AI करेल ना बे

Submitted by समीर on 18 June, 2024 - 16:08

या अधिवेशनात एक काम नक्की करा. सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच, यावर्षी बी एम एम ने एक वेगळा विज्ञान/तंत्रज्ञानावर माहितीपूर्ण ‘AI करेल ना बे’ नावाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यात अवश्य सहभागी व्हा!

नक्की काय असणार आहे ह्या कार्यक्रमात?
कृत्रिमप्रज्ञा (Artificial Intelligence) म्हणजे काय? जर यंत्र स्वतः विचार करू लागलं, तर त्याचे फायदे / तोटे काय होतील? समाजावर काय परिणाम होऊ शकतात? या क्षेत्रात नक्की काय संशोधन सुरु आहे? त्याचे दूरगामी परिणाम काय होतील? या सगळ्यावर या क्षेत्रात काम करणारे काही मराठी शास्त्रज्ञ चर्चा करणार आहेत.

तुमच्या मनात याविषयी काही प्रश्न असतील तर त्याला या कार्यक्रमात सहभागी शास्त्रज्ञ उत्तरे देतील. ते प्रश्न तुम्ही कार्यक्रमापूर्वी खालील QR code वापरून कळवू शकता, म्हणजे प्रत्यक्ष कार्यक्रमात आम्ही त्यांची दखल घेऊ. हा कार्यक्रम interactive असणार आहे - आणि विज्ञानासंबंधी आस्था असणाऱ्या प्रत्येकानं त्यात सहभागी व्हावं! खालील QR code स्कॅन करा आणि तुमचा प्रश्न आमच्याकडं पाठवा.
QR Code_0.png

कार्यक्रमाची तारीख: २८ जून २०२४
वेळः संध्याकाळी ४:३०
स्थळः San Jose Convention Center, CA
कार्यक्रम मराठी व इंग्रजी दोन्ही भाषामिश्रित असेल याची कृपया नोंद घ्यावी.

पॅनेलः
आशिष महाबळ - कॅलटेक - अ‍ॅस्ट्रोनॉमी
अनुराग मैराल - स्टॅनफर्ड - हेल्थकेअर
ज्योतिर्मय देशमुख - USC - Cyber Physical Safety

याशिवाय अभिजित महाबळ सुरुवातीला AI आणि त्यावरचे bias याबद्दल बोलणार आहे.

या कार्यक्रमात काही मायबोलीकरही सहभागी होणार आहेत. (आस्चिग, अनुदोन, समीर, सुप्रिया, वैभव)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पॅनेलः
आशिष महाबळ - कॅलटेक - अ‍ॅस्ट्रोनॉमी
अनुराग मैराल - स्टॅनफर्ड - हेल्थकेअर
ज्योतिर्मय देशमुख - USC - Cyber Physical Safety

याशिवाय अभिजित महाबळ सुरुवातीला AI आणि त्यावरचे bias याबद्दल बोलणार आहे.

हे Panel discussion online बघायला मिळेल का? Or can someone post video of this?

मंदार,
व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न नक्किच करू.

>>व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न नक्किच करू.<<
हा पेड इवेंट असल्याने टिपिकली त्याचं कवरेज पब्लिक डोमेनला टाकत नाहित. इट वुड बि ग्रेट इफ यु कुड पुल इट ऑफ...

>व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न नक्किच करू.<<
हा पेड इवेंट असल्याने टिपिकली त्याचं कवरेज पब्लिक डोमेनला टाकत नाहित>> पण हा एकदाच होणारा कार्यक्रम असेल म्हणजे त्याचे अजून प्रयोग होणार नाहीत.. त्यामुळे शक्य होईल असे वाटते.

<< हा पेड इवेंट असल्याने टिपिकली त्याचं कवरेज पब्लिक डोमेनला टाकत नाहित. >>

कदाचित live-streaming करणार नाहीत, पण नंतर उपलब्ध करू शकतील. उदा. YouTube वर Bogleheads conference 2023 शोधून बघा. (Paid event).

>> पण नंतर उपलब्ध करू शकतील. <<
पुर्वि संपुर्ण कार्यक्रमाची डिविडि विकायचे; आता कल्पना नाहि. बिएमएमची पॉलिसी बदलली असल्यास युट्युब अप्लोड शक्य आहे...

AI चा विकास होणार आणि वापर वाढणार तेव्हा कौतुक ओसरेल.

कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रतिसाद आणि उत्तरं कृत्रिमच राहतात. शेवटी यांचा कंटाळा येऊन लोक लंगड्या बुद्धिमत्तेकडे वळतील. किंवा "या फोटोत कोणतेही फेरफार/एडिटींग केले नाही" याप्रमाणे "या उत्तरात कृ.बु.चा वापर नाही " अशी पुस्ती जोडावी लागेल.

<< शेवटी यांचा कंटाळा येऊन लोक लंगड्या बुद्धिमत्तेकडे वळतील. >>

शक्यता कमी आहे, पण असे स्वप्न बघायला आणि स्मरणरंजन करायला हरकत नाही.

मी हा कार्यक्रम बघितला पण दुर्दैवानं पूर्ण कार्यक्रम नाही बघता आला. पण जेव्हढा बघितला तेव्हढा अतिशय माहितीपूर्ण होता. वक्ते त्यांच्या क्षेत्रात निष्णात होते.

मुळात त्या सगळ्या मनोरंजक कार्यक्रमांच्या गर्दीत यासारखे १-२ कार्यक्रम होते हे च खूप चांगले वाटले.

धन्यवाद छंदीफंदी. खरंतर अधिवेशनात अश्या स्वरुपाचे अजून कार्यक्रम व्हायला हवेत. सुरुवात तर झाली आहे. पुढे काय प्रगती होतेय ती पाहू.

उपाशी बोका - व्हिडिओ केला आहे. त्यात अजुन क्रेडीट्स वगैरे टाकयचे असल्याने अजून प्रकाशीत केला नाहि.

कार्यक्रमातील काही प्रकाशचित्रे

AI BMM panel.JPGAI BMM upsthiti.JPGAI BMM patraparichay.JPG
ज्योतिर्मय देशमुख, सुप्रिया जोशी, अनुराग मैरळ, अभिजीत महाबळ, गौतम पंगू, आशिष महाबळ, समीर सरवटे, कार्तीक गुप्ते, अनु महाबळ

छान.
गौतम पंगू यांच्या कथा दिवाळी अंकांमधून वाचल्या आहेत. आवडल्या आहेत.

संपूर्ण व्हिडीओ बघितला आणि आवडला.
अतिशय महत्त्वाचा मुद्दा शेवटच्या २ मिनिटात विचारला गेला आहे आणि त्याच्यावर फारशी चर्चा झाली नाही.
AI ची मॉडेल्स, अल्गोरिदम वगैरे ज्ञान ह्या निवडक कंपनीच्या/लोकांच्या हातात एकवटले जाण्याचा आणि हे ज्ञान पेवॉलच्या मागे बंदिस्त ठेवण्याचा मोठ्ठा धोका दिसत आहे. तसेच intellectual प्रॉपर्टी (IP) आणि copyright चा सढळ हस्ते उपयोग होणार हे स्पष्ट दिसत आहे, त्यामुळे या क्षेत्राचे पण enshittification व्ह्यायला वेळ लागणार नाही.

कुणी काहीही म्हणो, पण आर्टिस्ट, लेखक, चित्रकार, संगीतकार यांना धक्का बसणार हे उघड आहे. त्यामुळे तेसुद्धा बौद्धिक संपदा आणि copyright चा सढळ वापर करणार हे उघड आहे.

पॅनलमधील लोक स्वतः: AI क्षेत्रात काम करत असल्यामुळे AI ची दुसरी बाजू समजावून घेण्याबद्दल अधिक चर्चा व्ह्यायला हवी होती, असे वाटले. मायक्रोसॉफ्टने मॉडेल शिकण्यासाठी लोकांच्या private repositories या Github वरून बेधडक वापरल्या, Sam Altman आणि OpenAI यांची हाणामारी, Y combinator आणि तत्सम private equity यांनी सध्या AI मध्ये ओतलेला अफाट पैसा हा इतिहास आहे. सध्या तरी हा प्रकार किंचित डॉट कॉम बबल सारखा आहे काय? अशी काळजी वाटते. त्यामुळे मी स्वतःतरी AI बद्दल cautiously optimistic आहे.

संदर्भ: Internet Enshittification