Submitted by मी अभिजीत on 20 February, 2008 - 23:35
पहचाना क्या बगुवा हमको दारात आला कोणी.
कपडे होते कर्दमलेले, डोळ्यामध्ये पाणी,
क्षणभर बसला, नंतर हसला बोलला वरती पाहून,
राजभैय्याची माणसं परवा गेली स्टॉलवर येऊन.
गणपतीच्या मिरवणुकीसारखी चार भिंतीत नाचली.
मोकळ्या हाती जातील कशी, घरची मात्र वाचली.
गाडी फ़ुटली, चूल विझली, होत्याचे नव्हते झाले.
तिकिटासाठी म्हणून थोडे पैसे बाकी ठेवले.
कारभारणीला घेऊन संगे, बघा आता पळतो आहे.
उद्याच तिकीट काढतो आहे आणि बिहार गाठतो आहे.
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला.
पैसे नकोत पण थोडा एकटेपणा वाटला.
मोडुन पडलाय संसार आणखी मोडू नका कणा
म्हटलं, "मग सोडा युपी दिन, "जय महाराष्ट्र" म्हणा..!"
-- अभिजीत दाते
गुलमोहर:
शेअर करा
चांगले जमलेय
चांगले जमलेय विडंबन
visit http://milindchhatre.blogspot.com
आवडले
आवडले विडंबन.. शेवट चांगला आहे
बिहाराष्ट्र
>> म्हटलं, "मग सोडा युपी दिन, "जय महाराष्ट्र" म्हणा..!" >>
हे बरं केलत नाही तर महाराष्ट्र बिहाराष्ट्र व्हायला वेळ लागणार नाही. चांगलच रेखाटले आहे विडंबन.
जय महाराष्ट्र!
सुंदरंच आहे कविता!!!
व्वा क्या
व्वा क्या बात हे ! अभि, महाराष्ट्राचा अस्सल मराठी शोभतोस.
जय महाराष्ट्र !
छान!!!! जय
छान!!!!
जय महाराष्ट्र!!!!!
जबरदस्त !
जबरदस्त !
सही रे सही
सही रे सही !
मस्त रे कांबळे ....sorry..दाते !
अरे हे आज वाचले....जबरी जमले
अरे हे आज वाचले....जबरी जमले आहे !
छान विडंबन
छान विडंबन
छान जमलं, जय महाराष्ट्र.
छान जमलं, जय महाराष्ट्र.
चांगलं आहे.
चांगलं आहे.
सह्ही !
सह्ही !
शेवट अतिशय सही!
शेवट अतिशय सही!
सही...
सही...
(No subject)
जबरदस्त विडंबन! टॉप टेन मध्ये
जबरदस्त विडंबन!
टॉप टेन मध्ये सामिल करतोय.
शरद
मस्तच
मस्तच
आवडली!
आवडली!