सदस्य प्रवेश |
मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागलेमूळ कविता : मेघ नसता वीज नसता मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले (रस्ता रोडरोलरला म्हणतो) एवढे नाजूक आहे वय तुझे का डांबरा? लाख रस्ते मारण्याचे, यम तरीही हळहळे चालताना रंग उडुनी होई चेहरा पांढरा भर पहाटे मी खडीनी दृष्ट काढुन टाकली - प्रसाद |
|
मस्त प्रसाद! मूळ गाण्यातलेच शब्द खास वापरलेस..
चालताना रंग उडुनी होई चेहरा पांढरा
तेच ते ड्रेनेज उघडे बघ सुगंधू लागले...
भर पहाटे मी खडीनी दृष्ट काढुन टाकली
खोदती रात्री तुला जे, भय तयांचे वाटले
हीहीहीही...
सही झालीय.
>> तू मला रोलून बघताना
फिटं बसलंय एकदम
झकास!!!
मार्तन्ड.
एवढे नाजूक आहे वय तुझे डांबरा
LOL !!
मस्त जमलिये प्रसाद !
>> भर पहाटे मी खडीनी दृष्ट काढुन टाकली
क्या बात है, प्रसाद
कविता आवडली. नवीन शब्द सुध्दा आवडले.
प्रा.(इं ) सुरेश खेडकर.(नागपूर)