गातो तुझेच गाणे

Submitted by मिल्या on 6 September, 2009 - 13:05

माझे न हे तराणे! गातो तुझेच गाणे
लांगूलचालनाचे हेही नवे बहाणे

बाहेरच्या सुखांना भोगून आज आलो
दारात दु:ख होते बसले उदासवाणे

ओकून टाक सारी मळमळ तुझ्या मनीची
पचनी मला पडेना बसणे मुक्याप्रमाणे

ही पाहिजे कशाला दारात दानपेटी?
चलनात आज नाही देवा तुझेच नाणे

आभाळ जिंकण्याची पंखात जिद्द आहे
सद्ध्या जरी नशीबी घरटे जुनेपुराणे

कळले मला न केव्हा हसलो खरेच खोटे
कळले मला न केव्हा झालो तुझ्याप्रमाणे

फिर्याद कोणत्याही हद्दीत येत नाही
प्रत्येक मंदिराचे झाले मुजोर ठाणे

पुष्पक नको अम्हाला! इथल्या पुरेत गाड्या
झाले खरेच सोपे स्वर्गात आज जाणे

गुलमोहर: 

वा

छान ग़ज़ल!

<<ही पाहिजे कशाला दारात दानपेटी?
चलनात आज नाही देवा तुझेच नाणे

आभाळ जिंकण्याची पंखात जिद्द आहे
सद्ध्या जरी नशीबी घरटे जुनेपुराणे

कळले मला न केव्हा हसलो खरेच खोटे
कळले मला न केव्हा झालो तुझ्याप्रमाणे>>>

हे तीन शेर खास आवडले.

शरद

मस्त!

ही पाहिजे कशाला दारात दानपेटी?
चलनात आज नाही देवा तुझेच नाणे

कळले मला न केव्हा हसलो खरेच खोटे
कळले मला न केव्हा झालो तुझ्याप्रमाणे

>> हे दोन शेर खासच

छान!!!!! आवडली

आभाळ जिंकण्याची पंखात जिद्द आहे
सद्ध्या जरी नशीबी घरटे जुनेपुराणे

कळले मला न केव्हा हसलो खरेच खोटे
कळले मला न केव्हा झालो तुझ्याप्रमाणे

पुष्पक नको अम्हाला! इथल्या पुरेत गाड्या
झाले खरेच सोपे स्वर्गात आज जाणे

हे शेर खासच...:)

बाहेरच्या सुखांना भोगून आज आलो
दारात दु:ख होते बसले उदासवाणे
>> व्वा!
ही पाहिजे कशाला दारात दानपेटी?
चलनात आज नाही देवा तुझेच नाणे

>>व्वा...

फिर्याद कोणत्याही हद्दीत येत नाही
प्रत्येक मंदिराचे झाले मुजोर ठाणे

>> वाह च!

खुप आवडली...

कळले मला न केव्हा हसलो खरेच खोटे
कळले मला न केव्हा झालो तुझ्याप्रमाणे.........एक नंबर
..................
नितिन

मस्त.

गातो तुझेच गाणे - छानच...

कळले मला न केव्हा हसलो खरेच खोटे
कळले मला न केव्हा झालो तुझ्याप्रमाणे

सुंदर...

सहजसुंदर...खुप आवडली !!!

बाहेरच्या सुखांना भोगून आज आलो
दारात दु:ख होते बसले उदासवाणे ---------- क्या बात है..

गिरीश

ही पाहिजे कशाला दारात दानपेटी?
चलनात आज नाही देवा तुझेच नाणे

फिर्याद कोणत्याही हद्दीत येत नाही
प्रत्येक मंदिराचे झाले मुजोर ठाणे

पुष्पक नको अम्हाला! इथल्या पुरेत गाड्या
झाले खरेच सोपे स्वर्गात आज जाणे

खूप आवडले.

बाहेरच्या सुखांना भोगून आज आलो
दारात दु:ख होते बसले उदासवाणे

ही पाहिजे कशाला दारात दानपेटी?
चलनात आज नाही देवा तुझेच नाणे

फिर्याद कोणत्याही हद्दीत येत नाही
प्रत्येक मंदिराचे झाले मुजोर ठाणे

पुष्पक नको अम्हाला! इथल्या पुरेत गाड्या
झाले खरेच सोपे स्वर्गात आज जाणे... हे शेर अतिशय मार्मिक आहेत.. उत्तम
-मानस६

व्वा! मस्त गझल!
बाहेरच्या सुखांना भोगून आज आलो
दारात दु:ख होते बसले उदासवाणे

ही पाहिजे कशाला दारात दानपेटी?
चलनात आज नाही देवा तुझेच नाणे

आभाळ जिंकण्याची पंखात जिद्द आहे
सद्ध्या जरी नशीबी घरटे जुनेपुराणे>>> हे शेर तर तूफान!!

माफ करा, माझं शब्दज्ञान एवढं मोठं नाही म्हणुन विचारते, "लांगुलचालन" म्हणजे काय?

परत एकदा धन्यवाद सर्वांना

अडमा अरे हे अक्षरगणवृत्त आहे... आनंदकंद
गागालगालगागा x 2

सुमेधा : लागूंलचालन म्हणजे हांजी हांजी करणे ... कुत्रा जसे शेपूट हलवून करतो तसे Happy

चक्क देवाधिदेव इकडे मायबोलीवर?

मिल्या - व्वा !!
तीन शेर खूप म्हणजे खूपच आवडले.

बाहेरच्या सुखांना भोगून आज आलो
दारात दु:ख होते बसले उदासवाणे

ही पाहिजे कशाला दारात दानपेटी?
चलनात आज नाही देवा तुझेच नाणे

आभाळ जिंकण्याची पंखात जिद्द आहे
सद्ध्या जरी नशीबी घरटे जुनेपुराणे

Pages