मराठी ब्लॉगर्स

आजच्या लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत मराठी ब्लॉग विश्वावर छोटेखानी लेख आलाय. त्यात मायबोलीच्या मायाजालावर मराठी प्रसार आणि टिकवुन ठेवण्याच्या परिश्रमांची खास नोंद घेतलीय. तसेच स्वाती आंबोले, निरजा आदी मायबोलीकरांच्या ब्लॉग्सचा खास उल्लेख केलाय. एक मायबोलीकर म्हणुन ही अभिमानाची गोष्ट आहे


नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे! शक्य असेल तर या लेखाची लिंक देता येऊ शकेल का? किंवा लिंक नसेल तर ते पान स्कॅन करून इथे टाकता येऊ शकेल का?



पुनम

ही आहे त्याची लिंक

http://www.loksatta.com/daily/20080119/ch10.htm



अजय्,खरच रे.. ही अभिमानाचीच गोष्ट आहे... छान वाटले ही बातमी वाचुन... सुधीर,लिंकबद्दल धन्यवाद..स्मित



मायबोलीकर आहेत बहुदा.. त्यांचे खास धन्यवाद
या लेखात बर्‍याच मायबोलीकरांच्या blogs चे पत्ते आहेत..



शर्मीलाफडके सुध्दा मायबोलीकर आहे. जुने क्लासिक चित्रप्ट हा फलक त्यांनी उघडला व सुजाताची कथा त्यांनीच लिहीली आहे.