महाराष्ट्र / मराठी नोकरी साठी चांगले नाव सुचवा

Submitted by स्वरुपसुमित on 5 February, 2025 - 04:25

youtube चॅनेल साठी नाव पाहिजे आहे

१) शक्यतो व्यनि करावा , सदर धागा पब्लिक असल्याने मी सोडून दुसरे कोणी पण नाव उचलेगिरी शकते
२) नाव सुचवताना देवनागरी ते इंग्लिश स्पेल्लिंग व्हेरियेशन होणार नाही हे कृपा करून बघा ,जसे मी मराठी सध्या माझी नौकरी केले आहे तर majhi naukri mazi nokri majhi nokri असे वेग वेगळे नवे येत आहेत
३) शकयतो आधी वापरलेले नाव नको , रोजगार केंद्र ,महा स्पर्धा , महा नोकरी , माझी नोकरी हि सगळी नावे खूप वेळा वापरलेली आहेत

Group content visibility: 
Use group defaults

तुमचा चा (चहा) रोज गार असा चुकीचा अर्थ निघू शकतो Happy
@धागालेखक, सॉरी तुम्हाला नावं हवी आहेत पण पाणचट विनोद करण्याचा मोह आवरला नाही.

भारी आहात तुम्ही लोक.
मला काय करायचं आहे आणि कशासाठी नाव हवं आहे ह्याचा अर्थबोधच होत नाहीये.
वावे Biggrin हा जोक फारच आवडलेला आहे. वापरायचा प्रयत्न करण्यात येईल Proud
स्पेलिन्ग आणि व्हेरिएशन आणि भाषांतर करुन व्हेरिएशन याची चिंता करायचे दिवस गेले. आता काय वाट्टेल ते लिहिलं तरी योग्य जागी पोहोचतो आपण.

महाराष्ट्रातील सरकारी/खासगी(खाजगी?) नोकरी. काय/ किती जागा असतात, कशी भरती होते, काय पात्रता असावी यासंबंधी माहीती देणारा युट्युब चॅनेल काढायचा आहे का तुम्हाला?

तसे असेल तर…… AI ने सुचवलेले… ‘नोकरीच्या संदर्भात’
मला सुचलेले…… पोटापाण्यासाठी, नोकरी कट्टा, कारकीर्द, उपजीविका, अर्थार्जन

तुम्ही सांगितलेला मराठी आणि इंग्रजीचा मुद्दा अवघड आहे. कारण स्वरांपैकी
आ - a, aa
ई - i, ee
ऊ - u, oo
ए - a, e, ai
ऐ - ai, a
ओ - o, au
याशिवाय व्यंजनांना अ जोडला असेल तर कधीकधी काहीच wovel वापरत नाहीत. उदा. चमचा मधला म पहा - chamacha किंवा chamcha

असे संदिग्ध स्पेलिंग होतात

व्यंजनांमध्ये
छ - chh, ch
ज - j, z
झ - z, jh,
त - t, th
द - d, dh
फ - f, ph
व - W, v
ळ - l, ll

इत्यादी गोंधळ होतात. जोडाक्षर आल्यास आणखीन जास्त.

आता तुम्हाला अजिबात संदिग्धता नको असेल तर वरील अक्षरे सोडून उरलेल्या अक्षरांत नि स्वरात काही शब्द तयार करता येतील का ते पहा.

हे सगळे नुआन्सेस गूगल (सर्च इंजिन) हातळतं की!
एचटीटीपी युआर एल टाईप करुन साईट किंवा युट्युब व्हिड्यूवर जाण्याचे दिवस गेले. युट्युब व्हिड्यू बघायला सर्च बार मध्येच जवळजवळ सगळे (माझ्याकडे विदा नाही) टंकन केलं जातं. जे सर्च इंजिनच्या अल्गोरिदमला मिळून हे वरचे फेरफार हाताळून आपल्याला कायम बरोबरच उत्तर मिळतं. त्यात तुम्ही तुमच्याकडून सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनला सगळ्या शक्यतांची स्पेलिंगं देऊन काम सोपं करू शकता.

>> जय मोदी जय रोजगार !>>
ही घाण इथेही आहे का?
माफ करा... पण माझा माबोवरचा हा शेवटचा प्रतिसाद...