Submitted by FundooPriya on 17 August, 2009 - 09:58
कधी ऎकली आहे पित्यावर केलेली कविता
नेहमीच उपेक्षित राहतो आपला पिता
आई जन्म देते आई घर सांभाळते
पण रोज पैशासाठी पित्याची चप्पल झिजते
घराला आईचा अधारस्तंभ हवा असतो
पण त्याचा पाया हा पिताच असतो
बाळाच्या जन्मानंतर आईच्या डोळ्यात अश्रु
पण अश्रु पिऊन पेढे वाटणारा हा पिताच असतो
मुलीला नट्टापट्टा तर मुलाला गॉगल हवा असतो
पित्याच्या दाढीच्या वाटीत मात्र साबणाचा तुकडा असतो
मुलांच्या पोषणासाठी झिजणाराही पिताच असतो
वेळप्रसंगी रागावुन धाक लावणाराही पिताच असतो
त्याला नाही दया माया असेच वाटत असते
नारळातील पाणी कधी का वरुन दिसते
फ़्रेन्डशीप डे, वॅलंटाईन डे कधीच विसरत नाही
फ़ादर्स डे मात्र कधीच आठवत नाही
पित्याला त्याची माया कधीच दाखवता येत नाही
म्हणुनच आपण कधी पित्यावर कविता करत नाही
गुलमोहर:
शेअर करा
भावना छान व्यक्त केल्या आहेत.
भावना छान व्यक्त केल्या आहेत. खरं आहे. अर्थात सध्याच्या काळात मात/पिता असा भेदभाव मुले करतांना दिसत नाहीत, याचे कारण पिता मुलांचे मित्र व्हायला शिकले असावेत असे वाटते.
(येथे पित्यावरही / पित्यांनीही कविता सादर केलेल्या आहेत.)
पित्याला नेहमी आपल्या
पित्याला नेहमी आपल्या कर्तव्याची फिकीर लागून राहिलेली असते.
पोरांना काही कमी पडू नये यासाठी तो सदैव जागरूक असतो.
त्यामुळे त्याला कुणी चांगले म्हणा वा म्हणू नका, त्याला त्याचे सुखदु:ख नसते.
हे जग सोडून जाताना पोरांनी आपल्याला शिव्याशाप देऊ नयेत, एवढ्या छोट्या इच्छेपायी बिचारा खस्ता खात असतो.
पण असे असले तरी आईचे स्थान कधीही वडिलांहून उच्चच. तेथे समानता नाही आणि निसर्गालाही ती मंजूर नाही.
फंडू ! -हरीश
फंडू !
-हरीश