अंत: अस्ति प्रारंभ: - १ - द ममी रिटर्न्स - श्रद्धा

Submitted by श्रद्धा on 10 September, 2024 - 03:37

हमुनाप्त्राच्या वाळवंटातली ती एक रम्य संध्याकाळ होती. नुकतेच ममीच्या तावडीतून सुटून रिक आणि इव्ही पिरॅमिडातला खजिना उंटांवर लादून संसाराची स्वप्ने पाहत चालले होते.

'अंत: अस्ति प्रारंभ:*' इम्होतेपने मरताना म्हटलेले वाक्य अजूनही इव्हीच्या मनात घोळत होते. 'काय झाले?' रिकने विचारले. 'तो काही आता परत यायचा नाही.' तिचा चिंताक्रांत चेहरा पाहून रिकने तिला धीर दिला.

तेवढ्यात धुळीचे भयंकर वादळ सुरू झाले. उंट थिजल्यासारखे एकाच जागी उभे राहिले. जोनाथनच्या तर शब्दशः पायाखालची वाळू सरकली. पाहता पाहता समोरच्या टेकाडावर धुळीतून इमहोतेपचा चेहरा साकार होऊ लागला. रिक पुन्हा शस्त्रे घेऊन सज्ज झाला. इमहोतेपने 'आ' वासला आणि...
उंच डोंगरावरचे ते दृश्य पाहून त्याने रस्त्याकडे धाव घेतली.

* हे शशकचा भाग नाही, पण अतिरिक्त माहिती! मूळ ममी सिनेमात खरंच इमहोतेप 'अंत: अस्ति प्रारंभ:' (Death is only the beginning) म्हणतो. Lol
* या उपक्रमाच्या नावाचे आणि बे एरिया बाफाचे आभार! Proud

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

एक नंबर!

सुरुवातीला मी मप्रे सवयीने हनुमानाच्या वाचलं

भारी आहे हे
हनुमानाच्या वाचलं>>>>> मी पण

Lol मस्त जमले आहे श्र! आणि नुकताच तो पिक्चरही पुन्हा पाहात असल्याने संदर्भही लक्षात आले. फक्त मला शेवटी धाव इमहोतेपने घेतली की रिकने ते समजले नाही Happy कदाचित गहन मराठी चित्रपटांसारखे "ज्याने त्याने आपला अर्थ लावावा" असे असेल Happy

त्या वाळवंटात "रम्य" वगैरे संध्याकाळ तीन साडेतीन हजार वर्षांनंतर आली असावी Happy तेथे वसंत बापट असते (तर त्यांचे नाव वस्बांप्ट असे काहीतरी असले असते) तर त्यांनी "शतकांनंतर आज पाहिली पहिली रम्य संध्याकाळ" लिहीले असते.

(इथल्या फोमोपटूंना बेकरीत उत्तरे देतो Happy ती चर्चा इथे अवांतर आहे )

धन्यवाद लोक्स. Happy

फक्त मला शेवटी धाव इमहोतेपने घेतली की रिकने ते समजले नाही <<<< रिकनेच. धुळीचा चेहरा काय धावणार? Proud

कदाचित गहन मराठी चित्रपटांसारखे "ज्याने त्याने आपला अर्थ लावावा" असे असेल <<<<<
म्हणजे 'हमुनाप्त्रा - 52'?

तर त्यांचे नाव वस्बांप्ट असे काहीतरी असले असते<<<<< Lol

फक्त मला शेवटी धाव इमहोतेपने घेतली की रिकने ते समजले नाही
<<<< याचे एक उत्तर 'त्यावेळी बॅटिंग कोण करत होता त्याने..' हे देखील असू शकेल. Proud

हमुनाप्त्रा - 52 >>>
याचे एक उत्तर 'त्यावेळी बॅटिंग कोण करत होता त्याने..' हे देखील असू शकेल >>> Lol

हो रिक व इव्ही सकाळी काहीतरी संस्कृतीप्रधान करून आवरून घरातून उंटावर बसून निघतात. मग इव्ही सांगते की हमुनाप्त्रा मधे एक मॅच सुरू आहे व तेथे आत्ता शेवटची ओव्हर असेल. ते बघायला गेले तर तेथे शारजा-१९९८ सारखे एक धुळीचे वादळ दिसू लागले. मग यावेळेस दोघांनी धाव घेतली Happy ( अर्थात दोघे पळाले नसते तर कोणीतरी रन आउट झाला असता, पण हे "क्रिकेटमधेही असंच असतं" या पुढे कधीतरी काही सुचले तर लिहायच्या लेखाकरता राखून ठेवतो)

हो रिक व इव्ही सकाळी काहीतरी संस्कृतीप्रधान करून आवरून घरातून उंटावर बसून निघतात. <<<<<
..... तेव्हा त्यांच्या शेजारचे वृद्ध काका 'बुक ऑफ द डेड' वाचत आरामखुर्चीत बसलेले दिसतात. वाचनसंस्कृती लोप पावत चालल्याचे ते प्रतीक आहे.