Submitted by रेव्यु on 22 November, 2024 - 12:27
अडाणी स्वतः व त्यांच्या बोर्ड सदस्यांवर गंभीर आरोप होत आहेत
पण भक्त आत्ममग्नतेत अन त्यांना डिफेन्ड करण्यात गुंतले आहेत
आपले काय मत आहे?
विषय:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अदानी वर आरोप हा भारताची
अदानी वर आरोप हा भारताची प्रतिमा मलिन करण्याचा एक आतंरराष्ट्रीय कट आहे अशा प्रकारच्या पोस्ट येत आहेत. भारताची प्रतिमा जगभरात मोदींजीमुळे उंचावली आहे असे मी एवढे दिवस समजत होतो ते चूक म्हणायचे
अमेरिका स्वतः ला काय समजते?
अमेरिका स्वतः ला काय समजते? आमच्या अडानीवर अरेस्ट वारंट कशी काय काढू शकते?
अदानीने पैसे चारले तेव्हा त्या राज्यात विरोधी पक्षांची सरकारे होती.
अश्या पण प्रतिक्रिया येत आहेत?
हे ललित लेखनात चालते का???
हे ललित लेखनात चालते का??? गेल्या आठवड्यातली याच विषयावरची घमासान चर्चा आठवली. बाकी चालु द्या.
मी ललित काढून टाकलंय....
मी ललित काढून टाकलंय.... राजकारणात टाकायचं म्हणतोय.... कसं करायचं?
आज अर्णब गोस्वामीला ऐकलं....
आज अर्णब गोस्वामीला ऐकलं.... तो म्हणतो भारतात लाच दिली तर तो none of America's business....कहर आहे पत्रकारितेचा..... आरोप आहे अमेरिकन पैसा लाच देण्यास वापरला..... अन हा दादागिरी करत मूर्खासारखे विधान करतो.
माझ्या मते हा भारता च्या प्रतिमेस धक्का आहे आणि हे पार्टी अन राजकारणाच्या पलिक डे जाऊन पाहिले पाहिजे
५४ पानी आरोपपत्रात नक्की काय
५४ पानी आरोपपत्रात नक्की काय मांडले आहे ?
https://www.justice.gov/usao-edny/media/1377806/dl?inline
<< मी ललित काढून टाकलंय....
<< मी ललित काढून टाकलंय.... राजकारणात टाकायचं म्हणतोय.... कसं करायचं? >>
----- पण हा तर भ्रष्टाचार आहे. राजकारण नाही.
भ्रष्टाचार करुन कंत्राट मिळाल्यावर तो पैसा वीजेचे दर वाढवून परत मिळविला जातो. वाढलेल्या दराने वीज म्हणजे शेवटी जनचेचाच पैसा वाया जात आहे.
अर्थात ED, CBI तसेच SEBI Securities and Exchange Board of India यांच्या नजरेतून एव्हढा मोठा भ्रष्टाचार कसा निसटला हे एक कोडेच आहे.
मी ललित काढून टाकलंय....
मी ललित काढून टाकलंय.... राजकारणात टाकायचं म्हणतोय.... कसं करायचं? >>
----- पण हा तर भ्रष्टाचार आहे. राजकारण नाही.
>>>>
मग भ्रष्टाचाराचा आता वेगळा ग्रुप उघडायचा का
Solar Energy Corporation of
Solar Energy Corporation of India (SECI, सेकी)
ही २०११ मध्ये केंद्र सरकार द्वारे non profit कंपनी Ministry of New and Renewable Energy अंतर्गत स्थापन करण्यात आली.
२०१५ मध्ये तिचे commercial कंपनी म्हणुन रूपांतर करण्यात आले (हरकत नाही.) तरीही ती केंद्र सरकारच्या अखत्यारीतच येते. आणि ती सौर ऊर्जेत ट्रेडिंग करू लागली आणि स्वतचेही सोलर पॉवर प्लॅन्ट्स आहेत.
सौर ऊर्जा निर्मित करणाऱ्यांकडुन ती विकत घेणे आणि राज्य, केंद्र शासित प्रदेशांना विकणे, मधले कमिशन ही एक ऍक्टिव्हिटी.
अमेरिकेतील आरोप पत्रात काय म्हटले आहे?: मी ते वाचले आणि त्यातील मला जेवढे कळले त्यानुसार थोडक्यात:
सेकीने Azure Power आणि Adani Green यांचा सोबत अनुक्रमे ४ GW आणि ८ GW सौर ऊर्जा खरेदी करण्याचा करार केला. पण त्याचा दर फारच जास्त होता. त्यामुळे कोणी खरेदी करेना.
त्यासाठी मग अदानी आणि त्यांच्या कंपन्यांनी आंध्र, तमिळनाडू, ओरिसा,छत्तीसगड, जम्मुकाश्मीर येथील सरकारी अधिकाऱ्यांना लाच देऊन सेकी साठी कंत्राट मिळवण्याची योजना आखली आणि मग त्यानुसार सेकीसाठी २०२१-२०२२ दरम्यान ती ऊर्जा उच्च दरात विक्री करण्याच्या ऑर्डर्स मिळवल्या.
हा सगळा कारभार लपवून अमेरिकन गुंतवणूकदारांना आपणास सौर ऊर्जा पुरविण्याचे जगातील सर्वात मोठे कंत्राट मिळाले आहे असे सांगुन, त्यांच्याकडुन मोठ्या प्रमाणात गुंतवणूक मिळवली.
अमेरिकेत त्यांच्या गुंतवणूकदारांची फसवणुक केल्याबद्दल हा खटला आहे.
हे आरोप आहे तसे आणि तेवढे खरे मानले तर यात
सेकीला हा कारभार करायला कोणी भाग पाडले आणि का? हा प्रश्न उभा रहातो तसेच वर उल्लेख आलेली राज्ये व केंद्रशासीत प्रदेश यांनी लाच घेऊन जास्त दरात ऊर्जा विकत घेण्याचा भ्रष्टाचार केला असे दिसून येते.
यात अजुन पेच, गुंतागुंत असेल. थोडक्यात काय प्रकरण आहे हे सांगण्याचा हा प्रयत्न.
केनियाचे अध्यक्ष विल्यम रुटो
केनियाचे अध्यक्ष विल्यम रुटो यांनी अदानी समूहासोबतचे दोन करार रद्द केले (अ) विमान विस्ताराचा प्रकल्प (ब) पॉवर ट्रान्समिशन लाइन्स
https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/kenya-scraps...
एव्हढ्या कमी वेळांत एव्हढा मोठा ( $ २.६ अब्ज ) व्यावहार रद्द होत आहे याचे आश्चर्य वाटते.
मानव, माहितीबद्दल धन्यवाद.
मानव, माहितीबद्दल धन्यवाद.
हे वाचताना आठवलं की गुजरात राज्य अदाणीची महागडी वीज घेतं अशा ट्वीट्स दिसतात. त्या ट्वीट करणार्यांनी याही राज्यांबाबत लिहायला हवं होतं. भाजप शासित इतर राज्येही अदाणीची वीज घेत असतील. तिथे महागडी वीज गळ्यात घालताना लाच द्यावी लागली नाही असं दिसतंय.
यात अजुन पेच, गुंतागुंत असेल.
यात अजुन पेच, गुंतागुंत असेल. थोडक्यात काय प्रकरण आहे हे सांगण्याचा हा प्रयत्न. >>> धन्यवाद मानव. आत्ता वाचलं नीट.
डोकं खाजवा,
डोकं खाजवा,
अडाणी सोलर एनर्जी दोन राज्यांनी 2.94 रू प्रती युनिट ने विकत घेतली जेव्हा दुसऱ्या प्रकल्पातून 2रू प्रती युनिट ला उपलब्ध असताना, एक भाजप शासित होत, ह्या राज्यात अधिकाऱ्यांना लाच द्यायची गरज पडली नाही. दुसरं राज्य भाजप शासित नवत पण इथे अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागली.
Quiz: कोणत्या राज्यात भ्रष्टाचार झाला, भाजप शासित की बिगर भाजप शासित

Quiz: कोणत्या राज्यात
Quiz: कोणत्या राज्यात भ्रष्टाचार झाला, भाजप शासित की बिगर भाजप शासित >>> सोपं आहे, ज्या राज्यांत अधिकऱ्यांनी लाच घेतल्या तिथे भ्रष्टाचार झाला.....जनतेकडून अधिक विजबिलाच्या रुपाने उकळलेला पैसा जेव्हा शेल कंपन्यांच्या मार्फत इलेक्टोरल बॉंड्स मधे ओतला जातो तेव्हा तो भ्रष्टाचार म्हणून गणला जात नाही.
जनतेकडून अधिक विजबिलाच्या
जनतेकडून अधिक विजबिलाच्या रुपाने उकळलेला पैसा>>> हे अगदी सत्य आहे.
अडाणी म्हणताहेत कि आम्हाला
अडाणी म्हणताहेत कि आम्हाला फक्त दंड होईल. आम्हाला म्हणजे डायरेक्टर मंडळींना. फसले तर पगारदार लोक फसतील.
आज अप्पर सर्किट लागलंय.
अडानी पॉवर

आज अप्पर सर्किट लागलंय.
सर, तुम्ही अडानीच्या
सर, तुम्ही अडानीच्या शेअर्समध्ये ट्रेड करत नाही , असं लिहिलं होतं. त्याचं काहीतरी कारणही लिहिलं होतं. आताच त्यांच्या कंपन्यांच्या शेअर्सना लोअर सर्किट लागलं, तेव्हा तुम्ही काही लिहिलं नाही. आम्ही पामरांनी काय समजायचं? आता महायुती आली म्हणजे अडानीची चांदी , सोने , हिरे माणकं, पाचू. असंच ना?
सरशी तिकडे पारशी. शेअर
सरशी तिकडे पारशी. शेअर मार्केट भक्त!
सेबीने अडाणी ग्रुपच्या
सेबीने अडाणी ग्रुपच्या कंपन्या / त्यांच्या अधिकार्यांना नियमभंगाच्या नोटिशी पाठवल्या होत्या. त्याबाबत काही लाख रुपये घेऊन मांडवली करून टाका असं या कंपन्या/ अधिकारी सेबीला सांगत आहेत.
बाकी चालू द्या