अंत: अस्ति प्रारंभ: - २ - {पेला नेहमीच अर्धा रिकामा} - {मामी}

Submitted by मामी on 13 September, 2024 - 10:18

हैबती अन सुभान्या जीवलग दोस्त पण दोघांनाही एक वाईट सवय होती. प्रत्येक गोष्टीत नकारात्मक विचार करायचे. गायीला कालवड झाली तर वासरू का नाही झालं म्हणून गळा काढणार. वासरू झालं तर अजून एक बैल काय करायचाय म्हणून टिपं गाळणार. भविष्य फारच अंधारमय आहे याच दिशेनं त्यांचे विचार जायचे. याबाबतीत दोघेही एकमेकांना पूरक होते.

यंदा उन्हाळा जरा लांबलाच. शेतकरी हवालदिल झाले. पण उशीरानं का होईना पावसानं कृपा केली. सुरेख संततधार लागली.

झालं! शेताच्या बांधावर बसून दोघांच्याही डोळ्यातून अश्रूंचा पूर लोटला.
"असंच पाणी पडत राहिलं तर पीकाचं लुसकान होणार की रं. "
"यंदा पीकाचं काही खरं नाही. "

ते दोघे मुसळधार पावसात होते, पण co-रडेच!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.

शेवटचा वर्ड प्ले आवडला.>>+१

मामी, छान कथा जमलीए.
फक्त ते लुसकान असतं असं मला वाटतं....!
अर्थात त्याने काही फार काही लुकसान होत नाहीये! Happy

एका मायबोलीकरणीनं सुचवल्याप्रमाणे एक शब्द बदलला आहे.

यंदा पावसाळा जरा लांबलाच. --- > यंदा उन्हाळा जरा लांबलाच.

धन्यवाद गं.