चार वाट्या सुट्या केलेल्या तिसर्या,
चार कांदे,
चार हिरव्या मिरच्या
चार आमसुले
१ वाटी नारळ
पाच लसणीच्या पाकळ्या
पाच मिरी
एक चमचा धणे-जिरे मिश्रण
एक चमचा हळद
एक चमचा तिखट
मीठ
कांदे व मिरच्या बारीक चिरून घेणे,
खोबरे-लसूण-मिरी-धणे-जिरं एकत्र जाडसर वाटून घेणे.
रगडा/ पाटा धुतलेले वाटी-दोन वाटी ( लहान ) पाणी वेगळे ठेवावे.
सुट्या तिसर्या, वाटण, हळद, तिखट, आमसुले, मीठ एकत्र करून त्यात मसाल्याचे पाणी घालून शिजवावे. पाणी आटत आले की सुके तयार.
कांदे व लसूण भारतातल्या आकाराने लिहिले आहेत.
तिसर्या सुट्या करणे म्हणजे एका बोथट सुरीने उघडून, दोन्ही बाजूचे शिंपले काढून टाकून आतले मांस तेवढे घ्यायचे असते. चार वाट्या म्हणजे बराच वेळ लागेल. तो गृहीत धरलेला नाही. कॅन मधले क्लॅम्स वापरून 'पुअर मॅन्स' व्हर्शन करता येईल, मी कधी केले नाही.
बरोबर तांदळाची भाकरी एकदम मस्त लागते.