वविकर्स, वविसाठीच्या काही सूचना खाली देत आहोत त्या सर्व वविकरांनी पाळुन संयोजकांना सहकार्य करावे.
१) वविच्या दिवशी सकाळी सर्व मायबोलीकरांनी सांगितलेल्या वेळेतच आपापल्या बसथांब्यावर उपस्थित रहावे.
२) वविला आपण पावसात भिजणार आहोत. तेव्हा बरोबर येताना कपड्यांचा अतिरिक्त जोड,टॉवेल बरोबर घेऊन यावे. स्विमिंग टॅंकमध्ये उतरणार असाल तर त्यासाठीचे कपडे बरोबर असावेत..
३)आपल्या बरोबरचे सामान ठेवण्यासाठी आणि कपडे बदलण्यासाठी दोन खोल्यांची व्यवस्था मावळसृष्टीला करण्यात आली आहे.. त्यातली एक बायकांसाठी आणि एक पुरुषांसाठी असेल.
४)आपण जरी पावसात भिजणार असलो तरी छत्र्र्या किंवा जर्कीन्स या गोष्टी बरोबर ठेवाव्यात.. मुख्यत्वे लहान मुले बरोबर असतील तर.
५)अगदी लहान मुले बरोबर असतील त्यांच्यासाठी दूध किंवा जेवणाची,खाण्यापिण्याची व्यवस्था,लागणार असतील तर औषधे यासारख्या गोष्टींची आधीच काळजी घ्यावी.
६)सर्वांनी आपापल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या बरोबर घ्याव्यात. म्हणजे प्रवासात काही अडचण होणार नाही.
७) मावळसृष्टीला धुम्रपान किंवा मद्यपान करण्यास पूर्णपणे मनाई आहे. तेव्हा सर्व मायबोलीकरांनी ही गोष्ट कटाक्षाने पाळावी...
८) बरोबर आणलेल्या वस्तूंची काळजी स्वतःच घ्यावी..
९) मावळससॄष्टीलाही जर काही सूचनांचे फलक असतील तर त्या पाळण्याच्या बाबतीत सर्व मायबोलीकरांनी सहकार्य करावे.
याव्यतिरिक्त कोणाला काही शंका असेल तर विचारा..
धन्यवाद.
वविसंयोजक
गेल्या
गेल्या वेळेस तिथे फारसे पाणी नव्हते ओढा-धबधब्याला
पण यावेळेस बहुधा तसे नसावे! कारण मावळात खुप पाऊस झालाय्/होतोय. तेव्हा कोणत्याही प्रवाहापाशी, प्रवाहात जाताना पुरेशी खबरदारी घ्या!
बाकी वविस हार्दीक शुभेच्छा! मजा करा!
एक
एक प्रथमोपचाराची पेटी प्रत्येक बस बरोबर असलेली बरी
***************
ॐ नमश्चण्डिकायै |
एक
एक प्रथमोपचाराची पेटी प्रत्येक बस बरोबर असलेली बरी >>> अश्विनी,हो.. प्रत्येक बसमध्ये एक प्रथमोपचार पेटी असावी हे ठरलेले आहे.
*************** ॐ
***************
ॐ नमश्चण्डिकायै |
ज्याना बशी
ज्याना बशी लागतात त्यांनी विशेष काळजी घ्या, म्हणजे आम्हाला त्रास नको...