विवाह परिषदेनिमित्त राज्यस्तरीय निबंधस्पर्धा
" मिळून सा-याजणी" मासिक आणि विमेन्स नेटवर्क संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जानेवारी २०१० मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त विवाह परिषदेचे आयोजन केले जाणार आहे.त्याची सुरवात राज्यस्तरीय निबंधस्पर्धेपासुन करीत आहोत.
निबंधस्पर्धेचे विषय
१) विवाहांतर्गत आनंदी सहजीवनाच्या वाटा
२) विवाहप्रथा आणि स्त्री-पुरुष समता
३) विवाहबंधन गरज कि सक्ती
४) विवाहपुर्व शरीरसंबंधांचा अनुभव- सफल वैवाहिक जीवनाकरिता की निव्वळ अनैतिक
५) आंतरजातीय विवाह जातींचा मेळ कि झळ
६) विवाह असुनही एकाकी
७) एक पालकत्व- संकट कि स्वातंत्र्य
८) अविवाहित स्त्री-पुरुषांचे सहजीवन (लिव्ह इन) - निरुपाय कि उपाय
९) घटस्फोट - कुटुंब घडविणे कि नवे घडविणे
१०) अनाथांच्या विवाहाचा प्रश्न
निबंधस्पर्धेचे नियम
१) या स्पर्धेत कोणत्याही वयोगटातील स्त्री पुरुषा स्पर्धकाला भाग घेता येईल.
२) प्रत्येक स्पर्धकाला जास्तीत जास्त दोन विषयावर निबंध पाठवता येतील.
३) निबंधाची कमाल शब्दसंख्या १२०० (बाराशे) असावी.
४) निबंध मराठी/ हिंदी/ इंग्रजी भाषांमधुन स्वीकारले जातील.
५) निबंध पाठवण्याचा अंतिम दिनांक १५ सप्टेंबर २००९ आहे.
६) स्पर्धकाने निबंध लेखन फुलस्केप पेपरवरच करणे आवश्यक आहे. तसेच पेपरच्या फक्त एका बाजुला तसेच पुरेसा समास सोडुन केलेले असावे.
७) लेखनावर स्पर्धकाचे संपुर्ण नाव व पत्ता, तसेच संपर्क फोन नंबर आणि स्पर्धकाची जन्मतारीख असल्याशिवाय निबंध स्वीकारला जाणार नाही,
८) जरुर तिथे स्पर्धकाचे नांव व पत्ता याबाबत गुप्तता बाळगली जाईल.
९) स्पर्धेसाठी पारितोषिके- पहिले ३०००/- रुपये, दुसरे २०००/- रुपये, तिसरे १०००/- रुपये व उत्तेजनार्थ प्रत्येकी ५००/- रुपयांची पाच पारितोषिके
१०) स्पर्धेचा निर्णय निवडसमिती नेमुन घेतला जाईल.
११) स्पर्धेतुन यशस्वी क्रमांक निवडण्याचा परिक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
१२) निबंध स्पर्धेचा निकाल जानेवारी २०१० मध्ये विवाह परिषदेमध्ये जाहीर केला जाईल आणि त्याच दिवशी पारितोषिक वितरण होईल.
निबंध पाठवण्याचा पत्ता
प्रति
आयोजक, विवाह-परिषद- निबंधस्पर्धा
'मिळुन सा-या जणी'.४०/१/ब भोंडे कॊलनी, कर्वे रोड पुणे ४
संपर्क- मिळुन सा-या जणी (०२०) २५४३३२०७, विमेन्स नेटवर्क - ९३७१३२५४११, ९८५०९५४५०२
सहभागी संस्था- साथ साथ विवाह अभ्यास मंडळ* कबीर कलामंच* समाजस्वास्थ्य ट्रस्ट