रामायण - एक राजकीय प्रवास – भाग ४

Submitted by अविनाश जोशी on 23 August, 2024 - 07:29

रामायण - एक राजकीय प्रवास – भाग ४
राम साधरणतः दक्षिण दिशेला जाताना त्यांचा पश्चिम किनारपट्टीवरून फारसा प्रवास झाला नाही . प्रवास बहुतांश मध्य भागातून अथवा पूर्व किनारपट्टीवरून झाला. याचे महत्वाचे कारण म्हणजे, फार पूर्वी हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष या दोघं भावांना दक्षिण भागात प्रचंड सोनाच्या खाणी मिळाल्या . हिरण्यकश्यपूचा वध विष्णू अवतारात झाला आणि हिरण्याक्षाचा वध विष्णूनी केला. हिरण्य म्हणजे सोने यावरूनच त्या दोघांना ती नावे मिळाली असावी. हिरण्यकश्यपाचा पुत्र प्रल्हाद गादीवर आला. प्रल्हाद विष्णुभक्त होता आणि त्याच्या मुळेच नरसिंह रूपात हिरण्यकश्यपाचा वध झाला. या वेळेस इंद्राने प्रल्हादकडे संपत्तीचा भाग मागितला. प्रल्हादाने काही प्रमाणात मागणी मान्य केली. परंतु इंद्राच्या लोभामुळे विष्णूने प्रलहादचा वध केला. त्यानंतर विरोचन आणि महाबली राज्यावर आले. आजही केरळमध्ये महाबलीची पूजा केली जाते. हिरण्यकश्यपूपासून बळीराजा पर्यंत सर्वानीच समुद्री व्यापाराला महत्व दिले आणि स्वतःचे आरमार वाढवले. या व्यापारात सोने, हिरे, हस्तिदंत अशा अनेक मौल्यवान वस्तू असायच्या. कुबेराची स्वतःची अनेक जहाजे असून तो त्या व्यापारावरच श्रीमंत झाला होता. असुर राज्यांचा जरी वध झाला तरी केरळ आणि पश्चिम किनाऱ्यावर असुरांचे प्राबल्य होते. रावणाने सुद्धा समुद्र मार्गाने जाऊन लंका जिंकली होती. एवढेच नव्हे तर मंदोदरीबरोबरीच्या लग्नासाठी तो समुद्र मार्गे राजस्थान मधील भागात गेला होता असा उल्लेख आहे. या सर्व साखळीमुळे रामाने आणि ऋषींनी पश्चिम किनारा आणि सागरी मार्ग त्याज्य ठरिवले. त्यांचे मुख्य उद्दिष्ट असुरांचा बोलविता धनी नष्ट करण्याचे होते. त्याचप्रमाणे त्यांना दक्षिणेत मित्र सत्ता हवी होती.
त्याकाळी साधारणतः नर्मदा नदी ही आर्यावर्ताची दक्षिण सीमा मानली जायची शेवटचे माहिष्मतीचे राज्य सहस्त्रअर्जुनाकडे होते.या वेळेपर्यंत रावणाने आपल्या साम्राज्यात अंदमान, निकोबार, सिंगापूर, मलेशिया आणि इंडोनेशियाची काही बेटे येथे साम्राज्य समावेश केला . राम लक्ष्मणाकडे प्रचंड दिव्यास्त्रे जमली होती. पण त्यांचा प्रभाव त्यांना पाहता आला नव्हता. सर्वच बलाढ्य राष्ट्रे आपल्याकडील अति प्रगत शस्त्रास्त्रांचा उपयोग छोट्या राष्ट्रांच्या युद्धातच करतात. गेल्या शतकात अमेरिकेने व्हिएतनाम, इराक, अफगाणिस्थान मध्ये तर रशियाने अफगाणिस्थान, क्रिमिया मध्ये आणि सध्या युक्रेन मध्ये चालवला आहे. . ..... अपूर्ण .......

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users