चुरमुरे,
पंढरपुरी डाळे,
मिरची,
आलं,
लसूण,
कांदा,
टोमॅटो,
कोथिंबीर,
फोडणीसाठी मोहरी, कडिपत्ता, हिंग, हळद, तेल
एका भांड्यात चुरमुरे घेऊन त्यावर दोन पेरं येईल एवढं पाणी घाला. लगेचच हाताने एकदोनदा हलवून पाणी निथळून काढा. पाणी राहू देऊ नका नाहीतर गिच्च होतात चुरमुरे.
डाळं, मिरची, आलं, लसूण मिक्सर मधून बारीक पूड करून घ्या.
आता कढईत फोडणी करून त्यात कांदा, टोमॅटो परतून घ्या. हवे असतील तर थोडे भाजलेले शेंगदाणे घालून परतून घ्या.
मग त्यात भिजवलेले चुरमुरे घालून नीट मिसळून घ्या. त्यावर मीठ घालून परत एकदा नीट मिसळून घ्या.
एक वाफ आली की लगेच डाळ्याची पूड वरून घालून नीट मिसळून घ्या.
छान एक दोन वाफा आल्या की गॅस बंद करा.
गरमागरम उग्गानी तयार.
वरून कोथिंबीर घालून, लिंबू पिळून खायला घ्या.
इकडे आंध्र प्रदेश, रायलसीमा भागात सकाळी सकाळी टिफीन सेंटरवर इडली डोस्याबरोबरच हा पदार्थ पण उपलब्ध असतो. यासोबत मिरचीची भजी देतात. उग्गानी भजी.
आपल्या कडे 'सुशीला' करतात त्याची नीट रेसिपी मला माहिती नाही.पण यात लसूण मस्ट आहे. लसणाची चव लागली पाहिजे एवढा भरपूर लसूण घाला. निदान मला तरी ती लसणाची हलकी चव आवडली.
तुम्ही जास्त तिखट खात असाल तर फोडणीतही मिरची घालू शकता. आलं घातलंच पाहिजे असं नाही.
चुरमुरे भरपूर घ्या, कारण भिजून वाफ काढल्यावर ते आकसून एवढुस्से होतात.
डाळं पूड जास्त झाली तर फ्रिजमध्ये राहते. पण आठवडाभरात लगेच संपवा.
इन्टरेस्टिंग आहे रेसिपी, करून
इन्टरेस्टिंग आहे रेसिपी, करून बघेन.
सुशीला करतात त्यात लसूण किंवा टोमॅटोही घातलेला पाहिला नाही. डाळ्याच्या चटणीची आयडिया मस्त आहे.
मस्त चटपटीत वाटतेय रेसिपी!!
मस्त चटपटीत वाटतेय रेसिपी!!
वाचून एकदम यम्मी वाटतेय
वाचून एकदम यम्मी वाटतेय रेसिपी. करून पाहण्यात येईल
डाळ्याची पूड हा गेमचेंजर दिसतोय.
अरे वां... करून बघेन हा
अरे वां... करून बघेन हा पदार्थ
भारी आहे रेसिपी. असे काही
भारी आहे रेसिपी. असे काही खाल्लेले नाही आधी. पाहायला पाहिजे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त चटपटीत वाटतेय रेसिपी!!>>
मस्त चटपटीत वाटतेय रेसिपी!!>>>> +१
चटपटीत वाटतेय . मी
चटपटीत वाटतेय . मी नाशत्यासाठी कांदेपोह्यासारखेच करते - पोह्याच्याएवजी कुरमुरे ( यालाच सुशीला म्हणतात का? )
आता हा प्रकार ही करून बघेन एक्दा .
डाळ्याची पूड हा गेमचेंजर दिसतोय. >> + १००
धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना.
चटपटीत आणि सोपा प्रकार आहे. नक्की करून पहा.
छान पाककृती. करून पाहेन.
छान पाककृती. करून पाहेन.
हा सुशीलाच आहे.
आजच सायंकाळी केला. घरी खूप
आजच सायंकाळी केला. घरी खूप आवडला. अगदी लहान मेंबराने पण आवडीने खाल्ला हा पदार्थ.. थॅन्क्स फॉर द रेसिपी
मला ही सुशीलाच वाटला . मी
मला ही सुशीलाच वाटला . मी बरेच वेळा करते. डाळं मस्ट
आहे ह्या साठी. पण ते एकदम बारीक न करता थोडं भरड ठेवायचं त्याने जास्त छान चव येते. तसेच जे तिखट खाऊ शकतात त्यांनी थोडा तिखट करावा हा पदार्थ.
मुरमुरे पाण्यात घातले तर एकदम चीपचीपित होतील अस वाटतं पण तसं काही होत नाही थोडा वेळ पाण्यात ठेवून घट्ट पिळले तर... छान texture राहत. मुरमुरे पाण्यात घातले की ते करताना जी वाळू वापरतात ती पाण्यात उतरते , पाणी काळपट दिसतं. मुरमुरे स्वच्छ झाले म्हणून मनाला ही बरं वाटत.
छान
छान
पाकृ वाचायला घेतली आणि "सुशिला" च आठवली म्हणजे सुशीला ही पाकृ आठवली.
क्रुन चव घेण्यात येईल.
मी सुशीला (सुसला?) करून
मी सुशीला (सुसला?) करून बघितला/ली आहे एकदोनदा. पण मला जमली नाही बहुतेक कृती. कुरमुरे पाण्यात भिजवल्यावर एक विशिष्ट वास यायला लागला आणि चवही फार काही खास वाटली नाही. जे नेहमी करतात त्यांनी केलेला एकदा खाऊन बघितला पाहिजे.
सुशीला आवडतो. आधी त्याचे
सुशीला आवडतो. आधी त्याचे सुसला की असेच काहीतरी वेगळे नाव ऐकले होते आणि काही वर्षांपासुन सुशीला.
उग्गानी हैद्राबादला पाहिल्याचे कधी आठवत नाही. आता स्विगीवर पाहिले तर एक दोन ठिकाणी दिसतोय ऊग्गानी-मिरची बज्जी.
घरीच करून पाहीन ऊग्गानी.
करून बघेन,यम्मी वाटतोय,
करून बघेन,यम्मी वाटतोय,
उग्गानी हैद्राबादला पाहिल्याचे >>>हैद्राबाद म्हटलं की अमा आठवतातच
आताच न्याहारीसाठी केलेत. चटणी
आताच न्याहारीसाठी केलेत. चटणी इज गेम चेंजर.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कुरमुरे फारच आळतात , थोडे आणखी जास्त घ्यायला हवे होते