ओशो ध्यान शिबिराचा अनुभव

Submitted by मार्गी on 28 November, 2024 - 10:41

सर्वांना नमस्कार.

नुकतंच २२ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबरमध्ये पुण्याजवळ लव्हासा रस्त्यालगत आनंद क्रिया योगाश्रम येथे दोन दिवसीय ओशो- ध्यान शिबिराचा आनंद घेतला. सक्रिय ध्यान, नादब्रह्म ध्यान व इतर विविध प्रकारचे अभ्यास व पद्धती त्यात होत्या. परिसरसुद्धा अतिशय सुंदर होता. सोबत संगीत व नृत्यही होतं. ध्यानासह संगीताचा उत्कट मिलाफ होता. त्या शिबिराचे अनुभव माझ्या ब्लॉगवर हिन्दीत लिहीले आहेत. मराठीत लगेच लिहीणं शक्य होत नाहीय. म्हणून इथे ब्लॉगची लिंक देत आहे. ह्या वर्षीच्या शिबिराचे अनुभव- "क्रिया" से "शुक्रिया" तक की यात्रा: ध्यान शिविर

मागच्या वर्षीही मळवलीला असंच दोन दिवसीय सुंदर शिबिर केलं होतं. त्यावेळीही खूप छान अनुभव आले होते. सक्रिय ध्यान, ध्यानाला पूरक अशी सुंदर गाणी, नृत्य- मौन ध्यान असा खूप छान तो अनुभव होता. त्याबद्दलही तेव्हा लगेच हिन्दीत ब्लॉग लिहीला होता. तोही इथे शेअर करतो. मागच्या वर्षीच्या शिबिराचे अनुभव- ओशो के प्रेमी आए, गाना तो होगा हसना हंसाना होगा रोना भी होगा

इथे जे ओशोप्रेमी व ध्यानप्रेमी असतील त्यांच्या माहितीसाठी. त्यातील आनंद त्यांच्यासोबत शेअर करण्यासाठी.

धन्यवाद.

- निरंजन वेलणकर. 09422108376.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ब्लोग चा फॉन्ट वाचायला आनन्ददायी नाही
नकारात्मक प्रतिक्रिया म्हणून घेउ नका.
वाचायची इच्छा आहे, पण वाचू शकले नाही, म्हणून न रहावून सांगतेय.

पुन्हा शिबीर असेल तेव्हा इथे डिटेल्स टाकू शकाल का?

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद! Happy

@ नानबा जी, अगदी बरोबर आहे तुमचं. कारण ब्लॉग पोस्ट केला तेव्हाच मला जाणवलं होतं की, मजकूर खूपच चिकटून दिसतोय. कारण तेव्हा मी वर्ड फाईलमधलं फॉरमॅटिंग (बोल्ड/ हेडिंग वगैरे) तसंच ठेवून तिथे पेस्ट केलं होतं. तुमची कमेंट बघितल्यानंतर ते बेसिक फॉरमॅटिंग केलंय. आता सहजपणे वाचता येऊ शकेल. हे आवर्जून कळवल्याबद्दल विशेष धन्यवाद!

अशी शिबिरं अधून मधून होत असतात. हे शिबिर ह्या पद्धतीत ज्यांनी आधी दोन शिबिर केले आहेत त्यांच्यासाठी होतं. एक दिवसीय किंवा प्राथमिक असं ह्या पद्धतीचं शिबिर मला कळेल तेव्हा आपल्याला नक्की कळवेन. धन्यवाद.