रामेश्वर - एक रामेश्वर स्थापनेची सुरस कथा.
वाल्मिकी रामायण सोडून इतर अनेक रामायणे आहेत. अगदी आत्तापर्यंतच्या गीत रामायणापर्यंत.
स्कंद रामायण, अध्यात्म रामायण, रामचरितमानास , अनेक भाषांतील अनेक रामायणे आणि माहित नसलेल्यात अनेक कथा या रामायणातून आहेत.
रामेश्वर - एक रामेश्वर स्थापनेची सुरस कथा.
रावणावर विजय मिळवावा या हेतूने श्री रामाने स्वारीपूर्वी शिवलिंगाची स्थापना करण्याचे ठरविले. स्थापनेची सर्व तयारी तर झाली, पण नंतर सुग्रीवाच्या असे लक्षात आले कि दंडकअरण्य आणि त्याच्या दक्षिणेला आता कोठेही पुरोहित मिळणे शक्य नाही. पुरोहिताशिवाय पूजा शक्यच नव्हती.
बराच वेळ विचार केल्यावर राम म्हणाला 'अरे सुग्रीवा असा एक जण येथे आहे. वेदशास्त्र संपन्न, तपस्वी आणि पौरोहित्य जाणणारा आपल्या जवळच एक आहे. त्याला आपण विचारून बघू '.
सगळे जण रामाकडे आश्चर्याने पाहू लागले. त्यांचे चकित झालेले चेहरे पाहून राम म्हणाला ' आपण या पूजेकरता पुरोहित म्हणून रावणाला बोलावणे पाठवू. कारण तो वेदशास्त्र संपन्न आणि सर्वज्ञ आहे आणि पूजेकरता बोलावल्यास तो ब्राम्हण कुळातला असल्यामुळे नकार देणेही शक्य नाही '.
शेवटी सर्वानुमते हनुमान परत रावणाच्या दरबारात गेला. परत त्याने आपल्या शेपटीचे सिव्हासं केले आणि रावणाला रामाचा निरोप सांगितला . रावण विचारात पडला. त्याने अगोदर ज्ञान संपन्न असूनही पौरोहित्य कधी केले नव्हते. पण त्याला आमंत्रण नाकारणेही धर्म संमत नव्हते. अखेर तो हनुमानाबरोबर पूजेच्या ठिकाणी आला.
पूजेची सर्व तयारी पाहून तो प्रसन्न झाला. मग तो रामाला म्हणाला ' सर्व साधन सामग्री तर तयार आहे पण पूजा केल्यावरही पूजेचे फल मिळणार नाही . कारण ही पूजा जोडप्यांनी केल्यासच फलप्राप्ती होईल'. सर्वजण विचारात पडले. राम एकपत्नीव्रत असल्यामुळे तो दुसरे लग्न करणे ही शक्य नव्हते आणि पूजा तर रामालाच करायला हवी होती .
शेवटी राम रावणाला म्हणाला ' हि अडचण आहे खरी पण पुरोहित म्हणून तुम्हीच काहीतरी उपाय सांगा.
थोडासा विचार करून रावण म्हणाला ' एक उपाय आहे , या पूजेसाठी मी सीतेला घेऊन येईन आणि पूजा झाल्यावर तिला परत घेऊन जाईन , पण मला एक वचन हवे आहे कि सीतेला परत नेताना कोणीही कसलाही प्रतिबंध करू नये '
सर्वांतर्फे रामाने तसे वचन दिले. पूजेकरिता रावण सीतेला घेऊन आला आणि अत्यंत व्यवस्थित पूजा पार पडून, शिवलिंगाची स्थापना झाली. स्वतःच्या नाशाकरिता पूजा आहे हे माहित असूनही रावणाने यथासांग पुरोहित्य केले.
पुरोहिताला दक्षिणा देणे पूजेतील महत्वाचा विधी असतो त्याप्रमाणे रामाने रावणाला दक्षिणेबद्दल विचारले. रावण विचारात पडला. शेवटी विचारांती तो म्हणाला ' रामा ! तूच माझा वध कर आणि मी मरताना तूच माझ्या जवळ असला पाहिजे.' असे म्हणून रावणाने हात पुढे केला आणि रामाने दक्षिणे करता अर्ध्य त्याच्या हातावर टाकल्यावर तो सीतेला घेऊन परत गेला.
रामेश्वर - एक रामेश्वर स्थापनेची सुरस कथा
Submitted by अविनाश जोशी on 26 August, 2024 - 07:07
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान कथा.
छान कथा.
सुरस कथा.
सुरस कथा.
हसावं की रडावं अशी इल्लॉजिकल
शेवट सुंदर आहे.