ववि२००९:- सांस्कृतिक कार्यक्रम पोस्ट क्र. ४ - अंताक्षरी

Submitted by ववि_संयोजक on 14 July, 2009 - 04:13

आ $ आ $ आ $ आ $ आ $ आ $ आ $ आ $ आ $ आ $ आ $ आ $
चाफा बोलेना $$ चाफा चालेना $
चाफा खंत करी काही केल्या फुलेना....
चाफा बोलेना....

ना जाने कहाँ से आयी है,
ना जाने कहाँ को जाएगी
दिवाना किसे बनाएगी
ये लडकी....
किसी के हाथ ना आएगी ये लडकी....

काय वविकर? खेळ लक्षात येतोय का?
काय म्हणालात?
"लॉजिकल अंताक्षरी? "
नाही हो....
हरलात का?
अहो ही तर आपली नेहमीची अंताक्षरी.... Happy

इच्छुक उमेदवार... पटापट पुढे येऊन आपली कला दाखवा, आपल्याला एकूण ५ गट हवेत, प्रत्येक गटात ४ पार्टिसिपन्ट्स असतील.

दरवर्षी आपण अंताक्षरी निर्भेळ ठेवतो, यावर्षी थोडी भेसळ करतोय... Proud
घाबरू नका हो $$भेसळ म्हणजे मराठी आणि हिंदी मिक्स......

राऊंड १
यात २ फेर्‍या असतील.
या मध्ये पहील्या फेरीत सांस्कृतीक समितीचा मेंबर एक हिंदी गाणं म्हणेल, त्याच्या शेवटच्या अक्षरापासून गट क्र. १ पुढच्या गाण्याची सुरूवात करेल, पण ते गाणं मराठी असेल. मग गट क्र. २ हिंदी गाणं म्हणेल.. आणि पुढे... असा हा पहीला राऊंड अल्टरनेट गाण्यांचा असेल (म्हणजे एक हिंदी आणि एक मराठी) अशा पद्धतीने पहीला राऊंड पुर्ण झाला की दुसर्‍या राऊंडच्या सुरूवातीला सा.सं. में. यावेळी मराठी गाणं गाईल, यावेळी गट क्र. १ हिंदी गाणं म्हणेल.
या राऊंड मध्ये प्रत्येक गटाला प्रत्येक गाण्यासाठी १० गुण दिले जातील,
जितकी गाणी गायली जातील तितके मार्क्स मोजले जातील.
एखाद्या गटाला गाणं आलं नाही तर, पुढच्या गटाने त्याच अक्षरापासून सुरवात होईल असं गाणं गायलं पाहीजे.

राऊंड २
या राऊंडमध्ये एक बोल ठेवलेला असेल, यात हिंदी आणि मराठी सिनेमातल्या गाण्यांच्या एकूण १० चिठ्ठ्या मिसळून ठेवण्यात आलेल्या असतील. प्रत्येक गटातल्या एका पार्टिसिपंटने येऊन एक चिठ्ठी उचलून त्यात लिहीलेल्या गाण्याची हावभावातून नक्कल करून दाखवायची व त्या त्या गटाने ते गाणं ओळखायचं. प्रत्येक गटाला गाणं ओळखण्यासाठी २ पर्याय मिळतील, एक हिंदी आणि एक मराठी. हिंदी आणि मराठी दोन्ही साठी २ वेगवेगळे राऊंडस असतील.

प्रत्येक गटाला २ मिनिटात ३ संधी मिळतील त्यात जर योग्य गाणं ओळखता आलं नाही तर त्या गटाचे ५ मार्क वजा होतील. व ते गाणं पुढे प्रेक्षकांना पास करण्यात येईल, पुढच्या गटाला नविन पर्याय देण्यात येईल.

राऊंड ३
या राऊंड मध्ये २ फेर्‍या असतील.
या मध्ये सां.स.में. समोर ठेवलेल्या बोलमधून एक चिठ्ठी उचलून सिनेमाचं नाव सांगेल, ज्यां पार्टीसिपंट ना त्या सिनेमातील गाणं येत असेल त्यांनी हात करावा, हा बझर राऊंड असल्याने ज्या गटाने प्रथम हात वरती केला असेल त्यांना त्या सिनेमातलं गाणं गाण्याची संधी मिळेल, बरोबर गाण्यासाठी २० मार्क अधिक होतील, आणि चुकिच्या गाण्यासाठी ५ मार्क वजा होतील.

राऊंड ४
या राऊंडमध्ये २ फेर्‍या असतील.
पहील्या फेरीत मराठी तारे-तारकांच्या नावाच्या चिठ्ठ्या समोर बोल मध्ये असतील. सां.स.में. त्यापैकी एक चिठ्ठी उचलून त्यावरचं नाव वाचतील, त्या तारा-तारकाच्या एकूण ५ चित्रपटांची नावं ओळखायची आहेत. जो गट प्रथम हात वरती करेल त्याला प्रथम संधी देण्यात येईल. ज्यांना संपुर्ण ५ नावं ओळखता येतील त्यांना २० अधिक मार्क मिळतील, ओळखलेल्या चित्रपटाच्या अर्धवट संख्येला मार्क मिळतील ते असे ३ चित्रपट ओळखल्यास १०, ४ ओळखल्यास १५ मार्क आणि ५ ही ओळखल्यास २०.
या फेरीत काहीही ओळखता आलं नाही तरी मार्कस वजा होणार नाहीत. पण चुकिचा सिनेमा सांगितल्यास त्या गटाचे ५ मार्क वजा होतील.

प्रत्येक गटाला चित्रपट ओळखण्यासाठी जास्तीत जास्त १ मिनिटाचा वेळ मिळेल. जर ५ पैकी ५ चित्रपट ओळखता आले नाहीत तर तो पर्याय वगळून पुढच्या गटाला पुढचा पर्याय देण्यात येईल.
दुसरी फेरी तंतोतंत, फक्त हिंदी चित्रपट तारे-तारकांच्या सिनेमांसाठीची असेल.

फेर्‍या संपलेल्या आहेत, मिळालेले अधिक आणि वजा मार्क मोजून विजेता गट ठरवण्यात येईल..

चला तर मग, चित्रपट आणि गाणी याविषयी जास्ती अभ्यास करा आणि वविच्या स्पेशल अंताक्षरीची मजा घ्या. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रश्न फोडले जाण्याची काय शक्येता हे काय? कोणाशी मांडवली करावी लागन?
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

दक्षिणे अगं काही तत्व वगैरे आहेत की नाही तुला , काही नीती अनीतीची चाड वगैरे ..चाल्ली लगेच दात दाखवत मांडवली करायला .... Happy
मायबोली प्रश्नमंजूषेसाठी माझ्याशी.. Proud

दक्स, मीनू, गेल्याजन्मी मंत्री होतात का गं ? Proud बरं पटपट सांगा बरं काय काय आतल्या बातम्या आहेत त्या ! Lol
***************
ॐ नमश्चण्डिकायै |

नीरजा, तू गाणारेस????????????
Proud
---------------------------------------------
यह दिल बन जाये पत्थरका, ना इसमें कोई हलचल हो..

मीनु, Lol
ज्ञान सांगे लोका, शेंबूड माझ्या नाका... Proud

>>नीरजा, तू गाणारेस???????????? >> का? तु पण बोळे आणायचा विचार करतेयंस का?

दक्षिणाचा पेश्श्शल म्हणींचा एक कारेकिरम ठेवा. Happy

म्हणजे पुणे बशीतून लोक उतरतील ते हे मोठ्ठे कापसाचे कानाबाहेर येणारे बोळे कानात कोंबूनच !
***************
ॐ नमश्चण्डिकायै |

ज्ञान सांगे लोका, शेंबूड माझ्या नाका...>>> ए शब्दखेळातल्या म्हणी काय फोडते आहेस.. पुन्हा एकदा...अगं काही तत्व वगैरे आहेत की नाही तुला , काही नीती अनीतीची चाड वगैरे .. Proud

बरं पटपट सांगा बरं काय काय आतल्या बातम्या आहेत त्या ! ॐ नमश्चण्डिकायै | >>>> कुणाचीही भिती दाखवलीस तरी चिरी मिरी घेतल्याशिवाय आम्ही आतली एकही बातमी फोडणार नाही.. Proud

नीती आणि अनीती पण येणार आहेत का वविला ???????? Happy

केप्या : ऐकतो आहेस ना ??????? Lol

~~~~~~~~~~~~~~
उद्या उद्याची किती काळजी बघ रांगेतून
परवा आहे उद्याच नंतर बोलू काही
चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही

मीनू Rofl किती ग्रॅम मिरी पाहिजेत तुला. सारीन हं पुरचुंडी तुझ्या हातात त्या दिवशी हळूच (मनातल्या मनात : मिर्‍याच वाटतेय ही ! Proud )
***************
ॐ नमश्चण्डिकायै |

का? तु पण बोळे आणायचा विचार करतेयंस का?
>>> मीनु, दक्षिणा आणि नंदिनी यांची सांस असताना, म्या बापडी दुसरं काय करणार? कानात कापूस इज अ प्रीरेक Lol
Light 1 घ्या मुलींनो, नाहीतर माझी काही धडगत नाही! Happy
---------------------------------------------
यह दिल बन जाये पत्थरका, ना इसमें कोई हलचल हो..

मीनु फुल्ल सुटली आहेस... >>> आज्जे,दक्षिणा तुला जाड म्हणतेय बघ Proud

नीरजा, तू गाणारेस????????????<<
याबद्दल दक्षिला झाप. तिनेच आग्रह केलाय माझ्या विपुत.

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

पुनम,
मावळसृष्टीत तुला आम्ही तिघी मिळून धुणार. Proud

का ती अंघोळ नाही करून येणारे?
अरे हो पुण्यात पाणीकपात आहे नाही का? Wink
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

पूनम, तूझे सगळे धुवायला टाकायचे कपडे बरोबर घेवून ये गं. तिघी तिघी आहेत धुवायला. (दक्सने तुझा पू र्‍हस्व केला बघ ! - कशी काडी लावली Lol )

***************
ॐ नमश्चण्डिकायै |

मी नि चं गाणं (कानात बोळे न घालता) ऐकणारे.
कोण झापतंय मला बघुया... या इकडं धुते त्याला पण.

मयुरेश - तुला आग लावायचं काम चांगलं जमायलंय की... Proud

हो, येतंच होते अश्विनी, सांगायला Happy
दक्षिणा, 'पू'नम कृपया! Happy

ही आयडीया भारीये! चला, बादलीभर कपडे घेऊन येते, धुवा ज्याला हौस आहे त्याने Lol
---------------------------------------------
यह दिल बन जाये पत्थरका, ना इसमें कोई हलचल हो..

एकच बादली? हॅत्तिच्या ! दिवसभर तिघी मिळून एवढंच धुणार? चांगल्या जाड चादरी वगैरे आण बशीच्या टपावर टाकून. तिघींना ३ Light 1
***************
ॐ नमश्चण्डिकायै |

कुठल्यातरी चाळीतल्या नळावर आल्यासारखं का वाटतंय ? Wink Proud
:पळा पळा:
--------------------------------------------
रखरखीत हा रस्ता प्रवास करण्याचा,
शेवट त्याचा मिळेल तोवर बोलू काही...

केश्विनीबाई.. लोकांचे गैरसमज करून देता काय तुम्ही?
पूSSनम, तुला धुण्याबद्दल चाललंय. तुझे कपडे धुण्याबद्दल नाही.
दक्षे, 'नी'रजा कृपया...
Wink
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

काय बाई टवाळ लोकं आहेत, अंताक्षरी सोडून सगळे विषय चघळून झाले इथे..

नीरजा Proud अगं पूनम काय पटकन धुवून होईल.
***************
ॐ नमश्चण्डिकायै |

सांस्कृतिक कार्यक्रमात धुलाईचा पण कार्यक्रम आहे का?
मग त्या साठी साबणाच्या जाहिराती वैगेरे असे पण काही सादर करायचय का!
वॉशिंग पावडर धुलाई!

-------------------------------------------------------------
'ज्याला कलाकार नाही बनता येत तो टीकाकार बनतो'

मग खळबळवत बसायचं जास्ती वेळ...

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

दक्स, तूलाच धुवायची हुकी आली ना?
कृ, ते तू गुणदर्शन मधे सादर कर.

***************
ॐ नमश्चण्डिकायै |

Pages