सह्याद्री पठाररावरून किनारपट्टीकडे जायला २५० पेक्षा जास्त वाटा होत्या. त्यातील सर्वच वाटा वापरात होत्या असं नाही पण या सर्व वाटांचे आराखडे १७०० व्या शतकात तयार केले गेले आहेत. औरंगजेबाने असंख्य माणसे कामाला लावून हे आराखडे तयार केले. शिवाजी राजांचे बलस्थान हे सह्याद्री आणि त्यातील वाटा आहेत आणि गड हे शक्तीकेंद्रे आहेत हे त्यांनी केव्हाच ओळखले होते. या उलट मुघल फ़ौज मैदानावरील लढाई करण्याचा जास्त अनुभव होता. या उलट त्यांना सह्याद्रीचे किल्ले, असंख्य फ़ौज आणि दारू गोळा वापरूनही मिळवता येत नव्हते.
शिवाजी महाराजांनी सुरवातीचे बरेच किल्ले फारशी लढाई नकरिता ताब्यात घेतले होते. अचानक मूठभर मावळ्यानिशी बेसावध हल्ला करून व राजकारण करून हे गड ताब्यात आले होते.
पुरंदरची हकीकत फारच शिवाजी महाराजांचे पैलू दाखवणारी आहे. पुरंदर हा शिवाजी महाराजांच्या ताब्यात आलेला पहिला बलदंड गड . पुरंदरचा किल्लेदार अचानक मरण पावला त्याच्या तीन मुलांमध्ये किल्ले आणि वतने याबद्दल भांडणे सुरु झाली. मोठ्या भावाने सर्व सत्ता ताब्यात घेतली . आदिलशहाकडून तसे पत्र आणले आणि दोन्ही बंधूना गडाबाहेर काढले. हा किल्ला आदिलशहाचा होता पण त्यावर शिवाजी महाराजांची जहागिरी होती. दोघेही लहान भाऊ शिवाजी महाराजांकडे आले आणि त्यांनी शिवाजी महाराजांना मध्यस्थी करण्याची विनंती केली. दिवाळी जवळच आली होती त्यामुळे दिवाळीच्या वेळेला आपण तेथे येऊ असे महाराजांनी सांगितले. दिवाळीच्या आसपास महाराजांनी पुरंदरच्या पायथ्याजवळ आपला तळ ठोकला. त्यांच्याबरोबर एक हजाराची शिबंदी होती. तेथे येण्याचे कारण महाराजांनी देवदर्शन असे दिले होते.
महाराज गडाखाली आहेत हे समजताच किल्लेदार तातडीने त्यांना भेटण्यासाठी गडाखाली आले. (त्यांचे नाव बहुदा नीलकंठ असावे ). त्यानी शिवाजी महाराजांना गडावर येण्याची विनंती केली. महाराजांनी शिबंदी बरोबर असल्यामुळे वर येण्याची असमर्थथा दाखविली. किल्लेदाराने गडाला शिबंदी काही जड नाही असे खात्रीपूर्वक सांगितले. अखेर महाराज शिबंदीसह गडावर पोहोचले.
त्यांच्या बरोबर किल्लेदारचे दोन बंधूही होते. त्यांना पाहताच किल्लेदाराच्या कपाळावर आठ्या पडल्या. तिघे भाऊ महाराजांना भेटायला गेले. महाराजांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले, हा मामला त्यांचा घरचा आहे तो त्यांनीच सोडवावा. महाराज स्वतः त्यामध्ये काहीही दाखल घेऊ शकणार नाहीत. हे ऐकल्यावर किल्लेदार खुश झाला आणि त्याने महाराजांना रात्रीच्या जेवणाचे आमंत्रण दिले. दोन्ही धाकटे भाऊ मात्र हिरमुसले झाले. महाराजांनी त्यांना सांगितले की कुठल्याही बोलण्याने हा किल्ला तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला जर किल्ला हवाच असेल तर मोठ्या भावाला पकडून किल्ला तुमच्या ताब्यात घ्या. एकदा किल्ला तुमच्या ताब्यात आला, तर तुम्हाला बादशहाचे पत्र मिळायला उशीर लागणार नाही.
रात्री जेवणात किल्लेदाराने भरपूर मद्य प्राशन केले. त्या अवस्थेत दोन्ही लहान भवानी त्याला उचलून बांधून ठेवले आणि सगळीकडे ते दोघे आता किल्ल्याचा कारभार पाहणार असे सांगू लागले. दुसऱ्यादिवशी सकाळी किल्लेदार शुद्धीवर आला, तेव्हा आपण कैदेत असल्याचे त्याच्या लक्षात आले पण तोपर्यंत त्याने बरच काही गमावले होते. या प्रकारात महाराजांनी स्वतःची शिबंदी वापरली नव्हती. त्या दिवशी सकाळी महाराज त्या दोन बंधूना म्हणाले चला आता दिवाळीच्या फराळासाठी वाड्यावर जाऊ आणि फराळ उरकून उद्या सकाळी परत येऊ. त्यावेळेस तुम्ही मासाहेबांशीही बोलून घ्या.
लगेचच परत यायचे असल्यामुळे फारच थोडे स्वार बरोबर घेतले आणि ते दोघे भाऊ महाराजांसोबत शिवपूरच्या वाड्यावर आले. दोघा बंधूंनी महाराजांसह भोजन केले व दुसऱ्यादिवशी ते गडाकडे जाण्यास निघाले. मुख्य द्वाराजवळ येताच दोन्ही बंधूना गडावरचे चौकी पहारे बदलेले दिसले. त्यांचे लक्ष वर गेले तेथील आदिलशाही ध्वज काढून तेथे भगवा झेंडा फडकत होता. महाराज मुख्य दरवाज्याजवळ आले असल्याचा नगारा वाजू लागला होता. दोघेही बंधू अतिशय संतापले होते. त्यांनी महाराजांना विचारले, महाराज हे काय केले? महाराज म्हणाले सोप्पं आहे चौक्या पहारे आमचा आहे, ध्वज आमचा आहे तुमची सर्व शिबंदी कैदेत आहे आणि आता हा किल्ला आमचा आहे,.
दोघेही बंधू महाराजाना रागावून म्हणाले की, तुम्ही आम्हाला दगा दिलात. दिवाळीचे निम्मित काढून किल्ला ताब्यात घेतलात. महाराजांनी आपल्या सैनिकांना दोघा बंधूंच्या मुसक्या आवळण्यास सांगलीतले. तुम्हीच तुमच्या मोठ्या भावाला दगा आणि कैदेत टाकले, तुमच्या घरी तुम्ही कलह माजवलेत. किल्ल्याबाहेर पडताना तुम्ही किल्ल्याची कोणतीही काळजी घेतलेली नाही. मी दगा दिला नाही मी फक्त राजकारण केले. आता तुम्ही तिघा बंधूनी गड सोडून खाली जावे . तुमची वतने तुम्हाला मिळण्याची मी व्यवस्था करेन. तुम्ही तिघेही भाऊ आपसात विचार करून ठरवा असे म्हणून मोठ्या भावाला तेथे आणण्याची आज्ञा दिली.
मोठा भाऊ तेथे येताच संतापाने तो दोन्ही भावांशी भांडू लागला. महाराजांनाही त्याने अपशब्द वापरले. महाराज शांतपणे आपल्या सैनिकाला म्हणाले त्या तिघांनाही एकाच कोठडीत ठेवा आणि त्याची भांडणे संपली कि माझ्या सामोर आणा . त्याप्रमाणे त्या तिघांनाही कोठडीत बंद केले गेले. येसाजी कंक ने महाराज येण्यापूर्वी सर्व शस्त्रे , दारुगोळा ताब्यात घेतले होते. महाराज स्वतः गडाची पाहणी करण्यासाठी आणि व्यवस्था बघण्याकरिता निघून गेले.
संध्याकाळ होईपर्यत गडाच्या रक्षणाकरिता अजून फ़ौज आलीच होती. गडावरच्या अदिलशाही सेनेपैकी काहींनी महारांजवळ काम करण्याची इच्छा व्यक्त केले. ज्यांना सोडून जायचे होते त्या सर्वाना गडाबाहेर जाण्याची मुभा देण्यात आली. त्याचप्रमाणे शिलेदारांना पागेतून घोडी देण्याचीही परवानगी देण्यात आली.
तिघेही भाऊ संध्याकाळी मान खाली घालून त्यांच्या समोर आले. महाराज त्यांना म्हणाले हा सर्व परिणाम तुमच्यातल्या भांडणाचा आहे. तुम्ही न भांडता जर तुमची वतने वाटून घेतली असती तर हा प्रसंग आला नसता . आता किल्ला तर गेलाच आहे पण वतने तरी नीट वाटून घ्या. वतनांवर राहून स्वराज्याशी एकनिष्ठ राहा. जर दगाबाजी केलीत तर तुमची वतनेही खालसा होतील. हे ऐकून तिघें बंधू गडाखाली आपापली वतने सांभाळायला निघून गेली. अशा रीतीने रक्ताचा एकही थेंब न सांडता पुरंदर सारखा बलाढ्य गड स्वराज्यात आला.
हे माहीत नव्हते.
हे माहीत नव्हते.
सध्या नाथमाधव यांचं
सध्या नाथमाधव यांचं 'स्वराज्याची घटना' वाचतोय. त्यात हाच प्रसंग थोड्या वेगळ्या पध्दतीने लिहिला आहे..
मी वाचलेलं त्याप्रमाणे नीलकंठ
मी वाचलेलं त्याप्रमाणे नीलकंठ यांच्या ताब्यात होता किल्ला तो त्यांनी महाराजांना फत्तेखानाच्या फोजेविरुद्ध वापरायला दिला होता, याच लढाईत बाजी पासलकर मारले गेले जेव्हा लढाई मैदानावर पांगत गेली. महाराजांना मोठा विजय मिळाला. ही खऱ्या अर्थाने स्वराज्याची पहिली मोठी लढाई होती.
त्यानंतर नीलकंठराव वारल्यानंतर त्यांच्या मुलांच्यात भांडणे सुरू झाली. महाराजांना त्या सर्वांना स्वराज्यात सामील करायचे होते तसे त्यांनी समजुतीने सांगून पाहिले पण यांच्या भांडणात हे मूर्खपणा करून इतका बुलंद किल्ला शत्रूच्या घशात घालतील याची जाणीव झाल्याने किल्ला ताब्यात घेतला आणि मुलांना वतने लावून दिली.
आशुचँप, मलाही हीच गोष्ट
आशुचँप, मलाही हीच गोष्ट माहितीय.