Submitted by मिल्या on 23 November, 2009 - 02:09
जिवंत राहिलो कसा रुतून दलदलीत मी?
उमेद एवढीच की फुलेल पद्म कर्दमी
कबूल कर अता तरी तुझ्या नसानसात मी
फितूर श्वास सांगती उभ्या जगास बातमी
कळेल का तुला सखे, मिळे न प्रेम सारखे
घडेल का असे कधी, फुले वसंत नेहमी?
कशास वेचिशी खुळ्या तिला वहायला कळ्या
तिच्याकडे खळ्या हजार, काय रे तिला कमी?
नवेच शौक पाळतो फुलास भृंग टाळतो
अशी अनेक अत्तरे म्हणे खरीदलीत मी
अजून खेळ हा तुझा सुरूच खेळवायचा
तुझा... तुझाच डाव हा! तुझीच लागते रमी
रडेनही... हसेनही... जगेनही अता पुन्हा
झुरायचे... मरायचे... विचार फक्त मोसमी
मनाविरुद्ध मी असा तुझ्यात गुंतलो पुन्हा
इलाज काय जर तुझा नकार गर्भरेशमी
अखेर मोडलास ना करार आपल्यातला
तशी कुणास तू म्हणा दिलीस जीवना हमी?
गुलमोहर:
शेअर करा
कशास वेचिशी खुळ्या तिला
कशास वेचिशी खुळ्या तिला वहायला कळ्या
तिच्याकडे खळ्या हजार, काय रे तिला कमी?>>>>
अखेर मोडलास ना करार आपल्यातला
तशी कुणास तू कधी दिलीस जीवना हमी?>>>>
खल्लास! मस्तच मिल्या.
कशास वेचिशी खुळ्या तिला
कशास वेचिशी खुळ्या तिला वहायला कळ्या
तिच्याकडे खळ्या हजार, काय रे तिला कमी?
नवेच शौक पाळतो फुलास भृंग टाळतो
अशी अनेक अत्तरे म्हणे खरीदलीत मी
अखेर मोडलास ना करार आपल्यातला
तशी कुणास तू कधी दिलीस जीवना हमी>>>>
खूप आवडले. मस्त आहे गझल.
वाह!
वाह!
क्लास! खळ्या, अत्तरे चे शेर
क्लास!
खळ्या, अत्तरे चे शेर सही!
क्या बात है मिल्या! मस्त.
क्या बात है मिल्या! मस्त.
मस्त!!
मस्त!!
<<<<कबूल कर अता तरी तुझ्या
<<<<कबूल कर अता तरी तुझ्या नसानसात मी
फितूर श्वास सांगती उभ्या जगास बातमी
कळेल का तुला सखे, मिळे न प्रेम सारखे
घडेल का असे कधी, फुले वसंत नेहमी?
मनाविरुद्ध मी असा तुझ्यात गुंतलो पुन्हा
इलाज काय जर तुझा नकार गर्भरेशमी
अखेर मोडलास ना करार आपल्यातला
तशी कुणास तू कधी दिलीस जीवना हमी?>>>>
हे चार शेर आवडले.
मस्त ग़ज़ल!!
सहीच!
सहीच!
सही रे मिल्या...
सही रे मिल्या...
खळ्या आणि गर्भरेशमी सुंदर.
खळ्या आणि गर्भरेशमी सुंदर. अता टाळता आला तर जास्त चांगलं वाटेल. तांत्रिकदृष्ट्या चुक नसेल तो, पण खटकतो. बाकी छानच.
सुरेखच !
सुरेखच !
कशास वेचिशी खुळ्या तिला
कशास वेचिशी खुळ्या तिला वहायला कळ्या
तिच्याकडे खळ्या हजार, काय रे तिला कमी?>>> फार फार आवडला.
खुप सुंदर.
खुप सुंदर.
क्या बात है!!! मस्त
क्या बात है!!! मस्त
भन्नाट !!! मला शिर्षकच खुप
भन्नाट !!! मला शिर्षकच खुप आवडलं....
सुंदर
सुंदर
क्या बात है ! फारच सुरेख.
क्या बात है ! फारच सुरेख.
मिल्या वेडच झाली आहे
मिल्या वेडच झाली आहे गझल..:)
विशेषतः
नवेच शौक पाळतो फुलास भृंग टाळतो
अशी अनेक अत्तरे म्हणे खरीदलीत मी
रडेनही... हसेनही... जगेनही अता पुन्हा
झुरायचे... मरायचे... विचार फक्त मौसमी
मनाविरुद्ध मी असा तुझ्यात गुंतलो पुन्हा
इलाज काय जर तुझा नकार गर्भरेशमी
आता बाल की खाल..;) मला फक्त जीवनाकडे कसली हमी मागतो हे सहज येत नाही असं वाटलं म्हणजे जीवनाची हमी आहे, का जीवनातल्या सुखाची हमी आहे का दु:खाची हमी का अजून कसली..
व्वाह ! खळ्यांचा शेर फारच
व्वाह !
खळ्यांचा शेर फारच खल्लास !
सर्वांनाच खूप खूप
सर्वांनाच खूप खूप धन्यवाद
देवा : जीवनाकडे कसली हमी मागितली आहे ह्याचे उत्तर वाचंकांच्या perception वर आहे.. ज्याला आपल्या अनुभुतीप्रमाणे जे वाटेल ते... कुणाला सुखाची, कुणाला आनंदाची तर कुणाला जगण्याचीही हमी हवी असू शकते...
आधी मी उला मिसरा "अखेर मोडलास ना करार साथ द्यायचा" असा लिहिलेला पण मग एवढे थेट लिहिले तर त्यातिल गंमत निघून जाईल असे वाटले...
मस्त
मस्त
अप्रतिम!!!
अप्रतिम!!!
अत्तर आवडलं.
अत्तर आवडलं.
परत एकदा खूप खूप धन्यवाद
परत एकदा खूप खूप धन्यवाद
मनाविरुद्ध मी असा तुझ्यात
मनाविरुद्ध मी असा तुझ्यात गुंतलो पुन्हा
इलाज काय जर तुझा नकार गर्भरेशमी>>>>>>>
अखेर मोडलास ना करार आपल्यातला
तशी कुणास तू कधी दिलीस जीवना हमी?>>>>
अप्रतिम.. !! सहीच रे मिल्या.. !!!
आज परत वाचली. लय मस्त पकडलीय.
आज परत वाचली. लय मस्त पकडलीय.
छानच...
छानच...
आवडेश...
आवडेश...
बातमी अन खळ्या वाले शेर
बातमी अन खळ्या वाले शेर खासच्...पुर्ण च गझल मस्त...
......विचार फक्त
......विचार फक्त मौसमी
मिल्याशेठ,
सगळा मामलाच मस्त आहे.जियो.
जयन्ता५२
Pages