अंदाजे ५०-६० तिसर्या
अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा
दीड वाटी ओले खोबरे
१ टी स्पून धणे
६-७ सुक्या मिरच्या
हळकुंडाचा छोटासा तुकडा ( नसल्यास चमचाभर हळद )
अर्धा टी स्पून काळी मिरी
अर्धी वाटी ओल्या नारळ्याच्या कातळ्या ( पातळ काप, सुक्या खोबर्याचे चिवड्यात घालतात तसे )
चिंचेचा घट्ट कोळ पाव वाटी
खोबरेल तेल किंवा गोडे तेल.
सगळ्या तिसर्या एक शिंपलीच्या करुन घ्याव्या.
थोड्या तेलावर पाव वाटी कांदा परतून घ्यावा. थोडी हळद पूड घालून त्यावर तिसर्या, कातळ्या, व थोडे पाणी घालून शिजत ठेवावे.
हळकुंड, मिरी, धणे , मिरच्या थोड्या तेलावर परतून खोबरं व उरलेल्या कांद्याबरोबर वाटून घ्यावे. त्यात चिंचेचा कोळ घालावा.
तिसर्या शिजत आल्या की त्यावर मसाला घालावा व थोडे गरम पाणी घालावे. दोन उकळ्या आल्या की एकशिपी तयार.
आवडत असल्यास १ बटाट्याच्या सालासकट चकत्या फोडणीत घालत येतील.
एकशिपी म्हणजे शिंपल्या कापून एक शिंपली टाकून द्यायची व एकच ठेवायची. ( क्लॅम्स ऑन द हाफ शेल शोधलं तर चित्रं सापडतील)
वा. पाणी
वा. पाणी सुटलं तोंडाला. मस्त रेसिपी. करून बघीतली पाहिजे.
एकशिपी खाऊन युगं लोटली असतील. मुंबईला शेजारच्या काकी करायच्या आणि माझ्या साठी खास काढून ठेवायच्या. त्याची पुन्हा आठवण झाली.
वा छान आहे
वा छान आहे रेसिपी. मी एकशिंपलि कांदा खोबर्याचे वाटण घालून करते. तुमची रेसिपी आवडली नक्की करुन बघेन.
तिसर्या
तिसर्या म्हणजे काय? कुठल्या प्रांताचा हा पदार्थ आहे? खूपच वेगळां... धन्यवाद शोनू?