भारतात हल्ली पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करण्याचे फॅड वाढत चालले आहे. परंतू फक्त वाईट गोष्टींचेच अनुकरण जास्त होतेय. यातलाच एक प्रकार म्हणजे समलिंगी संबंध. तस पहायला गेलं तर ही एक विकृतीच आहे. विकृती म्हणजे जी प्रकृती नाही ते. प्रकृती म्हणजे नैसर्गिक.
न्यायालयाने या संबंधाना परवानगी दिली ती न्यायदानाच्या कक्षेत राहून.. त्यात त्यांनी काही चूक केली नाही. परंतू समाज, नितीमत्ता, सामाजिक बंधन ह्यांचा विचार केला गेला तर हे सर्वस्व चुकीचे ठरू शकेल. सामाजिक बंधने काही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून घातली गेली आहेत.
खर तर अशा विकृतपणामुळे संपुर्ण समाज बिघडू शकतो. हे सर्वनाशाला कारणीभूत ठरू शकते. निसर्गचक्र थांबू शकते. प्रजनन ही क्रियाच अशाने कुंठीत होऊन जाईल. जे निसर्गाविरुद्ध आहे. सायन्सच्या भाषेत बोलायचं झालं तर नर आणि मादी यांच्या संबंधाचा यात मागमुसच नाही.
समलिंगी संबंधामुळे पुढे काय दुष्परिणाम होतील हे लक्षात घेतले नाहीत असं मला वाटतयं. असल्या संबंधामुळे एचाअयवी/एड्स सारखे रोग किंवा इतरही रोग फेलावत जाण्याची शक्यताच जास्त. असले रोग किती झपाटयाने फेलावतील याचा विचारच करवत नाही. अशिक्षित व्यक्ती शिक्षणमंत्री झाल्यावर शिक्षणव्यवस्थेचा जसा बोजवारा उडेल तसाच प्रकार इथे घडू शकतो.
ह्या अशा विकृत चाळ्यांना तरूण जास्त बळी पडत असल्याचे दिसून येते. रेव्ह पार्टीजमधून अशा विकृतींना उधाण येते.
ड्रग्स, दारुचा अतिरेक ह्या गोष्टी तरूणांमध्ये आढळून येतात. त्याही दोन स्तरांवर. एक ते ज्यांच्याकडे पैसा नाही आणि दुसरे ते ज्यांच्याकडे नको तेवढा पैसा आहे. ते सहज अशा विकृतींना बळी पडतात. मध्यमवर्गीय सहसा अशा गोष्टींकडे वळत नाहीत कारण ते समाजाला .... मनाला घावरतात.
न्यायालयाच्या न्यायदानाचा आदर आपण करायलाच हवा. या गोष्टी थांबू शकतात जर समाजाने मनावर घेतलं तर. पण जो मनाला घाबरतो तो हे मनावर घेणार नाही आणि जो मनाला घाबरत नाही तो समाजाला काय विचारणार ?
न्यायालयाच्या निर्णयाने अशा लोकांनी मुखवटे घालून व चेहरे रंगवून आनंद व्यक्त केला आहे. समाजासमोर ते ताठ मानेने येत नाहीत. अस का ? यांचा ताठ मानेने जगण्याचा अधिकार कोणी हिरावून घेतलाय.
कदाचित त्यांच्या दृष्टीकोनातून हे बरोबर असेल ही, पण सर्वांगिण विचार करता हे चुकीचे आहे.
खरतरं हा लेखप्रपंच मुर्खपणाचा ठरू शकतो. कारण विकृतीना बळी पडणारे यातून बाहेर पडत नाहीत आणि समाजाला त्यांच्याकडे पहायला वेळ नाही. ’आम्हाला काय करायचे आहे ? ’ ही वृत्ती झाली आहे. कदाचित मीही तेच म्हणेन. कारण मीदेखील या समाजाच भाग आहे.
समलिंगी संबंध - एक धोका
Submitted by manojprabhakar999 on 28 July, 2009 - 02:16
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Private - accessible only to group members
शेअर करा
वर याचं उत्तर आलेलं आहे.
वर याचं उत्तर आलेलं आहे. आपल्या वाचनात ते कार्यबाहुल्यामुळे आलेलं नसावं.
आता अंड्या मावळायला
आता अंड्या मावळायला जातो.<<<
अंड्या, तुम्ही मावळा किंवा उगवा, बाफ असेच उबत राहतील.
एक प्रतिसादक,
तुम्ही मुद्यांना आकडे देत असल्यामुळे (बहुधा) तुम्ही म्हणजे मीच असल्याची एक शंका उपस्थित होऊ पाहात आहे.
कृपया, आपल्या माहितीसाठी.
आता अशा शंकांना महत्व कितपत
आता अशा शंकांना महत्व कितपत द्यायचं याचा विचार व्हावा. आपण चर्चेचा आनंद घेत रहावा. मतं प्लेक्झिबल ठेवावीत आणि जमलेच तर केवळ बोलके प्रतिसादक न राहता काही करता आले तर पहावे.
बेफिकीर आणि एक प्रतिसादक एकच नाहीत हे बेफींच्या विनंतीवरून. पण या खुलाश्याने शंकानिरसन होईल असे तुम्हाला वाटते का ? चिलमाडी.
पण या खुलाश्याने शंकानिरसन
पण या खुलाश्याने शंकानिरसन होईल असे तुम्हाला वाटते का ? <<<
मी 'कृपया आपल्या माहितीसाठी' असे म्हणालो होतो.
ओह. आकडे लावण्यावर इथे आपले
ओह.
आकडे लावण्यावर इथे आपले बौद्धीक स्वामित्व हक्क आहेत याची कल्पना दिल्याबद्दल धन्यवाद.

शुभरात्री !
आकडे लावण्यावर इथे आपले
आकडे लावण्यावर इथे आपले बौद्धीक स्वामित्व हक्क आहेत याची कल्पना दिल्याबद्दल धन्यवाद.
शुभरात्री !<<<
तुम्ही विपर्यास करत आहात.
एक प्रतिसादक, स्वतःचे
एक प्रतिसादक,
स्वतःचे निष्कर्श हे चर्चेचे निष्कर्श म्हणुन खपवण्याचे काहीच कारण नाही.
उदा. 'हा हार्मोनल इमबॅलन्स आहे. ( या संबंधी अभ्यासास अजूनही पुरेसा वेळ मिळालेला नाही. मात्र, हा मुद्दा पटण्यास अशा अभ्यासाची गरज वाटली नाही. पहिल्यापासून ही भूमिका कायम आहे).' किंवा मानवतेच्या आधारावर स्विकारले जावे... ?
खरा प्रष्ण हा आहे की समलिंगी संबंध असतात ह्यामुळे तुमच्या स्त्री/पुरूष असण्याच्या 'सेल्फ इमेज' ला कुठे व का धक्का बसला वा बसतो आहे. कसले भय वाटत आहे हे स्वतःशी पडताळून पहाण्याचा.
राहिला प्रष्ण समाजाचा तर समाज 'सती' किंवा 'स्त्री भॄण हत्या', दलीत अत्याचार, धर्मासाठी वाट्टेल ते सारख्या सडक्या विचरासरणी असलेल्या लोकामुळे सुद्धा कोसळलेला नाही तो समलिंगी लग्ना सारख्या निरुपद्रवी 'प्रथेने' कोसळेल असे वाटत नाही.
स्वतःचे निष्कर्श हे चर्चेचे
स्वतःचे निष्कर्श हे चर्चेचे निष्कर्श म्हणुन खपवण्याचे काहीच कारण नाही. >>>
१०० % सहमत. जे मुद्दे दोन्ही बाजूंनी मान्य आहेत असं म्हटलंय त्याबद्दल शंका आहे का ?
राहिला प्रष्ण समाजाचा तर समाज 'सती' किंवा 'स्त्री भॄण हत्या', दलीत अत्याचार, धर्मासाठी वाट्टेल ते सारख्या सडक्या विचरासरणी असलेल्या लोकामुळे सुद्धा कोसळलेला नाही तो समलिंगी लग्ना सारख्या निरुपद्रवी 'प्रथेने' कोसळेल असे वाटत नाही. >>>>
असा निष्कर्ष कुठे काढलाय हे समजले नाही. कायद्याने जे क्रांतिकारी बदल झालेत ते अजूनही समाजमान्य नाहीत या मताचा समाज कोसळण्याशी काय संबंध ? सती, स्त्री-भ्रूण हत्या, दलितात्याचार यातले सर्वच कायद्याने बंद झालेलेअसले तरी समाजातून बंद झालेय असे म्हणणे आहे का ? याउलट यातले काहीच समाजात्न हद्दपार झालेले नाही हेच तर म्हणणे आहे.
हे सर्व समाजातून हद्दपार झाले तरीही समाज कोसळणार नाही. खरं तर या अनिष्ट प्रथां सुरू होण्याची काही कारणेच असली तरी आज त्याचं प्रयोजन उरलेलं नसतानाही समाज त्याला कवटाळून बसतोआहे. समाज प्रगल्भ नाही इतकेच म्हणणे आहे. सती-प्रथा, अस्पृश्यता विरोधी कायदा, स्त्री-शिक्षणाचा कायदा, विधवा पुनर्विवाह इ. इ. सुधारणा आणि संबंधित कायदे हे ब्रिटीश भारतात झाले. त्यानंतर क्रांतिकारी बदल असणारे कायदे झाले का ?
साधे सगोत्र विवाह देखील मान्य होत नाहीत आणि अशा विवाहाविरोधी फतवे निघत असताना कुणीही त्याला विरोध करत नाही ही आजची परिस्थिती आहे. आपण मुद्दे समजून घ्याल ही नम्र अपेक्षा ! माझ्याकडून अल्पविराम ! धन्यवाद.
चला तुम्ही चर्चा सुरू ठेवा..
चला तुम्ही चर्चा सुरू ठेवा.. स्वतःचे निष्कर्ष चर्चेचे म्हणून जाहिर करा (पेशवा म्हणाला त्याप्रमाणे) आम्हाला बरीच कामं आहेत.
तुम्ही समलैंगिकता ही नैसर्गिक नाही वर आडून रहा आम्ही आहे वर आडून राहतो. आमची मतं आमच्याजवळ.
धन्यवाद!
दक्षिणाजी तुमच्या कामाशी इथे
दक्षिणाजी
तुमच्या कामाशी इथे कुणाला घेणेदेणे असेल असं वाटत नाही. पण काम करणार असाल तर अभिनंदन आणि शुभेच्छा ! चर्चा समजून घेण्याचा आग्रह नाही पण एक उत्सुकता म्हणून विचारावंसं वाटतं कि तुम्ही तुमची भाषा थोडीफार काबूत ठेवू शकाल का ? या बाफवर सुरूवातीपासून तुमचा सूर खटकतो आहे.
इथे काही लोकांच्या
इथे काही लोकांच्या बेसिकमध्येच घोळ आहे.
समलिंगी अनैसर्गिक ठरवताना केवळ प्रजोत्पादन हाच एक निकष लावला जात आहे.
म्हणजे प्रजोत्पादन होत असेल तरच ते नैसर्गिक अन्यथा अनैसर्गिक
या प्रकारे हस्तमैथुन हे देखील अनैसर्गिक झाले की राव..
अवांतर - भारतासारख्या कृषीप्रधान देशात काही ठराविक टक्के लोक समलिंगी संबंधात रुची ठेवणारे असणे चांगलेच आहे.
अंड्या, लै भारी. इथे चल्लेलं
अंड्या, लै भारी.
इथे चल्लेलं मेण्टल मास्टरबेशन देखिल नैसर्गिकच आहे.
भारतासारख्या कृषीप्रधान देशात
भारतासारख्या कृषीप्रधान देशात काही ठराविक टक्के लोक समलिंगी संबंधात रुची ठेवणारे असणे चांगलेच आहे. >> अंड्या ते कसं काय? जरासा प्रकाश फेक.
तुमची भाषा थोडीफार काबूत ठेवू
तुमची भाषा थोडीफार काबूत ठेवू शकाल का ? >> प्रतिसादक हो.. माझी भाषा या बाफवर खरंच तुम्ही म्हणता तशी खटकण्या जोगी आहेच. उडत जा, किंवा बेपर्वा पोस्टी टाकण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे माबोवर... बाकीवेळा मी मज्जेने बोलत असते इतर वाहत्या धाग्यांवर पण त्यामागे चेष्टेचा सूर आहे हे तिथे उपस्थित असणारे सर्वच जाणतात. पण तुम्ही कृपया ते पर्सनली घेऊ नये हि विनंती. एकूण समलिंगी संबंध म्हणजे समाजाची किड असा विचार करणार्यांसाठी त्या पोस्ट्स होत्या.. अगदी मायबोलीच काय, बाहेरील लोकांना सुद्धा.
बेसिक प्रश्न - एखाद्याला
बेसिक प्रश्न - एखाद्याला समलिंगसंबंधांवर इतके भरभरून लिहावेसे का वाटावे ? >>
अंड्या, तुम्हाला काय वाटते ते जाणून घ्यायला उत्सुक आहे.
हे फोटो पाहा आणि मग जरा शांत
हे फोटो पाहा आणि मग जरा शांत डोक्याने विचार करा की इतकं सात्विक प्रेम, या वयात चेहर्यावर येणं हे नैसर्गिक आहे की अनैसर्गिक. कायद्याने आता संरक्षण मिळालेली ही जोडपी आयुष्याच्या या वळणावर किती आनंदी आहेत.
http://www.buzzfeed.com/mjs538/20-photos-that-could-change-someones-mind...
धनश्री लिंक शेअर केल्याबद्दल
धनश्री लिंक शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
भारतासारख्या कृषीप्रधान देशात
भारतासारख्या कृषीप्रधान देशात काही ठराविक टक्के लोक समलिंगी संबंधात रुची ठेवणारे असणे चांगलेच आहे. >> >>> समलिंगी संबंध ठेवल्यास भारताची लोकसंख्या कमी राहिल असं तर तुला म्हणायचं नाहीये ना? तसं असल्यास तुझा गैरसमज आहे. समलिंगी संबंध असलेल्या जोडप्यांचे आपलं मुलं असण्याचे स्वप्न पुर्ण करण्यात भारतातील काही वैद्यकीय संस्थांचे मोलाचे कार्य सुरु आहे. सध्या या संस्था परदेशातील लोकांना मदत करत असल्या तरी लवकरच भारतातही कार्यरत होतील.( किंवा असतीलही)
No surrogacy visa for gay
No surrogacy visa for gay foreigners
http://shine.yahoo.com/parent
http://shine.yahoo.com/parenting/dad-s-love-letter-to-gay-teenage-son-go...
इथे वर एक दोन लोकांनी तुमची मुलं गे असली तर काय कराल हे विचारलं होतं. तसं पाहिलं तर काहीच वेगळं करणार नाही हे उत्तर आहे पण तरी हे पत्र थोडं त्यापलिकडे जाऊन आई-वडिलांचे मुलांवर असलेल्या प्रेमाची बाजू दाखवते, म्हणून इथे टाकलं.
अंड्या | अवांतर -
अंड्या |
अवांतर - भारतासारख्या कृषीप्रधान देशात काही ठराविक टक्के लोक समलिंगी संबंधात रुची ठेवणारे असणे चांगलेच आहे. >>
कृषीप्रधान देशात कशासाठी...? कारण या शब्दावरून एका नवीण स्फोटक धाग्याची निर्मिती होउ शकते. अर्थात "त्या"गोष्टीला देखील नैसर्गिक म्हणणारे महाभाग येथे असू शकतील. फक्त फरक एवढाच आहे ते नेहमी उंटावर बसून शेळ्या राखत असतात. "तुम लढो हम कपडे संभालते है' असे म्हणत दुसऱ्यांना उचकावत असतात.
मी या लेखावर प्रतिसाद दिला ?
मी या लेखावर प्रतिसाद दिला ? आश्चर्य आहे. काहीच कसं आठवत नाही ?
नवीन प्रतिसाद असं सुद्धा दिसत नाही.
लोकहो या विषयाबाबत एक
लोकहो या विषयाबाबत एक महत्वाची माहिती. येथे जे लोक सपोर्ट करत होते त्यांचे काय मत आहे यावर ?
http://www.esakal.com/Tiny.aspx?K=Q3KJW
http://www.firstpost.com/poli
http://www.firstpost.com/politics/sc-to-govt-with-377-ruling-if-you-have...
ह्म्म्म अब देखते है आगे आगे
ह्म्म्म अब देखते है आगे आगे होता है क्या !
काल कोर्टाचा निकाल नक्की काय
काल कोर्टाचा निकाल नक्की काय आहे ते शोधायचा प्रयत्न केला पण मिळत नव्हता. निकाल देणार्या न्यायमूर्तींनीही आधी निकालपत्रक वाचा मग आम्हाला नावे ठेवा असे म्हटले होते.
वरच्या लिंकमधला मजकूर वाचून समलैंगिकता हा गुन्हा आहे वा नाही, कलम ३७७ चूक आहे की नाही हे ठरवणे आमचे काम नाही. शासनाला तसे वाटत असेल तर त्यांनी बदल करावेत असे म्हटले.
यावर वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रिया इंटरेस्टिंग होत्या. प्रत्यक्ष पाहिलेल्या नाहीत. एका वृत्तवाहिनीवर थोडक्यात प्रतिक्रियांची जंत्री होती.
काँग्रेसच्या अनेक मंत्र्यांनी येत्या संसदीय अधिवेशनात हा मुद्दा हाती घेऊ, घ्यायला हवा असे म्हटले. न्यायालयातील सुनावणीत नरो वा कुंजरो वा अशी सरकारी भूमिका असायची. (पाहुण्याच्या हातून साप मारून घ्यायची?)
भाजपच्या प्रकाश जावडेकरांनी मी अशा विषयावर बोलत नाही असे म्हटले तर शत्रुघ्न सिन्हांनी मला या विषयाची माहिती नाही असे म्हटले. कम्युनिस्ट पक्षाने फार पूर्वीपासून कलम ३७७ रद्दबातल करण्याची भूमिका घेतली आहे. उत्तरेतील बहुतेक प्रादेशिक राजकीय पक्षांनी समलैंगिकता चूक अशी भूमिका घेतली.
आजचा लोकसत्तेतील अग्रलेख
आजचा लोकसत्तेतील अग्रलेख वाचनीय आहे.
http://www.loksatta.com/sampadkiya-news/gay-sex-illegal-says-supreme-cou...
सुप्रीम कोर्टाचं निकालपत्र - http://judis.nic.in/supremecourt/imgst.aspx?filename=41070
मिळाली निकालपत्रकाची पीडीएफ .
मिळाली निकालपत्रकाची पीडीएफ . त्यातले दिल्ली हायकोर्टाच्या निकालपत्रकातले quote केलेले परिच्छेद वाचले.(तिथवर वाचून झाले). अर्धवट वाचून कमेंट करणे चुकीचे आहे हे कळतेय...पण...
बातम्यांवरून समलैंगिक मिनिस्क्युअल मायनॉरिटिज आहेत, समलैंगिकता अनैसर्गिक आहे असे सर्वोच्च न्यायायलाच्या या न्यायमूर्तींचे मत असल्याचे कळले.
यातल्याच एका न्यायमूर्तींनी कँपाकोला कंपाउंडच्या च्या रहिवाशांच्या समस्येची suo moto दखल घेतली होती.
मयेकरजी +१. एरवी एकमेकांचा
मयेकरजी +१.
एरवी एकमेकांचा द्वेषच करणारे सनातनी, रामदेवबाबा, रझा अॅकेडमी, चर्चवाले या निमित्त एकत्र आले हेही नसे थोडके.
शेजारच्या हिंदू नेपाळमध्ये
शेजारच्या हिंदू नेपाळमध्ये समलिंगी असणं, हा गुन्हा नाही, हे भारतातल्या हिंदू संघटनांच्या लक्षात आलेलं दिसत नाही.
जगभरात समानहक्क चळवळीचा एक महत्त्वाचा भाग म्हणून समलिंगी विवाहाला मान्यता मिळत असताना भारत मात्र अजूनही गेल्या शतकात जगतो आहे.
Pages