Submitted by कविन on 15 June, 2009 - 01:01
पिंकु परी येते सानुच्या घरी
खाऊन जाते श्रिखंड पुरी
पिंकु परी जाते शाळेत जरी
जादुची छडी तिचा होमवर्क करी
पिंकु परीची बातच न्यारी
खेळायला येतात चांदण्या दारी
खेळायला आल्या चांदण्या जरी
सानु आवडते तिला भारी
सानुच्या स्वप्नात मग येते परी
गोड पापा घेते नी जाते तिच्या घरी
(लेकीचा हट्ट माझ्यासाठी माझ्या नावाने काहीतरी लिही ना आई. म्हणुन ही आणि एक कविता लिहुन झाली)
गुलमोहर:
शेअर करा
ही पण छान
ही पण छान
***************
युद्धकर्ता श्रीरामः मम | समर्थ दत्तगुरु मुलाधारः ||
साचार वानरसैनिकोSहम | रावण वधः निश्चितः ||
इति अनिरुद्ध महावाक्यम |
छान छान
छान छान छान..
कविताची कविता किती छान...
०------------------------------------------०
आयुष्यात आई आणि वडील यांना कधीच विसरु नका!!!
कवे ही पण
कवे ही पण खुप गोड, अगदी लहान मुलांच्या मनातली
गोंडुल्या
गोंडुल्या आहेत दोन्ही पर्या ..........:)
(No subject)
मश्त मश्त
मश्त मश्त लिहिलीय आईनी परीची कविता. खुप खुप आवलली!
क्रान्ति
मुक्त तरीही बंधनात मी
फुलाफुलाच्या स्पंदनात मी
http://www.agnisakha.blogspot.com/
धन्यवाद
धन्यवाद सगळ्यांना
ही पिंकु परी (हे नावही तिनेच दिलेल) तिची गोष्टीतली सखी. रचुन गोष्ट सांग ह्या हट्टातुन तयार झालेली. जेवताना पानातला एक घास तिचा असतोच असतो. ती कधीही बॅड बिहेव्ह करत नाही, बॅड बिहेव्ह करणार्या पर्या म्हणजे ब्ल्यु परी, व्हाईट परी आणि इतर. काय इमॅजिनेशन असत ना मुलांचं! दिवेआगरला श्रेयसला (विनय भिडेच्या मुलाला) गोष्ट सांगताना मी पुन्हा हि परीची गोष्ट सांगितली. आणि आश्चर्य म्हणजे त्यालाही ती चक्क त्याच्या आधिपासुनचीच ओळखिची वाटली, त्याला भेटली पण ती परी. मला खुपच कमाल वाटली त्यांच्या कल्पनेची
लहान
लहान मुलांचं कल्पनाविश्व म्हणजे खरेच एक वेगळाच आणि जिवंत कलाविष्कारच असतो. उगाच नाही संत म्हणुन गेले "बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा!" आणि अशा मुलांना तुझ्यासारखी कलावंत आई मिळाणे म्हणजे तर दुग्धशर्कराच की !
***********************************
"ARISE ! AWAKE ! STOP NOT TILL THE GOAL IS REACHED !"
(Swamy Vivekanand)
कसच कसच
कसच कसच विशाल :लाजलेली बाहुली:
कवे, केवढी
कवे, केवढी आहे तुझी लेक?
कशी गोड
कशी गोड गोड कविता आहे ही पिंकुपरीची आणि सानुची...
.. मस्तच आहे !
पल्ले साडे
पल्ले साडे पाच वर्षाची आहे सानु.
पल्ली साडे
पल्ली साडे पाच वर्षाची आहे, सानु !
हे सानु ला सांगतेयस ? असं कुणाचं वय चारचौघात सांगू नये !
वा! छान!
वा! छान!
~~~
मन उधाण वार्याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान कसे गहिवरते...
टवाळा
टवाळा
खुप छान !
खुप छान !
गोड
गोड
ही पण छान
ही पण छान आहे.
मुकुंद कर्णिक
मुकुंदगान:- http://mukundgaan.blogspot.com
भगवद्गीता:- http://marathi-bhagavadgita.blogspot.com