मागील काही दिवसात काही उत्तम (उदा.: 'ठकिशी संवाद - यातील सुव्रत जोशी चा उत्तम कलाभिनय), काही चांगल्या (उदा. : ये जो पब्लिक है) काही वेगळे पण छान (उदा. 'तन्मय इन हार्मोनी') असे विविध कार्यक्रम बघावयास मिळाले.
विशेष जाणवण्यासारखी गोष्ट म्हणजे ह्या कार्यक्रमाची वेगळी अशी - आटोपशीर व नेटकी ठिकाणे, (नेहमीची नाट्यगृहे सोडुन - त्यातील काहींची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चाललीय - त्यातील एक म्हणजे 'बालगंधर्व'), रसिक प्रेक्षकवर्ग आणी समोरासमोर दिसणारा अभिनय! (गिरिजा ओक -गोडबोले - ही खरंच गोरी आहे हे कळाले हो.. - हे आमच्या हिचे मत ! - आणी सौं. च्या म्हणण्यानुसार गिरिजासोबत व सुव्रत सोबत फोटो काढला. )
तर सांगायचा मुद्दा हा की मी पहिल्यांदा पाहिले ती ठिकाणे म्हणजे 'द बॉक्स' / 'ज्योत्स्ना भोळे सभागृह वगैरे (अजूनही असावित...). हा बदल छान वाटला. ठि़कणे थोडी आत आहेत व पार्किंग वगैरे कमी आहे पण डुएबल आहे.
आणखी काही मिनी थिएटर्स :
आणखी काही मिनी थिएटर्स :
जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड
सुदर्शन रंगमंच, शनिवार पेठ
एम ई एस ऑडिटोरियम, कोथरूड
छान धागा. हौशी कलाकार आणि
छान धागा. हौशी कलाकार आणि हौशी प्रेक्षकांना चांगली आहेत ही नाट्यगृह.
पण इथे लागणारी नाटकं, पिक्चर्स आपल्याला कसे कळतील?
The box चा व्हाट्सएप नंबर आहे.
9309985767 - इथे info असा मेसेज केला की ते आपल्याला त्यांच्या लिस्ट मध्ये ऍड करतात. दोन तीन दिवसांत एकदा त्यांचे काय काय प्रोग्रॅम्स आहेत त्यांची लिस्ट /माहिती येते.
अशी माहिती बाकीच्या नाट्यगृहाची मिळू शकते काय?
छान धागा.
छान धागा.