबे जगदोद्धारिणि गे |
१००) नृसिंहसरस्वती अष्टक
१०१) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी..
१०२) लतादीदीं च्या आवाजातली रामरक्षा - श्रीकांत यांच्या पोस्टमधील लिंक
१०३) सूर्यस्तुती
पान १३
१०४) दुर्गाकवच - लिंक (माधव यांची पोस्ट)
१०५) बजरंग बाण
१०६) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र - लिंक
१०७) श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम्
*अर्थासहित) न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो
१०८) शांतीपाठाचा अर्थ
१०९) शिव आरती
११०) या कुन्देन्दुतुषारहार धवला
१११) नवनाथ कथा सार - लिंक (माधव यांची पोस्ट)
११२) करुणाष्टकं (रामदास स्वामी)
पान १४
११३) करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन - लिंक
११४) श्री लिंगाष्टकः
११५) व्यंकटेश स्तोत्र - लिंक (हसरी यांची पोस्ट)
११६) ५२ श्लोकी गुरुचरित्र
११७) सार्थ दत्तबावनी
पान १५
११८) श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य
११९) श्री अक्कलकोट स्वामी मानसपूजा
१२०) श्री स्वामी समर्थ स्तवन (नाही जन्म....)
१२०) विविध स्त्रोत्रांची लिंक - joshnilu यांची पोस्ट
१२१) GOD grant me the SERENITY...
१२१) GOD grant me the SERENITY... (मराठीत)
१२२)सर्वसिध्दी मंत्र
१२३) श्री स्वामी समर्थ मानस पूजा
१२४) श्री शिव मानस पूजा
१२५) शनी स्तोत्र
श्रीगुरुचरित्र (पाळावयाचे सामान्य संकेत)
!!भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.!!
पान १६
१२६) श्री दत्तात्रेय स्तुती
१२७) नवरात्र अष्टमी होम
१२८) देवीची गाणी, संबळ गीत, जोगवा, आरत्या इत्यादी.
१२८) श्रीदेवी उपासना - उपचार पद्धती, श्री गणेशस्तोत्रम , अथ श्री महालक्ष्म्यष्टकम्, अथ तंत्रोक्त देवीसूक्तम्, श्री सरस्वति स्तोत्र, अथ श्री सूक्तम् , श्री गणपतीच्या आरत्या, श्रीदेवीच्या आरत्या, माहुरगडावरी माहुरगडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास, श्री महालक्ष्मी आरती - वससी व्यापकरुपे, आरती श्री लक्ष्मी - अंबिके तुझे गे, श्रीयोगेश्वरी (अंबेजोगा‌ई) देवीची आरती, श्रीकरवीरनिवासिनीची (कोल्हापूरची अंबाबा‌ई) आरती, श्री शाकंभरी देवीची आरती, गोंधळाची संबळगीत, श्री देवीचे जोगवा संबळगीत, श्री देवीचे जोगवा, गोंधळ - उदो उदो गर्जुनी , श्रीदेवीची भजने, श्रीदेवीची खेळगाणी, कुंकू,  दंडवत, निरोप आरती, आरती श्री लक्ष्मी - सौम्य शब्दे उदोकारे
१२९) श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र यूट्यूबवर.
पान १७
१३०) श्री ज्ञानदेव हरिपाठ
१३१) श्री देवी कवच
१३२) सिद्धमंगल स्तोत्र
१३३) रघुपति राघव राजा राम - भजन
१३४) पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवच स्तोत्र
१३५) श्रीपञ्चम���ख हनुमत्कवचमंत्र
पान १८
१३६) श्री महालक्ष्मी माहात्म्य
१३७) संस्कृत स्तोत्रांच्या लिंक्स (वरदा यांची पोस्ट)
१३८) काकड आरतीच्यावेळचा अभंग
१३९) भग्वद्गीता ऑडियो लिंक (monalip यांची पोस्ट)
१४०) महालक्ष्म्याष्टक स्तोत्रा - ऑडियो लिंक (भरत मयेकर यांची पोस्ट)
पान १९
१४१) चंदन चावल बेल की पतिया - संत मीराबाईंचे भजन
१४२) कालभैरव अष्टकम् (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट
१४३) कुबेर मंत्र (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट
१४४) श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र
१४५) स्वामी स्वरुपानंद - ज्ञानेश्वरी (mukti यांच्या पोस्टमधील यूट्यूब लिंक)
१४६) दत्तलीलामृत आणि सिद्धलीलामृत - लिंक - राधिका यांची पोस्ट
१४०) श्री हनुमान स्तुती
१४७) प्रारंभी विनती करु गणपती...
१४८) श्रीगुरुचरित्र - अध्याय १४वा
१४९) वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे !
१५०) श्रीज्ञानेश्वरस्तोत्रम्
१५१) गजानन बावनी
१५१) गजानन बावनी
पान २०
१५२) स्तोत्रांच्या ऑडियो फाईल्सची लिंक (श्रीकांत यांची पोस्ट)
१५३) श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचित गणपतिस्तोत्र
१५४) श्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र
१५५) श्रीसदाशिवेन्द्रस्तवः
१५६) श्रीदिनेशस्तवः
१५७) ललितापञ्चरत्नम्
१५८) त्रिपुरा सुन्दरि स्तोत्र
१५९) विंध्यवासिनीचे स्तोत्र
१६०) श्री विंध्यवासिनी माता आरती
१६१) महिषासुरमर्दिनी स्तोत्रम
१६२) पाण्डुरङ्गाष्टकम
पान २१
१६३) स्वामी स्वरुपानंद (पावस) यांची रचना
१६४) सद्गुरु सुबोध - श्री गोंदवलेकर महाराज
१६५) रामदासस्वामी रचित अंबेची नवरात्राची आरती
१६६) संत एकनाथ महाराज रचित अंबेचा जोगवा
१६७) एकश्लोकी रामायण
१६८) एकश्लोकी मारुती स्तोत्र
१६९) एकश्लोकी भागवत
१७०) श्रीविष्णोषोडशनामस्तोत्रं
१७१) वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना
१७१) श्रीगजानन विजय ग्रंथ- ऑन लाईन डाउन लोड
१७२) श्री तुळजाभवानी अध्याय व तुळजाभवानी कवच - केदार लसणे याच्या पोस्टमधली लिंक
१७३) स्वा.सावरकर रचित स्वतंत्रतादेवी-स्तोत्र : जयोस्तुते
१७४) जिव्हा प्रार्थना
पान २२
१७५) श्रीराधाकृतं गणेशस्तोत्रम् - अभी यांची पोस्ट्/लिंक
१७६) श्री दत्त अथर्वशीर्ष
१७६) गणेशाने केलेले राधास्तोत्र आणि बरेच काही
१७७) एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी.लिंक
१७८) ए. आर. रेहमान यांच्या अल्बम मधील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक
१७९) दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम्
१८०) ज्वरनाशकस्तोत्रः
१८१) दशरथ महाराज रचीत शनैश्चर स्त्रोत्र
१८२) श्री गणपती विघ्ननाषना मंगलमुर्ती मुषकवाहना
१८३) संपूर्ण अच्यु���ाष्टक - लिंक (अभी यांची पोस्ट)
१८४) महामृत्युंजय जप
पान २३
१८५) शनि वज्रपंज्जर कवचम
१८५) सहस्त्र-नाम तत्युल्यं मंत्र
१८५) जय जय त्रिंबकराज गिरीजानाथा गंगाधरा हो
१८६) दासबोध (लिंक) - श्रीकांत यांची पोस्ट
१८७) गजेंद्रमोक्ष स्तोत्र
१८८) कौसल्या सुप्रजा रामा
पान २४
१८९) कुंजिका स्तोत्र
१९०) मंदिरात पादुकांना नमस्कार करतांना म्हणायचा श्लोक.
१९०) नर्मदाष्टकम् --श्री शंकराचार्य
१९१) श्री रेणुका स्तोत्र
१९२) मानसपूजा (आत्मपूजा)
१९३) गायत्री मंत्राचा अर्थ (शशांक पुरंदरे आणि परब्रह्म यांची पोस्ट)
१९४) श्री दत्त कवच
१९५) नवग्रह स्तोत्र (पौराणिक आणि वैदिक मंत्रांचे संकलित स्तोत्र)
१९६) गुर्वभिन्न गणेश स्तुति
१९७) गीतिपूर्वं श्रीगणपतिस्तोत्रम्
पान २५
१९८) नारायण सूक्त
१९९) नारायण कवच
२००) व्यंकटेश स्तोत्र
२०१) श्रीगुरुपादुकाष्टम्
२०१) श्रीमद् शन्कराचार्यविरचितं शिवपञ्चाक्षरस्तोत्रं
२०२) स्वर्णाकर्षण भैरव स्तुती
पान २६
२०३) श्री गुरुगीता
२०४) श्रीहरि स्तोत्र
२०५) श्रीदुर्गापदुद्धारस्तोत्रम्
२०५) सोळा सोमवारचे व्रत कथा
२०६) समर्थ वाड्मयासाठी लिंक - मी_आर्या यांची पोस्ट
२०७) रात्री शांत झोप लागण्यासाठी श्लोक
२०८) तुळस तोडतांना म्हणायचा मंत्र
२०९) भगवान शिव प्रात: स्मरण स्तोत्र
२१०) श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती
पान २७
२११) गणेश स्तुती
२१२) रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती
२१३) ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं
२१४) लक्ष्मी सूक्त
२१५) श्री सूक्त
२१६) श्री प्रज्ञावर्धिनी स्तोत्र
२१७) मंत्रमातृकापुष्पमालास्तवः
२१८) अन्नपूर्णास्तुतिः
२१९) श्री बालमुकुन्दाष्टक.
२२०) शाकंभरी (शताक्षी) माहात्म्यम्
पान २८
२२१) आरती भुवन सुंदराची | इंदिरावरा मुकुंदाची - लिंक (माधव यांची पोस्ट)
२२२) ऋणविमोचन गणपति स्तोत्र
२२३) अर्गला स्तोत्र
२२४) श्री हनुमान वडवानल स्तोत्र
२२५) निर्भय निर्गुण (संत कबीर)
२२६) शुन्य गढ शहर, शहर घर बस्ति, कोन सुता कोन जागे है (गोरक्षनाथ)
२२७) कबिर भजन - सुनता है गुरु ग्यानी
२२८) लक्ष्मीनृसिंह करावलंबस्तोत्र
२२९) शनैस्चर कृत श्री नृसिम्ह स्तुति
२३०) कार्थ वीर्यार्जुन द्वादश नाम स्तोत्रम
२३०) श्रीबृहस्पति कवचम्
पान २९
२३१) गोविंद नामावली
२३२) श्री अक्कलकोट स्वामी स्तवन
२३३) "आरती संग्रह (मराठी)" अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपची लिंक
२३४) गोंदवलेकर महाराजांची प्रवचने (अ‍ॅप्लिकेशन लिंक)
२३५) अन्नपूर्णा स्तोत्र
२३६) श्रीहनुमदष्टकम्‌, शिवकवच (सम्पूर्ण) (लिंक)
२३७) वराह कवच - बाधामुक्तीसाठी (लिंक)
२३७) चिदम्बरेश्वर शिव स्तोत्र (लिंक)
२३८) नारायण स्तोत्र
२३९) सीतानवमीच्या दिवशी म्हणायचा जप
२४०) श्री साईनाथांची अकरा वचने
२४१) शतश्लोकी रामायण
२४२) श्रीरामहृदयम्
२४३) ब्रह्मचिंतन
२४४) सर्व-कामना-सिद्धि स्तोत्र
पान ३०
२४५) मृत्युंजय कवचम्
२४६) अनसूयेचे स्तोत्र
२४७) अष्टक १ ले (नवरात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.)
२४८) गुरु शरणम्
२४९) लक्ष्मी कवच
२५०)अन्नपूर्णाष्टकम् स्तोस्त्रम्
२५१) व्यंकटेश्वर वज्र कवच स्तोत्र
२५२) श्रीपरशुराम स्तुती
पान ३१
२५३ ) परशुरामसहस्रनामस्तोत्र
२५४) श्रीपरशुरामाष्टकम्
२५५) परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रम्
२५६) परशुरामस्तोत्रम्
२५७) संस्कृत स्तोत्रं वगैरे असलेली साईट
२५८) कर्‍हाडच्या कृष्णामाईचं स्तवन
पान ३२
२५९) इंदूकोटी स्तोत्र
२६०) इंदूकोटी स्तोत्र (यूट्यूब लिंक)
२६१) दारिद्रयदुःखदहन शिवस्तोत्र
२६२) गौरीची प्रार्थना
पान ३३
२६३) एकनाथी भागवत - भाग १४ मधील काही भाग
२६४) हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला
२६५) दत्तात्रेय कवचम

***********************************************************************************

पान १

१) गायत्री मंत्र २) दत्तबावनी ३) श्लोक ४) घोरकष्टोद्धरण स्तोत्र
५) तुळजा भवानी - लिंक ६) श्री भवानी अष्टक ७) श्री साईसच्चरित - लिंक
८) शिवपञ्चाक्षर स्तोत्र ९) करुणा त्रिपदी १०) धन्य धन्य हो प्रदक्षिणा
११) श्री दत्तस्तव स्तोत्र
आणि श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) यांच्याबद्दलची लिंक केदार जोशी यांच्या पोस्टमधे.

पान २

१२) येई वो विठ्ठले १३) श्री समर्थ रामदास - लिंक १४) नव-नाग स्तोत्र
१५) गणपती अथर्वशीर्ष - लिंक १६) नि:शंक हो निर्भय हो मना रे (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र)
१७) दत्तमाला मंत्र

पान ३

१८) श्री स्वामी समर्थाष्टक १९ ) श्रीगणपती स्तोत्र 20) श्री मारुती स्तोत्र (भीमरुपी महारुद्रा)
२१) नवग्रह स्तोत्र २२) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी २३) हनुमंताचा धावा २४) श्लोक
२५) तीर्थप्राशन, करदर्शन व भूमीवंदन श्लोक २६) संपूर्ण नवनाग स्तो���्र २७) शुभंकरोति कल्याणम
२८) कालभैरवाष्टक २९) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र ३०) शनी मंत्र ३१) रुद्र

पान ४

३२) संपुर्ण आरती सन्ग्रह /मनाचे श्लोक/ भगवद गीता - लिंक (गौतम्७स्टार यांची पोस्ट)
३३) श्री आदि शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे - लिंक (चिनूक्स यांची पोस्ट)
३४) जयजयाजी गणपती (गणपती स्तोत्र) ३५) जगन्नाथपंडितांचं गंगालहरी - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३६) प्रार्थना ३७) श्रीसूक्त - लिंक (चिनूक्स पोस्ट) ३८) विविध स्तोत्रं (ऑडियो) - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३९) गणेश / विष्णू / राम / हनुमान इत्यादींची स्तोत्रे - लिंक्स (मीनल यांचे पोस्ट) ४०) आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक ४१) सुंदरकाण्ड - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४२) पुरुषसूक्त ४३) http://khapre.org/ (स्तोत्रे / पोथ्या व इतर वाड्मयाचा संग्रह (महेश यांची पोस्ट) 44) दत्तलीला मंत्र ४५) मंगलाष्टके - लिंक (महेश यांची पोस्ट) ४६) लक्ष्मी श्लोक / शारदा स्तवन / गणपती श्लोक

पान ५

४७) स्वामी समर्थ माला मंत्र ४८) सूर्याष्टक ४८) हनुमान चलिसा - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४९) वदनी कवळ घेता - मातृभूमीसाठी ५०) भगवद्गीता / दासबोध - लिंक (saket यांची पोस्ट) ५१) अष्टलक्ष्मी स्तोत्र - लिंक (GauriC यांची पोस्ट)
५२) शांती मंत्र ५३) शिवताण्डव स्तोत्र ५४) श्रीरामाचा पाळणा (pdf फाईल) ५५) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी - संपूर्ण - जयवी यांची पोस्ट ५६) श्री समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र (राष्ट्राच्या सर्वांगिण रक्षणासाठी) ५७) मेधासूक्त - लिंक (कदंब यांची पोस्ट) ५८) विष्णूसहस्रनाम / भगवद्गीता - लिंक (महेश देशपांडे यांची पोस्ट) ५८) चर्पटपञ्जरिका स्तोत्रम.

पान ६

५८) नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ५९) सूर्यनमस्कार ६०) नवग्रहपीडाहरस्तोत्र ६१) रुद्राष्टक - लिंक (माधव यांची पोस्ट)

पान ७

६२) श्री दुर्गासप्तशती सार ६३) ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम् ६४) दत्तदशक स्तोत्र ६५) श्रीमहिषासूरमर्दिनी स्तोत्र ६६) कैलासराणा शिवचंद्रमौळी...

पान ८

६७) श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक ६८) आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती ६९) श्रीविष्णो: षोडशनामस्तोत्रम् ७०) रामरक्षा ७१) श्री हनुमंतांच्या उपासनेचे कारण व कार्य.

पान ९

७२) श्रीरामांची कर्पुरआरती ७३) मारुती स्तोत्र आणि त्याचे निरुपण (लिंक) ७४) संगितातल्या विविध रागांमधे गायल्या गेलेल्या दत्तबावनीची लिंक (अभि यांची पोस्ट) ७५) पवमान सूक्त - लिंक (अभि यांची पोस्ट) ७६) गणपती स्तोत्र (मराठी) ७७) गायत्री मुद्रा (व्हिडियो) - अभि यांची पोस्ट

पान १०

७८) दयाळू तू देवा खचित आहे���ि - संत एकनाथांची रचना ७९) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम् ८०) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम् ८१) सनातनदेवीसूक्त ८२) शिवषडाक्षर स्त्रोत्र ८३) श्री महालक्ष्मी स्तोत्र ८४) देवीची आराधना ८५) स्वामी समर्थांना स्नान घालताना किंवा स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद ८६) श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक ८७) श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित "आरती नर्मदेची" ८८) श्रीदासगणूंनी रचलेले श्रीसाईबाबांवरील पद

पान ११
८९) धर्मराजाचे दुर्गास्तवन ९०) अन्नपूर्णास्तोत्रम् ९१) श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित "उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेय'' ९१) सद्गुरु स्तोत्र ९२) विविध आरत्या ९३) श्री रंग बावनी ९४) आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना

पान १२
९५ ) दत्तबावनी (मराठी) ९६) नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन ९७) अमोघशिवकवचम ९८) प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर ९९) अंबे जगदोद्धारिणि गे | १००) नृसिंहसरस्वती अष्टक
१०१) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी.. १०२) लतादीदीं च्या आवाजातली रामरक्षा - श्रीकांत यांच्या पोस्टमधील लिंक १०३) सूर्यस्तुती

पान १३

१०४) दुर्गाकवच - लिंक (माधव यांची पोस्ट) १०५) बजरंग बाण १०६) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र - लिंक १०७) श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम् १०८) शांतीपाठाचा अर्थ १०९) शिव आरती ११०) या कुन्देन्दुतुषारहार धवला १११) नवनाथ कथा सार - लिंक (माधव यांची पोस्ट) ११२) करुणाष्टकं

पान १४

११३) करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन - लिंक ११४) श्री लिंगाष्टकः ११५) व्यंकटेश स्तोत्र - लिंक (हसरी यांची पोस्ट) ११६) ५२ श्लोकी गुरुचरित्र ११७) सार्थ दत्तबावनी

पान १५

११८) श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य ११९) श्री अक्कलकोट स्वामी मानसपूजा १२०) श्री स्वामी समर्थ स्तवन (नाही जन्म....) १२०) विविध स्त्रोत्रांची लिंक - joshnilu यांची पोस्ट १२१) GOD grant me the SERENITY... १२२)सर्वसिध्दी मंत्र १२३) श्री स्वामी समर्थ मानस पूजा १२४) श्री शिव मानस पूजा १२५) शनी स्तोत्र

पान १६

१२६) श्री दत्तात्रेय स्तुती १२७) नवरात्र अष्टमी होम १२८) देवीची गाणी, संबळ गीत, जोगवा, आरत्या इत्यादी. १२९) श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र यूट्यूबवर.

पान १७

१३०) श्री ज्ञानदेव हरिपाठ १३१) श्री देवी कवच १३२) सिद्धमंगल स्तोत्र १३३) रघुपति राघव राजा राम - भजन १३४) पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवच स्तोत्र १३५) श्रीपञ्चमुख हनुमत्कवचमंत्र

पान १८
१३६) श���री महालक्ष्मी माहात्म्य १३७) संस्कृत स्तोत्रांच्या लिंक्स (वरदा यांची पोस्ट) १३८) काकड आरतीच्यावेळचा अभंग १३९) भग्वद्गीता ऑडियो लिंक (monalip यांची पोस्ट) १४०) महालक्ष्म्याष्टक स्तोत्रा - ऑडियो लिंक (भरत मयेकर यांची पोस्ट)

पान १९
१४१) चंदन चावल बेल की पतिया - संत मीराबाईंचे भजन १४२) कालभैरव अष्टकम् (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट १४३) कुबेर मंत्र (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट १४४) श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र १४५) स्वामी स्वरुपानंद - ज्ञानेश्वरी (mukti यांच्या पोस्टमधील यूट्यूब लिंक) १४६) दत्तलीलामृत आणि सिद्धलीलामृत - लिंक - राधिका यांची पोस्ट १४७) प्रारंभी विनती करु गणपती... १४८) श्रीगुरुचरित्र - अध्याय १४वा १४९) वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे ! १५०) श्रीज्ञानेश्वरस्तोत्रम् १५१) गजानन बावनी

पान २०
१५२) स्तोत्रांच्या ऑडियो फाईल्सची लिंक (श्रीकांत यांची पोस्ट) १५३) श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचित गणपतिस्तोत्र १५४) श्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र १५५) श्रीसदाशिवेन्द्रस्तवः १५६) श्रीदिनेशस्तवः १५७) ललितापञ्चरत्नम् १५८) त्रिपुरा सुन्दरि स्तोत्र १५९) विंध्यवासिनीचे स्तोत्र १६०) श्री विंध्यवासिनी माता आरती १६१) मह���षासुरमर्दिनी स्तोत्रम १६२) पाण्डुरङ्गाष्टकम

पान २१
१६३) स्वामी स्वरुपानंद (पावस) यांची रचना १६४) सद्गुरु सुबोध - श्री गोंदवलेकर महाराज १६५) रामदासस्वामी रचित अंबेची नवरात्राची आरती १६६) संत एकनाथ महाराज रचित अंबेचा जोगवा १६७) एकश्लोकी रामायण १६८) एकश्लोकी मारुती स्तोत्र १६९) एकश्लोकी भागवत १७०) श्रीविष्णोषोडशनामस्तोत्रं १७१) वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना १७२) श्री तुळजाभवानी अध्याय व तुळजाभवानी कवच - केदार लसणे याच्या पोस्टमधली लिंक १७३) स्वा.सावरकर रचित स्वतंत्रतादेवी-स्तोत्र : जयोस्तुते १७४) जिव्हा प्रार्थना

पान २२

१७५) श्रीराधाकृतं गणेशस्तोत्रम् - अभी यांची पोस्ट्/लिंक १७६) श्री दत्त अथर्वशीर्ष १७७) एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी.लिंक १७८) ए. आर. रेहमान यांच्या अल्बम मधील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक १७९) दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम् १८०) ज्वरनाशकस्तोत्रः १८१) दशरथ महाराज रचीत शनैश्चर स्त्रोत्र १८२) श्री गणपती विघ्ननाषना मंगलमुर्ती मुषकवाहना १८३) संपूर्ण अच्युताष्टक - लिंक (अभी यांची पोस्ट) १८४) महामृत्युंजय जप

पान २३
१८५) शनि वज्रपंज्जर कवचम १८६) दासबोध (लिंक) - श्रीकांत यांची पोस्ट १८७) गजेंद्रमोक्ष स्तोत्र १८८) कौसल्या सुप्रजा रामा

पान २४
१८९) कुंजिका स्तोत्र १९०) मंदिरात पादुकांना नमस्कार करतांना म्हणायचा श्लोक. १९१) श्री रेणुका स्तोत्र १९२) मानसपूजा (आत्मपूजा) १९३) गायत्री मंत्राचा अर्थ (शशांक पुरंदरे आणि परब्रह्म यांची पोस्ट) १९४) श्री दत्त कवच १९५) नवग्रह स्तोत्र (पौराणिक आणि वैदिक मंत्रांचे संकलित स्तोत्र) १९६) गुर्वभिन्न गणेश स्तुति १९७) गीतिपूर्वं श्रीगणपतिस्तोत्रम्

पान २५
१९८) नारायण सूक्त १९९) नारायण कवच २००) व्यंकटेश स्तोत्र २०१) श्रीगुरुपादुकाष्टम् २०२) स्वर्णाकर्षण भैरव स्तुती

पान २६
२०३) श्री गुरुगीता २०४) श्रीहरि स्तोत्र २०५) श्रीदुर्गापदुद्धारस्तोत्रम् २०६) समर्थ वाड्मयासाठी लिंक - मी_आर्या यांची पोस्ट २०७) रात्री शांत झोप लागण्यासाठी श्लोक २०८) तुळस तोडतांना म्हणायचा मंत्र २०९) भगवान शिव प्रात: स्मरण स्तोत्र २१०) श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती

पान २७
२११) गणेश स्तुती २१२) रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती २१३) ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं २१४) लक्ष्मी सूक्त २१५) श्री सूक्त २१६) श्री प्रज्ञावर्धि���ी स्तोत्र २१७) मंत्रमातृकापुष्पमालास्तवः २१८) अन्नपूर्णास्तुतिः २१९) श्री बालमुकुन्दाष्टक. २२०) शाकंभरी (शताक्षी) माहात्म्यम्

पान २८
२२१) आरती भुवन सुंदराची | इंदिरावरा मुकुंदाची - लिंक (माधव यांची पोस्ट) २२२) ऋणविमोचन गणपति स्तोत्र २२३) अर्गला स्तोत्र २२४) श्री हनुमान वडवानल स्तोत्र २२५) निर्भय निर्गुण (संत कबीर) २२६) शुन्य गढ शहर, शहर घर बस्ति, कोन सुता कोन जागे है (गोरक्षनाथ) २२७) कबिर भजन - सुनता है गुरु ग्यानी २२८) लक्ष्मीनृसिंह करावलंबस्तोत्र २२९) शनैस्चर कृत श्री नृसिम्ह स्तुति २३०) कार्थ वीर्यार्जुन द्वादश नाम स्तोत्रम

पान २९
२३१) गोविंद नामावली २३२) श्री अक्कलकोट स्वामी स्तवन २३३) "आरती संग्रह (मराठी)" अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपची लिंक २३४) गोंदवलेकर महाराजांची प्रवचने (अ‍ॅप्लिकेशन लिंक) २३५) अन्नपूर्णा स्तोत्र २३६) श्रीहनुमदष्टकम्‌, शिवकवच (सम्पूर्ण) (लिंक) २३७) वराह कवच - बाधामुक्तीसाठी (लिंक) २३७) चिदम्बरेश्वर शिव स्तोत्र (लिंक) २३८) नारायण स्तोत्र २३९) सीतानवमीच्या दिवशी म्हणायचा जप २४०) श्री साईनाथांची अकरा वचने २४१) शतश्लोकी रामायण २४२) श्रीरामहृदयम् २४३) ब्रह्मचिंतन २४४) सर्व-कामना-सिद्धि स्तोत्र

पान ३०

२४५) मृत्युंजय कवचम् २४६) अनसूयेचे स्तोत्र २४७) अष्टक १ ले (नवरात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.) २४८) गुरु शरणम् २४९) लक्ष्मी कवच २५०)अन्नपूर्णाष्टकम् स्तोस्त्रम् २५१) व्यंकटेश्वर वज्र कवच स्तोत्र २५२) श्रीपरशुराम स्तुती

पान ३१

२५३ ) परशुरामसहस्रनामस्तोत्र २५४) श्रीपरशुरामाष्टकम् २५५) परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रम् २५६) परशुरामस्तोत्रम् २५७) http://sanskritdocuments.org/sanskrit/by-category/stotra.php २५८) कर्‍हाडच्या कृष्णामाईचं स्तवन

पान ३२
२५९) इंदुकोटी स्तोत्र २६०) इंदूकोटी स्तोत्र (यूट्यूब लिंक) २६१) दारिद्रयदुःखदहन शिवस्तोत्र २६२) गौरीची प्रार्थना

पान ३३
२६३) एकनाथी भागवत - भाग १४ मधील काही भाग २६४) हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला २६५) दत्तात्रेय कवचम

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>विष्णू सहस्त्र नामाचे पाठ कसे करावेत? कुणी सांगेल का.
मला गणपती अथर्वशीर्षाबद्दल खात्रीशीर माहीती आहे की फलशॄती अगदी शेवटच्या आवर्तनाला म्हणतात. जर २१ पाठ करायचे असतील तर फलषॄती २१ वेळा म्हणत नाहीत.

अस्मिता मी या स्तोत्राबद्दलच बोलत होते, छान आहे बोलायला बाकी मला पण नवीन होतं, हनुमान आणि तांडव पण ते सुद्धा शिवाचा अवतार आहेत सो केलं असेल कधी तरी तांडव :o )

हनुमान तांडव?? हनुमानाने कधी तांडव केले?
माफ करा. संकटमोचन व पंचमुखी स्तोत्रे माहीत आहेत. हनुमान तांडव स्तोत्र नवीनच ऐकतेय.>>हो मला पण हीच माहित होती, पण मध्ये corona मुळे खूप डिप्रेससिंग वाटत होतं तेव्हा हे स्तोत्र बोलायला चालू केलं एकदम छान वाटायचं संपल्यावर

शिवलीलामृत ग्रंथाचा ११ वा पाठ वाचल्यावर अतिशय प्रसन्न वाटते असा अनुभव आहे. एकदा एका कुशल (स्किल्ड) रेकी तज्ञ स्त्रीने मला १० मिनिटे रेकी दिली होती. तो माझा पहीला व शेवटचा रेकी अनुभव. पण मला ता-ब-ड-तो-ब अतिशय प्रसन्न वाटले होते. शिवलीलामृताचा ११ वा अध्याय वाचल्यानंतर त्या अनुभवाच्या ५ पट तरी मला प्रसन्न वाटले. याची कारणे कदाचित -
- सोपी सुंदर गोष्ट आहे (पण मग शिवलीलामृताच्या इतर अनेक अध्यायात तशाच सोप्या गोष्टी आहेत की
- हा अध्याय साक्षात शंकर मानण्यात येतो. तसे उल्लेख वारंवार त्या अध्याया येतात त्यामुळे परिणाम होत असेल का?
काही का असेना अतिशय मस्त वाटते.

माफ करा विषयांतर होतंय पण रेकी, हीलिंग याचा खरंच उपयोग होतो का आणि आपल्याला कसं कळत कि we are getting cured or better का हे सगळं आपल्या विश्वासावर आहे ?
शिवलीलामृत ग्रंथाचा ११ वा पाठ वाचल्यावर अतिशय प्रसन्न वाटते असा अनुभव आहे>>>same here मला पण हा अध्याय वाचून प्रोटेक्टड वाटत..may be i am wrong in interpretation पण असं सॉलिड positive वाटत

रेकीवरती माझा विश्वास नाही याचे कारण मी त्याबद्दल वाचलेच नाही. पण मला फार छान वाटल्याचा अनुभव मी नाकारु शकत नाही. एकंदर शिवभक्ती दीर्घायुष्य देते असे पाहीलेले आहे. अर्थात माझ्या साबांचे उदाहरण. माझ्याकडे एकच विदा पॉइन्ट आहे. त्यांनी सामुदायीक इव्हेंटमध्ये, लघुरुद्रही केले होते.
>>>पण असं सॉलिड positive वाटत
अगदी अगदी!!! दर वेळेचा अनुभव आहे माझा. सॉलिड सकारात्मक वाटतं.

श्रीरेणुकादेवी मंत्र १

अथ ध्यानम
प्रसीद सुमुखीं देवीमेकवीरां सुरेश्वरीम|
भक्ताभीष्टप्रदां नित्यां रेणुकां चिन्तयाम्यहम||१||

ॐ र्हीं नमो भुवनैश्वर्यै||

दुर्गे स्मृता हरसि भीतीमशेषजन्तो:
स्वस्थ्यै: स्मृता मतिमतीव शुभां ददासि|
दारिद्र्यदु:खभयहारिणी का त्वदन्या
सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता||
----------------------------------------------

श्रीरेणुकादेवी मंत्र २
अथ ध्यानम
जमदग्निप्रियां देवीं रेणुकां राममातरं|
एकवीरां परां शक्तिं प्रसीद सुमुखीं भजे||

ॐ ऐं र्हीं क्लीं चामुण्डायै विच्चे|

काल स्कंद पुराणात ही स्तोत्रे सापडली. यात एक नामावली स्कंद म्हणजे कार्तिकेयाचे असून अन्य स्तोत्रे शंकराची आहेत.

पापस्य कालं भवपंककालं कलाकलं कालमार्गस्य कालम्॥
देवं महाकालमहं प्रपद्ये श्रीकालकंठं भवकालरूपम्॥ ४०.१०० ॥
ईशानवक्त्रं प्रणमामि त्वाहं स्तौति श्रुतिः सर्वविद्येश्वरस्त्वम्॥
भूतेश्वरस्त्वं प्रपितामहस्त्वं तस्मै नमस्तेस्तु महेश्वराय॥ ४०.१०१ ॥
यं स्तौति वेदस्तमहं प्रपद्ये तत्पुरुषसंज्ञं शरणं द्वितीयम्॥
त्वां विद्महे तच् नस्त्वं प्रदेहि श्रीरुद्र देवेश नमोनमस्ते॥ ४०.१०२ ॥
अघोरवक्त्रं त्रितयं प्रपद्ये अथर्वजुष्टं तव रूपकाणि॥
अघोरघोराणि च घोरघोराण्यहं सदानौमि भूतानि तुभ्यम्॥ ४०.१०३ ॥
चतुर्थवक्त्रं च सदा प्रपद्ये सद्योभिजाताय नमोनमस्ते॥
भवेभवेनादिभवो भवस्व भवोद्भवो मां शिव तत्रतत्र॥ ४०.१०४ ॥
नमोस्तु ते वामदेवाय ज्येष्ठरुद्राय कालाय कलाविकारिणे॥
बलंकरायापि बलप्रमाथिने भूतानि हंत्रे च मनोन्मनाय॥ ४०.१०५ ॥
त्रियंबकं त्वां च यजामहे वयं सुपुण्यगंधैः शिवपुष्टिवर्धनम्॥
उर्वारुकं पक्वमिवोग्रबंधनाद्रक्षस्व मां त्र्यंबक मृत्युमार्गात्॥ ४०.१०६ ॥

____________________________________
व्यालीढांगा महादेवा बलिनो नीलकंधराः॥
चंद्रखंडत्रिपुंड्राश्च पिंगाक्षाः शूलपाणयः॥ २१.१७ ॥
पिंगोत्तुंगजटाजूटाः सिंहचर्मावसायिनः॥
भस्मोद्धूलितगात्राश्च भुजमंडलभैरवाः॥ २१.१८ ॥
कपालीशादयो रुद्रा विद्रावितमहाऽसुराः॥
कपाली पिंगलो भीमो विरुपाक्षो विलोहितः॥ २१.१९ ॥
नमो जगत्प्रसूत्यै ते हेतवे पालकाय च॥
संहर्त्रे च नमस्तुभ्यं तिस्रोऽवस्थास्तव प्रभो॥ २२.४ ॥
त्वमपः प्रथमं सृष्ट्वा तासु वीर्यमवासृजः॥
तदण्डमभवद्धैमं यस्मिल्लोकाश्चराचराः॥ २२.५ ॥
वेदेष्वाहुर्विराड्‌रूपं त्वामेकरूपमीदृशम्॥
पातालं पादमूलं च पार्ष्णिपादे रसातलम्॥ २२.६ ॥
महातलं चास्य गुल्फौ जंघे चापि तलातलम्॥
सुतलं जानुनी चास्य ऊरू च वितलातले॥ २२.७ ॥
महीतलं च जघनं नाभिश्चास्य नभस्तलम्॥
ज्योतिः पदमुरः स्थानं स्वर्लोको बाहुरुच्यते॥ २२.८ ॥
ग्रीवा महश्चवदनं जनलोकः प्रकीर्त्यते॥
ललाटं च तपोलोकः शीर्ष सत्यमुदाहृतम्॥ २२.९ ॥
चन्द्रसूर्यौ च नयने दिशः श्रोत्रे नासिकाश्विनौ॥
आत्मानं ब्रह्मरंध्रस्थमाहुस्त्वां वेदवादिनः॥ २२.१० ॥
एवं ये ते विराड्‌रूपं संस्मरंत उपासते॥
जन्मबन्धविनिर्मुक्ता यांति त्वां परमं पदम्॥ २२.११ ॥
एवं स्थूलं प्राणिमध्यं च शूक्ष्मं भावेभावे भावितं त्वां गृणंति॥
सर्वत्रस्थं त्वामतः प्राहुर्वेदास्तस्मै तुभ्यं पदम्ज इद्विधेम॥ २२.१२ ॥
_______________________________________________

स्कंदाची १०८ नावे

अष्टोत्तरशतं नाम्नां श्रृणु त्वं तानि फाल्गुन॥
जपेन येषां पापानि यांति ज्ञानमवाप्नुयात्॥ २९.१२४ ॥
त्वं ब्रह्मवादी त्वं ब्रह्मा ब्राह्मणवत्सलः॥
ब्रह्मण्यो ब्रह्मदेवश्च ब्रह्मदो ब्रह्मसंग्रहः॥ २९.१२५ ॥
त्वं परं परमं तेजो मंगलानां च मंगलम्॥
अप्रमेयगुणश्चैव मंत्राणां मंत्रगो भवान्॥ २९.१२६ ॥
त्वं सावित्रीमयो देव सर्वत्रैवापराजितः॥
मंत्र शर्वात्मको देवः षडक्षरवतां वरः
मौली पताकी च जटी मुंडी शिखंड्यपि॥
कुण्डली लांगली बालः कुमारः प्रवरो वरः॥ २९.१२८ ॥
गवांपुत्रः सुरारिघ्नः संभवो भवभावनः॥
पिनाकी शत्रुहा श्वेतो गूढः स्कन्दः कराग्रणीः॥ २९.१२९ ॥
द्वादशो भूर्भुवो भावी भुवः पुत्रो नमस्कृतः
नागराजः सुधर्मात्मा नाकपृष्ठः सनातनः॥ २९.१३० ॥
त्वं भर्ता सर्वभूतात्मा त्वं त्राता त्वं सुखावहः॥
शरदक्षः शिखी जेता षड्वक्त्रो भयनाशनः॥ २९.१३१ ॥
हेमगर्भो महागर्भो जयश्च विजयेश्वरः॥
त्वं कर्ता त्वं विधाता च नित्यो नित्यारिमर्दनः॥ २९.१३२ ॥
महासेनो महातेज वीरसेनश्च भूपतिः॥
सिद्धासनः सुराध्यक्षो भीमसेनो निरामयः॥ २९.१३३ ॥
शौरिर्यदुर्महातेजा वीर्यवान्सत्यविक्रमः॥
तेजोगर्भोऽसुररिपुः सुरमूर्तिः सुरोर्ज्जितः॥ २९.१३४ ॥
कृतज्ञो वरदः सत्यः शरण्यः साधुवत्सलः॥
सुव्रतः सूर्यसंकाशो वह्निगर्भः कणो भुवः॥ २९.१३५ ॥
पिप्पली शीघ्रगो रौद्री गांगेयो रिपुदारणः॥
कार्त्तिकेयः प्रभुः क्षंता नीलदंष्ट्रो महामनाः॥ २९.१३६ ॥
निग्रहो निग्रहाणां च नेता त्वं सुरनंदनः॥
प्रग्रहः परमानंदः क्रोधघ्नस्तार उच्छ्रितः॥ २९.१३७ ॥
कुक्कुटी बहुली दिव्यः कामदो भूरिवर्धनः॥
अमोघोऽमृतदो ह्यग्निः शत्रुघ्नः सर्वमोदनः॥ २९.१३८ ॥
अव्ययो ह्यमरः श्रीमानुन्नतो ह्यग्निसंभवः॥
पिशाचराजः सूर्याभः शिवात्मा शिवनंदनः॥ २९.१३९ ॥
अपारपारो दुर्ज्ञेयः सर्वभूतहिते रतः॥
अग्राह्यः कारणं कर्ता परमेष्ठी परं पदम्॥ २९.१४० ॥
अचिंत्यः सर्वभूतात्मा सर्वात्मा त्वं सनातनः॥
एवं स सर्वभूतानां संस्तुतः परमेश्वरः॥ २९.१४१ ॥
नाम्नामष्टशतेनायं विश्वामित्रमहर्षिणा॥
प्रसन्नमूर्तिराहेदं मुनींद्रं व्रियतामिति॥ २९.१४२ ॥
______________________________
नमः शिवायास्तु निरामयाय नमः शिवायास्तु मनोमयाय॥
नमः शिवायास्तु सुरार्चिताय तुभ्यं सदा भक्तकृपापराय॥ ३४.४० ॥
नमो भवायास्तु भवोद्भवाय नमोस्तु ते ध्वस्तमनोभवाय॥
नमोऽस्तु ते गूढमहाव्रताय नमोऽस्तु मायगहनाश्रयाय॥ ३४.४१ ॥
नमोस्तु शर्वाय नमः शिवाय नमोस्तु सिद्धाय पुरातनाय॥
नमोस्तु कालाय नमः कलाय नमोऽस्तु ते कालकलातिगाय॥ ३४.४२ ॥
नमो निसर्गात्मकभूतिकाय नमोऽस्त्वमेयोक्षमहर्द्धिकाय॥
नमः शरण्याय नमोऽगुणाय नमोऽस्तु ते भीमगुणानुगाय ॥ ३४.४३ ॥
नमोऽस्तु नानाभुवनाधिकर्त्रे नमोऽस्तु भक्ताभिमतप्रदात्रे॥
नमोऽस्तु कर्मप्रसावाय धात्रे नमः सदा ते भगवन्सुकर्त्रे॥ ३४.४४ ॥
अनंतरूपाय सदैव तुभ्यमसह्यकोपाय सदैव तुभ्यम्॥
अमेयमानाय नमोस्तु तुभ्यं वृषेंद्रयानाय नमोऽस्तु तुभ्यम्॥ ३४.४५ ॥
नमः प्रसिद्धाय महौषधाय नमोऽस्तु ते व्याधिगणापहाय॥
चराचरायाथ विचारदाय कुमारनाथाय नमः शिवाय॥ ३४.४६ ॥
ममेश भूतेश महेश्वरोसि कामेश वागीश बलेश धीश॥
क्रोधेश मोहेश परापरेश नमोस्तु मोक्षेश गुहशयेश॥ ३४.४७ ॥
इति संस्तूय वरदं शूलपाणिमुमापतिम्॥
प्रणिपत्य उमापुत्रो नमोनम उवाच ह॥ ३४.४८ ॥

एक क्षेत्रपालाचे स्तोत्र सापडले. जरा विचित्र आहे. आपल्या आपल्या जबाबदारीवरती म्हणावे.

क्षेत्रपालाः स्थिताश्चैव यथास्थाने निरूपिताः
इति वः क्षेत्रपालानां सृष्टिः प्रोक्ता समासतः ।। २१
आराधनं प्रवक्ष्यामि येन प्रीता भवंति ते ।। २२
ॐक्षां क्षेत्रपालाय नमः इति नवाक्षरो महामंत्रः ।।२३
अनेनात्र चंदनादि दत्त्वा राजमाषतण्डुलमिश्रकाश्च चतुःषष्टिकृतभागान्वटकान्निवेद्य तावत्यो दीपिकास्तावन्ति पत्राणि पूगानि निवेद्य दण्डवत्प्रणम्य महास्तुतिमेतां जपेत् ।। २४
ॐऊर्ध्वकेशा विरू पाक्षा नित्यं ये घोररूपिणः रक्तनेत्राश्च पिंगाक्षाः क्षेत्रपालान्नमामि तान् ।। २५ अह्वरो ह्यापकुम्भश्च इडाचारस्तथैव यः इंद्रमूर्तिश्च कोलाक्ष उपपाद ऋतुंसनः ।। २६
सिद्धेयश्चैव वलिको नीलपादेकदंष्ट्रिकः इरापतिश्चाघहारी विघ्नहारी तथांतकः ।। २७
ऊर्ध्वपादः कम्बलश्च खंजनः खर एव च गोमुखश्चैव जंघालो गणनाथश्च वारणः ।। २८
जटालोप्यजटालश्च नौमि स्वःक्षेत्रपालकान् ऋकारो हठकारी च टंकपाणिः खणिस्तथा ।। २९
ठंठंकणो जंबरश्च स्फुलिंगास्यस्तडिद्रुचिः दंतुरो घननादश्च नन्दकश्च तथा परः ।। 1.2.62.३०
फेत्कारकारी पंचास्यो बर्बरी भीमरूपवान् भग्नपक्षः कालमेघो युवानो भास्करस्तथा ।। ३१
रौरवश्चापि लंबोष्ठो वणिजः सुजटालिकः सुगंधो हुहुकश्चैव नौमि पातालरक्षकान् ।। ३२
सर्वलिंगेषु हुंकारः स्मशानेषु भयावहः महालक्षो वने घोरे ज्वालाक्षो वसतौ स्थितः ।। ३३
एकवृक्षश्च वृक्षेषु करालवदनो निशि घण्टारवो गुहावासी पद्मखंजो जले स्थितः ।। ३४
चत्वरेषु दुरारोहः पर्वते कुरवस्तथा निर्झरेषु प्रवाहाख्यो माणिभद्रो निधिष्वपि ।। ३५
रसक्षेत्रे रसाध्यक्षो यज्ञवाटेषु कोटनः चतुर्दश भुवं व्याप्य स्थिताश्चैवं नमामि तान् ।। ३६
एवं चतुःषष्टिमिताञ्छरणं यामि क्षेत्रपान् प्रसीदंतु प्रसीदंतु तृप्यंतु मम पूजया ।। ३७
सर्वकार्येषु यश्चैवं क्षेत्रपानर्चयेच्छुचिः क्षेत्रपास्तस्य तुष्यंति यच्छंति च समीहितम् ।। ३८
इमं क्षेत्रपकल्पं च विजानन्विजयस्तथा यथोक्तविधिनाभ्यर्च्य सिद्धेयं तुष्टुवे च तम् ।। ३९
प्रणम्य च ततो देवीमानर्च वटयक्षिणीम् पुरा यदा नारदेन कलापग्रामतो द्विजाः ।। 1.2.62.४० ।।
______________________________________
एक विष्णूची व त्याला लागुनच असलेली देवीची नामावली सापडली.

ॐ नमो भगवते वासुदेवाय नमोऽनंताय सहस्रशीर्षाय क्षीरोदार्णवशायिने शेषभोगपर्यंकाय गरुडवाहनाय पीतवाससे वासुदेव संकर्षण प्रद्युम्नानिरुद्ध हयशिरो वराह नरसिंह वामन त्रिविक्रम राम राम वरप्रद नमोऽस्तु ते नमोऽ स्तुते असुरदैत्यदानवयक्षराक्षस भूतप्रेतपिशाचकुंभांड सिद्धयोगिनी डाकिनी स्कंदपुरोगमान्ग्रहान्नक्षत्रग्रहांश्चान्यांश्च हन २ दह २ पच २ मथ २ विध्वंसय २ विद्रावय २ शंखेन चक्रेण वज्रेण गदया मुशलेन हलेन भस्मीकुरु सहस्रबाहवे सहस्रचरणायुध जय २ विजय २ अपराजित अप्रतिहत सहस्रनेत्र ज्वल २ प्रज्वल २ विश्वरूप बहुरूप मधुसूदन महावराह महापुरुष वैकुंठ नारायण पद्मनाभ गोविंद दामोदर हृषीकेश सर्वासुरो त्सादन सर्वभूतवशंकर सर्वदुःखप्रभेदन सर्वयंत्रप्रभंजन सर्वनागप्रमर्दन सर्वदेवमहेश्वर सर्वबंधविमोक्षण सर्वाहितप्रमर्दन सर्वज्वरप्रणाशन सर्वग्रह निवारण सर्वपापप्रशमन जनार्दन जनानंदकर नमोऽस्तु ते स्वाहा ।। ५३ इमामपराजितां परमवैष्णवीं महाविद्यां जपति पठति शृणोति स्मरति धारयति कीर्तयति न च तस्य वाय्वग्निवज्रोपलाशनिवर्षभयं न समुद्रभयं न ग्रहभयं न च चौरभयं न च श्वापदभयं वा भवेत् ।। ५४ क्वचिद्रात्र्यंधकारस्त्रीराजकुलविषोपविषगरदवशीकरण विद्वेषणोच्चाटनवधबंधभयं वा न भवेदेतैर्मंत्रपदैरुदाहृतैर्हृदा बद्धैः संसिद्धपूजितैः ।। ५५ तद्यथा नमोनमस्तेऽस्तु अभये अनघे अजिते अत्रसिते अमृते अपराजिते पठितसिद्धे स्मरितसिद्ध एकानंशे उमे ध्रुवे अरुंधति सावित्रि गायत्रि जातवेदसि मानस्तोके सरसि सरस्वति धरणि धारिणि सौदामिनि अदिते विनते गौरि गांधारि मातंगि कृष्णे यशोदे सत्यवादिनि ब्रह्मवादिनि कालि कपालिनि सद्योवयवचयनकरि स्थलगतं जलगतमंतरिक्षगतं वा रक्ष २ सर्वभूतभयोपद्रवेभ्यो रक्ष २ स्वाहा ।।५६ यस्याः प्रणश्यते पुष्पं गर्भो वा पतते यदि म्रियंते बालका यस्याः काकवंध्या च या भवेत् धारयेत इमां विद्यामेभिर्दोषैर्न लिप्यते ।।५७ रणे राजकुले द्यूते नित्यं तस्य जयो भवेत् शस्त्र धारयते ह्येषां समरे कांडधारिणी ।। ५८ गुल्मशूलाक्षिरोगाणां नित्यं नाशकरी तथा शिरोरोगज्वराणां च नाशनी सर्वदेहिनाम् ।। ५९ तद्यथा हन २ कालि सर २ कालि सर २ गौरि धम २ गौरि धम २ विद्ये आले ताले माले गंधे वधे पच २ विद्ये नाशय पापं हन् दुःस्वप्नं विनाशय कष्टनाशिनि रजनि संध्ये दुंदुभिनादे मानसवेगे शंखिनि चक्रिणि वज्रिणि शूलिनि अपमृत्युविनाशिनि विश्वेश्वरि द्रविडि द्राविडि केशवदयिते पशुपतिमहिते दुर्द्दमदमिनि शर्वरि किराति मातंगि ॐह्राँह्रँह्रँह्रँक्राँक्रँक्रँक्रँत्वर २ ये मां द्विषति प्रत्यक्षं परोक्षं वा सर्वान्दम २ मर्द्द २ तापय २ पातय २ शोषय २ उत्सादय २ ब्रह्माणि माहेश्वरि वाराहि विनायकि ऐंद्रि आग्नेयि चामुंडे वारुणि प्रचंडविद्योते इंदोपेंद्रभगिनि विजये शांतिस्वस्तिपुष्टिविवर्धिनि कामांकुशे कामदुधे सर्वकामवरप्रदे सर्वभूतेषु वासिनि प्रति विद्यां कुरु २ आकर्षिणि वेशिनि ज्वालामालिनि रमणि रामणि धरणि धारिणि मानोन्मानिनि रक्ष २ वायव्ये ज्वालामालिनि तापनि शोषणि नीलपताकिनि महागौरि महाश्रये महामयूरि आदित्यरश्मि जाह्नवि यमधंटे किणि २ चिंतामणि सुरभि सुरोत्पन्ने कामदुघे यथा मनीषितं कार्यं तन्मम सिध्यतु स्वाहा ॐस्वाहा ॐभूः स्वाहा ॐभुवः स्वाहा ॐस्वः स्वाहा ॐभूर्भुवःस्वःस्वाहा यत्रैवागतं पापं तत्रैव प्रतिगच्छतु स्वाहा ॐबले महाबले उासिद्धसाधिनि स्वाहा ।। 1.2.62.६० इतीमां साधयामास वैष्णवीमपरा जिताम् विजयः संयतो भूत्वा मनोबुद्धिसमाधिभिः ।। ६१ य इमां पठते नित्यं साधनेन विनापि च तस्यापि सर्वविघ्नानि नश्यंति द्विजपुंगवाः ।। ६२ ।। इति श्रीस्कांदे महापुराण एकाशीतिसाहस्र्यां संहितायां प्रथमे माहेश्वरखण्डे कौमारिकाखण्डे बर्बरिकोपाख्याने महाविद्या साधनवर्णनंनाम द्विषष्टितमोऽध्यायः ।। ६२ ।।

एक विष्णूची व त्याला लागुनच असलेली देवीची नामावली सापडली. >>> ती नामावली नसून विष्णु अपराजिता महाविद्येचे दक्षिणमार्गी स्तोत्र आहे. यात बऱ्याच चुका दिसत असून शुद्ध स्तोत्र https://sanskritdocuments.org/ इथे मिळेल. शाक्त सम्प्रदायात प्रचलित वाममार्गी स्तोत्र याहून बरेच मोठे आहे.

का हो मला तर ध्यान अचूक वाटते आहे.

ॐ नीलोत्पलदलश्यामां भुजङ्गाभरणान्विताम् ।
शुद्धस्फटिकसङ्काशां चन्द्रकोटिनिभाननाम् ॥ १॥
शङ्खचक्रधरां देवी वैष्ण्वीमपराजिताम् ( = वैष्णवीम + अपराजिताम)
बालेन्दुशेखरां देवीं वरदाभयदायिनीम् ॥ २॥ ( = वरदा + अभयदायिनीम)

शेवटी उच्चारांची माफी मागितली आहे ते एक बरे आहे. -

यदत्र पाठे जगदम्बिके मया
विसर्गबिन्द्वऽक्षरहीनमीडितम् ।
तदस्तु सम्पूर्णतमं प्रयान्तु मे
सङ्कल्पसिद्धिस्तु सदैव जायताम् ॥ ४५॥

ध्यानश्लोक म्हणजे जी कोण देवता असेल तिच्या बाह्यरूपाचे वर्णन असते. सरस्वतीची उपासना करताना कालीचे ध्यान करून कसे चालणार? विष्णुअपराजिता देवीचे जे रूप आहे त्याचा आणि वर दिलेल्या रूपाचा 'शन्खचक्रगदा' सोडले तर ताळमेळ नाही. वरची लिंक मीच सुचवली होती पण नीट वाचल्यावर चुका लक्षात आल्या. कोणतीही उपासना करताना आंतरजालावर किंवा छापील पुस्तकात सापडणारे सन्दर्भ अंतिम धरू नयेत. या गोष्टी अपलोड करणाऱ्या मंडळींकडे अचुक सन्दर्भ असतीलच असे नाही.

रामाचा पाळणा -

जो जो जो जो रे रघुराया| निद्रा करी बा सखया|

जोगी आलासे भेटाया| शशीसम देखुनि काया|

जोगी दिसतो सुंदर| मस्तकी जटाभार|

गळा रुंडमाळांचे हार| शोभे व्याघ्राम्बर||१||

भस्म चर्चूनि सर्वांगी|वेष्टिला भुजंगी|

भूते घेऊनि स्वअंगी |आला प्रेमरंगी||२|

जटेमधुनीया तो जळ वाहे| मुद्रा लावूनी पाहे|

मान धरूनिया तो राहे| ना कळे कोण आहे|

इतके ऐकुनिया वचन|हासले रघुनंदन|

भावे पदकमली तल्लीन|गोसावीनंदन||३||

मला दोन प्रश्न आहेत.
१. रोज म्हणण्याची दत्ताची प्रार्थना आहे का? रामरक्षा किंवा अथर्वशीर्ष वगैरे सारखे काही श्लोक असतात का?
२. लहान मुलांच्या सुरक्षा, तब्येत, यश, वगैरे सगळ्या चांगल्या गोष्टी साठी काही प्रार्थना, स्तोत्र वगैरे आहे का?

१. रोज म्हणण्याची दत्ताची प्रार्थना आहे का? रामरक्षा किंवा अथर्वशीर्ष वगैरे सारखे काही श्लोक असतात का?>>>>

जटाधरं पाण्डुरंगं शूलहस्तं कृपानिधिम्।
सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे ॥१॥

जगदुत्पत्तिकर्त्रे च स्थितिसंहारहेतवे।
भवपाशविमुक्ताय दत्तात्रेय नमोस्तुते॥२॥

जराजन्मविनाशाय देहशुद्धिकराय च।
दिगंबर दयामूर्ते दत्तात्रेय नमोस्तुते॥३॥

कर्पूरकान्तिदेहाय ब्रह्ममूर्तिधराय च।
वेदशास्स्त्रपरिज्ञाय दत्तात्रेय नमोस्तुते॥४॥

ह्रस्वदीर्घकृशस्थूलनामगोत्रविवर्जित!
पञ्चभूतैकदीप्ताय दत्तात्रेय नमोस्तुते॥५॥

यज्ञभोक्त्रे च यज्ञेय यज्ञरूपधराय च।
यज्ञप्रियाय सिद्धाय दत्तात्रेय नमोस्तुते॥६॥

आदौ ब्रह्मा मध्ये विष्णुरन्ते देवः सदाशिवः।
मूर्तित्रयस्वरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते॥७॥

भोगालयाय भोगाय योगयोग्याय धारिणे।
जितेन्द्रिय जितज्ञाय दत्तात्रेय नमोस्तुते॥८॥

दिगंबराय दिव्याय दिव्यरूपधराय च।
सदोदितपरब्रह्म दत्तात्रेय नमोस्तुते॥९॥

जंबूद्वीप महाक्षेत्र मातापुरनिवासिने।
भजमान सतां देव दत्तात्रेय नमोस्तुते॥१०॥

भिक्षाटनं गृहे ग्रामे पात्रं हेममयं करे।
नानास्वादमयी भिक्षा दत्तात्रेय नमोस्तुते॥११॥

ब्रह्मज्ञानमयी मुद्रा वस्त्रे चाकाशभूतले।
प्रज्ञानघनबोधाय दत्तात्रेय नमोस्तुते॥१२॥

अवधूत सदानन्द परब्रह्मस्वरूपिणे ।
विदेह देहरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते॥१३॥

सत्यरूप! सदाचार! सत्यधर्मपरायण!
सत्याश्रय परोक्षाय दत्तात्रेय नमोस्तुते॥१४॥

शूलहस्त! गदापाणे! वनमाला सुकन्धर!।
यज्ञसूत्रधर ब्रह्मन् दत्तात्रेय नमोस्तुते॥१५॥

क्षराक्षरस्वरूपाय परात्परतराय च।
दत्तमुक्तिपरस्तोत्र! दत्तात्रेय नमोस्तुते॥१६॥

दत्तविद्याड्यलक्ष्मीश दत्तस्वात्मस्वरूपिणे।
गुणनिर्गुणरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते॥१७॥

शत्रुनाशकरं स्तोत्रं ज्ञानविज्ञानदायकम्।
आश्च सर्वपापं शमं याति दत्तात्रेय नमोस्तुते॥१८॥

इदं स्तोत्रं महद्दिव्यं दत्तप्रत्यक्षकारकम्।
दत्तात्रेयप्रसादाच्च नारदेन प्रकीर्तितम् ॥१९॥

इति श्रीनारदपुराणे नारदविरचितं
श्रीदत्तात्रेय स्तोत्रं संपुर्णमं।।

आणि

करुणात्रिपदी
शांत हो श्रीगुरुदत्ता । मम चित्ता शमवी आता ।।धृ।।

तू केवळ माता जनिता । सर्वथा तू हितकर्ता ||
तू आप्तस्वजन भ्राता । सर्वथा तूचि त्राता ||
भयकर्ता तू भयहर्ता । दंडधर्ता तू परिपाता ||
तुजवाचुनि न दुजी वार्ता । तू आर्ता आश्रय दत्ता ||
शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता ।।१।।

अपराधास्तव गुरुनाथा । जरि दंडा धरिसी यथार्था ।।
तरि आम्ही गाउनि गाथा । तव चरणीं नमवू माथा ।।
तू तथापि दंडिसी देवा । कोणाचा मग करूं धावा ||
सोडविता दुसरा तेव्हां । कोण दत्ता आम्हां त्राता ||
शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता ।।२।।

तू नटसा होउनि कोपी । दंडिताहि आम्ही पापी ||
पुनरपिही चुकत तथापि । आम्हांवरी न च संतापी ।।
गच्छतः स्खलनं क्वापि । असें मानुनि नच होऊ कोपी ||
निजकृपा लेशा ओपी । आम्हांवरि तू भगवंता ।।
शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता ।।३।।

तव पदरीं असता ताता । आडमार्गीं पाऊल पडतां ||
सांभाळुनि मार्गावरता । आणिता न दूजा (दुसरा) त्राता ||
निजबिरुदा आणुनि चित्ता । तू पतितपावन दत्ता ||
वळे आतां आम्हांवरता | करुणाघन तू गुरुनाथा ||
शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता ।।४।।

सहकुटुंब सहपरिवार । दास आम्ही हें घरदार ||
तव पदी अर्पू असार । संसाराहित हा भार ||
परिहरिसी करुणासिंधो । तू दीनानाथ सुबन्‍धो ||
आम्हां अघ लेश न बाधो । वासुदे-प्रार्थित दत्ता ।।
शांत हो श्रीगुरुदत्ता । मम चित्ता शमवी आता ।।५।।

वरचे स्तोत्र खूप आवडले. हा.आ. !

@पीनी
मुलांसाठी एक प्रज्ञाविवर्धन स्तोत्र व नील सरस्वती स्तोत्र आहे. हे कसे कधी म्हणावे याबाबत काही माहिती नाही.

-----------

प्रज्ञाविवर्धन स्तोत्र

अस्य श्रीप्रज्ञाविवर्धन-स्तोत्र-मंत्रस्य सनत्कुमारऋषि:।
स्वामी कार्तिकेयो देवता। अनुष्टुप् छंद:।
मम सकल विद्यासिद्ध्यर्थं जपे विनियोग:।
श्रीस्कंद उवाच।।

 योगीश्वरो महासेन: कार्तिकेयोSग्निनन्दन:।
स्कंद:कुमार: सेनानी: स्वामिशंकरसंभव: ।।१।।

 गांगेयस्ताम्रचूडश्च ब्रह्मचारी शिखिध्वज:।
तारकारिरुमापुत्र: क्रौंचारिश्च षडानन: ।।२।।

 शब्दब्रह्मसमुद्रश्च सिद्ध:सारस्वतो गुह:।
सनत्कुमारो भगवान् भोगमोक्षफलप्रद: ।।३।।

 शरजन्मा गणाधीशपूर्वजो मुक्तिमार्गकृत।
 सर्वागमप्रणेताच वांछितार्थप्रदर्शन: ।।४।।

 अष्टाविंशति नामानि मदीयानीति य: पठेत्।
 प्रत्यूषं श्रद्धयायुक्तो मूको वाचस्पतिर्भवेत् ।।५।।

 महामंत्रमयानीति मम नामानुकीर्तनम्।
 महाप्रज्ञामवाप्नोति नात्र कार्या विचारणा ।।६।।

|| इति श्री प्रज्ञाविवर्धन स्तोत्रं संपूर्णम् ||

-------------

नीलसरस्वती स्तोत्र

घोररूपे महारावे सर्वशत्रुभयङ्करि 
भक्तेभ्यो वरदे देवि त्राहि मां शरणागतम् I१I

ॐ सुरासुरार्चिते देवि सिद्धगन्धर्वसेविते I
जाड्यपापहरे देवि त्राहि मां शरणागतम् I२I

जटाजूटसमायुक्ते लोलजिह्वान्तकारिणि I
द्रुतबुद्धिकरे देवि त्राहि मां शरणागतम् I३I

सौम्यक्रोधधरे रूपे चण्डरूपे नमोSस्तु ते I
सृष्टिरूपे नमस्तुभ्यं त्राहि मां शरणागतम् I४I

जडानां जडतां हन्ति भक्तानां भक्तवत्सला I
मूढतां हर मे देवि त्राहि मां शरणागतम् I५I

वं ह्रूं ह्रूं कामये देवि बलिहोमप्रिये नमः I
उग्रतारे नमो नित्यं त्राहि मां शरणागतम् I ६I

बुद्धिं देहि यशो देहि कवित्वं देहि देहि मे I
मूढत्वं च हरेद्देवि त्राहि मां शरणागतम् I७I

इन्द्रादिविलसद्द्वन्द्ववन्दिते करुणामयि I
तारे ताराधिनाथास्ये त्राहि मां शरणागतम् I८I

अष्टम्यां च चतुर्दश्यां नवम्यां यः पठेन्नरः I
षण्मासैः सिद्धिमाप्नोति नात्र कार्या विचारणा I९I

मोक्षार्थी लभते मोक्षं धनार्थी लभते धनम् I
विद्यार्थी लभते विद्यां तर्कव्याकरणादिकम् I१०I

इदं स्तोत्रं पठेद्यस्तु सततं श्रद्धयाSन्वितः I
तस्य शत्रुः क्षयं याति महाप्रज्ञा प्रजायते I११I

पीडायां वापि संग्रामे जाड्ये दाने तथा भये I
य इदं पठति स्तोत्रं शुभं तस्य न संशयः I१२I

इति प्रणम्य स्तुत्वा च योनिमुद्रां प्रदर्शयेत् I१३I

!! इति नीलसरस्वती स्तोत्रं संपूर्णं !!

-------------

सिद्धमंगल स्तोत्र रोज म्हणायला सोपे व लहान आहे
आणि साक्षात दत्तात्रय असलेल्या श्रीपाद श्रीवल्लभांचे आहे.

।। श्री सिद्धमंगल स्तोत्र ।।

श्री मदनंत श्रीविभुषीत अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥१॥

श्री विद्याधारी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥२॥

माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥३॥

सत्यऋषीश्र्वरदुहितानंदन बापनाचार्यनुत श्रीचरणा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥४॥

सवितृ काठकचयन पुण्यफल भारद्वाजऋषी गोत्र संभवा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥५॥

दौ चौपाती देव लक्ष्मीगण संख्या बोधित श्रीचरणा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥६॥

पुण्यरुपिणी राजमांबासुत गर्भपुण्यफलसंजाता ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥७॥

सुमतीनंदन नरहरीनंदन दत्तदेव प्रभू श्रीपादा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥८॥

पीठिकापुर नित्यविहारा मधुमतीदत्ता मंगलरुपा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥९॥

॥ श्रीपादराजम् शरणम् प्रपद्ये ॥

प्रज्ञा विवर्धन आणि नीलसरस्वती स्तोत्र स्पेसिफिकली बुद्धी करता म्हटली जातात. आहे ना त्यांच्या फलशृतीमध्ये.

रामानंद सागरांच्या रामायणात रावणाचं काम करणारे अरविंद त्रिवेदी ह्यांनी 'सादर' केलेलं हे शिवतांडवस्तोत्र नक्की पहा. पाठांतर, उच्चार, डिक्शन, आवेश - सगळंच उच्च आहे!

पितृ स्तोत्र
अर्चितानाममूर्तानां पितृणां दीप्ततेजसाम् ।
नमस्यामि सदा तेषां ध्यानिनां दिव्यचक्षुषाम्।।
इन्द्रादीनां च नेतारो दक्षमारीचयोस्तथा ।
सप्तर्षीणां तथान्येषां तान् नमस्यामि कामदान् ।।
मन्वादीनां मुनीन्द्राणां सूर्याचन्द्रमसोस्तथा ।
तान् नमस्याम्यहं सर्वान् पितृनप्सूदधावपि ।।
नक्षत्राणां ग्रहाणां च वाय्वग्न्योर्नभसस्तथा।
द्यावापृथिवोव्योश्च तथा नमस्यामि कृताञ्जलि:।।
देवर्षीणां जनितृंश्च सर्वलोकनमस्कृतान्।
अक्षय्यस्य सदा दातृन् नमस्येsहं कृताञ्जलि:।।
प्रजापते: कश्यपाय सोमाय वरुणाय च ।
योगेश्वरेभ्यश्च सदा नमस्यामि कृताञ्जलि:।।
नमो गणेभ्य: सप्तभ्यस्तथा लोकेषु सप्तसु ।
स्वयम्भुवे नमस्यामि ब्रह्मणे योगचक्षुषे ।।
सोमाधारान् पितृगणान् योगमूर्तिधरांस्तथा ।
नमस्यामि तथा सोमं पितरं जगतामहम् ।।
अग्रिरूपांस्तथैवान्यान् नमस्यामि पितृनहम् ।
अग्नीषोममयं विश्वं यत एतदशेषत:।।
ये तु तेजसि ये चैते सोमसूर्याग्निमूर्तय:।
जगत्स्वरूपिणश्चैव तथा ब्रह्मस्वरूपिण:।।
तेभ्योsखिलेभ्यो योगिभ्य: पितृभ्यो यतमानस:।
नमो नमो नमस्ते मे प्रसीदन्तु स्वधाभुज:।।.

ॐ पितृगणाय विद्महे जगत धारिणी धीमहि तन्नो पितृो प्रचोदयात्।

ॐ आद्य-भूताय विद्महे सर्व-सेव्याय धीमहि। शिव-शक्ति-स्वरूपेण पितृ-देव प्रचोदयात्।

Pages