आरंभ संस्था- सहयोगाची हाक

Submitted by अस्मिता. on 2 December, 2024 - 10:20

आरंभ संस्था औरंगाबाद या NGO साठी माझी आतेबहिण प्रज्ञा देशपांडे अनेक वर्षांपासून काम करते. तिने मला हे फॉरवर्ड पाठवले होते. ही ऑथेन्टिक पोस्ट आहे. मला याबाबत फारशी माहिती नाही पण तिच्या तोंडून कधीमधी याबद्दल कळले आहे. कधीकधी या मुलांनी बनवलेली प्रॉडक्ट्स घेतलेली आहेत. मराठवाडा हा मागासलेला भाग आहे, तिथे ऑटिझम विषयी समाजात फारशी जाणीव नाही. अशा मुलांसाठी व प्रौढांसाठी येणाऱ्या आव्हानांची कल्पनाही सहज येणं कठीण आहे. मराठवाड्यात अशा शाळा किंवा संस्थाही नसाव्यात. त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. ही पुढील माहिती तिने जशी पाठवली तशीच इथे देत आहे.

*हार्दिक विनंती*

*सहयोगाची मनस्वी हाक*

मराठवाड्यातील छ. संभाजी नगर (औरंगाबाद) येथे मागील १२ वर्षापासून स्वमग्न आणि गतिमंद समाज घटकासाठी *आरंभ संस्था* सेवा काम करते. स्वमग्न आणि गतिमंद गटातील बालक आणि प्रौढ यांचे जीवन अतिशय आव्हानात्मक असते. किंबहुना अशा मुला - मुलींच्या पालकांचे जीवन अनेक आव्हानांनी भरलेले असते, अशा स्वमग्न व गतिमंद गटासाठी आम्ही शाळा चालवतो. अशा विशेष मुला - मुलींसाठी निवासी शाळा ,प्रकल्प असणे अती आवश्यक असते. बदललेल्या काळात अशा विशेष शाळांची समाजात नितांत गरज आहे. यामुळे छ. संभाजी नगर (औरंगाबाद) शहरापासून जवळच आरंभ संस्थेच्या शाळेचे काम सुरू आहे, संस्थेच्या जवळच्या सर्व संचिता (आर्थिक रकमेतून) स्वमग्न व गतिमंद बालके व प्रौढ यांचे घर व शाळा उभा करीत आहोत. पैशांच्या अर्थात निधीच्या कमतरतेमुळे हे बांधकाम थांबले आहे. आपल्या शहरातील असंख्य स्वमग्न व गतिमंद मुला - मुलींचे थांबलेले हे काम उभे करण्यासाठी आरंभ संस्थेला आपण खालील प्रमाणे छोटी मदत जरूर करावी. एकदा या कामाला भेट जरूर द्या.. शाळेचे सर्व पालक आणि या राज्य व देशातील अशा बालकांच्या - प्रौढांच्या समस्यांची जाण असणा-या प्रत्येकाने छोटी मदत जरूर आरंभला जोडून द्यावी..!!

आपण पाठविलेल्या प्रत्येक मदतीची आर्थिक व वस्तुरूप पावती संस्थेमार्फत आपणास जरूर मिळेल. संस्थेला दिलेल्या आर्थिक मदतीस आयकर कलम ८० जी अन्वये आयकर यात सवलत मिळते.

आपण आरंभ च्या शाळेच्या बांधकामासाठी खालील प्रमाणे मदत करू शकता..!

1) एक सिमेंट पोते: 360 रुपये
2) दहा विटा : 150 रुपये
3) एक गज स्टील : रुपये 400
4) एकब्रास फरशी : 2500 रुपये
5) एक ब्रास वाळू : 6000 रुपये
6) आपण वरील बांधकाम साहित्य किंवा त्याची किम्मत किंवा कमीत कमी 500 रु किंवा जास्त रक्कम पण मदत म्हणून पाठवू शकता.

संपर्क:
टीम आरंभ संस्था ,
https://aarambhtrust.in/
ही त्यांची वेबसाईट.

छ. संभाजी नगर (औरंगाबाद)

संपर्क :
अंबिका ताई:
82752 84178
प्रज्ञा ताई:
99231 82155
आनंद सर:
9372006965

खाली अकांऊट नंबर व बॅन्क ट्रान्स्फरची माहिती देत आहे. यापेक्षा अधिक माहिती हवी असेल तर वरील कुठल्याही नंबर वर मेसेज करून विचारू शकता.
भारतातील लोकांना -
IMG-20241129-WA0002_1.jpg

उत्तर अमेरिकेतील लोकांना भारतीय अकाऊंट मधून पैसे ट्रान्स्फर करणे सोपे जाईल. मी तेच केले.

Account Name: AARAMBH SOCIETY FOR AUTISM & SLOW LEARNER CHILDREN, AURANGABAD Bank Name: COSMOS Bank
AC No. 91205010109925
Account type: Saving Account.
IFSC Code - COSB0000912
Branch name: Dashmeshnagar.
Branch Code - 00912

8275284178

Aarambh Aurangabad
युरोप मधील लोकांना समहाऊ कॉस्मॉस चालत नाही असे लक्षात आले-
AARAMBH SOCIETY FOR AUTISM & SLOW
LEARNERS CHILDREN

Account No 62244857159
IFSC Code SBIN0021139
Bank Name State Bank of India
Branch Name Shahnoorwadi
Branch Code 21139
City Aurangabad
Contact No 8275284178
Account type Saving Account.

शिवाय -
IMG-20241201-WA0006.jpg

-
धन्यवाद. /\

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धागा वर रहावा; अधिक लोकांच्या नजरेस पडावा म्हणून प्रतिसाद देत आहे.

ही एथिकल पोस्ट आहे. >>

ऑथेंटिक पोस्ट म्हणायचे आहे असे वाटले.

Ok
हे लक्षात ठेवतो
काही करता येईल का बघतो
CSR funds वै , कंपन्या कडून वै
प्रयत्न करतो नक्की
वैयक्तिक पातळीवर छोटी मदत तर नक्कीच करेन.

Btw हा धागा मला दिसत नव्हता
संपूर्ण1मायबोली वर नवीन मध्येच दिसला
ध्यासपंथी पावले ग्रुप चा मी सदस्य नसल्याने असे झाले असेल

लोकसत्ता गेले काही वर्षे सर्वकार्येषु सर्वदा असा उपक्रम गणेशोत्सवात चालवतो. ज्यांना निधीची गरज आहे अशा सेवाभावी संस्थांची सविस्तर माहिती गणेशोत्सवात एकेक दिवस दिली जाते. त्यांचे बँक तपशील देतात आणि वाचकांना मदतीचे आवाहन केले जाते. एका सार्वजनिक कार्यक्रमात कुण्या प्रसिद्ध व्यक्तीच्या हस्ते निधीचे हस्तांतरण होते. या वर्षीचा कार्यक्रम नुकताच झाला. अतिथी होते अभिनेता जितेंद्र जोशी . या संस्थेलाही त्या उपक्रमात सहभागी होता येईल का ते बघावे.
माझ्यापरीने मदत मी पाठवतो आहे.

हर्पेन, हो. ऑथेन्टिक योग्य आहे बदल करते. Happy
भरत, तिला ही लिंक दिली आहे. वरची माहितीही वाचायला सांगेन. Happy
अन्जूताई, अश्विनी Happy
CSR funds वै , कंपन्या कडून वै
प्रयत्न करतो नक्की>>> झकासराव, असं करता आलं तर फार बरं होईल. Happy

धन्यवाद सर्वांना. Happy

मला आता नाव आठवत नाहीये मी नुकतीच ह्या प्रदर्शनाला भेट दिली पुण्यात निवारामधेये होतं…. सेवाभावी संस्था सहभागी असतात . गोखले नावच्या ताई आहेत त्या दरवर्षी पुण्यात प्रदर्शन भरवतात अशा प्रदर्शनात स्टाॅल लावता येईल. अशीच नागपूरला संद्न्या संवर्धन नावाची संस्था आहे त्यांना दोन तीन ए कर जागा मिळालीये अनाथ मुलांच्या वसतीगृहासाठी पण ते उभं करण्यासाठी सक्षम मनुष्यबळ मिळत नव्हतं. आता काय परिस्थिती आहे माहिती नाही.

नमस्कार. खूप महत्त्वाचं व चांगलं काम आहे हे. आपण इथे माहिती दिलीत हे चांगलं केलंत. जमेल तसं मी ह्या विषयावरच्या संस्थांच्या/ मंडळींच्या कामाला हातभार लावत असतो. संस्थेला शुभेच्छा!

थॅंक्यू विकु. Lol

इथे आवर्जून सांगत राहा तसे कारण धागा वर राहील आणि इतरांनाही द्यावेसे वाटेल कदाचित. Happy

आरंभ ला मदत पाठवलेल्या सर्वांचे धन्यवाद. मी काही वर्षापूर्वी मायबोलीचे सदस्य झाले होते. मात्र येथे नियमित लिहणे झाले नाही. अस्मिता ने आरंभ विषयी लिहल्या नंतर आम्हाला खर्च खूप मदत झाली.
@भरत सर सर्वकार्येषु सर्वदा सदर मध्ये लोकसत्ताने आरंभ च्या कामाची दखल घेतली होती. @ मंजुताई पुण्यात वीणा गोखले देणे समाजाचे नावाने प्रदर्शन नियमित भरवतात. त्यातही आरंभला काम मांडण्याची संधी मिळाली होती. आपण सर्वांनी आरंभचे काम जाणून घेतले आणि मदत पाठवली त्याबद्दल धन्यवाद.
मी सोबत माझा नंबर देत आहे. आपल्या सर्वाना आभारपत्र आणि पावती पाठवायचे आहे. ९९२३१८२१५५ या क्रमांकावर आपण नाव, पूर्ण पत्ता, फोन नंबर आणि pan nupathvavaपाठवावा. म्हणजे ही पावती आपणास इन्कमटॅक्स साठीही उपयोगी ठरू शकेल.
आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद.

प्रज्ञा, अस्मिता - मी आरंभच्या वेबसाईटला भेट दिली. संस्थेचे काम खरच कौतुकास्पद आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

धन्यवाद उदय. Happy
मी येथे लिहिल्यानंतर आरंभला बरीच आर्थिक मदत झाली याचे मला फार समाधान वाटले. तुम्ही दाखवलेला विश्वास व प्रेम बघून भरून आले. मी पहिल्यांदाच असे काहीतरी केले आहे. /\