कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो . २०१५,२०२१, आणि २०२४ चा अपवाद वगळता गेली १२ वर्षे आपण हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला. या वर्षी ही काही मायबोलीकरांनी आवर्जून तो साजरा करण्यासाठी विचारपूस केली आहे. तुम्हाला जर या उपक्रमाच्या संयोजनात भाग घ्यायचा असेल तर इथे कळवा.
उपक्रमात सहभागी होणार्या स्वयंसेवकांना उपक्रमाच्या कालावधीत आपले खरे नाव स्वतःच्या मायबोली प्रोफाईल मधे लिहावे लागेल.
याआधीचे सगळे मराठी भाषा दिवस कार्यक्रम इथे बघता येतील.
मराठी भाषा दिवस हा उपक्रम मायबोलीवर साजर्या होणार्या गणेशोत्सवाचे छोटे रूप मानायला हरकत नाही. फरक इतकाच की गणेशोत्सव हा दहा दिवस साजरा केला जातो, मराठी भाषा दिवस हा २७ फेब्रुवारी आणि त्याच्या आगचेमागचे काही दिवस असा एकूण मिळून ३ किंवा ५ दिवस किंवा त्या त्या वेळेच्या संयोजकांनी ठरवल्यानुसार पार पाडला जातो. आणि हा उपक्रम करताना मुख्य भर मराठी भाषेशी संबंधित कार्यक्रम/ स्पर्धा करण्यावर असतो हे गेल्या वर्षांतले उपक्रम पाहिलेत तर लक्षात येईल. या कार्यक्रमांची आखणी आणि आयोजन संयोजकांनी करायचे असते.
१. संयोजनात भाग घेऊ इच्छिणार्यांची नावे बघून अॅडमिन संयोजक निवडतील आणि मायबोलीवर त्यांचा क्लोज्ड युजर ग्रूप तयार करतील. या ग्रूपमधे उपक्रमाचा कालावधी आणि स्वरूप ठरवणे आणि उपक्रमाशी संबंधित इतर चर्चा करता येते.
२. उपक्रमाचे स्वरूप यामधे मायबोलीकरांसाठी स्पर्धा, कार्यक्रम, पाहुण्यांकडून/ मायबोलीकरांकडून लेखन मागवणे इत्यादी ठरवावे. त्यासाठी परवानगीची आवश्यकता असल्यास त्या योग्य प्रकारे मिळवणे.
३. या सर्व कार्यक्रम/ स्पर्धांची जाहिरात मायबोलीवरील गप्पांच्या बाफवर करणे.
४. प्रत्यक्ष उपक्रम राबवणे.
५. उपक्रमाचा समारोप आणि निकाल.
मला संयोजनात भाग घ्यायला
मला संयोजनात भाग घ्यायला आवडेल.
मला संयोजक म्हणून काम करायची
मला संयोजक म्हणून काम करायची ईच्छा आहे.
शेवटचे नाव माझे घ्या, अजून
शेवटचे नाव माझे घ्या, अजून लोकं आली तर त्यांना आधी घ्या संयोजनात.
मला पण आवडेल यायला संयोजनात.
मला पण आवडेल यायला संयोजनात.
धन्यवाद,
धन्यवाद,
तुम्हा चौघाना संयोजन ग्रूपात सहभागी करतो.
मलाही आवडेल संयोजनात भाग
मलाही आवडेल संयोजनात भाग घ्यायला.
मला सुध्दा या वर्षी संयोजनात
मला सुध्दा या वर्षी संयोजनात भाग घ्यायला आवडेल.
धन्यावाद, तुम्हालाही सहभागी
धन्यावाद, तुम्हालाही सहभागी केले आहे.
वा! संयोजक समिती स्थापन झाली
वा! संयोजक समिती स्थापन झाली.
संयोजकांना शुभेच्छा!
संयोजकांना शुभेच्छा! काही मदत
संयोजकांना शुभेच्छा! काही मदत लागली तर हाक मारा.
संयोजकांना शुभेच्छा!
संयोजकांना शुभेच्छा!
एकेक मतब्बर मंडळी आहेत
एकेक मतब्बर मंडळी आहेत संयोजनात. संयोजक चमूस शुभेच्छा. टेन्शन नही लेने का![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
संयोजकांना शुभेच्छा
संयोजकांना शुभेच्छा
मराठी भाषा दिवस २०२५ च्या
मराठी भाषा दिवस २०२५ च्या उपक्रमांमध्ये माझ्या मराठी शब्दखेळांच्या वेबसाईट वरील खेळांचा समावेश करून काही स्पर्धात्मक उपक्रम करता येईल का ते विचारायचे होते .
https://marathigames.in/
या वेबसाईट वरील बरेच खेळ मायबोलीकरांनी पूर्वी खेळले आहेत. संदर्भासाठी माझे जुने धागे पहा. या वेबसाईट वर खेळ तयार सुद्धा करता येतात. यासाठी वेबसाईट वरचा शेवटचा विभाग पाहा . तर उदाहरणार्थ मराठी भाषेच्या थीम वर काही मायबोलीकर शब्दकोडी तयार करू शकतील आणि मग ती सर्वांना सोडवायला देता येतील, संयोजक शब्दशोध चे खेळ तयार करून सर्वांना खेळायला देता येतील, इत्यादी. अजून यावर विविध कल्पना लढवून विचार करता येईल .
अरे वा शुभेच्छा सगळ्यांना.
अरे वा शुभेच्छा सगळ्यांना.
संयोजकांना शुभेच्छा !!
संयोजकांना शुभेच्छा !!
संयोजकांना शुभेच्छा..! काही
संयोजकांना शुभेच्छा..! काही लागले तर भरतना हाक मारा.
गंमत करतेय, मलाही हाक मारू शकता. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हाकामारी साठी तयार रहा
हाकामारी साठी तयार रहा सगळ्यांनी...
>>>>>काही लागले तर भरतना हाक
>>>>>काही लागले तर भरतना हाक मारा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हाहाहा
मी ही अस्मिताला व्हॉलंटिअर करते
शुभेच्छा सर्वांना.
शुभेच्छा सर्वांना.