नो कटकट केक :)

Submitted by मृण्मयी on 9 August, 2009 - 19:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

फक्त ५ मिनिटं मिश्रण तयार करायला आणि १ तास बेक करायला लागणारा वेळ! अगदीच सोपा केक. Happy

पावणे तीन कप सेल्फ रायजिंग मैदा (किंवा मैदा + २ टीस्पून बेकिंग सोडा)
२ कप साखर
२ मोठी अंडी
चिमूट्भर मीठ
१ कप ताक
१ कप तेल (मक्याचं वापरलं)
२ टीस्पून व्हॅनिला इसेन्स
१ कप उकळीचं पाणी

क्रमवार पाककृती: 

* ओव्हन ३०० डिग्री फॅ. ला गरम करायला ठेवावं. (हा केक कमी तापमानावर, जास्त वेळ बेक करावा लागतो.)
* ९ इंच X १३ इंच मोठं चौकोनी केक पात्र आतून हलका तेलाचा हात लावून आणि थोडा मैदा भुरभुरवून तयार ठेवावं.
* सगळे घटक एका मोठ्या भांड्यात एकत्र करावे.
* व्यवस्थीत घोटून मिसळून घ्यावे.
* हे मिश्रण केकपात्रात ओतून १ तास बेक करावं.
(ऐच्छिक) : * केक बाहेर काढून गार व्हायच्या आत त्यावर आटवलेलं संत्र्याचा रसाचं आणि साखरेचं मिश्रण घालावं. ( साधारण २ वाट्या संत्र्याचा रस आणि वाटी-दीड वाटी साखर मिसळून एक उकळी आणावी. जरासं गार करून केकवर ओतावं. वर थोडसं चॉकलेट सॉस पण घालावं).

वाढणी/प्रमाण: 
८-१० माणसांना भरपूर
अधिक टिपा: 

* केक करायला अत्यंत सोपा आहे. सगळे घटक एकाच वेळी एकत्र करून फक्त केक पात्रात ओतून बेक करायचे आहेत.
* नेहमीपेक्षा कमी तापमानाला आणि जास्त वेळ बेक करायचंय.
* गरम पाणी बिन्धास्त टाका. अंडी उकडून निघणार नाहीत.
* वरच्या मिश्रणात १ वाटी मैदा कमी करून त्या ऐवजी ३/४ कप कोको पावडर घालून पण छान केक होतो.
* ऐनवेळी दह्याचं ताक करून घातलं तरी चालेल. फारसं आंबट किंवा अगदीच अधमुर्‍या दह्याचं नको.

माहितीचा स्रोत: 
ईंटरनेटवर 'नो खटपट-नो फेल केक' शोधताना मिळालेली कृती. :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक प्रश्नः
अंड्या ला काही सबस्टिट्युट आहे का घरातल्या घरात उपलब्ध असणारा... की अंडी घातलीच नाही तरी चालेल?

केकमधे अंड्याला पर्याय म्हणुन एग रिप्लेसर मिळते एनर-जी कंपनीचे. काही वेळा अ‍ॅपलसॉस, बनाना प्युरी हे देखील वापरता येते. तसेच सोडा आणि व्हिनेगर देखील ठरावीक प्रमाणात वापरता येते. मी दूध/ताक्/अंडी काहीच खात नाही पण ट्रायल करुन पाहेन थोडीशी आणि लिहेन इथे.