ववि २००९: सांस्कृतिक कार्यक्रम पोस्ट क्रं-१

Submitted by ववि_संयोजक on 29 June, 2009 - 01:08

चला, लागले का सर्व वविच्या तयारीला?? नाव नोंदणी करायला विसरू नका!!!

आणि हो... त्याचसोबत तुमच्या छोटुकल्याची पण नाव नोंदणी करायला विसरू नका..

कशासाठी काय??

वैयक्तिक गुणदर्शन

तुमच्या बाळाचे कलागुण मायबोलीकरांसमोर सादर करण्यासाठी एक उत्तम संधी.

या कार्यक्रमासाठी आधीच प्रवेशिका मागवण्यात येत आहेत.

नृत्य/गीतगायन्/कथाकथन् /मूकाभिनय अथवा नाट्यछटा आणि इतर कलाप्रकार (शक्यतो मराठी असावे)यामधे सदर करता येतील.

प्रत्येक प्रवेशिकेसाठी जास्तीत जास्त पाच मिनिटाचा वेळ देण्यात येईल. सादरीकरणासाठी लागणारे सर्व साहित्य (ड्रेपरी/कॅसेट प्लेयर) हे सादरकर्त्याने (अर्थात त्याच्या पालकानी) आणायचे आहे.

या कार्यक्रमामधे समावेश करण्यासाठी कृपया vavi@maayboli.com इथे मेल ४ जुलै २००९ पूर्वी करावी. या मेलमधे सादरकर्त्याचे नाव, पालकाचे नाव आणि मायबोली आयडी, कार्यक्रमाचे स्वरूप, लागणारा वेळ, इतर साहित्य हे नमूद करावे. मेलचा विषय `वैयक्तिक गुणदर्शन' असा असावा.

काही अपरिहार्यपणे सांस्कृतिक कार्यक्रमात काही बदल अथवा रद्द करावे लागल्यास संयोजकाचा निर्णय अंतीम राहील याची कृपया नोंद घ्यावी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे! काय हे कुणीच कसं फिरकलं नाहीये इथे..? वविसंयोजक वविच्या सगळ्या पोस्टच्या लिंक एकाठीकाणी दिसतील शक्यतो वविमाहीती मधे असं काही तरी करता येईल का?

तुमच्या बाळाचे कलागुण मायबोलीकरांसमोर सादर करण्यासाठी एक उत्तम संधी. <<<

आणि स्वतःचे कलागुण दाखवायचे असेल तर? पालकांना घेऊन यायचे? (म्हणजे त्यांच्या बाळाचे कलागुण दिसेल. असे.) :p

>>>>> आणि स्वतःचे कलागुण दाखवायचे असेल तर? पालकांना घेऊन यायचे? Lol Lol Lol
जीड्या, अगदी अगदी! जाम हसलो बुवा तुझ्या प्रश्नाला! Happy
(एकीकडे जीड्या त्याचे कलागुण दाखवतोय अन पकलेले वविकर्स सन्योजकान्नी पुरवलेली अन्डी अन टोमॅटो फेकुन मारताहेत......... अहाहा..... क्या नजारा होगा! Proud ---- अस्सच चित्र डोळ्यापुढे उभ राहिल म्हणुन हसू आल बरका! हो, आधीच क्लिअर करतोय, उगाच त्यावरुन वाद नकोत!)

जीडी आपले गुण उधळायला वेगळ व्यासपीठ कशाला ?
*************************************************
तू नसताना आठवीत बसतो जराजरासे,
तुझे बहाणे, ना येण्याचे तर्‍हेतर्‍हेचे

>>>>> आणि स्वतःचे कलागुण दाखवायचे असेल तर? पालकांना घेऊन यायचे? >> Lol जीड्या.

>>>> जीडी आपले गुण उधळायला वेगळ व्यासपीठ कशाला ?
म्हणजे??? नको का? मग क्काय उण्टावर बसूनच गुण उधळून दाखवणार का? Wink Proud

ए बास करा रे! विषय बदला अन सूचना सिरीयसली घ्या! Happy
अर्थातच ज्यान्च्याकडे स्वतःची चिल्लीपिल्ली आहेत त्यान्नी ती जरुर आणावित!
(कोणास शेजारपाजार्‍याची/लोकाची का होईना, पण चिल्लीपिल्ली आणायची(च) असतील तर त्यासही हरकत नसावी, फक्त पूर्वपरवानगी घ्यावी असे वाटते)

आणि स्वतःचे कलागुण दाखवायचे असेल तर? >>> त्यासाठी वविची नोंदणी सक्तीची आहे... उगाच शेळ्यां (शेख्यां) मारू नका... Proud