एका कवितेच्या निमित्ताने...

Submitted by ललिता-प्रीति on 21 December, 2009 - 05:13

माझा मुलगा आदित्य, इ. ९ वी.
समाजशास्त्राची एक असाईनमेंट म्हणून त्यानं शाळेत कुठल्याही पूर्वतयारीशिवाय ही एक अतिशय सुंदर कविता लिहीली. विषय होता : वन्यजीव आणि त्यांचे संरक्षण.

Heal the wild,
Heal the life

and when their distress becomes mild
go for it and invoke the past
as our forefathers did
Live with the animals, not against them
Learn to weave and hem
Your existence with them
And when their pain becomes mild
Go for it, foresee the future
As we would do in the due coming time
Or
Animals from ages,
Would be pushed to the edges,
And then to the pages......
Off goes their existence,
If we don't do the present
or their sheer living, will get small as a crescent

Heal the wild,
Heal the life

आज ही कविता इथे टाकण्याचं अजूनही एक कारण आहे.
दहावीच्या परिक्षा, अकरावीचे प्रवेश, एस.एस.सी. बोर्ड विरुध्द सी.बी.एस.सी. बोर्ड इ. वरून चाललेले सततचे गदारोळ आपण वर्तमानपत्रातून वाचतच असतो. त्या पार्श्वभूमीवर (मराठीचा सार्थ अभिमान बाळगून) हे सांगावंसं वाटतं की सी.बी.एस.सी. बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधल्या परिक्षापध्दतीत काही चांगले, स्वागतार्ह बदल होत आहेत. (ही कविता हा त्याचाच एक परिपाक आहे असं मला वाटतं.)
प्रश्नोत्तरांची घोकंपट्टी करून परिक्षेच्या तीन तासांत पोपटपंची करून गुण मिळवायचे दिवस किमान सी.बी.एस.सी. बोर्डापुरते तरी हळूहळू मागे पडतायत. निव्वळ पुस्तकी अभ्यासाला महत्त्व न देता विद्यार्थ्यांची लेखन-संभाषण कला, नेटकी शब्दयोजना, सभाधीटपणा, चार जणांना आपला मुद्दा समर्थपणे पटवून देण्याची कला, एखाद्या विषयावरच्या साधकबाधक चर्चेत आत्मविश्वासानं सहभागी होण्याची कला इ. गोष्टीही मूल्यमापनात ग्राह्य धरल्या जात आहेत. त्या अनुषंगाने गेल्या १-२ वर्षात सी.बी.एस.सी.च्या परिक्षा पध्दतीत हळूहळू पण आमूलाग्र बदल घडवून आणले जात आहेत.
बदलाच्या या काळात काही पालक नाराज आहेत तर माझ्यासारखे काही अतिशय खूष आहेत.
आज ही कविता इथे टाकताना त्यामागे एक कौतुक करणारी आई तर आहेच; त्याहीपेक्षा या बदलांच्या स्वागताला दोन्ही हात पसरून उभी असलेली एक आशावादी पालकही आहे!

गुलमोहर: 

लले छानच आहे ग कविता आणि ती ही पूर्वतयारीशिवाय .. ग्रेट.

सी.बी.एस.सी.च्या परिक्षा पध्दतीत हळूहळू पण आमूलाग्र बदल घडवून आणले जात आहेत.

मोदक तुला Happy

लले मस्तच केलीय ग कविता, लेकाला अभिनंदन सांग,

आप्लया कडे खेदाची गोष्ट म्हणजे, अजुनही प्रश्न्,उत्तर पाठ करुन मार्कांच्या रेस मधे मुलाला धावडवण्या ची वृत्ती जास्त आहे पालकांमधे Sad त्यामुळे असले बदल म्हणजे बर्‍याचदा पालकांना काही तरी फालतु(?) गोष्टींना महत्व दिल्या सारखे वाटतात Sad

लले तू कवितेच्या वाटेला जात नाहीस आणि लेकाने बरोब्बर तीच वाट निवडली Proud

गमतीचा भाग सोडुन दे पण त्याच्या कल्पनाशक्तीची नी विचार मांडण्याची कमाल आहे. आधी चित्र आता शब्द मस्त जमतय त्याला दोन्हीही Happy

स्मि पालकांचा पण पुर्ण दोष नाही म्हणता येत ह्यात. मानसिकता बदलायला वेळ लागतो, तसा शाळेने देखील विश्वास निर्माण करायला हवा पालकांमधे.

Or
Animals from ages,
Would be pushed to the edges,
And then to the pages......

सही! ९ वीत असून एव्हढे छान विचार आहेत आदित्यचे!
छान वाटलं वाचून.