मराठी माणूस धंद्यात मागे आहे असा एक सर्वसामान्य समज आहे. पण नुकत्याच पार पडलेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनातील एक्स्पो हॅाल मधील चित्र मात्र काहीसं वेगळंच होतं.
या एक्स्पो हॅालमध्ये अनेक उद्योजकांनी - विशेषत: मराठी उद्योजकांनी - आपआपले कक्ष उघडले होते. मी या दालनात फेरफटका मारत असता मध्येच एका माणसाने मला अडवलं आणि आणि एक छानसा पांढरा शर्ट माझ्या हातात थोपवला. मला तो शर्ट विकत घेण्यात रस नाही हे मी स्पष्ट करण्याआधीच त्याने तो शर्ट फुकट असून केवळ त्यांची अभिनव कल्पना ऐकून घेण्यासाठी आहे हे त्याने मला सांगितले. मी अर्थातच लगेच होकार दिला. पुढे त्याने जे सांगितले ते ऐकून मी चाटच झालो! पुण्यातील एका उद्योजकाने अमेरीकेतील लोकांना भारतीय आणि पाश्चिमात्य पद्धतीचे सूट आणि शेरवानी वगैरे ईंटरनेटवरुन शिवून द्यायचा धंदा सुरु केला आहे. तुम्हाला आत्ता हवं असेल तर कक्षात जाऊन मापं द्या नाहीतर जेव्हा हवं तेव्हा वेबकॅमवरुन तुम्हाला मापं कशी घ्यायची हे सांगण्यात येईल आणि ती मापं तुम्हा ईमेलने पाठवल्यावर २० दिवसात सूट तुमच्या अमेरीकेतल्या घरी पोस्टाने हजर! आणि तोही वाजवी किमतीत! बृहन्महाराष्ट्रमंडळाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने सूट शिवून घेतल्याचंही त्याने मला सांगितलं. मला त्यांच्या या अभिनव कल्पनेचं कौतुक वाटलं.
तिथून जरा पुढे जातो तो दादरच्या गोडबोल्यांच्या कक्षावरही बरीच गर्दी होती. सचिन गोडबोले नावाचा युवक राजकारणी जसे खादीचे जॅकेट घालतात त्याप्रमाणे जॅकेट घालून बऱ्याच लोकांना अभिनव पदार्थ खाऊ घालत होता. सर्वांशी हसून बोलणाऱ्या त्या युवकाने मला सेंट्रीफ्यूज पद्धतीने तेल काढलेली उत्तम चवीची चकली, कार्ल्याचा कडवट नसणारा चिवडा, बासमती पोह्यांचा चिवडा चव चाखण्यासाठी दिला. माझ्या हातात एक रंगीत गुळगुळीत पत्रक थोपवून आम्ही ईंटरनेटवरुन अॅार्डर घेतो असंही सांगितलं. परंतु जेव्हा त्याने आपण न्यूजर्सीत लवकरच शाखा उघडणार असल्याचं सांगितलं तेव्हा मात्र मला पुन्हा एकदा आनंदाश्चर्याचा धक्का बसला. माझ्या डोळ्यासमोर दहा बारा वर्षापूर्वीचा फलक तरळला - "आमची कुठेही शाखा नाही!"
दागिन्यांच्या क्षेत्रातही अमेरीकन बाजारपेठेत पू. ना. गाडगीळ, लागू बंधू मोतीवाले, वामन हरी पेठे यांनी जोरदार पदार्पण केले आहे असे मला त्यांच्या कक्षातून कळले. स्थानिक महाराष्ट्र मंडळांचे कार्यक्रम प्रायोजित करुन त्यांना जोरदार मार्केटींग चालू केले आहे. अमेरीकेतील लाखो मराठी बांधवांना आपल्या आवडीच्या मराठी पद्धतीचे दागिने आता अमेरीकेतल्या अमेरीकेत बसून विकत घेणे शक्य झाले आहे. पू. ना. गाडगीळ यांनी तर सिलिकॅान व्हॅलीत आपले दुकानही थाटले आहे!
अमेरीका ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. चीन आणि भारताच्या तुलनेत लोकसंख्या कमी असली तरी सर्वसामान्य अमेरीकन माणसाचे दरडोई उत्पन्न सर्वसामान्य चीनी आणि भारतीय माणसापेक्षा बरेच जास्त आहे. म्हणूनच अमेरीकन माणूस दरडोई जास्त पैसे खर्च करतो. अमेरीकेतील भारतीय समाज सर्वसामान्य अमेरीकन माणसापेक्षाही जास्त उत्पन्न असणारा आहे. त्या मुळे त्यांची खर्च करण्याची क्षमताही सर्वसामान्य अमेरीकन माणसापेक्षाही जास्त आहे. परंतु त्याला आवडणाऱ्या अनेक वस्तू - विशषत: भारतीय वस्तू -आजही जितक्या सुलभतेने भारतात उपलब्ध आहेत तितक्या सुलभतेने अमेरीकेत उपलब्ध नाहीत. या वस्तू त्याला वाजवी दरात अमेरीकेत उपलब्ध करुन दिल्यास ही भारतीय-अमेरीकन बाजारपेठ वाढून भारतीय उद्योजकांचा मोठा फायदाच होणार आहे. मराठी उद्योजकांनी जागतिकीकरणाची ही वळणे आता आत्मसात केली आहेत. बेडेकर बऱ्याच वर्षांपासून अमेरीकेत लोणची विकत आहेत पण त्यांच्या गोडा मसाला, लोणच्याचा मसाला अशा इतर उत्पादनांनाही त्यांनी आता अमेरीकन बाजारपेठेत आणायला सुरुवात केली आहे. नवनवीन कल्पना लढवून मराठी माणूस अमेरीकन बाजारपेठेत आता नव्या दमाने उतरायला लागला आहे.
सुमारे २०० वर्षापूर्वीच मराठी माणूस अटकेपार पोचला होता. आता आमची तट्टं मिसिसिपीचं पाणी पिण्यासाठी फुरफुरत आहेत!
वैभव, छान
वैभव,
छान लिहिला आहेस लेख.
कालच
कालच सकाळमध्ये हा लेख वाचला होता, चांगला लिहीलाय.
चांगली
चांगली माहिती दिलीत. गोडबोले न्यूजर्सीत शाखा उघडणार का? वा, वा.
या एक्स्पोकडून माझी थोडी निराशाच झाली. फार अपेक्षा होत्या त्यामानाने तिथे फारसे काही नव्हते. पुस्तके आणि सीडी, डीव्हीडीज खास नव्हत्या.
लालू, सिअॅ
लालू,
सिअॅटलच्या अधिवेशनात बरेच प्रकाशक आले होते. पण त्याना खुपच कमी प्रतिसाद मिळाला होता. तसेच फेब्रुआरीत साहित्य संमेलन झाल्याने तिथेही काही प्रकाशक येऊन गेले आहेत. दोनदा वारी करण्याएवढी त्यांची विक्री नक्कीच होत नाही.
अरे, पण
अरे, पण विकत घेण्यासारखी पुस्तके आणली होती का त्यांनी? इथे मोजक्या लेखकांची तीच तीच जुनी आणि 'उरलेल्या पदार्थांचे पदार्थ', 'भाताचे प्रकार' असली ढीगभर पाककृतींची पुस्तकं होती, ती कोण घेणार? सीडीज फारशा नव्हत्याच. त्यापेक्षा मायबोली खरेदी विभागात कितीतरी घेण्यासारखी पुस्तकं असतात. आता लोकांना विकत घ्यायचे आहे ते तुमच्याकडे नसेल तर कसा चांगला प्रतिसाद मिळणार?
पुस्तकांब
पुस्तकांबाबत आणि एकूणच एक्स्पोबाबत लालूला अनुमोदन. तसंच मराठी सीडीज कुठे दिसल्या नाहीत.
-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism!
स्वाती,
स्वाती, मराठी सीडी ग्रंथाली, रंगारंग आणि मॅजेस्टीक च्या स्टॅालवर होत्या.