मागच्या आठवड्यात मी चार दिवसांसाठी गावाला गेलो होतो. जाताना घरून पुणे स्थानकावर गेलो तेव्हा उबर रिक्षा केली होती. त्या ॲपमध्ये बुकिंगच्या वेळेला जी रक्कम दाखवली तीच प्रवास संपताना घेतली गेली. चार दिवसांनी मी मध्यरात्रीनंतर पुण्यात परतलो तेव्हा उबर रिक्षा बुक केली. ती बऱ्याच प्रतिक्षेनंतर मिळाली. परंतु रिक्षा चालकाने आधी फोनवरच मला सांगितले की रात्रीच्या मीटरप्रमाणे पैसे होतील, ॲपनुसार नाही.
त्यावेळेस माझी सहनशक्ती संपलेली होती आणि पुन्हा नव्याने अन्य बुकिंग करणे मला शक्य नव्हते म्हणून मी होकार दिला.
रिक्षात बसल्यानंतर मी चालकांना विचारले की हा नियम कधी झाला आहे ? त्यावर ते म्हणाले की तुम्हाला एसएमएस आला नाही का ? नुकताच हा आमचा करार झालेला आहे.
अर्थात मला काही कंपनीचा संदेश वगैरे आलेला नसल्याने मला त्यांचे म्हणणे काही पटत नव्हते. प्रवासात मी त्यांना माझी नाराजी बोलून दाखवली. अखेरीस माझे घर आले. ॲपनुसार 115 रुपये होते तर रात्रीच्या मीटर नुसार 163 झाले. संपूर्ण प्रवासात मी बडबड केलेली असल्यामुळे त्या चालकांनी स्वतःहूनच थोडी तडजोड करून माझ्याकडून दीडशे रुपये घेतले. सध्याच्या धोरणानुसार उबरचा वाटा गेल्यानंतर चालकांना बरीच कमी रक्कम मिळते असे त्यांनी मला नम्रपणे सांगितले.
आज वृत्तपत्रात संबंधित नियम १ एप्रिलपासून लागू झाल्याची बातमी आली आहे : https://www.freepressjournal.in/pune/ubers-new-auto-fare-rule-leaves-pun...
म्हणून पुण्यातील सर्वांच्या माहितीसाठी हा धागा काढलेला आहे. आपापला अनुभव नोंदवा. या संदर्भात ओलाची काय भूमिका आहे ते अद्याप कळलेले नाही. कुणाला काही अनुभव आला असल्यास लिहा.
वरील बातमीनुसार उबरने त्यांच्या aggregator धोरणापासून फारकत घेतलेली दिसते. आता ते रिक्षाचालकांकडून दिवसाला फक्त 19 रुपये अशी संगणकीय फी म्हणून घेणार आहेत. तसेच रिक्षाचालकाने ग्राहकाकडून घ्यायच्या रकमेबाबत त्यांनी कानावर हात ठेवले आहेत.
या संदर्भात ग्राहक कायदा वगैरेंची कोणाला माहिती असल्यास जरूर लिहा.
* * *
रात्री बारा नंतरचे मीटर जास्त
रात्री बारा नंतरचे मीटर जास्त असते कारण रिक्षा किंवा टॅक्सीवाले जागून चालवतात. तर रात्रीचे भाडे मुळात ॲप मध्ये सुद्धा जास्त यायला हवे. अन्यथा ओला उबेर रिक्षा चालवणाऱ्यांना इतरांच्या तुलनेत कमी पैसे मिळतील. यात समानता हवी. त्यामुळे ते मला पटले.
ओला Uber ला डिमांड जास्त असेल तर pick hours मध्ये भाड्यात फार तफावत असते. रिक्षांची कल्पना नाही पण मुंबई नवी मुंबई कॅब ने वरचेवर जाणे होते त्याचे सर्वात छोट्या गाडीचे भाडे कधी ५०० ते स्पेशल ओकेजनला ८००-९०० इतकी मोठी तफावत आढळते.
रिक्षाबाबत सुद्धा असे होत असेलच.
मग अश्या केसेस मध्ये जेव्हा ॲपचे भाडे मीटर पेक्षा जास्त असेल तेव्हा ते कुठले घेणार?
* जेव्हा ॲपचे भाडे मीटर
* जेव्हा ॲपचे भाडे मीटर पेक्षा जास्त असेल तेव्हा ते कुठले घेणार? >>>> अत्यंत योग्य आणि तर्कशुद्ध प्रश्न !
. . .
आता पुण्यातील रिक्षा पंचायत ओला व उबरपासून फारकत घेण्यासाठी आमची ऑटो हे स्वतंत्र ॲप नव्याने विकसित करीत आहे :
https://punemirror.com/pune/civic/new-ride-hailing-app-aamcha-auto-set-t...
पाहूया काय काय होतंय . . .
मला असा अनुभव मागच्या
मला असा अनुभव मागच्या आठवड्यात आला. ऑफिसमधून घरी जाताना ओला बुक केली..app var १५०/- दिसत होते. ओला आल्यावर ड्रायव्हर म्हणाला at actual जितके होतील तितके द्या कारण परवडत नाहीं . मी त्याला कॅन्सल करायला लावलं बुकिंग. दुसरी ओला बुक केली तो ऍप वरच्या teriff नी यायला तयार झाला. त्याच्याकडे चौकशी केल्यावर कळलं की ओलानी मीटर चा बेसिक रेट १३ का १४ केला आहे..त्यामुळे ऑटो वाल्यांना सध्या परवडत नाहीये..
हे मुंबई नवी मुंबई चे नुकतेच
हे मुंबई नवी मुंबई चे नुकतेच वाढलेले रेट आहेत.
मी प्रवास केला आहे दोन्हीत. आकडे करेक्ट आहेत.
Autorickshaws:
Minimum Fare: ₹26 (instead of the previous ₹23)
Per Kilometer Rate: ₹17.14
Black-and-Yellow Taxis:
Minimum Fare: ₹31 (instead of the previous ₹28)
Per Kilometer Rate: ₹20.66
ओला बाबत pick hours नसतील तर minimum काही आहेत का?
आणि काही गणित काही फॉर्म्युला असतो का? म्हणजे टाईम किंवा ट्रॅफिक इंटेन्सिटी किती आहे यावर काही calculation केले जाते का?
कारण आम्हाला भाडे जास्त वाटले आणि जायची घाई नसली तर आम्ही अर्धा पाऊण तास थांबतो आणि रेट उतरायची वाट बघतो. तसेच ओला आणि उबेर दोन्ही आलटून पालटून चेक करतो.
पण हो, ओलावाल्यांना परवडत नसावे असे वाटते खरे. इतर रिक्षावाले खूप जुगाड करतात. कधी जवळच्या जागी जायचे असल्यास मीटर नाही टाकत, कधी मीटरने न जाता वाढवून मनाचा आकडा सांगतात, कधी शेअर मध्ये लाऊन चारचार जण घेऊन जातात. ओला उबेर वाल्यांना असा काही स्कोप नसतो.
मलाही मागच्या वीकमध्ये
मलाही मागच्या वीकमध्ये दोनवेळा हा अनुभव आलाय एकावेळी उबर ड्राइवर ने स्वतच बुकिंग कैंसिल केले तेव्हा ऑटो बुक होऊन दुसरी रिक्षा मिळाली ती मात्र उबर च्या रेट प्रमाणेच आली
, मी पण बरीच भांडभांड केली दोन्ही वेळेला त्यांना बोलले मीटरप्रमाणेच जायचय तर उबर ला कशाला लावता रिक्षा?
काल रॅपिडो बुक केली नंतर तो पण अप प्रमाणे आला.
कालचा उबर ड्रायव्हर बोलत होता आमच्याकडे जीआर आहे गवर्नमेंट आणि उबर मधे करार झाला म्हणे खरेखोटे देव जाणे.
रात्री उबर, ओला वेगळा रेट
रात्री उबर, ओला वेगळा रेट घेते का की दिवसा रात्री तोच असतो ? मी रिक्षाने जात नाही म्हणून विचारले.
ओला, उबर मक्तेदारी संपेल आता. भारत सरकार एक अॅप आणतेय . त्यात सरकार काही घेणार नाही. पुर्ण पैसे चालकाला.
वरील प्रश्नाचे उत्तर मलाही
वरील प्रश्नाचे उत्तर मलाही जाणून घ्यायला आवडेल. माझ्या लेखातल्या उदाहरणानुसार अँपने जे पैसे दाखवले ते रात्रीचे वाटत नाहीत पण माझ्या अंतरासाठी दिवसाच्यापेक्षा थोडे जास्त आहेत.
आपण जेव्हा बुक करतो तेव्हा मागणी किती आहे त्यावर त्यांचे दर ठरत असावेत असं वाटतं.
कोणी सांगावे.
तशी एक सर्वसामान्य प्रथा आहे
तशी एक सर्वसामान्य प्रथा आहे यांची एखादा रात्रीचा प्रवासी मिळाला की अडवणूक करायची. अगदीच पोचलेले रात्री लुटतातही. त्या शहरात आलेला प्रवासी नवखा असेल तर लांबून नेणे.
मी विद्यार्थी असताना रिक्षात बसल्यावर फडाफड घरंगळणारे मीटर पाहयला लागू नये म्हणून डोळे मिटायचो. मोबाईल नव्हते तेव्हा बाहेरगावी गेल्यास घरी टेलीफोन बूथवरुन बोलताना मीटरकडे पाहून बोलायचो.
मागणीनुसार दर असावेत. Zomato सुध्दा रश अवर चार्जेस लावते.
थोडासा अवांतर असा प्रातिसाद
थोडासा अवांतर असा प्रातिसाद आहे पण मला असं वाटतं कि रिक्षा वाल्यान्च्या या परिस्थितिला ते स्वःता जबाब्दार आहेत. रिक्शा वाल्यानी फक्त येतील ती भाडी मीटरनुसार जरी घेतली तरी महिन्यभरात बर्याच ओला उबर कॅब्स बंद होतील. त्यांना कळत नाहीय कि रिकाम्या रिक्षात बसून टाईमपास करणे किंवा अगदी दिवसाच्या वेळी जवळपास डबल मीटर ने जी भाडी मिळतील तिच घेणं या सवयीं मुळेच या ओला ऊबर चा धंदा फावला आहे. जर मला रिक्षात बसून डबल मीटरच द्याय्चा असेल तर मी कमीत कमी एसी कॅब ने जाइन ना. तरी आता सर्व रिक्षा सीएन्जी वर आहेत. दर किमी ला १.५/२ रुपयाच्या पुढे खर्च येत नाही. दिवसाला १०० किमि रिक्शा चालली आणि त्यातल्या ७०-७५ किमि साठी जरी भाडी मिळाली तरी दिवसाचे हजार बाराशे सहज सुटतात. सकाळ संध्याकाळी फिक्स कॉर्पोरेट ची भाडी घेतली आणि दिवसाला अगदी तासाला २०किमी नुसार १० तास जरी रिक्षा चालली तरी याच्या डबल कमाई होईल. रात्री च्या वेळी नियमानुसार १.५ पट भाडे घेतले तरी चालेल. पण त्यासाठी सगळ्या रिक्षा वाल्यांना मीटर नुसार जाण्याचे ठरवावे लागेल. तरच ओला उबरचा धंदा कमी होईल आणि ते कस्टमर्स यांना मिळतील.
आज पावसात ना उबेर, ना ओला ना
आज पावसात ना उबेर, ना ओला ना रिक्षा कुणीही यायला तयार नव्हते. उबेर आमच्या इथे काही उपयोगाची नाही. पुण्यात रॅपिडो स्वस्त पडते. पण इथे नाहीये ते. आज थोडे जास्त पैसे मागितले असते तरी सुद्धा दिले असते. पण रिक्षात निवांत बसलेले होते त्यातले कुणीही येत नव्हते. पाण्याने सब वे ब्लॉक झालेत म्हणायला लागले. एक जण तयार झाला पण त्याने नऊशे रूपये मागितले. सातशे ते आठशे मीटर अंतराला नऊशे ?
मग भिजत चालत यायला लागलं. सब वे पाणी होतं, पण रिक्षा सहज गेली असती.
आज खूप राग आला, संताप झाला. प्रत्येक जण पोटासाठी करतो हे मान्य आहे. पण आजचा प्रकार अनुभवल्यावर रिक्षा बंदच केली पाहीजे. किंवा ज्यांना पाहीजे त्यांना हा व्यवसाय करू द्यावा. सरकारला रिक्षासारखं वाहन चालवता आलं तर बरं होईल. नसेल तर त्यांनी परस्पर दर ठरवू नयेत.
ज्याला परवडेल तो येईल.
हळूहळू तुम्ही विळख्यात अडकत
हळूहळू तुम्ही विळख्यात अडकत जातात तसे भाव वाढवत नेतील.
रात्री अपरात्री स्टेशनवर उतरलं तरी रिक्षा मिळते म्हणून तशा रेल्वे पकडल्या जातात. स्टेशनवर चार पाच तास कोण थांबणार? मग द्यायचे पैसे.
कित्येकांना पुण्यातून सकाळी सहाची सिंहगड पकडणे पूर्वी कठीण होते. कारण रिक्षा सुरू व्हायच्या त्याच सहाला. आता कॉल रिक्षा मुळे शक्य झाले. रात्री पुणे स्टेशनवर जाऊन झोपत असत काही जण.
कोकणात तर पाच सहा किमिटरचे दोनशे अडीचशे रुपये मागतात. म्हणे रिटन भाडे मिळत नाही.
(No subject)
मलाही एवढ्यात उबर ऑटो ने भाडे
मलाही एवढ्यात उबर ऑटो ने भाडे किती होईल याची रेंज दाखवली बुकिंग करताना आणि रिक्षा ने सोडल्यावर सुद्धा. (१५९-१८३) अशी काहीतरी रेंज होती. रिक्षावाल्याने अर्थातच १८३ घेतले.
पूर्वी एकच एक रक्कम यायची. किंवा रिक्षा सोडल्यावर तरी उबर एक ठराविक रक्कम पे करा असे दाखवायचे ऍप वर. ही रेंज माझ्यासाठी नवीन आहे.
तसेच रिक्षासाठी ऑनलाईन पेमेंटचा ऑप्शन पण काढून टाकलाय. अर्थात सगळ्याच रिक्षावाल्यांकडे UPI पेमेंटचा काही न काही ऑप्शन असतोच त्यामुळे फार अडत नाही. पण ज्यांच्यासाठी आपले पेमेंट डिटेल्स / अकाउंट डिटेल्स/ UPI डिटेल्स रिक्षावाल्यांकडे जाण्यास प्रॉब्लेम असेल त्यांना नक्की त्रास होईल या नवीन नियमाचा.
याहून मोठी लबाडी म्हणजे मागच्या वेळी आऊटस्टेशन उबर बुक करून UPI थ्रू पेमेंट केले तर त्या लबाड ड्रायव्हरने पैसेच दिले नाही अशी कंप्लेंट टाकली होती. आठवडाभराने का काहीतरी पुन्हा कॅब बुक करताना मला उबरने ३०००+ रुपये आधी ऍप मध्ये जमा करायला लावले. त्याशिवाय पुढची कॅब बुक होईना. तेव्हा वैतागून ते पैसे भरले आणि नंतर नवऱ्याने ते भांडून त्यांच्याकडून परत घेतले (म्हणे). म्हणे अश्यासाठी की कधीकधी माझा वैताग बघून तो खोटं सांगतो पैसे मिळाले आणि स्वतः लॉस बेअर करतो.
वाचतोय अनुभव सर्वांचे.
वाचतोय अनुभव सर्वांचे.
* एकेकाळी जेव्हा ॲपवाल्या रिक्षा नव्हत्या त्या काही रिक्षाचालकांची अरेरावी आणि दादागिरी या समस्या होत्या.
* या नव्या सुविधा आल्यानंतर सुरुवातीची काही वर्षे खरोखर बरे वाटले होते. अजूनही रात्री अपरात्री कुठलीतरी रिक्षा मीटरवर करण्याऐवजी प्रवासाची ऑनलाइन नोंद असलेला प्रवास बरा.
* पुढच्या काही वर्षात मात्र ॲपवाल्या कंपन्या आणि वाहनचालक यांनी लबाड्यांचे आपापले नवे नवे मार्ग शोधले.
तुमच्या सारखा अनुभव इतर
तुमच्या सारखा अनुभव इतर पुणेकरही घेतायेत. कारण उबरचा नवीन नियम आलाय....तो म्हणतो
अॅपने दाखवलेले भाडे दार्शनिक असेल. प्रवाश्यांनी मीटर प्रमाणे भाडे द्यायचे आहे. Free press news.
महाशिवरात्रीला हैदराबाद ला
महाशिवरात्रीला हैदराबाद ला गेलो होतो एअरपोर्ट वरून उबर केली पण परत एअरपोर्टला जाताना उबर वाला फोन करून जेवढे पैसे आहेत त्यावर 200 250 अधिक मागू लागला. कारण विचारल्यास आज सुट्टीमुळे परतीचे भाडे मिळणार नाही म्हणे.
मी नकार दिला. दोन तीन जणांकडून हाच अनुभव आला. मग रॅपिडो बुक केली. त्याने काही कुरबुर केली नाही.
आधी ओलाचे दर जास्त वाटायचे आता उबरचे वाटतात. सध्या रॅपिडो वापरतोय.
पण वर म्हटलं तसं नवनवीन लबाड्यांचे मार्ग निघत जातील.
एवढ होऊन रिक्षावाले आजही भाडी नाकारतात
अशीही लबाडी असते ??https:/
अशीही लबाडी असते ??
https://www.loksatta.com/explained/how-central-government-sahkar-taxi-wi...
. . . ओला किंवा उबरवर कॅब बुक करताना अनेकदा राईड मिळते; तर कधी कधी त्याच अंतरासाठी तुम्हाला जास्त पैसे दाखवले जातात. या किमती फोनचे मॉडेल आणि बॅटरी चार्जिंगच्या आधारावर ठरतात, असेही अनेकांचे म्हणणे आहे. कमी बॅटरी असलेल्या उपकरणांनी पूर्ण चार्ज केलेल्या उपकरणांपेक्षा जास्त दर असतात,</em> असे वापरकर्त्यांचे सांगणे आहे. वापरकर्ते आपत्कालीन परिस्थितीत जास्त भाडे देण्यास तयार असल्याने या कंपन्या हा अल्गोरिदम वापरतात, असाही दावा करण्यात आला. . . .
>>भारत सरकार एक अॅप आणतेय .
>>भारत सरकार एक अॅप आणतेय . त्यात सरकार काही घेणार नाही. पुर्ण पैसे चालकाला.
हो पण सर्व्हिस क्वालिटी चेकचे काय? ओला उबर चा चेक असतो म्हणून जरा तरी बरे वागतात रिक्षावाले.... सरकारी कारभार म्हणजे कुणाचा कुणाला धाक असणार?
उबर च्या नव्या नियमानुसार
उबर च्या नव्या नियमानुसार मेजर सिक्युरिटी कन्सर्न साठी फक्त त्यांच्याकडे तक्रार होऊ शकते, भाड्या संदर्भात अथवा तुमचा प्रॉब्लेम त्यांना मेजर वाटला नाही तर नाही...
पुण्यात गेल्या वर्षी आलेला अनुभव:
कॅब ई ची प्री बुक्ड कॅब वेळेच्या एक तासापूर्वी अलॉट होऊनही अर्धा तास जागच्या जागी होती, म्हणून फोन केला तर ड्रायव्हर झोपला होता. उरलेला वेळ एअरपोर्ट ड्रॉप साठी पुरेसा नव्हता म्हणून नाईलाजानी कॅब कॅन्सल केली (ड्रायव्हर कॅन्सल करू शकत नव्हता).
उबर मधे कुणीच राईड ऍक्सेप्ट केली नाही. ओला वर एकानी केली पण दुसऱ्या नंबर वरून फोन करून म्हणाला की हजार रुपये देत असलात तर येतो, या नंबर वर कळवा. अन् ओला ची राईड त्यानीच कॅन्सल केली.
कॅब ई च्या प्री बुक्ड राईड चे चारशे होत होते, उबर ऍप वर कसलातरी ऑफर कोड लाऊन साडेतीनशे. अन् ओला ऍप वर याच टॅक्सी चं बुकिंग पावणे चारशे ला झालं होतं.
पण अजून पाच मिनिटं इतर कुणी राईड घेईल या आशेवर काढली अन् शून्य रिस्पॉन्स आल्यावर शेवटी हजार तर हजार म्हणून त्याला फोन लावला.
कॅब मधे बसल्यावर त्याचं बाकी ड्रायव्हर सोबत फोन वरचं संभाषण ऐकून समजलं की असा फोन केल्यावर सदर ड्रायव्हर ग्रुप ला राईड डिटेल्स अन् आपण कोट केलेलं भाडं सांगतात. मग बाकीचे एक तर राईड घेत नाहीत, किंवा घेऊनही त्यापेक्षा जास्त भाडं सांगतात. शेवटी गिऱ्हाईक पहिल्या ड्रायव्हर लाच फोन लावतं.
फ्लीट बेस्ड टॅक्सी सगळ्यात बेस्ट ऑप्शन ठरतो. जिथे गाडी कंपनीची असते अन् ड्रायव्हर पगारी असतात. त्यात त्यांना मिळेल ते भाडं घ्यावंच लागतं. बंगलोर मधे ब्लू स्मार्ट, क्विक राईड, एअरपोर्ट वाल्यांचं BLR+, शोफर वगैरे सर्व्हिस अशा तत्वावर चालतात. अशी सर्व्हिस पुण्यात फक्त कॅब ई द्यायचं, पण आता त्यांचा ही अनुभव वाईट येतोय...
ओला किंवा उबरवर कॅब बुक
ओला किंवा उबरवर कॅब बुक करताना अनेकदा राईड मिळते; तर कधी कधी त्याच अंतरासाठी तुम्हाला जास्त पैसे दाखवले जातात. या किमती फोनचे मॉडेल आणि बॅटरी चार्जिंगच्या आधारावर ठरतात, असेही अनेकांचे म्हणणे आहे. कमी बॅटरी असलेल्या उपकरणांनी पूर्ण चार्ज केलेल्या उपकरणांपेक्षा जास्त दर असतात,>>>>
https://youtube.com/shorts/6TFUrTwhhxc?feature=shared
https://youtube.com/shorts/truhws1b9kk?feature=shared
गेल्या ८ दिवसात अनेकदा हा
गेल्या ८/१० दिवसात अनेकदा हा अनुभव आला. ऑटोवाले ride accept करण्यापुरतेच उबेर वापरतात आणि मीटरने भाडे देणार असू तरच येतात नाहीतर ride cancel करायला लावतात.
मीटरवर येणारे ऑटोवाले मुद्दाम हळू हळू चालवतात, म्हणजे भरपूर भाडे मिळेल. त्यात मीटर tempering केले नसेल याची काय खात्री.
त्यामुळे हाताशी वेळ असेल तर मी दुसऱ्या ride बुक करत रहाते, पिं चि भागात एखादा तरी उबेरच्या रेट प्रमाणे नेणारा निघतो. पुणे City मधले ऑटोवाले मात्र भयंकर उद्धटपणा करतात.
ओलाचे रेट आधीच भरमसाठ असल्याने, अगदीच कोणी नाही मिळालं आणि मेट्रोने जायला वेळ हाताशी नसेल तरच नाईलाजाने ओला वापरते.
पुण्यात सतत चालू असलेली मेट्रोची कामे, जागोजागी खोदलेले रस्ते, भयंकर आणि बेशिस्त traffic यामुळे मध्यंतरी गाडी वापरणे कमी केले होते. पण आता ऑटोवाल्यांची अरेरावी पाहता auto ने येण्या -जाण्यापेक्षा metro/cab/आपली गाडी काढणे उत्तम.
अर्थात जवळच्या अंतरासाठी, त्यात सिनियर सिटीझन असतील तर ऑटो ला पर्याय नाही
Punyat le Auto wale mhanje
Punyat le Auto wale mhanje bhayanak prakar ahe.. Rapido cha option best hota ataparynat ata te sudhha problem dyayla laglet meter ne yenar mhantat baryachda. Ani kahi area madhe bhetat ch nahiye lavkar auto.
चांगले रिक्षावाले असलेलं शहर
चांगले रिक्षावाले असलेलं शहर असं काही नसतं...
सर्व शहरांमधले मेजॉरिटी रिक्षावाले हे अतिरेकी माज दाखवणारे च असतात...
सहमत, एखाद्या शहराची बदनामी
सहमत, एखाद्या शहराची बदनामी करण्यात रिक्षावाल्यांचा मोठा वाटा असतो. पुण्या मध्ये पुणे स्टेशन,स्वारगेट ह्यांचे अड्डे आहेत. रात्री नऊ दहा नंतर तर ह्यांचेच राज्य असत. हे लोक फक्त पैसेच जास्त घेत नाहीत तर वाटेत असणारे बहुतेक सिग्नल तोडून जातात. कोणी हात दाखवला की इंडिकेटर न देता वळणार नाहीतर आहे तिथेच थांबणार. समजा रिक्षा एखाद्या ठिकाणी थोडा वेळ जरी थांबली तरी आसपासचा परिसर रंगवून टाकणार.
एकंदरीत रिक्षा हा प्रकार
एकंदरीत रिक्षा हा प्रकार बहुतांशी त्रासिक, कटकटीचा व संघर्षाचाच ठरलेला आहे. परंतु काही अपवादात्मक अनुभव चांगले असतात. तसेच आपल्या जवळपास राहणाऱ्या चालकांशी जर व्यक्तिगत ओळख झाली तर ते काही वेळेला फोन करून आपल्या घरी येतात आणि ती सेवा चांगली मिळते.
दोन अनुभव आहेत :
१. एका रिक्षाचालकांशी काही कारणाने कौटुंबिक परिचय झाला. मग मी त्यांना विचारले की मध्यरात्रीनंतर मला स्थानकावर पोहोचवायचे असेल तर तुम्ही येणार का? तर ते आनंदाने हो म्हणाले. रिक्षात बसल्यानंतर ते शिस्तीत मीटर टाकतात आणि रात्रीच्या दराप्रमाणेच माझ्याकडून घेतात. अर्थात ते मला घरपोच सेवा देत असल्यामुळे मी त्यांना खुशीने थोडेसे अधिक देतो. किंबहुना माझा जेव्हा असा अपरात्री प्रवास सुरू होणार असतो तेव्हा तिकीट काढण्याआधीच मी त्यांना विचारून घेतो. ( अशाप्रसंगी ॲपवाल्या रिक्षा मिळण्याची अजिबात खात्री नसते हा अनुभव).
२. भारतात अनेक गावांमध्ये अजूनही रिक्षा विना-मीटरच्या असून चालकांच्या ‘बोली’वर चालतात. आता बोली म्हणजे ग्राहकांची लूट आलीच. अशा एका गावात मला नियमित जाण्याचा प्रसंग येतो. तिथेही मी एकाशी परिचय वाढवून ठेवला आहे. ते मला तिथल्या स्थानकावरून न्यायला आणि पुन्हा परतीच्या प्रवासाच्या वेळेला आणून सोडायला फोनवरून येतात. गेली दहा वर्षे आमचे गुळपीठ छान जमले आहे. दर तीन वर्षांनी मी त्यांना भाड्यात काही वाढ देतो.
आपल्या जवळपास राहणाऱ्या
आपल्या जवळपास राहणाऱ्या चालकांशी जर व्यक्तिगत ओळख झाली तर ते काही वेळेला फोन करून आपल्या घरी येतात आणि ती सेवा चांगली मिळते.>> आठ दहा वर्षे नवऱ्याने हीच सेवा वापरली. त्याला महिन्यातून दोन वेळा रात्री अकरा वाजता बस स्टॅन्ड वर जायचं असायचं. ओळखीचा रिक्षाचालक बरोबर ठरलेल्या वेळी यायचा अन त्याला जमणार नसेल तर स्वतः हुन दुसरी रिक्षा पाठवायचा.
ओलाचा वाईट अनुभव -
एकदा ठाण्याहून पहाटे चार वाजता एअरपोर्ट करता निघायचं होतं. ओला बुक केली. ड्राइवर चा फोन आला, पाच मिनिटात येतोय म्हणून. आम्ही पार्किंग मधे आलो. तर बराच वेळ वाट पाहून ही ओला आलीच नाही. ड्राइवर फोन पण उचलेना. दुसरी कॅब पण बुक होत नव्हती. ज्यांच्या घरी उतरलो होतो, त्यांची चारचाकी होती पण चालवणारा त्या दिवशी बाहेगावी होता. शेवटी अवजड सामान घेऊन तसेच रस्त्यावर रिक्षा शोधायला चालायला लागलो. शेवटी एक रिक्षा मिळाली अन कसेबसे वेळेत पोहोचलो एअरपोर्ट वर.
भाड्याचे वाहन वाले रिकामे
भाड्याचे वाहन वाले रिकामे असताना एखाद्या टॉयलेटपाशी गाड्या पार्क करतात. कोणतीही बुक केली तरी भाडे दुसऱ्याला सांगतात. रद्द केल्यास दुसरा त्याचा फायदा घेतो. एकमेकांस मदत करतात.
उबरने मॉडेल पूर्णच बदललेले
उबरने मॉडेल पूर्णच बदललेले दिसते रिक्षांकरता. म्हणजे आता फक्त रिक्षा व प्रवासी यांना एकमेकांशी कनेक्ट करणे, इतकेच करणार असे दिसते या माहितीवरून. रस्त्यावरून रिक्षा पकडण्यापेक्षा अॅपवरून बोलवायची. तुम्हाला रिक्षावाल्याचे रेटिंग ई दिसेल, अंतराकरता भाड्याची रफ रेंज कळेल आणि उबरचे अॅप व त्यातील ट्रॅकिंग ई वापरता येइल.
पण रिक्षांच्या बाबतीत मला हे मीटरवर परत आले यात आश्चर्य वाटले नाही.
रिक्षाकरता हे मॉडेल मुळातच कसे चालते मला आश्चर्य वाटते. फक्त रस्त्यावर आपण रिक्षा पकडतो तेव्हा आपण आसपास जितक्या असतील त्यातूनच पकडू शकतो. अॅप मधून मागवली, की परिसरात असलेली कोणतीही रिक्षा येऊ शकते. म्हणजे तुम्हाला स्टेशनला जायचे आहे. स्टॅण्डवरच्या एकालाही जायचे नाही. पण मागच्या गल्लीत एक मोकळी रिक्षा एका प्रवाशाला सोडून निघाली आहे आणि तो रिक्षावाला जायला तयार आहे - अशा परिस्थितीत आपल्याला व त्या रिक्षावाल्याला याचा पत्ता नसे - अॅप ने या दोघांनाही कनेक्ट करायची सोय केली. याव्यतिरिक दोन्हीमधे तसा काही फरक नाही. अशा वेळी उबर मधून लोकांना मीटरपेक्षा कमी किंमत दिसत असेल तर ती मार्केटच्या दृष्टीने "अनस्टेबल" अवस्था आहे. कोणत्याही ठिकाणाकरता जर मीटरप्रमाणे मिळणारी किंमत "रास्त" धरली तर अॅप मधून मिळणारे कमी भाडे रिक्षावाला का स्वीकारेल? जर त्याला दुसरा पर्याय नसेल तरच. ज्या प्रमाणात रिक्षावाले भाडी नाकारतात ते बघितले तर त्यांनी हे ही नाकारणे स्वाभाविक वाटते.
उबरचे आख्खे मॉडेल हे त्यांची सबसिडी वगैरे वजा केली, तरी प्रवासी घेणारे लोक त्यांना पाहिजे तेव्हा त्यांच्या मर्जीने प्रवासी घेतील - तो त्यांचा प्राथमिक व्यवसाय नसेल - अशांकरता होते. नाहीतर जर टॅक्सीवाला ज्या भाड्यात येणार नाही त्या भाड्यात उबरवाला का येईल? सबसिडी काही दिवस चालेल. नंतर फुलटाइम उबरवालाही टॅक्सीवाल्याइतकेच डिमाण्ड करेल. संध्याकाळी ४-५ तास असे प्रवासी घेणारे लोक त्याकरता उबर जे देतील ते घेतील असे गृहीतक त्यात होते. भारतात्/पुण्यात रिक्षांकरता हे लागू होत नाही. कारण स्वतःची रिक्षा असो व दुसर्याची दिवसभरातील काही तास घेऊन चालवणारा असो, त्याचा तो प्राथमिक सोर्स असतो. (उबरकडून सबसिडी मिळणार नसेल तर) तो कमी भाड्यात तयार होणे हे मार्केट फोर्सेस च्या लॉजिकने जास्त काळ टिकणार नाही.
हे रिक्षावल्यांच्या बाजूने वगैरे नाही. फक्त मार्केटच्या लॉजिकने लिहीले आहे. बाकी रिक्षावाल्यांच्या वागण्याबद्दल माबोवर काही वर्षांपूर्वी तुंबळ वादविवाद झाले आहेत. धागा असेल अजूनही.
Submitted by फारएण्ड on 6
Submitted by फारएण्ड on 6 April, 2025 - 08:07 >>> +१
वादविवाद का झालेत पण ?
रिक्षावाले कसे वागतात ? मायबोलीवर रिक्षावाले असतील असे वाटत नाही.
मागच्या गल्लीत एक मोकळी
मागच्या गल्लीत एक मोकळी रिक्षा एका प्रवाशाला सोडून निघाली आहे आणि तो रिक्षावाला जायला तयार आहे >>> पण याची परवानगी आहे का? मागे एकदा मी अशाच रिक्षाला हात केला तेंव्हा त्याने इकडे-तिकडे पाहत भीत भीत मला रिक्षात घेतले व म्हणाला कि त्या-त्या भागातील रिक्शावाले त्याच भागातील प्रवासी घेतात. असे रिटर्न भाडे घेऊ देत नाहीत. आता काय परिस्थिती आहे माहित नाही.
Pages